Maharashtra News Updates 17th May 2023 : दिल्ली उच्च न्यायालयाचा समीर वानखेडे यांना 22 मे पर्यंत दिलासा, उद्याची CBI चौकशी रोखली

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 17 May 2023 09:10 PM
Sameer Wankhede: दिल्ली उच्च न्यायालयाचा समीर वानखेडे यांना 22 मे पर्यंत दिलासा, उद्याची CBI चौकशी रोखली

दिल्ली उच्च न्यायालयाचा समीर वानखेडे यांना दिलासा

उद्याची CBI चौकशी रोखली, 22 मेपर्यंत समीर वानखेडेंना दिल्ली उच्च न्यायालयाचा दिलासा

मात्र कायमस्वरूपी दिलाश्याकरता मुंबई उच्च न्यायालयात दाद मागण्याचे निर्देश

तूर्तास कठोर कारवाईपासून संरक्षण देण्यास CBI ची सहमती 

CBI ची कारवाई कोणत्या आधारावर? माझ्या घरी सर्च ऑपरेशन कां? माझ्यावर अन्याय होतेय

समीर वानखेडेंनी या या मुद्द्यांवर मागितली होती दिल्ली हायकोर्टात दाद

Thane: ठाणे: कंत्राटी नर्सेस यांना आरोग्य सेवेत सामावून घेण्यासाठी नर्सेस यांचे ठाणे जिल्हा अधिकारी कार्यालयाजवळ आंदोलन

Thane News:  कोरोना काळात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या कंत्राटी नर्सेस यांना पुन्हा आरोग्य सेवेत कायम करण्यासाठी आज ठाण्यात आयटक महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते कंत्राटी नर्सेस युनियनच्या वतीने ठाण्याच्या जिल्हा अधिकारी कार्यालयावर कंत्राटी नर्सेस यांनी आंदोलन करून जिल्ह्यातील आरोग्य केंद्र सेवेत रुजू करून घ्यावे यासाठी आंदोलन केले आहे. यावेळी आयटक युनियनच्या वतीने जिल्हा परिषदेच्या कार्यकारी अधिकारी यांना निवेदन दिले. 

Sanjay Raut: शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांना हक्कभंगाची नोटीस; विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी बजावली नोटीस

Sanjay Raut: शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांना हक्कभंगाची नोटीस; विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी बजावली नोटीस

Gondia News:  राखीव वनक्षेत्रात अवैध गट्टू कारखाण्यावर धाड; अग्रवाल ग्लोबल कंपनीचे कोट्यवधींचे साहित्य जप्त, गुन्हा दाखल

Gondia News:  गोंदिया जिल्ह्यातील ससीकरण देवस्थान परिसरात राखीव वन क्षेत्रात अग्रवाल ग्लोबल इन्फ्राटेक प्रायव्हेट लिमिटेड रायपूर या महामार्ग बांधकाम करणाऱ्या कंपनीने वन विभागाची कुठलीही परवानगी न घेता गट्टू बनविण्याचा कारखाना उभारला. त्यात लागणारी यंत्रसामग्री तसेच गट्टू तयार करण्याकरिता लागणारा कच्चा मटेरियल व मजुरांना राहण्याकरिता टिनाचे शेड उभे केले. काही दिवसापासून हा कारखाना अवैधरित्या सुरू असताना सडक अर्जुनीचे वनपरिक्षेत्राधिकारी सुरेश जाधव यांनी त्या अवैध कारखान्यावर आपल्या सहकाऱ्यांसोबत धाड टाकून करोडो रुपयांची यंत्रसामुग्री तसेच रेती, बजरी,गट्टू तसेच इतर साहित्य मोठ्या प्रमाणात जप्त केले असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Mumbai News: आदित्य ठाकरे यांचे राज्यपालांना पत्र; मुंबई महानगरपालिकेतील लूट आणि रस्ते घोटाळ्याकडे वेधले लक्ष

मुंबई महानगरपालिकेतील लूट आणि रस्ते घोटाळा  थांबवण्यासाठी हे पत्र असल्याचे आदित्य ठाकरे यांचे म्हणणे .

मुंबई महापालिकेत होणाऱ्या कामांसंदर्भात आक्षेप घेत शिवसेनेच्या शिष्टमंडळाने राज्यपालांची मागील महिन्यात भेट घेत तक्रार केली होती 

आता मुंबई महापालिका आणि मुख्यमंत्री कार्यालय यांच्याकडून पैशाचा अपव्य थांबावा यासाठी राज्यपालांनी लोकायुक्तांकडे याचिका पाठवावी अशी विनंती, आदित्य ठाकरे यांनी राज्यपालांकडे पत्राद्वारे केली आहे

Mumbai News: रस्त्यावर चालणाऱ्या महिलेचा विनयभंग; गुन्हा दाखल झाल्यापासून 24 तासात आरोपी अटकेत, अंधेरी पोलिसांची कारवाई

Mumbai News:  महिला आणि मुलींसाठी सुरक्षित शहर म्हणून मुंबई शहराचे नाव सर्वात पुढे आहे. महिला आणि लहान मुलांच्या संदर्भातील गुन्ह्यांचा तपास करताना मुंबई पोलीसांनी आपली एक छाप सोडली आहे. अंधेरी पोलीस ठाणे हद्दीत रस्त्याने पायी चालणाऱ्या महिलेचा विनयभंग झाल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला. याच प्रकरणात अंधेरी पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण कक्षाने गुन्हा दाखल झाल्याच्या 24 तासाच्या आतच आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत.संतोष कुमार विश्वनाथ गिरी (42 वर्ष) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

महाविकास आघाडीच्या लोकसभा निवडणूक समन्वय समितीमध्ये ठाकरे गटातून कोणाची वर्णी लागणार याची उत्सुकता, चार नावं चर्चेत
महाविकास आघाडीच्या लोकसभा निवडणुक समन्वय समितीमध्ये ठाकरे गटातून कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. खासदार संजय राऊत यांचं नाव निश्चित झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तर दुसरा नेता म्हणून कोणाची निवड होणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. उद्धव ठाकरे अंतिम निर्णय घेणार आहे. दुसरा नेता कोण असेल यासाठी सुभाष देसाई, अनिल देसाई, अरविंद सावंत आणि विनायक राऊत या चार नेत्यांची नावे सध्या चर्चेत आहेत. मात्र त्यापैकी सुभाष देसाई यांचे चिरंजीव भूषण देसाई शिंदे गटात गेल्यामुळे त्यांच्याबद्दल ठाकरे गटात तीव्र नाराजी आहे. त्यामुळे दुसरं नाव कोणाचं याची उत्सुकता आहे.

संजय राऊत यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता, शिवसेनेच्या आमदारांसह अपक्ष आमदार विधानसभा अध्यक्षांकडे राऊतांची तक्रार करण्याच्या तयारीत

संजय राऊत यांच्या अडचणी अधिक वाढण्याची शक्यता 

शिवसेनेच्या आमदारांसह अपक्ष आमदार विधानसभा अध्यक्षांकडे

राऊतांच्या विरोधात तक्रार करण्याच्या तयारीत 

शिवसेना संजय राऊतांवर परत हक्कभंग आणण्याच्या तयारीत 

विधानसभा अध्यक्षाबद्दल केलेल्या व्यक्तव्याबद्दल राऊतांवर हक्कभंग आणावा अशी मागणी करणार 

शिंदेच्या सर्व आमदार गटा गटानं विधानसभा अध्यक्षांची भेट घेणार 

ठाकरे गटानं विधानसभा उपाध्यक्षांची भेट घेतल्यानंतर टीम शिंदे ॲक्शन मोडमध्ये 

विधानसभा अध्यक्षाकडून तात्काळ कारवाईला सुरुवात, अध्यक्ष आज दोन्ही गटाकडून राजकीय पक्षाची घटना मागणार

Vidhan Sabha Speaker : विधानसभा अध्यक्षाकडून तात्काळ कारवाईला सुरुवात

अध्यक्ष आज दोन्ही गटाकडून राजकीय पक्षाची घटना मागणार 

सुप्रीम कोर्टाने अध्यक्षांना आधी राजकीय पक्ष कोण हे तपासण्यास सांगितलं आहे

त्यानुसार अध्यक्ष आज राजकीय पक्षाची घटना मागवणार 

आज ठाकरे आणि शिंदे गटातील 54 आमदारांना नोटीस पाठवली जाणार 

पुढील सात दिवसात आपली भूमिका मांडण्यास सांगणार

स्पर्धा परीक्षेसाठी आलेला तरुणाने मोबाईल फोन चोरल्याचं उघड, वानवडी पोलिसांकडून तरुण अटकेत

Pune News : स्पर्धा परीक्षा देण्यासाठी आलेला एका तरुणाने मोबाईल फोन चोरीचे गुन्हे केल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी तरुणास वानवडी पोलिसांनी अटक केली. ऋषिकेश पाटील (वय 24 वर्षे) असे अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव आहे. याबाबत एका तरुणाने फिर्याद वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. रामटेकडी येथील डिजिटल हब येथे स्पर्धा परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. फिर्यादी तरुण परीक्षा देण्यासाठी आला होता. परीक्षेच्या वेळी उमेदवारांचे मोबाईल फोन, कागदपत्रे आणि वस्तू ठेवायच्या पिशव्या बाहेर ठेवण्यात आल्या होत्या. फिर्यादी तरुणाने त्याची पिशवी बाहेर ठेवली होती. परीक्षा संपल्यानंतर तरुणाला पिशवी सापडली नाही. एका परीक्षार्थीची पिशवी तिथे होती. मात्र, पिशवीतील मोबाईल चोरीला गेला होता. परीक्षा सुरु असताना मोबाईल चोरीचे प्रकार घडल्याने उमेदवारांनी तक्रार वानवडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. पोलिसांना तपासात मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी सापळा लावून पाटील याला ताब्यात घेतले त्यावेळी चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी आरोपी ऋषिकेश पाटीलकडून मोबाईल फोन, गणकयंत्र आणि दुचाकी असा 96 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपी पाटील उच्चशिक्षित असून कंपनीत नोकरीस आहे. याचा अधिक तपास वानवडी पोलीस करत आहेत.

पुण्यातील पोलीस लॉकअपमध्ये एकाची आत्महत्या; विश्रामबाग पोलीस स्टेशनच्या हद्दीतील घटना

Pune News : पुणे शहरातील विश्रामबाग पोलीस स्टेशनच्या हद्दीत असणाऱ्या लॉकअपमध्ये एका आरोपीने गळफास घेऊन आत्महत्या केली. आज सकाळी सात वाजण्याच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. शिवाजी गरड असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. युनिट सहाच्या पथकाने त्याला हडपसर परिसरातील एका चोरीच्या गुन्ह्यात अटक केली होती.

गोंदियात मंदिरातील चांदीचे छत आणि दानपेटीमधील रक्कम पळवणाऱ्या चोरट्याला अटक

Gondia News : गोंदिया शहरातील हनुमान मंदिरातील हनुमानाच्या डोक्यावरील चांदीचे छत आणि दानपेटीतील रक्कम, शीतला माता मंदिराच्या दानपेटीतील पैसे तसेच दुर्गेश्वरी मंदिरातील दानपेटीमधील पैसे एकाच रात्री पळवल्याने एकच खळबळ उडाली होती. या घटनेप्रकरणी पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत आरोपी राहुल ओंकारकर याला भंडारा जिल्ह्यातून ताब्यात घेतले आहे. आरोपीने चोरी केलेला मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.

मुंबई-गोवा महामार्गावरील कणकवली इथल्या ओसरगाव टोलनाक्यावर 1 जूनपासून टोलवसुली सुरु होणार

Sindhudurg News : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर सिंधुदुर्गच्या कणकवलीमधील ओसरगाव टोलनाक्यावर टोल वसुलीसाठीची निविदा तिसऱ्यांदा मंजूर झाली आहे. भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणकडून झालेल्या कार्यवाहीनुसार ओसरगाव टोल वसुलीसाठी कंपनी निश्चित झाली असून 1 जूनपासून टोलवसुलीची 'वर्कऑर्डर' मिळाली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकीय पक्षांचा या टोलवसुलीला विरोध असून पुन्हा एकदा संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे. सर्वच पक्षांनी टोलवसुलीला विरोध केला आहे. सिंधुदुर्ग पासिंगच्या गाड्यांना टोलमुक्ती तसेच अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करुन मगच टोलवसुली करावी, अशी भूमिका घेण्यात आली. त्यानंतर ही टोलवसुली रखडली होती. आता पुन्हा नवीन तारीख निश्चित करण्यात आली असून यावेळचाही मुहूर्त साधता येईल का हे पाहणे आवश्यक आहे.

गिरीश महाजन यांचा वाढदिवस, दैनिकात शुभेच्छा जाहिरात देताना संजय पवार यांच्याकडून अजित पवार, शरद पवार आणि मोदींच्या फोटोचा वापर

Jalgaon News : राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांचा आज वाढदिवस आहे. या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात बंडखोरी करत जिल्हा बँकेचे अध्यक्ष बनलेल्या संजय पवार यांनी, एका दैनिकात महाजन यांना शुभेच्छा जाहिरात देताना गिरीश महाजन यांच्यासह अजित पवार, शरद पवार आणि मोदी यांचे फोटोही वापरले. त्यामुळे संजय पवार यांनी केलेली ही जाहिरात राजकीय क्षेत्रात पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनली आहे. बाजार समिती निवडणुकीत ही संजय पवार यांनी भाजप शिंदे गटाच्या पॅनलसोबत राहून निवडणूक लढवली होती. त्यावेळीही त्यांनी शरद पवार यांचा फोटो असलेले पॅम्पलेट नागरिकांना वाटले होते. त्यावेळीही राजकीय क्षेत्रात मोठी चर्चा रंगली होती.

बुलढाण्यात नांगरणी करताना अनियंत्रित होऊन ट्रॅक्टर विहिरीत कोसळताना वाचला, चालक शेतकरी सुरक्षित

Buldhana News : सध्या शेतीच्या मशागतीची कामं सुरु आहेत. बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालक्यातील घाटनांद्रा येथील शेतकरी पंकज देशमुख हे आपल्या ट्रॅक्टरने शेतीची नांगरणी करत असताना अचानक ट्रॅक्टर अनियंत्रित होऊन सरळ शेतातील मोठ्या विहिरीत कोसळताना बालंबाल बचावले. सध्या शेतकरी मशागतीची जास्तीत जास्त कामे ट्रॅक्टरने करतात. मात्र यावेळी अनेक अपघात होऊन नुकसान होण्याची शक्यता असते. त्यामुळे शेतकऱ्यांनी ट्रॅक्टरने कामे करताना सावधानता बाळगावी. यावेळी ट्रॅक्टर विहिरीत कोसळताना वाचला. जेसीबीच्या सहाय्याने ट्रॅक्टर बाहेर काढण्यात आला आहे.

नालासोपाऱ्यात एक लाख रुपयांची लाच स्वीकारताना तुळींज पोलीस स्टेशनच्या पोलीस उपनिरीक्षकाला अटक

Nalasopara News : एक लाख रुपयांची लाच घेताना नालासोपाऱ्यातील तुळींज पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक रामचंद्र दत्तात्रय शेंडगे यांना ठाण्याच्या लाच लुचपत विभागाने अटक केली आहे. तक्रारदारांकडून त्यांच्यावर तुळींज पोलीस स्टेशनात दाखल झालेल्या गुन्ह्यात अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी मदत करण्याकरता एक लाख रुपये लाचेची मागणी केली होती. ती स्वीकारतात काल मंगळवारी रात्री त्यांना अटक केली.

वांद्रे पश्चिम इथे लागलेल्या आगीवर नियंत्रण, कुलिंग ऑपरेशन सुरु; आगीत 7 ते 8 घरांचं नुकसान

Bandra Fire : बांद्रा पश्चिमेला असलेल्या नर्गिस दत्त नगर (नर्गिस दत्त रोड) भागात पहाटे साडेचारच्या दरम्यान आग लागली. अग्निशमन दलाला आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं असून कुलिंग ऑपरेशन सुरु आहे. या आगीत 7 ते 8 घरांचं नुकसान झाल्याची माहिती आहे. आगीत सुदैवाने कुठलीही जीवितहानी झालेली नाही.

अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी 20 वर्षांचा सश्रम कारावास, भंडारा जिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल

Bhandara News : अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवत अत्याचार केल्याप्रकरणी भंडारा जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने 29 वर्षीय तरुणाला 20 वर्षे सश्रम कारावास आणि तीन हजार रुपये द्रव्यदंडाची शिक्षा ठोठावली आहे. राजेंद्र लक्ष्मीचंद्र धुर्वे, रा. गुडरी, ता. तुमसर असं शिक्षा ठोठावलेल्या आरोपीचे नाव आहे. हा निर्णय जिल्हा व अतिरिक्त सत्र न्या. पी. बी. तिजारे यांनी दिला. ही घटना 4 ऑक्टोबर 2018 ची असून गोबरबाही पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. सुनावणी दरम्यान सरकारी फिर्यादीच्या वकील दुर्गा तलमले यांनी अल्पवयीन पीडितेची योग्य बाजू मांडली.

Mumbai Bandra News: मुंबईतील वांद्रे परिसरात भीषण आग, 8 घरं जळून खाक

Mumbai Bandra News: मुंबईतील वांद्रे परिसरात भीषण आग, झोपडपट्टीला भीषण आग, या आगीत सुमारे 8 घरं जळून खाक. 

 आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 10 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले.

 या आगीत कोणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही.

 पातळी 2 आग आहे.

Bhandara News: रिसेप्शनसाठी नवदाम्पत्यांची छकड्यातून ग्रँडएन्ट्री; भंडाराकरांनी अनुभवला नादखुळा शेतकरी
Bhandara News: वावर हैं तो पॉवर हैं, असं म्हणतात. ते काही खोटं नाही, याची अनुभूती भंडाराकरांना आली. भंडाऱ्यातील जाख या गावातील युवा शेतकऱ्यानं त्याच्या रिसेप्शनला जाताना त्याच्या नवविवाहितेला चक्क शेतकऱ्याचा जिवाभावाचा सोबती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सजविलेल्या बैलजोडी आणि छकड्यावर स्वार होऊन रिसेप्शनस्थळी ग्रँडएन्ट्री केली. 

भंडारा शहरालगत असलेल्या जाख (मुजबी) या छोट्याशा गावातील युवा शेतकरी भरत सार्वे हा मोहाडी तालुक्यातील जांभूळवाणी येथील निकिता हिच्याशी विवाहबंधनात अडकला. त्यांच्या विवाहाचं स्वागत समारंभ (रिसेप्शन) भरत याच्या गावी जाख इथं आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाला मान्यवरांची उपस्थिती असताना भरत आणि त्याची नवविवाहित निकिता हे दोघेही सजविलेल्या बैलजोडी आणि छकड्यावर स्वार होऊन आणि हातात आतषबाजीच्या गण नं रोषणाईची  उधळण करीत अगदी फिल्मी स्टाईलनं ग्रँडएन्ट्री केली. नवदाम्पत्यांची अगदी हटके एन्ट्री बघुन उपस्थितांनीही त्यांचं जोरदार स्वागत केलं.

पार्श्वभूमी

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

BMC : पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्तांनी घेतला आढावा, केल्या 'या' महत्त्वपूर्ण सूचना

Mumbai: येत्या पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) क्षेत्रातील विविध यंत्रणांमध्ये समन्वय साधला जावा,या दृष्टीने महानगरपालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल (Iqbal Singh Chahal) यांच्या मार्गदर्शनात बैठक पार पडली. मुंबईतील विविध यंत्रणांनी पावसाळ्याच्या काळात पूरपरिस्थितीच्या आव्हानावर मात करण्यासाठी सज्ज रहावे, अशा सूचना या बैठकीत देण्यात आल्या. पूराचा धोका टाळण्यासाठी सर्व यंत्रणांनी पावसाळापूर्व कामांमध्ये चोख भूमिका बजावावी, असे आवाहन पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी केले. 

उपनगरीय लोकलसेवा सुरळीत सुरू राहावी, याची काळजी घेण्याचे आवाहन

रेल्वे आणि मुंबई पालिकेने मागच्या वर्षीच्या पावसाळ्यात अतिशय उत्तम काम केल्यानेच उपनगरीय लोकल सेवा सुरळीत सुरू होती. यंदाही त्याच धर्तीवर उत्तम पद्धतीने काम करण्याचे निर्देश पालिका आयुक्तांनी दिले. रेल्वे परिसरातील वृक्ष छाटणी मोहीम मे महिन्याच्या अखेरीपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचनाही त्यांनी उद्यान विभागाला दिल्या. 

यंदा नागरिकांना हवामानाच्या माहितीचे एसएमएस मिळणार

आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडून पावसाळ्याच्या कालावधीत हवामानाचे वेळोवेळी अलर्ट देणारी यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. नागरिकांना पावसाळ्याच्या कालावधीत वेळोवेळी अपडेट्स देणारी मॅसेजची यंत्रणा यंदा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. एका एसएमएस ॲपच्या सहाय्याने हे एसएमएस अलर्ट नागरिकांना पाठवण्यात येतील.

APMC Election: नाशिक एपीएमसी निवडणूक प्रकरणी हायकोर्टाची नाराजी, राज्य सरकारला नोटीस जारी

APMC Election: नाशिकच्या कृषी उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी), अध्यक्ष आणि उपाध्यक्षांच्या निवडणुकीला स्थगिती दिल्याबद्दल पणन खातं सांभाळणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या निर्णयावर मुंबई उच्च न्यायालयानं (Mumbai High Court) ताशेरे ओढले आहेत. यावर राज्य सरकारला नोटीस बजावून एपीएमसीच्या निवडणुका घेण्याबाबत तातडीनं बैठक घेण्याचे आदेश राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाला (एससीईए) दिले आहेत.

कायद्यात तरतूद असूनही मुख्यमंत्री शिंदे यांनी चुकीचे आदेश पारीत करून निवडणूक प्राधिकरणाला अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडणुका घेण्यापासून रोखलं. अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाची निवडणूक प्रक्रिया स्वतंत्र आहे. निवडून आलेली व्यक्तीला त्यांचा अधिकार वापरण्यापासून प्रतिबंधित करणाऱ्या सक्षम प्राधिकरणाच्या आदेशाशिवाय अध्यक्ष आणि उपाध्यक्षांना अपात्र ठरवता येणार नाही, असं निरीक्षण न्यायमूर्ती अमित बोरकर आणि न्यायमूर्ती कमल खाता यांच्या सुट्टीकालीन खंडपीठानं आपल्या आदेशात नोंदवलं आहे. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.