Maharashtra News Live Updates 20th May 2023 : देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या फक्त एका क्लिकवर...

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 20 May 2023 06:14 PM
Maharashtra Politics: माजी राज्यपाल कोश्यारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीला

माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी 'वर्षा' निवासस्थानी दाखल झाले आहेत, गेल्या वर्षभरात राज्यपालांनी केलेल्या कामाबद्दल मुख्यमंत्री शिंदे त्यांचे आभार मानणार असल्याची माहिती मिळते आहे.


 

Karnataka Swearing-In Ceremony Live : सिद्धारमय्या यांनी घेतली कर्नाटकच्या मुख्यमंत्री पदाची शपथ

Karnataka Swearing-In Ceremony Live : सिद्धारमय्या यांनी घेतली कर्नाटकच्या मुख्यमंत्री पदाची शपथ

Pune-Mumbai Expressway : पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडी

पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर वाहतूक धीम्या गतीने सुरू आहे. बोरघाटातील अमृतांजन पुलाजवळ वाहनांच्या रांगा दिसत आहेत. विकेंडचा आनंद लुटण्यासाठी आणि आपापल्या गावी जाण्यासाठी मुंबईकर बाहेर पडलेत, परिणामी द्रुतगती मार्गावर ताण पडलेला आहे. काल रात्री ही अशीच वाहतूक कोंडी पाहायला मिळाली होती.

Breaking News : सिद्धरमय्यांच्या शपथविधीला उद्धव ठाकरे गैरहजर राहणार

Breaking News : सिद्धरमय्यांच्या शपथविधीला उद्धव ठाकरे गैरहजर राहणार... कर्नाटकच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा आज शपथविधी...


उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आशिष देशमुख यांच्या घरी दाखल

Nagpur News : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आशिष देशमुख यांच्या घरी दाखल झाले आहेत. फडणवीस आज नागपूर जिल्ह्यातील हिंगणा आणि उमरेड तालुक्याच्या दौऱ्यावर जात आहेत. मात्र त्यापूर्वी ते देशमुखांच्या घरी पोहोचले आहेत. फडणवीस यांच्यासोबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे देखील आहेत. दरम्यान आशिष देशमुख यांना काँग्रेसमधून निलंबित करण्यात आलं आहे. आता देवेंद्र फडणवीस हे आशिष देशमुख यांच्या भेटीसाठी पोहोचल्यानंतर देशमुख भाजपच्या वाटेवर आहेत का असाही प्रश्न उपस्थित होत आहे.

शिक्षण विभागात खळबळ! बारावी भौतिकशास्त्राच्या 372 उत्तरपत्रिकांमध्ये एकाच व्यक्तीचे हस्ताक्षर; चौकशी समितीचा अहवाल

HSC Exam Scam : बारावीच्या परीक्षेच्या (HSC Exam) भौतिकशास्त्र पेपर तपासणीमध्ये तीनशेहून अधिक विद्यार्थ्याच्या उत्तरपत्रिकेत दोन हस्ताक्षर असल्याचे आढळून आले होते. त्यामुळे यासाठी चौकशी समिती नेमण्यात आली होती. तर चौकशी समितीचा अहवाल प्राप्त होताच एचएससी बोर्डासह शिक्षण विभागात एकच खळबळ उडाली. कारण भौतिकशास्त्राच्या तब्बल 372 उत्तरपत्रिकांमध्ये एकाच व्यक्तीचे हस्ताक्षर असल्याचे चौकशीतून समोर आले आहे. त्यामुळे याबाबत तातडीने राज्य शिक्षण मंडळास कळविण्यात आले आहे. तर परीक्षेतील हा एक मोठा घोटाळा समजला जात आहे. 

Sindhudurg Crime : तळकोकणातील जगलात खैराची तोड, एकजण ताब्यात तर दोघे पसार, वनविभागाची कारवाई



Sindhudurg Crime : सिंधुदुर्गच्या सावंतवाडी तालुक्यातील डेगवे गावात वन विभागाच्या अत्यारीत असलेल्या शासकीय जंगलात खैराच्या झाडांची तोड करत असताना वनविभागाने कारवाई केली आहे. डेगवे येथील शासकीय जंगलात खैराची तोड करून तस्करी करणाऱ्या महेश रामा कुडव याला वनविभागाकडून ताब्यात घेण्यात आले आहे. तर दोघेजण फरार असून वनविभागाकडून त्याचा शोध घेण्यात येत आहे. ही कारवाई सिंधुदुर्ग वनविभागाच्या फिरत्या पथकाकडून करण्यात आली आहे. ताब्यात घेतलेल्या एकाला आज न्यायालायात हजार करण्यात येणार आहे.




Beed News : शिवसेनेच्या महाप्रबोधन यात्रेचा बीड शहरांमध्ये समारोप

Beed News : बीड शहरामध्ये आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे घटनांच्या महाप्रबोधन यात्रेचा ग्रामीण भागातील यात्रेचा बीड शहरांमध्ये समारोप होणार आहे या समारोपाच्या होणाऱ्या सभेला शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि उपनेत्या सुषमा अंधारे या उपस्थित असतील. मागच्या काही महिन्यात पहिल्यांदाच बीड शहरामध्ये शिवसेनेचा इतका मोठा कार्यक्रम होत आहे त्याची सुषमा अंधारे यांचा जिल्हा म्हणून पहिल्यांदाच त्यांनी स्वतःच्या नेतृत्वात या महाप्रबोधन यात्रेच्या समारोपाच्या सभेची तयारी केली आहे.

Weather Update : उन्हाचा झळ बसणार! पुढील तीन दिवस तापमान वाढणार

Weather Update : महाराष्ट्रासह देशात पुढील तीन दिवस तापमानाचा पारा आणखी वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. विदर्भ, मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांत तापमान 40 अंश सेल्सियसपेक्षा जास्त आहे. यात आणखी भर पडल्यास उष्माघाताशी संबंधित आरोग्य तक्रारी वाढू शकतात, असा इशारा तज्ज्ञांनी दिला असून काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे.  

Gautami Patil : गौतमी पाटीलच्या अदा पडणार 'भारी', कार्यक्रमासाठी आता आयोजकांच्या खिशाला चौपट कात्री

Pandharpur Gautami Patil Dance Performance : सबसे कातिल, गौतमी पाटील... अशी ओळख असणाऱ्या गौतमी पाटीलला (Gautami Patil) अजूनही राज्यभरातून अफाट मागणी होत असताना आता मात्र तिचा कार्यक्रम आणणे आयोजकांना जवळपास चौपट महागात पडणार आहे. याचा फटका आयोजकांसह गौतमी आणि तिच्या चाहत्यांना देखील बसण्याची शक्यता आहे. गौतमीचा कार्यक्रम आणि चाहत्यांची हुल्लडबाजी हे जणू समीकरणच झाले आहे. यात कधी प्रेक्षकांमध्ये हाणामारी होते तर कधी पोलिसांना या हुल्लडबाजांवर काठ्या चालवाव्या लागतात. अशातच परवा या हुल्लडबाजांचा फटका प्रसारमाध्यमांच्या कॅमेरामॅनलाही सोसावा लागला. यामुळेच आता पोलिसांनी गौतमीच्या कार्यक्रमांना सर्व परवानग्या सोबत पेड पोलीस बंदोबस्त देण्यास सुरुवात केली आहे. मात्र, याच पेड बंदोबस्तामुळे आयोजकांच्या खिशाला जवळपास चौपट कात्री लागणार आहे. 

पुत्रवियोगाचं दुःख बाजूला ठेवत त्यांनी दिली अंधांना दृष्टी, सर्पदंशाने मृत्यू झालेल्या मुलाचे डोळे केले दान
पुत्रवियोगाचं दुःख बाजूला ठेवत मुरबाडमधील पालकांनी आपल्या चिमुकल्याचं नेत्रदान केलं. उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात पालकांनी घेतलेल्या या निर्णयानं उपस्थित आरोग्य कर्मचाऱ्यांनाही गहिवरून आलं. मुरबाड तालुक्यातील टोकावडे जवळ असलेल्या फांगळोशी गावात फनाडे कुटुंबीय वास्तव्याला आहे. या कुटुंबातील संदेश फनाडे हा 13 वर्षांचा मुलगा आज सकाळी घराच्या ओसरीत बसलेला असताना त्याला विषारी नागाने दंश केला. जवळपास 50 किलोमीटरचा प्रवास करून हे कुटुंब संदेशला घेऊन उल्हासनगरला दाखल झालं. मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. त्याला तपासून डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. मात्र यानंतरही खचून न जाता पुत्रवियोगाचं दुःख बाजूला सारत फनाडे कुटुंबियांनी मृत मुलगा संदेश याचे डोळे दान करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. त्यानुसार सामाजिक कार्यकर्ते आणि डॉक्टरांच्या सहाय्याने संदेशचं नेत्रदान करण्यात आलं. 
Maharashtra Politics : शिवसेना ठाकरे गट आणि संभाजी ब्रिगेडमध्ये झाली मातोश्रीवर बैठक
शिवसेना ठाकरे गट आणि संभाजी ब्रिगेडमध्ये झाली मातोश्रीवर बैठक

 

शिवसेना ठाकरे गट आणि संभाजी ब्रिगेडचे महाराष्ट्रात 'संयुक्त मिळावे' सुरू होणार असून संयुक्त पहिला मेळावा लवकरच मुंबईत आणि त्यानंतर पुण्यात होणार आहेत.

 

जाती आणि धार्मिक वाद मिटवण्यासाठी संभाजी ब्रिगेड महाराष्ट्रात प्रबोधन करणार...

 

ठाकरे गट आणि संभाजी ब्रिगेड यांच्यात जिल्हास्तरावर सुद्धा मेळावे होणार

 

मातोश्री मुंबई येथे शिवसेना ठाकरे गट - संभाजी ब्रिगेड समन्वय समितीची बैठक झालीबैठकीमध्ये अनेक विषयांवर चर्चा झाली. यामध्ये प्रामुख्याने मुंबई मध्ये महाराष्ट्रातील सेना - ब्रिगेड पदाधिकारी संयुक्त मेळावा उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये आयोजित करणे, महाराष्ट्रातील सामाजिक सलोखा बिघडवण्यासाठी  होणारे प्रयत्न हाणून पाडण्यासाठीची रणनीती  पुढील राजकीय दिशा ह्यावर चर्चा झाली.
Karnataka CM Oath Ceremony : आज कर्नाटकमध्ये काँग्रेस सरकार स्थापन करणार, सिद्धरमय्या मुख्यमंत्री आणि शिवकुमार घेणार उपमुख्यमंत्रीपदाची शपथ

Karnataka CM Oath Ceremony : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर काँग्रेस आज सरकार स्थापन करणार आहे. काँग्रेस नेते सिद्धरमय्या आणि डीके शिवकुमार आज कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील. मंत्रिमंडळात सामील होणारे काही आमदारही पद आणि गोपनीयतेची शपथ घेणार आहेत. शपथविधी समारंभाच्या अगोदर, सिद्धरमय्या आणि शिवकुमार नवीन मंत्रिमंडळात समाविष्ट करण्यात येणार्‍या मंत्र्यांची नावे आणि खात्यांच्या वितरणाबाबत हायकमांडशी चर्चा करण्यासाठी दिल्लीला पोहोचले आहेत. 


सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Kalyan News : मेरी लाईफ मेरा स्वच्छ शहर अभियानांतर्गत राबविणार उपक्रम

कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील कर थकबाकीदारांसाठी केडीएमसीने पुन्हा एकदा अभय योजना लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील महिन्याच्या 15 जूनपासून या योजनेला प्रारंभ होणार असल्याची माहिती आयुक्त डॉ.भाऊसाहेब दांगडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. 


कोविड काळात आणि त्यानंतर केडीएमसी प्रशासनाने लागू केलेल्या या अभय योजनेला थकबाकीदार आणि नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता. त्या पार्श्वभुमीवर ही योजना पुन्हा लागू करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात होती. त्यानुसार पुढील महिन्यापासून ही योजना लागू केली जाणार असल्याची माहिती आयुक्त डॉ. दांगडे यांनी दिली. 

पार्श्वभूमी

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...


 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.