Maharashtra Live Updates : ठाण्यातील सिनेवंडर मॉलजवळील इमारतीला भीषण आग; काही लोक अडकले असल्याची भीती

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 18 Apr 2023 09:05 PM
Thane News: ठाणे: ठाण्यातील सिनेवंडर मॉलजवळील इमारतीला भीषण आग; काही लोक अडकले असल्याची भीती

Thane News: ठाणे: ठाण्यातील सिनेवंडर मॉलजवळील इमारतीला भीषण आग लागली आहे. घोडबंदर रोडला जोडणाऱ्या रस्त्यावर आगीचे मोठे लोळ येत आहेत. त्यामुळे रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली आहे. आग लागलेल्या इमारतीमध्ये काही लोक अडकले असल्याची माहिती समोर येत आहे. 

Nanded News: दोन कारची समोरासमोर धडक, 10 जण जखमी; तामसा नांदेड रोडवर पिंपराळा जवळ अपघात

Nanded News: दोन कारची समोरासमोर धडक होऊन एकूण 10 जण जखमी झाले आहेत. नांदेड जिल्ह्यात तामसा नांदेड रोडवर पिंपराळा जवळ हा अपघात घडला. स्विफ्ट कार आणि एर्टिगा गाडी पिंपराळाजवळ एकमेकांवर धडकली. स्विफ्ट गाडी मध्ये एकजण तर एर्टीगा गाडीमध्ये 7 महिला आणि दोन पुरुष असे एकूण 9 प्रवासी होते. 

Beed News: बीड: दीडशे वर्षांपूर्वीची परंपरा असलेल्या परळी येथील पापदंडेश्वराचा पालखी सोहळा उत्साहात संपन्न

Pune News:  परळी तालुक्यातील गाडे पिंपळगाव येथे दीडशे वर्षाची परंपरा असलेल्या श्री पाप दंडेश्वराचा पालखी सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी हजारो भाविक या पालखी सोहळ्यात सहभागी झाले होते. या निमित्ताने श्री पापदंडेश्वराच्या पालखीची संपूर्ण गावातून मिरवणूक काढण्यात आली होती. 


 

Sanjay Raut: ऑपरेशन मशालही होऊ शकते, ऑपरेशन हात देखील होऊ शकते: संजय राऊत

Sanjay Raut:  सध्या कमळाचा सिझन नाही. येत्या काळात 'ऑपरेशन मशाल'ही होऊ शकते, ऑपरेशन हात देखील होऊ शकते असे ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी म्हटले. 

Maharashtra Politics: सत्तेतील लोकं महाविकास आघाडीत गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत; संजय राऊत यांची प्रतिक्रिया

अजित पवार हे मविआचे आधारस्तंभ आहेत. त्यांच्याविषयीच्या अफवांवर आज पूर्णविराम मिळालेला आहे. सत्तेतील लोकं महाविकास आघाडीत गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत; संजय राऊत यांची प्रतिक्रिया

Dhule Fire : धुळ्यात मेणबत्ती बनवायच्या कारखान्याला आग, चार महिलांचा मृत्यू

धुळे जिल्ह्यातील चिखलीपाडा गावामध्ये एका मेणबत्ती बनवायच्या कारखान्याला लागलेल्या आगीत चार महिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर दोन महिला गंभीररित्या भाजल्या आहेत. वाढदिवसानिमित्त वापरले जाणारी आकर्षक मेणबत्ती या कारखान्यामध्ये बनवली जात होती.  यादरम्यान दुपारी दोन वाजेच्या सुमारास शॉर्टसर्किटने आग लागली आणि या आगीत होरपळून या चार महिलांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. चौकशीतच आगीच नेमकं कारण समोर येणार असल्याचं पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांनी सांगितल आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका संशयताला ताब्यात घेतल असून, जखमींना नंदुरबार येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या मयत महिलांमध्ये एक अल्पवयीन मुलीचाही समावेश असल्याने त्या संदर्भातही पोलीस तपास करीत आहेत.

Ajit Pawar: 40 आमदारांच्या सह्या घेतलेल्या नाहीत, बातम्यांमध्ये काहीही तथ्य नाही : अजित पवार

Ajit Pawar:  माझ्याबाबत चुकीच्या बातम्या दाखवल्या जात आहेत. 40 आमदारांच्या सह्या घेतलेल्या नाहीत. आम्ही राष्ट्रवादीत राहणार आहोत. इतर राजकीय पक्षाचे नेते याबाबत बोलत आहेत मात्र मी त्याबाबत बोलणार नाही. प्रत्येक मंगळवारी आमदार मला भेटतात हे नेहमीचे आहे. त्याचं काम होतं म्हणुन आले होतो, असेही अजित पवार म्हणाले

Ajit Pawar: आमच्या पक्षात कोणी बोलू नये : अजित पवार

Ajit Pawar: मुख्यमंत्री यांनी नुकसानग्रस्त भागाचा दौरा केला माञ मदत अद्याप दिलेला नाही.  ट्विटरमध्ये कोणताही बदल नाही. आमच्या पक्षात कोणी बोलू नये मी महाविकस आघाडीच्या बैठकीत याबाबत बोलणार आहे.आमच्या पक्षाबाबत बोलणं योग्य नाही, असे देखील अजित पवार म्हणाले

Ajit Pawar: आमदारांबाबत चुकीच्या बातम्या देऊ नका : अजित पवार

Ajit Pawar: आमदारांबाबत चुकीच्या बातम्या देऊ नका कारण संभ्रम निर्माण होतं आहे. राष्ट्रवादी काँगेस पक्षात चढउतार आले आहेत. आम्ही  राहणार आहोत. सध्या निर्माण झालेले प्रश्न आहेत त्याकडून लक्ष विचलित करण्यासाठीं हा प्रकार सुरू आहे : अजित पवार

माझ्यासह सहकाऱ्यांबाबत गैरसमज पसरवले जात आहेत, आम्ही राष्ट्रवादीतच राहणार : अजित पवार

Ajit Pawar PC : कारण नसताना माझ्या आणि माझ्या सहकाऱ्यांबद्दल गैरसमज पसरवला जात आहेत. जाणीवपूर्वक बदनामी करण्याचा प्रयत्न सुरु आहे. या बातम्यांमध्ये कोणतंच तथ्य नाही. आमदारांच्या सह्या घेण्याचं कारण नाही. आम्ही राष्ट्रवादीचे आमदार आहोत, राष्ट्रवादीतच राहणार आहोत. मी नेहमीप्रमाणे माझ्या ऑफिसमध्ये बसतो, अनेक जण कामानिमित्त येत असतात. नेहमीप्रमाणे आमदार मला भेटायला आले. त्यात वेगळा अर्थ काढू नका, असं स्पष्टीकरण अजित पवार यांनी भाजप प्रवेशाच्या चर्चांवर दिलं.

घराच्या अंगणात झोपलेल्या महिलेचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू, चंद्रपुरातील चक-विरखलमधील घटना

Chandrapur News : घराच्या अंगणात झोपलेल्या महिलेचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला. सावली तालुक्यातील चक-विरखल येथे ही घटना घडली. मंदा सिडाम (वय 52 वर्षे) असं मृत महिलेचं नाव असून काल रात्री ही महिला घराच्या अंगणात मच्छरदाणी लावून झोपली होती. रात्रीच्या दरम्यान बिबट्याने हल्ला करुन तिचा जीव घेतला. मात्र मृतदेहाभोवती मच्छरदाणी गुंढाळल्याने बिबट तिला ओढून नेऊ शकला नाही.

सेन्सेक्स 113 अंकांनी वधारत पुन्हा 60 हजारी, निफ्टी 28 अंकांनी वधारला 

Share Market Update : सेन्सेक्स 113 अंकांनी वधारत पुन्हा 60 हजारी, निफ्टी 28 अंकांनी वधारला 


निफ्टी बॅंक निर्देशांक 115 अंकांनी वधारला 


डाॅलरच्या तुलनेत रुपया 2 पैशांनी वधारत 81.99 वर उघडला 


आयटी कंपन्यांच्या समभागात तेजीचा परिणाम 


इन्फोसिस, आयसीआयसीआय बॅंक, एचसीएल टेकच्या कंपन्यांच्या समभागात तेजी

राजराम सहकारी साखर कारखाना निवडणूक बिनविरोध करण्याचा शब्द सतेज पाटील यांनी फिरवला, आमदार विनय कोरे यांचा आरोप

Kolhapur News :  राजराम सहकारी साखर कारखाना निवडणूक


आमदार विनय कोरे यांनी केला मोठा खुलासा


विधान परिषद निवडणुकीवेळी सतेज पाटील यांनी राजाराम बिनविरोध करण्याबाबत शब्द दिला होता


पण सतेज पाटलांनी शब्द फिरवला आमदार विनय कोरे यांचा आरोप


सतेज पाटील यांना शब्द पाळा असं सांगण्याचा प्रयत्नही मी केला


आमदार कोरे यांचा दावा


कुंभोज येथे सत्ताधारी गटाच्या प्रचार सभेदरम्यान कोरे यांच्या वक्तव्याने चर्चेना उधाण

सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी राजकीय दबावाखाली काम करत आहेत : विनायक राऊत

Sindhududrg News : सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी राजकीय दबावाखाली काम करत असल्याचा गौप्यस्फोट खासदार विनायक राऊत यांनी केला. याला कारण जिल्ह्यातील देवगड नगरपंचायत महाविकास आघाडीच्या हातून राजकीय खेळी खेळत राणेंनी घेतली. त्यावरुन खासदार विनायक राऊत यांनी जिल्हाधिकारी पक्षीय दृष्टीने काम करत असल्याचा आरोप केला आहे. देवगड नगरपंचायतमधील नगरसेवकांवर तात्काळ कारवाई आणि वैभववाडी नगरपंचायतमधील दोन नगरसेवकांवर कारवाई करण्यास चालढकलपणा करत असल्याचा आरोप खासदार राऊतांनी केला आहे.

Jyotiraditya Scindia : केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदेंना कोरोनाची लागण

Jyotiraditya Scindia Corona Positive : केंद्रीय विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे (Jyotiraditya Scindia) यांना कोरोनाची (corona) लागण झाली आहे. शिंदे यांनी स्वतः याबाबत ट्विट करुन माहिती दिली आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानं केलेल्या कोविड-19 च्या तपासणीत माझा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. गेल्या काही दिवसात जे लोक माझ्या संपर्कात आले आहेत, त्या सर्वांनी खबरदारी घ्यावी. जवळच्या आरोग्य केंद्रात जाऊन स्वतःची चाचणी करुन घ्यावी अशी विनंती ज्योतिरादित्य शिंदे यांनी केली आहे.

मालेगावचा पारा चाळिशी पार, सलग तिसऱ्या दिवशी पारा 40 अंशावर

Malegaon Temperature : मालेगाव शहर आणि परिसरात गेल्या तीन दिवसांपासून पारा वाढला आहे. वाढत्या तापमानामुळे यावर्षी उन्हाळ्यात प्रथमच तापमानाने चाळिशी पार केली आहे. सोमवारी सलग तिसऱ्या दिवशी पारा 40 अंशावर होता. शहर आणि परिसरात दरवर्षी मार्चमध्येच तापमान 40 अंशावर पोहोचते. यावर्षी बेमोसमी पाऊस, गारपीट आणि बदललेल्या हवामानामुळे मार्चमध्ये पारा 35 अंशाच्या आसपासच होता. 12 एप्रिलपासून उन्हाचा तडाखा वाढला आहे. शनिवारी (15 एप्रिल) तापमान प्रथमच 41.6 अंशावर पोहोचले होते. रविवारी (16 एप्रिल) 41.2 तर सोमवारी (17 एप्रिल) पारा 40.9 अंशावर होता. ऊन वाढू लागल्याने हंगामी व्यवसाय करणाऱ्या शीतपेये, रसवंतीगृह, लिंबू शिकंजी आदी दुकानांवर गर्दी दिसू लागली आहे. दरम्यान वाढत्या उन्हामुळे दुपारी शहरातील रस्त्यावरची वाहतूक मंदावली आहे. उन्हापासून बचावासाठी नागरिक टोप्या, रुमाल, उपरणे सन गॉगल्स यांचा वापर करत घराबाहेर पडू लागले आहेत.

Maharashtra Weather : राज्यात पुन्हा अवकाळीचा इशारा, तर दुसरीकडं तापमानाचा पारा वाढणार; विदर्भात इशारा

  Maharashtra Weather : एकीकडे राज्यातील तापमानात (Temperature) दिवसेंदिवस वाढ होत असताना दुसरीकडे मात्र राज्याला अवकाळी पावसाचा (Unseasonal rain) तडाखा बसण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रासह विदर्भ आणि मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. तर दुसरीकडं तापमानात देखील दोन ते तीन अंशांनी वाढ होण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. पुढील दोन दिवस विदर्भाच्या (Vidarbha) तापमानात अधिक वाढ होण्याचा इशाराही हवामान विभागानं दिला आहे. 

ठाकरे गट भरत गोगावले विरोधात तगडा उमेदवार देणार

Raigad News : रत्नागिरी जिल्ह्यात रामदास कदम आणि योगेश कदम यांच्या विरोधात संजय कदम यांच्या रूपाने चेहरा दिल्यानंतर आता ठाकरे गटाने भरत गोगावले यांच्या महाड या मतदारसंघावर लक्ष केंद्रित केले आहे. उद्धव ठाकरे यांची सहा मे रोजी सभा होण्याची शक्यता आहे. कदाचित ही तारीख बदलू देखील शकते. पण महाड येथील जाहीर सभेत महाडच्या माजी नगराध्यक्ष अश्विनी जगताप या काँग्रेसमधून  शिवसेनेच्या ठाकरे गटात प्रवेश करण्याची शक्यता आहे. अश्विनी जगताप या महाडमधील काँग्रेसचे माजी आमदार स्वर्गीय माणिकराव जगताप यांच्या कन्या आहेत. त्यामुळे भरत गोगावले यांच्याविरोधात अश्विनी जगताप या आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या उमेदवार असू शकतात. रायगड जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात याची जोरदार चर्चा रंगली आहे.

सिंधुदुर्गात मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर डंपरने धडक दिल्याने महिलेचा जागीच मृत्यू, डंपर चालकावर गुन्हा दाखल

Sindhudurg News : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर डंपरने धडक दिल्याने जिल्हा न्यायालयातील मुख्य दंडाधिकारी कार्यालयातील वरिष्ठ लिपिक सौ. सुषमा नेमण यांचा जागीच मृत्यू झाला. नेमण या महामार्ग ओलांडताना अचानक बांदा येथून आकेरी येथे जाणाऱ्या डपरने त्यांना धडक दिली. डंपरने महिलेला दिल्याने महिलेचा जागीच मृत्यू झाला तर डंपर चालकाने अपघातानंतर पळ काढला. 

सिंधुदुर्गात मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर डंपरने धडक दिल्याने महिलेचा जागीच मृत्यू, डंपर चालकावर गुन्हा दाखल

Sindhudurg News : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर डंपरने धडक दिल्याने जिल्हा न्यायालयातील मुख्य दंडाधिकारी कार्यालयातील वरिष्ठ लिपिक सौ. सुषमा नेमण यांचा जागीच मृत्यू झाला. नेमण या महामार्ग ओलांडताना अचानक बांदा येथून आकेरी येथे जाणाऱ्या डपरने त्यांना धडक दिली. डंपरने महिलेला दिल्याने महिलेचा जागीच मृत्यू झाला तर डंपर चालकाने अपघातानंतर पळ काढला. 

नागपूर महानगरपालिकेचे मुख्य अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके यांना छत्तीसगड पोलिसांनी अटक, महिलेशी अश्लील चॅट केल्याचा आरोप

Nagpur News : नागपूर महानगरपालिकेचे मुख्य अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके यांना छत्तीसगड पोलिसांनी अटक केली आहे.


महिलेशी अश्लील चॅट करण्याचा आरोप त्यांच्यावर आहे.


काही दिवसांपूर्वी आपल्याला हनीट्रॅप करण्याचा प्रयत्न केला जात असल्याची तक्रार त्यांनीच स्वत:च केली होती 


मात्र चौकशीत उचके हे दोषी आढळले त्यानंतर काल रांजणगाव पोलिसांनी त्यांना अटक केली.


वरिष्ठ अधिकाऱ्याला अटक झाल्याने एकच खळबळ उडाली.

Nagpur News :नागपूर पालिकेचे मुख्य अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके यांना अटक

Nagpur News :नागपूर पालिकेचे मुख्य अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके यांना अटक करण्यात आली आहे. महिलेशी अश्लील संवाद केल्याप्रकरणी छत्तीसगड
पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.वरिष्ठ अधिकाऱ्याला अटक झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. 

लांजा नगरपंचायत उपनगराध्यक्ष अविश्वास ठरावावरुन आता ठाकरे आणि शिंदे गटात कायदेशीर लढाई

Ratnagiri News : कोकणातल्या बालेकिल्ल्यात म्हणजेच रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा नगरपंचायतीत ठाकरे गटाच्या उपनगराध्यशा पूर्वा मुळ्ये यांच्याविरोधात अविश्वास दर्शक ठराव तेरा विरुद्ध शून्य मतांनी झाला. त्यानंतर ठाकरे गट आक्रमक झाला असून चुकीच्या पद्धतीने अविश्वास दर्शक ठराव केल्याचा दावा ठाकरे गटाने केला आहे. त्यानंतर ठाकरे गटाने आता कायदेशीर लढाई लढण्याची तयारी सुरु केली आहे. या अविश्वास दर्शक ठरावानंतर ठाकरे गटाने जिल्हाधिकारी यांना पत्र लिहून उपनगराध्यक्ष निवडीची प्रक्रिया काही काळ थांबवावी अशी मागणी केली आहे. या साऱ्या घडामोडीनंतर ठाकरे गट आता कोर्टात जाणारा असून कायदेशीर लढाई लढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे कोकणात शिवसेनेतला ठाकरे आणि शिंदे गटामध्ये संघर्ष वाढण्याची शक्यता आहे.

पार्श्वभूमी

18th April Headlines: Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...


 


मागील काही दिवसांपासून राज्यातील राजकीय वर्तुळात वेगाने घडामोडी घडत आहेत. आजही दिवसभरात राजकीय घडामोडी घडण्याच अंदाज आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या मुंबई दौऱ्यानंतर आज भाजपची महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. तर, राष्ट्रवादी काँग्रेसने इफ्तार पार्टीचे आयोजन केले आहे. या इफ्तारमध्ये शरद पवार, अजित पवार, जयंत पाटील आदींसह आमदार, अनेक नेते उपस्थित राहणार आहेत.
 


दिल्ली 


- आज समलिंगी विवाहाच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. समलिंगी विवाहाची मागणी हा निव्वळ शहरी आणि उच्चभ्रू वर्तुळातला सामाजिक मुद्दा आहे. घटनापीठाच्या सुनावणी आधी केंद्र सरकारकडून विरोध करण्यात आला होता. 


-  कर्नाटकात मुस्लिमांना दिलेले 4 टक्के आरक्षण रद्द करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णया विरोधात दाखल याचिकेवर सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे.


- बिलकिस बानो प्रकरणातील दोषींच्या सुटके विरोधात दाखल याचिकेवर सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे.



मुंबई 


- राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडून इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आलंय. याला विरोधी पक्षनेते अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह काही प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत.
 
- केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या दौऱ्यानंतर भाजप नेत्यांची आज महत्वाची बैठक होणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपची महाविजय 2024 ची पहिली सभा संदर्भात चर्चा होण्याची शक्यता आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत बैठक पार पडणार आहे. 


- शिंदे सरकार आमदार निधी वाटपात दुजाभाव करतंय, असा आरोप करत ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांनी हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी. राज्य सरकार आज नव्यानं आपलं प्रतिज्ञापत्र सादर करणार. 


पुणे 


बारामती -  पुणे जिल्हा परिषदेचे पहिले अध्यक्ष शंकरराव उरसळ यांच्या अर्ध पुतळ्याचे अनावरण शरद पवारांच्या हस्ते करण्यात येणार आहे. पुरंदर तालुक्यातील सिंगापूर येथील या कार्यक्रमाला शरद पवार उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाला शरद पवार, सुप्रिया सुळे, विजय शिवतारे, संजय जगताप उपस्थित रहाणार आहेत.


-  शरद पवार देहू मध्ये आयोजित किर्तन- प्रवचन कार्यशाळेच्या समारोपाला उपस्थित राहणार आहेत.
 


सातारा 


- आमदार शिवेंद्रराजे भोसले यांची पत्रकार परिषद होणार आहे. त्यानंतर पत्रकार परिषदेनंतर उदयनराजे पत्रकार परिषद घेणार आहेत.


 कोल्हापूर


- कोल्हापुरात मनसेच्या वतीने आज अनोखे आंदोलन करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांच्या विम्याचे पैसे अजूनही जमा न झाल्यामुळे मनसे आज जिल्हाधिकाऱ्यांना वर्ल्डकप भेट म्हणून देणार आहेत.


 
रत्नागिरी 


- ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी ज्यांच्या कुटुंबाची आज अलिबाग येथील एसीबी कार्यालयामध्ये चौकशी होणार आहे. या चौकशीसाठी साळवी यांच्या पत्नी, दोन मुलगे, मोठा भाऊ आणि वहिनी देखील उपस्थित असणार आहे. 


चंद्रपूर 


- गोंडवाना गणतंत्र पार्टी तर्फे आज पोंभुरणा तालुक्यात रास्ता रोको आणि ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे. 50 टक्के आदिवासी बहुल असलेल्या गावांमध्ये पेसा कायदा लागू करावा, 50 वर्षांपासून कसत असलेल्या वनजमिनी आदिवासींना देण्यात याव्या, इको सेन्सिटिव्ह झोन रद्द करण्यात यावा, आदी मागण्यांसाठी आंदोलन होणार आहे. 


 बुलढाणा


- पुलवामा हल्ल्या संदर्भात मोदी सरकारने भूमिका स्पष्ट करावी या मागणीसाठी जिल्ह्यात काँग्रेसकडून विविध ठिकाणी मोदी सरकार विरुद्ध आंदोलन पुकारण्यात आले आहे. 


 गोंदिया 


- गोंदिया काँग्रेस कमिटीच्यावतीने मोदी सरकारच्या विरोधात आंदोलन करण्यात येणार आहे. विविध प्रश्नांवर या आंदोलनाच्या माध्यमातून उपस्थित करण्यात येणार आहे. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.