Maharashtra Live Updates : पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर विचित्र अपघात, वाहतूक काही काळासाठी ठप्प
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE
Background
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
राज्यभरात पावसाचा अंदाज -
आज विदर्भात बूऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटात पावसाचा अंदाज आहे. तर कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाची शक्यता. तर उत्तर महाराष्ट्रातील अहमदनगर, नाशिक आणि पुण्यात गारपिटीचा इशारा. मराठवाड्यातील तीन जिल्ह्यांनाही गारपिटीचा हवामान खात्याचा इशारा. नांदेड, परभणी आणि हिंगोलीत जोरदार गारपिट होईल असा अंदाज व्यक्त केला असल्यामुळं फळबागांची काळजी घेण्याच आवाहन करण्यात आले आहे.
रिफायनरी विरोधक आणि प्रशासनामध्ये आज बैठक -
रिफायनरी विरोधक आणि प्रशासनामध्ये आज बैठक होणार आहे. या बैठकीनंतर आंदोलनाची पुढची दिशा ठरणार आहे. प्रशासन आणि विरोधक यांच्यात झालेल्या बैठकीनंतर आजच्या बैठकी बाबत निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळे या बैठकीत काय होतय हे पहाणं महत्वं आहे.
किसान सभेच्या मोर्च्याचा दुसरा दिवस -
शिर्डी – किसान सभेच्या मोर्च्याचा आजचा दुसरा दिवस आहे. महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या लोणीतील कार्यालयावर विविधी मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात येत आहे. वाढत्या उन्हाचा पारा पहाता पोलिसांनी मोर्चाला परवाणगी नाकारली आहे, मात्र मोर्चावर किसान मोर्चा ठाम आहे. काल संध्याकाळी 5 वाजता मोर्चाला सुरूवात झाली. मुक्कामानंतर आज पुन्हा एकदा हे शेतकऱ्यांच लाल वादळ सुरू होईल. सर्व काळजी घेत मोर्चेकरी आपल्या मागण्यांसाठी चालत आहेत.
रुग्णालयाचे लोकार्पण, मोहन भागवत-एकनाथ शिंदे एकाच मंचावर
नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट या अद्ययावत रुग्णालयाचा लोकार्पण होणार सरसंघचालक डॉ मोहन भागवत यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहे. नागपूरातील जामठा परिसरात उभारण्यात आलेला 470 बेडचा अत्याधुनिक नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. सुरुवातीला धरमपेठ परिसरात अत्यंत छोट्या स्वरूपात सुरू झालेला हे रुग्णालय आता मोठ्या प्रमाणात सुरू होणार आहे. धर्मादाय पद्धतीने चालणारा हे देशातील सर्वात मोठे कॅन्सर रुग्णालय असणार आहे. नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटच्या लोकार्पणासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा कालच नागपुरात दाखल होणार होते. मात्र काही कारणास्तव सकाळच्या वेळेत नागपुरात येणार आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अमित शहा यांची भेट आज सकाळी मुक्काम असलेल्या हॉटेलमध्ये किंवा कार्यक्रम स्थळी होणार आहे.
कोल्हापुरात महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धा -
कोल्हापूर – कोल्हापुरात महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धा सुरू आहेत या स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी म्हणजे आज खासदार बृजभूषण सिंह येणार आहेत. यांना विरोध करण्यासाठी कोल्हापुरातील विविध संघटनांच्या महिला एकत्र येणार आहेत. बृजभूषण सिंह यांच्यावर खेळाडूंचा लैंगिक अत्याचार केल्याचे आरोप आहेत. त्यामुळे अशा व्यक्तीला कुस्तीच्या पंढरीत येऊ देणार नाही. अशी भूमिका विविध संघटनाने केला आहे.
मुंबई – आयटी काद्यातील नवी दुरूस्ती व्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घालत थेट मुलभूत अधिकारांवर गदा आणणारी असल्याचा आरोप करणाऱ्या याचिकेवर आज हायकोर्टात सुनावणी होत आहे. हास्यकलाकार कुणाल कामराची याचिका हायकोर्टानं सुनावणीसाठी दाखल करून घेतली आहे. एखाद्या राजकीय घडामोडीवर व्यंगात्मक टिपणी किंवा त्याचं प्रहसन सादर करण्यावरही या कायद्यानं आता कारवाई होई शकते. याची गंभीर दखल घेत हायकोर्टानं आज यावर तातडीच्या दिलाश्याकरता सविस्तर सुनावणी होणार आहे.
Pune Expressway: पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर विचित्र अपघात, वाहतूक काही काळासाठी ठप्प
पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर विचित्र अपघात झालाय. अनेक वाहनं एकमेकांना धडकली आहे. एक चारचाकी तर अक्षरशः दुसऱ्या वाहनावर उभी आहे. खोपोली एक्झिट जवळ काहीवेळा पूर्वी हा अपघात झालाय. सुदैवाने यात कोणती जीवितहानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती आहे. काही जखमींना रुग्णालयात भरती केलं जातंय. वाहतूक काही काळासाठी ठप्प आहे.
Alibaug News: अलिबागचे शिवसेना आमदार महेंद्र दळवींना हायकोर्टाचा मोठा दिलासा
Alibaug News: अलिबागचे शिवसेना आमदार महेंद्र दळवींना हायकोर्टाचा मोठा दिलासा दिला आहे. साल 2013 च्या हाणामारी प्रकरणात दळवींना झालेल्या 2 वर्षांच्या शिक्षेला हायकोर्टाकडून स्थगिती देण्यात आली आहे. दोन वर्षांची शिक्षा झाल्यानं दळवींची आमदारकी धोक्यात आली होती. महेंद्र दळवी हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे समर्थक आमदार आहेत.
अलिबागचे शिवसेना आमदार महेंद्र दळवींना हायकोर्टाचा मोठा दिलासा, 2013 च्या हाणामारी प्रकरणात झालेल्या 2 वर्षांच्या शिक्षेला हायकोर्टाकडूून स्थगिती
Relief To Mahendra Dalvi : अलिबागचे शिवसेना आमदार महेंद्र दळवींना हायकोर्टाचा मोठा दिलासा
साल 2013 च्या हाणामारी प्रकरणात दळवींना झालेल्या 2 वर्षांच्या शिक्षेला हायकोर्टाकडूून स्थगिती
2 वर्षांची शिक्षा झाल्यानं दळवींची आमदारकी आली होती धोक्यात
महेंद्र दळवी हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे समर्थक आमदार
अलिबागचे शिवसेना आमदार महेंद्र दळवींना हायकोर्टाचा मोठा दिलासा, 2013 च्या हाणामारी प्रकरणात झालेल्या 2 वर्षांच्या शिक्षेला हायकोर्टाकडूून स्थगिती
Relief To Mahendra Dalvi : अलिबागचे शिवसेना आमदार महेंद्र दळवींना हायकोर्टाचा मोठा दिलासा
साल 2013 च्या हाणामारी प्रकरणात दळवींना झालेल्या 2 वर्षांच्या शिक्षेला हायकोर्टाकडूून स्थगिती
2 वर्षांची शिक्षा झाल्यानं दळवींची आमदारकी आली होती धोक्यात
महेंद्र दळवी हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे समर्थक आमदार
Accident News: दारू पिऊन भरधाव वेगात दुचाकी चालवत महिलेसह तिच्या मुलाला दिली धडक
Accident News: दारू पिऊन भरधाव वेगाने दुचाकी चालवणाऱ्या एका 22 वर्षीय तरुणाने महिलेसह तिच्या मुलाला धडक दिली. यामध्ये महिलेचा जागीच मृत्यू तर सहा वर्षीय बालक गंभीर जखमी झाला आहे. संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद तर 22 वर्षीय आरोपी दुचाकीस्वार समर्थ कदमची अटक करण्यात आलयं.