Maharashtra News Live Updates : अखेर नऊ तासांच्या चौकशीनंतर जयंत पाटील ईडी कार्यालयातून बाहेर

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 22 May 2023 11:01 PM
Beed News : बीड: केज अंबाजोगाई रोडवर बर्निंग कारचा थरार वायरिंगने पेट घेतल्याने संपूर्ण कार जळून खाक

Beed News:  केज अंबाजोगाई रोडवर धावत्या कारमध्ये बिघाड झाल्याने आग लागली. यामध्ये संपूर्ण कार जळून खाक झाली आहे. ही कार अंबाजोगाईवरून केजकडे येत होती. त्यावेळी अचानक कारने पेट घेतल्याने लागलेल्या आगीत संपूर्ण कार जळून खाक झाली. सुदैवाने यामध्ये कुठलीही जीवित हानी झाली नाही. 

Jayant Patil: अखेर नऊ तासाच्या चौकशीनंतर जयंत पाटील ईडी कार्यालयातून बाहेर पडले; कार्यकर्त्यांचा गराडा

Jayant Patil: राष्ट्रवादीचे अध्यक्ष जयंत पाटील यांची आज तब्बल 9 तास चौकशी करण्यात आली. चौकशीनंतर जयंत पाटील ईडी कार्यालयाबाहेर आल्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. 

Pune Rains: पुणे: वादळी वाऱ्यासह बारामती शहर आणि परिसरात अवकाळी पावसाला सुरुवात

Pune News: पुणे:  आज सायंकाळी बारामती शहर आणि परिसरात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाला सायंकाळी सात वाजता सुरुवात झाली. गेल्या काही दिवसापासून या परिसरात उन्हाची तीव्रता वाढली होती. त्यामुळे उकाडा  मोठ्या प्रमाणात जाणवत होता. आज सायंकाळी वातावरणात बदल होऊन ढगाळ वातावरण तयार झाले आणि सात वाजता वादळी वाऱ्यासह रिमझिम पावसाला सुरुवात झाली.

सोलापूर: पंढरपूरात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस मान्सूनपूर्व पावसाची हजेरी; फळपिकांचे नुकसान

Maharashtra Rains: सोलापूर: मान्सुनपूर्व पावसाने पंढरपूर शहर व तालुक्यात हजेरी लावली आहे. सोमवारी सायंकाळी ५ च्या सुमारात वादळी वा-यासह गारांचा पाऊस झाल्याने फळपिकांचे नुकसान झाले आहे. तर वेळेत पाऊस पडल्याने खरीपाच्या पेरणीचा वेग वाढणार आहे. शहर व तालुक्यात झाडे उन्मळून पडल्याने वाहतुक विस्कळीत झाली होती.

जयंत पाटील यांची चौकशी सुरूच

मागील 8 तासांपासून राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची चौकशी सुरूच


दुपारी सव्वा बारा पासून जयंत पाटील ईडी कार्यालयात

Thane Crime: भाईंदर: 42 किलो गांजासह तिघांना अटक, काशिमीरा पोलिसांची कामगिरी

Thane Crime News:  काशिमीरा पोलिसांनी घोडबंदर टोल नाक्याजवळ सापळा रचून 42 किलो गांज्यासह तीन आरोपींना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या तीन आरोपीपैकी एक आरोपी मुंबईचा रहिवासी असून उर्वरित दोन आरोपी नायगांव आणि वसई येथील रहिवासी आहेत.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या आरोपींविरुद्ध एनडी पीएस अॅक्टनुसार मुंबईतही गुन्हे दाखल आहेत. आरोपींकडून जप्त करण्यात आलेल्या 42 किलो गांजाची किंमत सुमारे पाच लाख रुपये आहे. काशिमीरा पोलिसांनी अटक आरोपींविरुद्ध  एनडीपीएस अॅक्टनुसार गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे. 


 

समीर वानखेडेवर केलेल्या आरोपांची किंमत नवाब मलिक यांना चुकवावी लागली: शरद पवार

समीर वानखेडेवर केलेल्या आरोपांची किंमत नवाब मलिक यांना चुकवावी लागली: शरद पवार 

भंडारा कृषी उत्पन्न बाजार समितीवर भाजप-शिवसेना-राष्ट्रवादीचा ताबा; लाखनीनंतर काँग्रेसचा दुसरा दारुण पराभव

Bhandara News : मागील 15 वर्षांपासून काँग्रेसच्या ताब्यात असलेल्या भंडारा कृषी उत्पन्न बाजार समितीवर भाजपचा सभापती तर, शिवसेनेचा उपसभापती निवडून आला. 18 संचालक असलेल्या बाजार समितीत काँग्रेसचे 9 संचालक तर, भाजप-शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी काँग्रेसचे 9 संचालक निवडून आले आहेत. अत्यंत अटीतटीच्या झालेल्या या निवडणुकीत काँग्रेसच्या गटातून निवडून आलेल्या विवेक नखाते यांना भाजपने सभापतीपदाची ऑफर दिली. यामुळे नखाते यांनी काँग्रेसला सोडून ऐनवेळी भाजपा गटात प्रवेश करुन सभापतीपदाची खुर्ची मिळवली. तर, उपसभापती पदाच्या निवडणुकीत शिवसेना (शिंदे गटाचे) नामदेव निंबार्ते यांचा विजय झाला. या निवडणुकीत 9-9 संचालक दोन्ही बाजूचे निवडून आले असले तरी, ऐनवेळी काँग्रेसच्या एका संचालकाला फोडून भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर कुरघोडी केल्याचे या निवडणुकीतून बघायला मिळाले. दोन दिवसांपूर्वी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा त्यांच्याच मतदारसंघाच्या लाखनी बाजार समितीवर भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसच्या मदतीने सभापती आणि उपसभापतीपदाची निवडणूक जिंकली आहे, हे विशेष.

समीर वानखेडे यांना CBI चं समन्स, 24 मे रोजी पुन्हा चौकशीसाठी बोलावलं

Sameer Wankhede CBI Inquiry : समीर वानखेडे यांना CBI चं समन्स


24 मे रोजी बोलावलं पुन्हा चौकशीसाठी


BKC च्या CBI कार्यालयात होणार चौकशी


दिल्ली CBI अधिकाऱ्यांची टीम करणार चौकशी

परभणीतील पाथरी कृषी उत्पन्न बाजार समिती राष्ट्रवादीच्या ताब्यात

Parbhani News : परभणी जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या परभणीच्या पाथरी कृषी उत्पन्न बाजार समितीवर अखेर राष्ट्रवादीचे आमदार बाबाजानी दुर्रानी यांचंच वर्चस्व पाहायला मिळाले आहे. आज झालेल्या निवडणुकीत सभापतीपदी अनिल नखाते तर उपसभापतीपदी श्याम धर्म यांची निवड करण्यात आली. आज दुपारी 1 वाजता यासंदर्भामध्ये निवडणूक प्रक्रिया पार पडली ज्यामध्ये राष्ट्रवादीच्या दोन्ही उमेदवारांना प्रत्येकी 12-12 मते पडली तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या उमेदवारांना 6 मतं पडली,  ज्यामध्ये राष्ट्रवादीच्या दोन्ही उमेदवारांचा विजय झाला. सभापती आणि उपसभापती निवड झाल्यानंतर पाथरीत राष्ट्रवादीकडून जोरदार जल्लोष साजरा करण्यात आला.

Parbhani News: सभापती,उपसभापती निवडीच्या सभेत जोरदार वादावादी

Parbhani News: परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती,उपसभापती निवडीच्या पहिल्याच सभेत जोरदार खडाजंगी झाल्याचे पाहायला मिळालं निवडीची सभा सुरू असतानाच शिवसेनेचे खासदार संजय जाधव,आमदार राहुल पाटील सभागृहात आल्याने भाजपचे शहराध्यक्ष तथा बाजार समितीचे संचालक आनंद भरोसे यांनी तीव्र आक्षेप नोंदवत अधिकाऱ्यांना धारेवर धरले यावरूनच वाद सुरू झाला आणि शिवसेनेचे खासदार संजय जाधव आमदार राहुल पाटील आणि भाजपचे संचालक आनंद भरोसे यांच्या जोरदार खडाजंगी झाली या खडाजंगी नंतर सभापतीपदी शिवसेनेचे पंढरीनाथ घुले तर उपसभापती पदी काँग्रेसचे अजय चव्हाण यांची निवड करण्यात आली दरम्यान या पहिल्याच सभेत भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांमध्ये झालेल्या गोंधळावरून तणावाचे वातावरण बाजार समिती पाहायला मिळाले.

Matheran News: गिरीस्थान माथेरान झालं 173 वर्षांचं

सह्याद्रीच्या एका कुशीत वसलेले रायगड जिल्ह्यातील एक प्रदुषण मुक्त असे अद्वितीय पर्यटन स्थळ म्हणून माथेरानचे नाव जगाच्या नकाशावर आहे. आज या ठिकाणाला 173 वर्ष पुर्ण झाली आहेत.

मोबाईल, दागिने चोरीनंतर आता पुण्यात चक्क चप्पल चोर

पुण्यातील खडकी भागातील एका दुकानातून तब्बल 55 चप्पल आणि बूट जोड चोरट्यांनी नेले चोरून


तीन जणांनी मिळून लंपास केले 30 ते 40 हजार रुपयांचे 55 चप्पलांचे जोड


यातील 40 मेन्स शूज तर 15 लेडीज चपला चोरट्यांनी चोरल्या


हरेश आहुजा यांनी या प्रकरणात पोलिसात फिर्याद दिली होती


या चोरीचा तपास करताना पोलिसांनी सागर चांदणे, आकाश कपूर, अरबाज शेख यांना अटक केली आहे 


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आहूजा यांचे खडकी बाजार भागात चपलेचे गोडाऊन आहे. शनिवारी गोडाऊन बंद केल्यानंतर रात्री या तीन तरुणांनी गोडाऊनचे शटर उचकटून आत प्रवेश केला आणि हाताला दिसेल आणि मिळतील तसे बूट आणि चप्पल असे एकूण 55 चप्पल आणि बूट चोरी करून पसार झाले. अशिक्षित असल्यामुळे या तरुणांनी उदरनिर्वाह तसेच दारू पिण्यासाठी ही चोरी केल्याचं प्राथमिक तपासातून निष्पन्न झाले आहे. 


खडकी पोलिस ठाण्यात या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

लग्न समारंभाहून गावी परतणाऱ्या स्कार्पिओ गाडीला तेलगावजवळ अपघात, बारा वर्षांच्या मुलाचा दुर्दैव मृत्यू

Beed News : लग्नसमारंभ आटोपून गावी परत जाणाऱ्या एका स्कार्पिओ गाडीला बीडच्या तेलगाव जवळ अपघात झाला. या अपघातामध्ये एका बारा वर्षांच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. माजलगाव इथे लग्न समारंभ आटोपून चिंचपूर गावचे कुटुंबीय आपल्या गावी परतत असताना त्यांच्या स्कार्पिओ गाडीला तेलगावजवळ एका टिप्परने समोरुन जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये अक्षय हंडीबाग या बारा वर्षाच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला असून इतर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.

Pune News: पुण्यातील  विचित्र अपघाताचं सीसीटिव्ही फुटेज समोर, 2 ठार

Pune News: पुण्यातील  विचित्र अपघाताचा सीसीटिव्ही समोर


पुण्यातील उंड्री भागात झालेल्या अपघातात 2 ठार तर पाच जण जखमी 


भरधाव मिनी बसने समोर असलेल्या सहा वाहनांना धडक दिल्यामुळे विचित्र अपघात झाला


ही घटना उंड्री परिसरातील एनआयबीएम ते कडनगर रस्त्यावर रविवारी रात्री 7 वाजता घडली


एनआयबीएम ते कडनगर रस्त्यावर एक उतार आहे आणि या उतारावर बसचा ब्रेक फेल झाला. त्यामुळे ही बस उतारावरून भरधाव सुटली आणि समोर असलेल्या सहा वाहनांना धडक दिली, त्यात एका दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला


या घटनेचा आता सी सी टिव्ही फुटेज समोर आले आहे.


केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी हाती कुऱ्हाड घेऊन स्वच्छता मोहिमेत भाग घेतल्याचा व्हिडीओ व्हायरल

केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी हाती कुऱ्हाड घेऊन स्वच्छता मोहिमेत भाग घेतल्याचा व्हिडीओ सोशल माध्यमांवर व्हायरल होतोय, जालना शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या संत गाडगेबाबा तलावा भोवती असलेल्या काटेरी वनस्पती तोडत दानवे यांनी मोहिमेतील सहभागी लोकांचा उत्साह वाढवला, तलावा भोवती झुडपं आणि काटेरी वनस्पतींचा मोठा विळखा पडला असून यासाठी सामूहिक श्रमदान करण्यात आलं त्यात दानवे यांनी अशा प्रकारे श्रमदान केलं.

Mumbai News: समीर वानखेडे यांचे वकील आबाद पोंडा उच्च न्यायालयात दाखल; आयआरएस समीर वानखेडे यांची मांडणार बाजू

Mumbai News: समीर वानखेडे यांचे वकील आबाद पोंडा उच्च न्यायालयात दाखल


आयआरएस समीर वानखेडे यांची मांडणार बाजू


मे 22 पर्यंत, वानखेडे यांना कोर्टानं दिलंय संरक्षण


आज सुनावणीत कोर्टात होणार घमासान


आबाद पोंडा अत्यंत आक्रमक बाजू मांडण्यासाठी अवगत


सीबीआयचे वकीलही आक्रमक भूमिका मांडणार असल्याची माहिती

आदित्य ठाकरेंचा नागपूर दौरा, अजनी वन सेव्ह मूव्हमेंटच्या लोकांसोबत बैठक घेणार

Aaditya Thackeray in Nagpur : आज आदित्य ठाकरे नागपूरच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात बहुचर्चित अजनी वन सेव्ह मूव्हमेंटच्या लोकांसोबत बैठक घेणार आहेत. केंद्र सरकार अजनी भागात साडेपाचशे एकरमध्ये अजनी इंटर मॉडेल स्टेशन प्रकल्प उभारत आहे. यासाठी अजनी वनमध्ये असलेली झाडे तोडण्यात येणार आहेत. केंद्र सरकार म्हणते की इथे 1500 झाडे आहे तर पर्यावरणवादी म्हणतात की या संपूर्ण प्रकल्पासाठी 50 हजार झाडे तोडली जाणार आहे. सध्या अजानी वनवरुन सरकार आणि पर्यावरणवादी समोरासमोर आहेत. त्यात आता आदित्य ठाकरे यांनी देखील उडी घेतली आहे. 

दुसरं लग्न करतो असं पतीने म्हणताच पत्नीची माहेरी आत्महत्या, बीडच्या कासारी गावातील घटना
Beed News : पतीने दुसरा लग्न करत असल्याचा सांगितल्याने पत्नीने विषारी द्रव प्राशन करुन आत्महत्या केल्याची घटना धारुर तालुक्यातल्या कासारी गावात घडली आहे. याप्रकरणी विवाहितेच्या वडीलाच्या फिर्यादीवरुन पतीविरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ऋतुजा फड अस विवाहित महिलेचे नाव आहे. ती माहेरी गेलेली असताना पतीने तिला फोन केला आणि सासरी का येत नाही असं म्हणत दुसरं लग्न करतो असं सांगितल. त्यानंतर या विवाहित महिलने विषारी द्रव प्राशन करुन आत्महत्या केली आहे.

 
Jayant Patil :  राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील ईडी कार्यालयाच्या दिशेने रवाना

Jayant Patil :  राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील ईडी कार्यालयाच्या दिशेने रवाना...  IL&FS प्रकरणी ईडी जयंत पाटील यांचा आज ईडी जबाब नोंदवणार आहे. 

अमरावतीमधील मोझरी इथे आमदार यशोमती ठाकूर यांच्याकडून ग्रामीण मुला-मुलींकरता जॉब महोत्सव

Amravati News : श्री रामचंद्र युवक कल्याण संस्था आणि आमदार यशोमती ठाकूर मित्र मंडळाच्या वतीने आयोजित जॉब महोत्सवाला अमरावती, भातकुली, मोर्शी आणि तिवसा तालुक्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. इयत्ता दहावीपासून ते अभियंता आणि इतर शैक्षणिक पात्रता असलेल्या अनेक विद्यार्थ्यांनी या जॉब महोत्सवाला उत्स्फूर्तपणे उपस्थिती दर्शवली. यावेळी जॉब महोत्सवात 60 च्यावर विविध कंपन्यानी उपस्थित उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. अनेक युवक-युवतींची मुलाखती देण्यासाठी एकच लगबग सुरु होती. या जॉब महोत्सवाच्या निमित्ताने प्रथम ग्रामीण भागातील उमेदवारांना रोजगार आपल्या दारी ही संधी उपलब्ध झाल्यामुळे त्यांच्यात एक प्रचंड उत्साह दिसून येत होता. जॉब महोत्सवापूर्वी मुलाखत कशी द्यायची आणि त्यासाठी नेमकी काय तयारी करायची हे जॉब पूर्व प्रशिक्षणाचा कार्यक्रमही श्रीरामचंद्र युवक कल्याण संस्थेच्या वतीने करण्यात आला आहे. त्यामुळे याचा फायदा प्रत्यक्ष मुलाखत देताना या युवकांना निश्चितपणे होणार असून ग्रामीण भागातील युवकांना रोजगाराच्या संधीचे दालन या निमित्ताने त्यांच्याच गावात उपलब्ध झाला आहे.  रोजगाराच्या संधीच्या शोधात असलेल्या युवकांना हा रोजगार महोत्सव निश्चितपणे एक मोठा दिलासा देणारा ठरला आहे. या जॉब महोत्सवात जवळपास 5000 बेरोजगार युवक युवतींनी नोंदणी केली होती त्यापैकी 1609 युवक युवतींना नियुक्ती पत्राचे वितरण करण्यात आले..

नाशिकमध्ये सीएनजीच्या तुटवड्यामुळे पंपाबाहेर वाहनांच्या लांबच लांब रांगा, तुटवड्याचं कारण अस्पष्ट
Nashik News : नाशिकमध्ये गेल्या तीन दिवसांपासून सीएनजीचा तुटवडा जाणवत असल्याने सीएनजीधारक हे संतप्त झाले आहेत. गेले तीन दिवस सीएनजी उपलब्ध नव्हता, कालपासून थोड्यापार प्रमाणात पंपावरुन पुरवठा सुरु झाला असून पंपाबाहेर वाहनांच्या लांबच लांब रांगा बघायला मिळत आहेत. सीएनजीसाठी दोन-दोन तास वाहनचालकांना रांगेत उभ राहावं लागत आहे. यामागील कारणही अस्पष्ट असून विस्कळीत पुरवठ्यामुळे वाहनचालकांसोबतच पंपचालकही हैराण झाले आहेत. 

 
MHADA Lottery : मुंबईत म्हाडाचं घर घेणाऱ्यांसाठी खूशखबर... अर्ज नोंदणी आजपासून सुरू

MHADA Lottery : मुंबईतील म्हाडाच्या घरांसाठी आजपासून नोंदणी प्रक्रिया सुरु होणार आहे. विविध उत्पन्न गटांसाठी 4083 घरांसाठी आजपासून नोंदणी करता येणार आहे. तर दुपारी तीन वाजल्यापासून अर्ज स्विकृतीला सुरुवात होणार आहे. 12 जुलैपर्यंत अर्ज भरता येणार असून 18 जुलैला याची सोडत जाहीर होणार आहे. अत्यल्प उत्पन्न गट 2 हजार 788 सदनिका समाविष्ट आहेत. तर अल्प उत्पन्न गटात एकूण 1 हजार 34 सदनिका आहेत. यामध्ये सर्वाधिक घरं गोरेगावमधील पहाडी परिसरात आहेत.

Palghar News: पालघरमध्ये कार-बाईकचा अपघात; दोन जण जागीच ठार





Palghar News: बोईसर नवापूर रस्त्यावरील पाम येथे बाईक आणि कारचा भीषण असा अपघात झाला. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. मध्यरात्रीच्या सुमारास भरधाव कारने बाईकला जोरदार धडक दिल्याने अपघात झाला असून या अपघातात दोन्ही बाइकस्वारांचा जागीच मृत्यू झाला. नरेश बारी आणि रुपेश बारी  अशी मृतांची नाव असून या घटनेनंतर बोईसर मधील तुंगा रुग्णालय आणि पोलीस स्टेशन परिसरात नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. त्यामुळे काही काळ या ठिकाणी तणावाच वातावरण निर्माण झालं होतं.


 




Jayant Patil : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आज ईडी कार्यालयामध्ये अकरा वाजता चौकशीसाठी हजर राहणार

Jayant Patil : राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांची आज ईडी कार्यालयात सकाळी 11 वाजता चौकशी केली जाणार आहे. IL&FS प्रकरणी ईडी जयंत पाटील यांचा जबाब नोंदवणार आहे. मात्र, याप्रकरणाशी आणि आपला काहीच संबंध नसल्याचा दावा जयंत पाटील यांनी केला आहे.. दरम्यान, जयंत पाटील यांच्या ईडी चौकशीविरोधात आज मुंबईतील राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयाबाहेर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी निदर्शनं केली. तसंच, पाटलांच्या सांगली जिल्ह्यात पुणे आणि नाशिकमध्येही राष्ट्रवादीचे कार्यकर्ते  ईडीविरोधात रस्त्यावर उतरणार आहेत.  

Sindhudurg: जी-20 शिखर परिषदेअंतर्गत मालवण चिवला समुद्र किनाऱ्यावर स्वच्छता मोहीम

Sindhudurg: जी-20 शिखर परिषदेचे अध्यक्षपद भारताला मिळाल्यानंतर देशभरात मोठ्या उत्साहात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. या कार्यक्रमांतर्गत विविध क्षेत्रातील प्रगतीवर विशेष भर दिला जात आहे. याच कार्यक्रमाचा भाग म्हणून समुद्र किनारे, सागरी जैवविविधता यांचे जतन व संवर्धन करण्याबाबत जागतिक पातळीवर लक्ष वेधण्याच्या उद्देशाने जगभरातील काही निवडक समुद्र किनाऱ्यांवर स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांतर्गत मालवण येथील चीवला बीच येथे स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम समुद्राच्या स्वच्छतेची तसेच प्लास्टिकऐवजी पर्यावरण पूरक साधनांच्या वापरास प्रोत्साहन म्हणून नगरपालिकेतर्फे कापडी पिशवीचे वाटप करण्यात आले. स्वच्छता मोहिमेत शहरातील विविध संस्था, नागरिक, व्यावसायिक, व्यापारी, शासकीय कर्मचारी सहभागी झाले.

डिक्लरेशनवरून नवा संभ्रम

येत्या मंगळवारपासून दोन हजारांच्या नोटा बदलण्यास सुरूवात होणार आहे. त्याआधीच, ऑल इंडिया बँक एम्पलॉईज असोसिएशनने रिझर्व्ह बँकेला पत्र लिहिलंय. नोट बदलताना ग्राहकाकडून डिक्लरेशन घेण्याचे निर्देश आरबीआयने दिलेत. मात्र त्याचवेळी स्टेट बँकेने अशा डिक्लरेशनची गरज नसल्याचं परिपत्रक काढलंय, त्यामुळे ग्राहक आणि बँकांमध्ये गोंधळाचं वातावरण आहे. असा आरोप करत, रिझर्व्ह बँकेने यात सुसूत्रता आणण्याची मागणी ऑल इंडिया बँक एम्पलॉईज असोसिएशनने केलीय.

Raju Patil Write Letter to Raosaheb Danve : रेल्वे तिकीट बुकिंग व्यवस्थेतील दलालांवर अंकुश ठेवण्याची राजू पाटलांची पत्राद्वारे रावसाहेब दानवेंना विनंती

Raju Patil Write Letter to Raosaheb Danve : रेल्वे तिकीट बुकिंग व्यवस्था दलालांसंदर्भात मनसे आमदार राजू पाटील यांनी केंद्रीय राज्य रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे यांना पत्र पाठवले. रेल्वे तिकीट बुकिंग व्यवस्थेतील दलालांवर अंकुश ठेवण्याची विनंती राजू पाटील यांनी पत्राद्वारे केली.. सोबतच रेल्वे स्टेशनवर दलाल दिसून आले तर मनसे स्टाईलने त्यांना धडा शिकवा असं आवाहन राजू पाटील यांनी कार्यकर्त्याना केलं.

Ganeshotsav 2023: रेल्वे मंत्र्यांनी गणेशोत्सव काळात जादा गाड्या सोडाव्यात; ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांची मागणी

Ganeshotsav 2023: गणेशोत्सवासाठी दरवर्षी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची मे महिन्यापासूनच तिकीट बुकिंग करण्याची तयारी सुरु असते. मात्र यंदा ऑनलाईन तिकीट बुक करत असताना वेबसाईटवर केवळ 2 मिनिटांत बुकिंग फुल दाखवत असल्यानं चाकरमान्यांमध्ये नाराजीचा सूर पसरलाय. 2 मिनिटात बुकिंग फुल असलेत तर यंदा गावी जाण्यासाठी तिकीट मिळवायचं कसं असा प्रश्न कोकणवासियांसमोर उभा राहिलाय. दरम्यान तिकीट बुकिंगच्या या समस्येवर राजकीय नेत्यांनी लक्ष केंद्रीत केलंय. रेल्वे मंत्र्यांनी गणेशोत्सव काळात जादा गाड्या सोडाव्यात अशी मागणी ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी केलेय. 

Ajit Pawar: बारामतीत अवैध दारुविक्रीवरुन अजित पवारांची नाराजी

Ajit Pawar: बारामतीत एका कार्यक्रमावेळी अजित पवार यांनी अवैद्य दारू विक्रीवरुन पोलीस प्रशासनाला खडेबोल सुनावले. कार्यक्रमात संबोधित करताना गावात दारूबंदी करण्याबाबत अजित पवारांकडे निवेदन दिले. यावेळी आता शरद पवार, सुप्रिया सुळेंसोबत येतो आणि कुठे कुठे भट्ट्या आहेत त्या आम्हीच शोधतो. पोलीस निवांत पगार घेतील, असे म्हणत अजित पवारांनी पोलिसांवर नाराजी व्यक्त केली.

Election Commission Of India : मतदानानंतर बोटावर शाई लावण्याची पद्धत कालबाह्य होणार, निवडणूक आयोकडून लेझर चिन्हाच्या चाचण्या सुरू

Election Commission Of India : बोगस मतदान रोखण्यासाठी निवडणूक आयोग आणखी एक नवीन तंत्र अवलंबणार आहे. मतदानादरम्यान बोटावर शाईऐवजी आता लेझर चिन्हाचा वापर केला जाणार आहे. हे तंत्रज्ञान आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थात ‘एआय’ वर आधारित राहणार आहे. यावर्षी होणाऱ्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत ही नवी प्रणाली लागू केली जाऊ शकते. त्याच्या चाचण्या सध्या सुरू आहेत. लेझर तंत्रज्ञानामुळे हेराफेरी थांबेल. अनेक दिवस लेझरने बनविलेले चिन्ह काढणे जवळपास अशक्य असल्याचा दावा केला जात आहे. एवढेच नाही तर ईव्हीएममध्ये कॅमेराही बसविण्यात येणार आहे, जो मतदाराचा फोटो टिपेल. या यंत्रणेचा वापर झाल्यास शाईचा वापर कालबाह्य होऊ शकतो.

Sameer Wankhede : समीर वानखेडेंची सलग दोन दिवस पाच तास चौकशी, वानखेडेंच्या याचिकेवर आज मुंबई हायकोर्टात सुनावणी

Sameer Wankhede : एनसीबीचे मुंबई विभागाचे माजी झोनल अधिकारी समीर वानखेडे यांच्या याचिकेवर आज मुंबई हायकोर्टात सुनावणी होणार आहे.. त्यांना २२ मे म्हणजे आजपर्यंत कोर्टानं अटकेपासून संरक्षण दिलं होतं. दरम्यान, वानखेडेंचा  पाय रोजच्या रोज अधिकच खोलात जातोय. वानखेडे यांची काल दुसऱ्या दिवशीही सीबीआयने पाच तास चौकशी केली. कालच्या चौकशीत वेगवेगळी माहिती पुढे आलीय. वानखेडेंनी शाहरुख खानसोबत केलेल्या चॅटची वरिष्ठांना कधीही माहिती दिली नव्हती, असा दावा एनसीबीने केलाय. हे चॅट वानखेडेंनी न्यायालयात सादर केल्यावरच एनसीबीला त्याबद्दल समजलं. तसेच समीर वानखडे यांनी खासगी व्यक्ती के. पी. गोसावी यांच्या संदर्भात उत्तर दिलेलं नाही, याकडेही एनसीबीने लक्ष वेधलंय.

पार्श्वभूमी

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...


IPL Playoffs : आरसीबीच्या चाहत्यांच्या पदरी पुन्हा एकदा निराशा! गुजरातच्या विजयासह मुंबई प्लेऑफमध्ये दाखल


Mumbai Indians Qualified for Playoffs : आयपीएल 2023 (IPL 2023) मधील शेवटचे डबल हेडर सामने रोमांचक ठरले. मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) सनरायजर्स हैदराबादचा (Sunrisers Hyderabad) पराभव केला. त्यानंतरच्या सामन्यात गुजरात टायटन्स (Gujarat Titans) कडून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला (Royal Challengers Bangalore) पराभवाचा सामना करावा लागला. यामुळे मुंबई इंडियन्स संघाला प्लेऑफचं तिकीट मिळालं आहे. पराभवासह आरसीबी संघाचं आयपीएल 2023 मधील आव्हान संपुष्टात आलं आहे. यामुळे चाहत्यांची पुन्हा एकदा निराशा झाली आहे. 


आरसीबीच्या चाहत्यांची निराशा! गुजरातच्या विजयासह मुंबई प्लेऑफमध्ये दाखल


आयपीएल चॅम्पियन बनण्याचं आरसीबी संघाच्या स्वप्नावर पुन्हा एकदा पाणी फिरलं आहे. आयपीएल 2023 च्या प्लेऑफसाठी गुजरात, चेन्नई, लखनौ आणि मुंबई संघ पात्र ठरले आहेत. आयपीएल पॉईंट्स टेबलमध्ये गुजरात 20 गुणांसह पहिल्या क्रमांकावर आहे. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या चेन्नई संघाकडे 17 गुण आहेत. तिसऱ्या क्रमांकावर लखनौ आणि चौथ्या क्रमांकावर मुंबई संघ आहे. लखनौ संघाकडे 17 तर मुंबई संघाकडे 16 गुण आहेत. आता प्लेऑफमध्ये गुजरात विरुद्ध चेन्नई आणि दुसऱ्या सामन्यात लखनौ विरुद्ध मुंबई लढत पाहायला मिळणार आहे.


G20 Kashmir Meeting: जी 20 पर्यटन वर्किंग ग्रुपची आजपासून बैठक, श्रीनगरमध्ये तीन दिवसीय बैठकीच आयोजन


G20 Kashmir Meeting: काश्मीरमध्ये आजपासून तीन दिवसीय जी-20 बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. चीन, तुर्की आणि सौदी अरब हे बैठकीत सहभागी होणार नाहीत.  बैठकीत  25 देश सहभागी होतील अशी माहिती आहे. दुपारी 3 वाजल्यापासून बैठकीला सुरूवात होणार आहे.


श्रीनगरच्या डल लेकमध्ये  असलेल्या शेर - ए- काश्मिर इंटरनॅशनल कन्वेंशन सेंटरमध्ये (SKICC) ही बैठक होणार आहे. या बैठकीत 25 देशातील 60 पेक्षा अधिक प्रतिनिधी तसेच जवळपास 100 पेक्षा अधिक पर्यटन क्षेत्राशी जोडलेले लोक सहभागी होणार आहेत. जी20 च्या पार्श्वभूमीवर काश्मिरमध्ये कडक बंदोबदस्त ठेवण्यात आला आहे. SKICC च्या दिशेने जाणारे दोन्ही रस्ते पुढील दोन दिवसांसाठी सामान्य नागरिकांसाठी बंद ठेवण्यात आले आहे. प्रतिनिधींची संख्या पाहता सुरक्षेच्या कारणास्तव गुलमर्गचा दौरा रद्द करण्यात आला आहे. 


Wrestlers Protest: "मी नार्को टेस्टसाठी तयार, पण कुस्तीपटूंचीही..."; बृजभूषण यांनी घातली मोठी अट


Brij Bhushan Sharan Singh News: उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) गोंडा (Gonda) येथील भाजप (BJP) खासदार आणि भारतीय कुस्ती महासंघाचे (Wrestling Federation of India) अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह (Brij Bhushan Sharan Singh) यांचं मोठं वक्तव्य समोर आलं आहे. बृजभूषण शरण सिंह यांनी त्यांच्या फेसबुक अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. नार्को टेस्ट, पॉलिग्राफ टेस्ट किंवा लाय डिटेक्टर टेस्ट करायला तयार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे, पण विनेश फोगट (Vinesh Phogat) आणि बजरंग पुनिया (Bajrang Punia) यांचीही टेस्ट व्हायला हवी, अशी अटही त्यांनी घातली आहे.


बृजभूषण शरण सिंह पुढे म्हणाले की, "जर विनेश फोगट आणि बजरंग पुनिया त्यांची टेस्ट करण्यास तयार असतील, तर पत्रकारांना बोलावून त्यासंदर्भात घोषणा करा. मी त्यांना वचन देतो की, मीही यासाठी तयार आहे." तसेच, पुढे बोलताना त्यांनी ते त्यांच्या म्हणण्यावर ठाम असल्याचं सांगितलं. "मी यापूर्वीही माझ्या म्हणण्यावर ठाम आहे आणि यापुढेही या वक्तव्यावर ठाम राहीन हे मी माझ्या देशवासियांना वचन देतो." दरम्यान, बृजभूषण शरण सिंह यांनी त्यांच्या अधिकृत फेसबुक पेजवर पोस्ट करुन यासंदर्भात मागणी केली. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.