Maharashtra News Updates : पत्राचाळ घोटाळा प्रकरण; संजय राऊतांचा जामीन रद्द करण्यासाठी ईडीनं दाखल केलेल्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी सुरू

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 18 Feb 2023 08:18 PM
गोंदिया : प्रतापगड यात्रेत एका महिला भाविकेचा मृत्यू

प्रतापगड यात्रेत नवेगावबांध येथील प्रभा कुंभरे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही दुखद घटना यात्रेत घडली. मृतक प्रभा ह्या प्रतापगड यात्रेत आल्या होत्या. प्रतापगड यात्रेत सहभागी झाल्या. त्या वर गडावर चढत होत्या. वाटेत त्यांच्या लहान मुलाच्या दुकानात विश्रांती घेतली. पुढे प्रतापगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या प्राचीन शिव मंदिरात श्री भगवान शंकराचे दर्शन घेण्यासाठी जाण्यासाठी त्या उभ्या राहिल्या बरोबर त्यांना भोवळ येऊन बेशुध्द पडल्या असता त्यांचा तिथेच मृत्यू झाला.

आर्वीचे आमदार दादाराव केचे कंत्राटदारावर संतापले

आर्वी विधानसभा क्षेत्राचे आमदार दादाराव केचे यांचा व्हिडीओ कमालीचा व्हायरल होत आहे. एका भूमिपूजन कार्यक्रमात आमदार दादाराव केचे  यांच्याकडून अपशब्द उद्गारला गेल्याचा हा व्हिडीओ आहे. यावर आता राजकारण सुरू झाले असून जलजीवन मिशन या शासकीय योजनेत भूमिपूजन दरम्यान हा प्रसंग उदभवला आहे.

पुण्यातील काश्मीरी मुलींशी अमित शाह संवाद साधणार

अमित शाह  एका खासगी कार्यक्रमानंतर  पुण्यातील काश्मीरमध्ये शहीद झालेल्या पोलिसांच्या मुलींसोबत जे डब्ल्यू मॅरिएटमध्ये ह़ॉटेलमध्ये संवाद साधणार आहेत.

पुण्यातील काश्मीरी मुलींशी अमित शाह संवाद साधणार

अमित शाह  एका खासगी कार्यक्रमानंतर  पुण्यातील काश्मीरमध्ये शहीद झालेल्या पोलिसांच्या मुलींसोबत जे डब्ल्यू मॅरिएटमध्ये ह़ॉटेलमध्ये संवाद साधणार आहेत.

पुण्यातील काश्मीरी मुलींशी अमित शाह संवाद साधणार

अमित शाह  एका खासगी कार्यक्रमानंतर  पुण्यातील काश्मीरमध्ये शहीद झालेल्या पोलिसांच्या मुलींसोबत जे डब्ल्यू मॅरिएटमध्ये ह़ॉटेलमध्ये संवाद साधणार आहेत.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह पुण्यात दाखल

Amit Shah :  केंद्रीय गृहमंत्री अमित शाह पुण्यात (Amit shah) दाखल झाले. सीमा (Pune) सुरक्षा दलाच्या विशेष विमानाने लोहगाव (Pune bypoll election) विमानतळ येथे आगमन झाले. यावेळी त्यांचं स्वागत करण्यात आलं. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,आमदार चंद्रशेखर बावनकुळे होते. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुष्पगुच्छ देऊन शाह यांचं स्वागत केलं. त्यांनी वाकडमधील एका खासगी कार्यक्रमात हजेरी लावली. त्यानंतर ते पुण्यातील काश्मीरमध्ये शहीद झालेल्या पोलिसांच्या मुलींसोबत जे डब्ल्यू मॅरिएटमध्ये ह़ॉटेलमध्ये संवाद साधत आहेत.

Beed: बीड शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे विलोभनीय दृश्य

शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर बीड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे नुकतेच सुशोभीकरण करण्यात आले आहे. अतिशय रेखीव आणि आकर्षक दिसणारा हा पुतळा बीड शहराच्या मध्यभागी असलेल्या बस स्थानका नजीक आहे. शिवजयंतीच्या निमित्ताने या ठिकाणी मोठी सजावट सध्या सुरू आहे, रोषणाई करण्यात आली आहे. याचेच ड्रोनच्या माध्यमातून चित्रीकरण केले आहे. बीडचा हौशी छायाचित्रकार शिवराज माने यांनी हे चित्रीकरण केलं आहे.

Mahrashtra Politics : मातोश्रीबाहेर ओपन जीपवर उद्धव ठाकरे भाषण करणार

Mahrashtra Politics : उद्धव ठाकरे थोड्याच वेळात शिवसैनिकांना संबोधित करणार आहेत. मातोश्रीबाहेर ओपन जीपवर उद्धव ठाकरे भाषण करणार आहेत. मातोश्रीबाहेर ठाकरे गटाचं शक्तिप्रदर्शन पाहायला मिळालं. 


Prakash Ambedkar on Shiv Sena Symbol: ठाकरेंचा 'तो' निर्णय योग्यच; प्रकाश आंबेडकरांनी स्पष्टच सांगितलं

"निवडणूक आयोगाने शिवसेनेच्या संदर्भात दिलेल्या निकालाच्या विरोधात उद्धव ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा घेतलेला निर्णय योग्यच आहे. मुळात निवडणूक आयोगाला पक्षाच्या अंतर्गत वादावर निर्णय देण्याचा अधिकार आहे का? हाच सर्वात मोठा प्रश्न आहे. कुठल्याही परिस्थितीत निवडणुका घेणे हे निवडणूक आयोगाचे काम आहे, राजकीय पक्षातील विवादावर निवाडा करणे हे निवडणूक आयोगाचे काम नाही. हाच मुद्दा घेऊन उद्धवजी सर्वोच्च न्यायालयात गेले तर त्यांना नक्कीच न्याय मिळेल.", असं प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत. 

पत्राचाळ घोटाळा प्रकरण; संजय राऊतांचा जामीन रद्द करण्यासाठी ईडीनं दाखल केलेल्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी सुरू

Patra Chawl Land Scam Case: संजय राऊतांचा जामीन रद्द करण्यासाठी ईडीनं दाखल केलेल्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी सुरू



ईडीतर्फे एएसजी अनिल सिंह करत आहेत युक्तिवाद


संजय आणि प्रवीण राऊत यांना मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए कोर्टानं दिलेला जामीन रद्द करण्याची तपासयंत्रणेची मागणी


आरोपी प्रवीण राऊत आणि संजय राऊत यांचे आमदार भाऊ सुनील राऊत हायकोर्टात उपस्थित

मुंबईत पोलीस भरतीदरम्यान एका परीक्षार्थीचा मृत्यू, 1600 मीटर धावण्याच्या स्पर्धेत 26 वर्षीय उमेदवार मैदानात कोसळला

Mumbai Police Recuritment : मुंबईत पोलीस भरती प्रक्रियेदरम्यान एका परीक्षार्थीचा मृत्यू झाला. चालक पदाच्या या भरती प्रक्रियेअंतर्गत 17 फेब्रुवारी रोजी कलिना इथल्या कोळे कल्याण मैदानात उमेदवारांची शारीरिक चाचणी घेण्यात येत होती. त्याचवेळी या भरतीसाठी आलेल्या 26 वर्षीय गणेश उत्तम उगले हा उमेदवार 1600 मीटर धावण्याची स्पर्धा पूर्ण होण्यापूर्वीच चक्कर येऊन जमिनीवर पडला. गणेशला तात्काळ व्ही एन देसाई रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.

पुणे कस्टमच्या नार्कोटिक्स टीमकडून अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश, दोन महिलांसह पाच जण अटकेत

Pune News : पुणे कस्टमच्या नार्कोटिक्स टीमने अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केला. या प्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली. ओदिशातून अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या सिंडिकेटद्वारे मोठ्या प्रमाणात गांजा तस्करी होत असल्याची माहिती मिळाली. 14 फेब्रुवारीला मिळालेल्या माहितीनुसार सोलापूरजवळ दोन संशयित वाहने अडवली असता एका वाहनाच्या झडतीदरम्यान 54 किलो गांजा आढळून आला. नार्कोटिक ड्रग्स अँड सायकोट्रापिक सबस्टन्स अंतर्गत गांजा जप्त करण्यात आला असून दोन महिलांसह पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपी हे पुणे जिल्ह्यातील शिरुर तसेच अहमदनगर येथील आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास सध्या सुरु आहे.



Uddhav Thackeray Meeting : उद्धव ठाकरे यांनी तात्काळ पक्षाची बैठक बोलावली; आमदार, खासदार, नेते उपस्थित राहणार

Uddhav Thackeray Meeting : उद्धव ठाकरे यांनी तात्काळ पक्षाची बैठक बोलावली. या बैठकीला सर्व आमदार खासदार आणि नेते उपस्थित राहणार आहेत. आज दुपारी एक वाजता मातोश्रीवर बैठक होणार आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर पुढची भूमिका काय यावर चर्चा होणार आहे. मतदारसंघात असलेले आमदार आणि खासदार तात्काळ मातोश्रीच्या दिशेने रवाना झाले आहेत.

दारुच्या नशेत पत्नीची कुऱ्हाडीने हत्या करुन पतीची आत्महत्या, नागपुराच्या रामटेकमधील आमडी गावातील घटना

Nagpur News : दारुच्या नशेत पत्नीची कुऱ्हाडीने हत्या करुन पतीने आत्महत्या केल्याची धक्कदायक घटना नागपूर जिल्ह्यातील रामटेक परिसरात आमडी गावात घडली आहे. आरोपी मधुकर इवनाती हा दारुच्या नशेत असताना पत्नी कुसुम इवनातीसोबत त्याचे भांडण झाले. रागाच्या भरात त्याने कुऱ्हाडीने कुसूमच्या डोक्यात वार केला. त्यात तिचा जागीच मृत्य झाला. त्यानंतर राहत्या खोलीत त्याने स्वतःला गळफास लावून घेतला. हे पती पत्नी मूळचे मध्यप्रदेशचे असून मजुरीसाठी रामटेकला आले होते. पोलिसांनी पतीच्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु आहे.

Mahashivratri : बम बम भोलेच्या गजरात औंढा नागनाथ नगरी दुमदुमली

Mahashivratri : बारा ज्योतिर्लिंगापैकी आठव्या स्थानी असलेल्या श्रीक्षेत्र औंढा नागनाथ येथील महाशिवरात्रीच्या यात्रा या महोत्सवाला सुरुवात झाली. शनिवारी रात्री साडेबारा वाजता देवस्थानाचे  पदसिद्ध अध्यक्ष तथा तहसीलदार डाँ कृष्णा कानगुले ,कळमनुरी विधानसभा शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांच्या हस्ते रीतसर अभिषेक करून महापूजा झाली. रात्री दोन वाजता भाविकांना दर्शनासाठी मंदीर खुले करण्यात आले. रात्री पासुनच हजारो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.मध्यरात्रीपासून नागनाथाच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती.भाविकांच्या गर्दीने मंदिर परिसर फुलून गेला होता. भाविकांची गर्दी लक्षात घेता गर्भगृहातील अभिषेक दिवसभर बंद ठेवण्यात आले होते.

Maharashtra Politics: ​रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत ठाकरेंसोबत, शिवसैनिक आक्रमक, गद्दारांना गाडणार; शिवसैनिंकांच्या संतप्त प्रतिक्रिया

Maharashtra Politics: निवडणूक आयोगाचा निर्णय आल्यानंतर सोलापूर जिल्ह्यातून शिवसैनिकांच्या तीव्र प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली असून शिवसेना म्हणजे ठाकरे आणि ठाकरे म्हणजे शिवसेना एवढीच ओळख महाराष्ट्रातील शिवसैनिकांना असून आता या गद्दारांना गाडणार, सर्वोच्य न्यायालयात उद्धव साहेबांचा म्हणजे सत्याचा विजय होईल, अशा संतप्त प्रतिक्रिया गावोगावातून उमटू लागल्या आहेत . माळशिरस तालुक्यात युवा सेना जिल्हाप्रमुख गणेश इंगळे यांच्यासह युवा सैनिकांनी हातात मशाली घेऊन उद्धव ठाकरेंच्या सोबत शेवटच्या श्वासापर्यंत राहणार असल्याच्या घोषणा दिल्या. 


पंढरपूर येथे जिल्हाप्रमुख संभाजी शिंदे यांनीही रात्री शिंदे फडणवीस सरकार आणि मोदी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करीत निषेध व्यक्त केला. महाराष्ट्रातला प्रत्येक शिवसैनिक हा फक्त ठाकरे यांच्याच सोबत राहणार असल्याचे संभाजीराजे शिंदे यांनी सांगितलं. 

पार्श्वभूमी

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...


केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज नागपूर आणि पुणे दौऱ्यावर आहेत. पुणे चिंचवड पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांचा दौरा महत्वाचा असल्याचे बोलले जात आहे. आज राज्यासह देशभरात महाशिवरात्रीचा उत्साह असणार आहे. त्याशिवाय जाणून घ्या आज दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी...








नव्या राज्यपालांचा शपथविधी







नवे राज्यपाल रमेश बैस यांचा आज शपथविधी सोहळा पार पडणार आहे. हाय कोर्टाचे मुख्य न्यायाधीश त्यांना पद आणि गोपनियतेची शपथ देतील. 


केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज नागपूर आणि पुणे दौऱ्यावर


केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज नागपूर आणि पुणे दौऱ्यावर आहेत. पुणे चिंचवड पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांचा दौरा महत्वाचा असल्याचे बोलले जात आहे. अमित शाह आज सकाळी साडे दहा वाजता दीक्षाभूमीला जाऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृतीला वंदन करतील. त्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रेशीमबागेतील हेडगेवार स्मृती भवन परिसरात जाऊन आद्य सरसंघचालक डॉ. हेडगेवार आणि द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांच्या समाधीला वंदन करतील. 


कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठी दोन्ही बाजूंकडून प्रचार  


पुण्यातील कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठी भाजप आणि महाविकास आघाडीकडून प्रचाराला सुरूवात करण्यात येणार आहे. 


राज्यासह देशभरात महाशिवरात्रीचा उत्साह 


आज राज्यासह देशभरात महाशिवरात्रीचा उत्साह असणार आहे. बुलढाणा जिल्ह्यातील पळशी झाली येथे महाशिवरत्रीनिमित्त आज श्री. शंकरगिरी महाराज महादेव मंदिरात मोठी यात्रा भरते. याठिकाणी सव्वा क्विंटलचा अनोखा रोडगा बनविण्याची 350 वर्षापासूनची प्रथा आहे. गव्हाचं पीठ,  ड्राय फ्रूट , दूध इत्यादी पदार्थांपासून बनविण्यात आलेल्या या मोठ्या रोडग्याला जमिनीत गाडून आग न लावता भाजतात व दुसऱ्या दिवशी या रोडग्याचा महाप्रसाद भाविकांना दिल्या जातो. हा रोडगा बनविताना बघण्यासाठी हजारो भाविक या ठिकाणी येतात. ही 350 वर्षांपासूनची परंपरा कोरोनामुळे गेल्या तीन वर्षांपासून खंडित झाली होती. त्यामुळे यावेळी या यात्रेत मोठी गर्दी उसळेल. 


महाशिवरात्री निमित्ताने बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असणाऱ्या त्रंबकेश्वरच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी होणार आहे, आज रात्रभर मंदिर भाविकांसाठी खुले रहाणार सकाळ पासून गर्दी वाढणार. महाशिवरात्री निमित्ताने उद्या जळगाव जिल्ह्यातील मुक्ताई नगर तालुक्यातील कोथळी येथील संत मुक्ताई ची यात्रा होत असते. यावेळी संत मुक्ताई मंदिर ते चांगदेव मंदिर अशी पालखी काढण्याची परंपरा आहे. लाखो भाविक या निमित्ताने दर्शन घेण्यासाठी गर्दी करत असतात


महाशिवरात्री निमित्ताने अहमदनगरच्या डोंगरगण येथे महादेव मंदिरात मोठ्या संख्येने भाविकांची गर्दी होत असते. हजारोंच्या संख्येने भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात. या मंदिराच्या बाजूलाच सीता मातेचे स्नानगृह आहे. वनवासाच्या काळात श्रीरामांनी सीता मातेसाठी बाण मारून इथे स्नानगृह बनविल्याची आख्यायिका आहे. तिथेही भाविक गर्दी करत असतात


महाशिवरात्रीनिमित्त बीड येथील ज्योतिर्लिंग वैद्यनाथ मंदिरात मोठी गर्दी होते. महाशिवरात्रीच्या निमित्ताने देशातील पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या परळीतल्या वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाच्या मंदिरात मोठी गर्दी होत आहे. महाशिवरात्रीला दर्शन घेण्यासाठी राज्यभरातून आणि राज्या बाहेरून सुद्धा भाविक परळी मध्ये येत आहेत रात्रीपासूनच दर्शनासाठी लोक रांगेमध्ये लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. 


 गोंदियातील प्रतापगड येथे यात्रा


गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील प्रतापगड येथे सुमारे 300 वर्षांपूर्वी गोंड राजाचे शासन होते. त्या काळातच याठिकाणी येथील डोंगर फोडून प्रतापगड हा किल्ला बांधण्यात आला होता. त्यानंतर बऱ्याच वर्षांपासून याठिकाणी शिवरात्रीला मोठी यात्रा भरते. येथे सर्व जाती- धर्माचे नागरिक मोठ्या संख्येने येतात. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे दरवर्षी या ठिकाणी शिवरात्रीला उपस्थित राहतात. आजही नाना पटोले त्या ठिकाणी भेट देणार आहेत. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.