Maharashtra Live Updates : गोंदियाच्या कृषी उत्पन्न बाजार समितीतून धान चोरी करणाऱ्या तिघांना अटक
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE
Background
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
महाराष्ट्र भुषण पुरस्कार सोहळ्याला गालबोट
उष्माघातामुळं कार्यक्रमाला आलेल्या 11 श्री सेवकांचा मृत्यू झाला आहे. अनेक सदस्यांवर रुग्णालयात उपचार सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रुग्णालयात जाऊन घेतली श्री सदस्यांची भेट घेतली असून सरकारकडून मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे.
प्रकाश आंबेडकराचं भाकित खरं ठरणार?
राज्याच्या राजकारणात भूकंप होणार ? 8 एप्रिलला अजित पवार नॉट रिचेबल झाल्यानंतर आणि सुप्रिम कोर्ट सत्ता संघर्षाची तारीख जवळ यायला लागल्यापासून महाराष्ट्राचं राजकीय वातावरण गरम व्हायला लागल आधी अंजली दमानिया आणि आता प्रकाश आंबेडकरांनी राजकीय बॉम्ब स्फोटाचा दावा केला आहे. 15 दिवस थांबा दोन बॉम्ब स्फोट होणार असल्याचं प्रकाश आंबेडकरांनी म्हंटलय
वॉर्ड पुनर्रचनेविरोधात हायकोर्टात दाखल याचिकेचा फैसला आज ?
ठाकरे गटाला मिळणार का दिलासा ? मविआ सरकारनं बृहन्मुंबई महापालिकेची प्रभागाची पुनर्रचना करून प्रभाग संख्या ती 227 वरुन 236 पर्यंत वाढवली. शिवसेनेतून शिंदे गटानं बाहेर पडून भाजपाशी हात मिळवणी करून नवे सरकार स्थापन केले. त्यानंतर मविआ सरकारचा निर्णय बदलून प्रभाग संख्या पूर्ववत 227 केली. या निर्णयामुळे बृहन्मुंबई महापालिकेची आधीच रखडलेली निवडणूक आणखी लांबणीवर पडणार आहे. तसेच याचा सरकारी तिजोरीलाही मोठा फटका बसणार आहे, असा दावा करीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी नगरसेवक राजू पेडणेकर यांच्यावतीनं याचिका दाखल केलेल्या याचिकेवर हायकोर्टाचा फैसला आज होणार आहे.
मुंबई: पत्राचाळ घोटाळा प्रकरणी संजय राऊतांना मिळालेला जामीन रद्द करण्यासाठी ईडीनं हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर आजपासून हायकोर्टात विशेष सुनावणी होणार आहे. संध्याकाळी 4.30 वाजता सुरू होणार आहे. तसेच याप्रकरणी मुंबई सत्र न्यायालयात सुरू असलेल्या खटल्याकरता संजय राऊत सकाळी 11 वाजेपर्यंत मुंबई सत्र न्यायालयात हजेरी लावण्याची शक्यता आहे.
दिल्ली : राज्यपाल नियुक्त 12 आमदार याचिकेवर सुप्रिम कोर्टात आज सुनावणी होणार आहे.
सांगली : आटपाडी तालुक्यातील खरसुंडी मधील प्रसिद्ध श्री सिद्धनाथ देवाच्या यात्रेचा आज मुख्य दिवस असून सासनकाठी गुलालाच्या उधळणीत लाखो भाविकांच्या उपस्थितीत पार पडतो. हा सोहळा पाहण्यासाठी आणि दर्शनासाठी महाराष्ट्र, तामिळनाडू कर्नाटकसह अनेक राज्यातून लाखो भाविक श्री सिद्धनाथाच्या खरसुंडी नगरीत दाखल होतात. खरसुंडी मधील सिद्धनाथ देवाच्या यात्रेनिमित्ताने खिलार जनावराचा मोठा बाजार भरतो. बैलगाडी शर्यतीत खिलार बैलांना अधिक पसंती असते आणि बैलगाडी शर्यतीला परवानगी मिळाल्यानंतरचा हा खरसुंडी मधील खिलार जनावराचा पहिलाच बाजार भरतोय.
Gondia News: गोंदियाच्या कृषी उत्पन्न बाजार समितीतून धान चोरी करणाऱ्या तिघांना अटक
Gondia News: गोंदिया येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत ठेवलेले दोन व्यापाऱ्यांचे धान चोरट्यांनी चोरून नेले होते. याप्रकरणी गोंदिया शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत एकूण तीन आरोपींना अटक केली आहे. या तिन्ही आरोपींनी धान चोरल्याचे कबूल केले आहे. राजकुमार विश्वकर्मा, संदीप बावनथडे , अतुल पारधी असे अटक करण्यात आलेल्या तिन्ही आरोपींची नावे आहेत.
Maharashtra Politics: लोकशाही वाचवण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत: उद्धव ठाकरे
देशाला हुकूमशाहीचा धोका आहे. लोकशाहीला वाचवण्यासाठी आम्ही एकत्र आलो असल्याचे शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटले.
लोकशाही वाचवण्यासाठी काँग्रेस शिवसेना ठाकरेंसोबत आहे; काँग्रेस नेते के.सी. वेणुगोपाल यांची स्पष्टोक्ती
लोकशाही वाचवण्यासाठी काँग्रेस शिवसेना ठाकरेंसोबत आहे असे प्रतिपादन काँग्रेस नेते के.सी. वेणुगोपाल यांनी केले आहे. मातोश्रीवरील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
Maharashtra Politics: काँग्रेस नेते के. सी. वेणुगोपाल मातोश्रीवर दाखल; उद्धव ठाकरे यांच्यासोबत करणार विविध मुद्यांवर चर्चा
Maharashtra Politics: काँग्रेस नेते के. सी. वेणुगोपाल मातोश्रीवर दाखल झाले आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत विविध मुद्यांवर चर्चा करणार आहेत. वेणुगोपाल यांच्यासोबत भाई जगताप, बाळासाहेब थोरात, चरणसिंग सप्रा हेदेखील मातोश्रीवर दाखल झाले आहेत.
Congress KC Venugopal : काँग्रेसचे केसी वेणुगोपाल हे उद्धव ठाकरेंच्या भेटीला, मातोश्रीवर चर्चा
राज्यातील महाविकास आघाडी कायम एकजूट राहावी यासाठी आता काँग्रेसचे केंद्रीय नेते केसी वेणुगोपाल हे उद्धव ठाकरेंच्या भेटीला मातोश्रीवर पोहोचले आहेत. सावरकरांच्या मुद्द्यावरुन काँग्रेस आणि शिवसेना उद्धव ठाकरे यांच्यातील संबंध ताणले असताना ही भेट महत्त्वाची आहे.