Maharashtra News Updates 16 February 2023 : 19 फेब्रुवारीला शिवनेरी किल्ल्यावर जाणाऱ्या शिवभक्तांना राज्य सरकारचा दिलासा

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 16 Feb 2023 07:47 PM
मुलुंडमध्ये आगीची घटना

मुलुंड पश्चिम एस एल रोड येथे  शॉर्ससर्किटमुळे आग लागल्याची घटना  उघडकीस आली या आगीमुळे सपूर्ण दुकाने जळून खाक झाली असून इतर दोन दुकानांचे देखील या आगी मुळे नुकसान झाले आहे. मिळालेली प्राथमिक माहिती अनुसार या घटने मध्ये कोणतेही जीवितहानी  झाली नाही. अग्निशमन दलाला माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल होऊन ही आग विजवण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे.

मुंबई - पुणे एक्सप्रेस वे च्या बोरले टोल नाक्यावर तोडफोड

मुंबई - पुणे एक्सप्रेस वे च्या बोरले टोल नाक्यावर तोडफोड


४० ते ५० जणांनी केली तोडफोड


टोल मागितला म्हणून तोडफोड करण्यात आली आहे


मुंबई कडून पुणे कडे जाताना शेडूंग फाटा येथे Exit घेतो त्या ठिकाणच्या टोल नाक्याची तोडफोड 


पनवेल तालुका पोलिसांनी तोडफोड करणार्या ४० जणांना घेतले आहे ताब्यात

राज्य सरकारकडून एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी २२३ कोटी रुपयांचा निधी 

राज्य सरकारकडून एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी २२३ कोटी रुपयांचा निधी 


एसटी महामंडळाकडून आजच कर्मचाऱ्यांचे पगार करण्याचे प्रयत्न, मात्र प्रक्रियेस उशीर झाल्यास उद्यावर एसटी कर्मचाऱ्यांचे पगार जाणार 


काल झालेल्या अर्थ, परिवहन आणि एसटी कर्मचाऱ्यांच्या बैठकीत ३५० कोटी रुपयांचा निधी मिळणार असल्याचं सांगण्यात आलं होतं मात्र महामंडळाला २२३ कोटी रुपये देण्यात आले आहेत


एसटी महामंडळाकडून अर्थ विभागाला पत्र लिहित १ हजार कोटी रुपयांची मागणी करण्यात आली होती 


मात्र, खर्चाचे विवरण सादर करण्याचे निर्देश महामंडळाला दिले गेले होते, अशात कर्मचाऱ्यांचे पगार लांबणीवर गेले होते

19 फेब्रुवारीला शिवनेरी किल्ल्यावर जाणाऱ्या शिवभक्तांना राज्य सरकारचा दिलासा

19 फेब्रुवारीला शिवनेरी किल्ल्यावर जाणाऱ्या शिवभक्तांना राज्य सरकारचा दिलासा


शिवनेरी मार्गावर लागणाऱ्या तीन टोल वर टोलमाफी


खालापूर, तळेगाव आणि खेड राजगुरुनगर या टोलनाक्यावर टोल माफी असणार

सोलापूर महानगरपालिकेचा सहाय्यक अभियंता 13 हजारांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले

सोलापूर महानगरपालिकेचा सहाय्यक अभियंता 13 हजारांची लाच स्वीकारताना सापडला रंगेहात 


सुनील नेमीनाथ लामकाने असे आरोपी लोकसेवकाचे नाव 


महापालिकेच्या गवसू विभागात सहाय्यक अभियंता पदावर होते कार्यरत


मोजमापे पुस्तकावर सही करण्यासाठी ठेकेदाराकडून स्वीकारली होती 13 हजार रुपयांची लाच 


महापालिकेच्या इमारतीत लाच स्वीकारताना लामकाने रंगेहात सापडले

भंडाऱ्यातील मेकॅनिल इंजिनियर रमला शेतीत, आधुनिक पद्धतीनं शेतात पिकविलं वेखंड, हळद आणि मोहरी

मेकॅनिकल इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण करून अशोक लेलँड कंपनीत व्यवस्थापक पदावर कार्यरत असलेल्या व्यक्ती नोकरी सोडून वडिलोपार्जित शेतात कष्ट उपसत आहे, असं कोणी सांगितलं तरीही विश्वास बसणार नाही. मात्र, भंडाऱ्यात हे प्रत्यक्षात बघायला मिळत आहे. भंडाऱ्याच्या लाखनीतील राजेश गायधने असं आधुनिक शेती करणाऱ्या शेतकऱ्याचं नावं आहे. गायधने यांचेकडे नऊ एकर शेती असून या शेतीत त्यांनी आधुनिक पद्धतीनं पिकांचं नियोजन केलं आहे. त्यांनी पाऊण एकरात वेखंड, (वेखंड हे छोट्या बाळांना चोखवतात... बोबळे पण दूर करण्यासाठी दिले जाते त्यासोबत त्याचा औषधी गुणधर्म म्हणून वापर करण्यात येते) मोहरी साडेतीन एकरात तर, हळद दीड एकरात लावली असून उर्वरित एकरात त्यांनी भात आणि गव्हाचं पीक घेतलं आहे. रासायनिक द्रव्यांची फवारणी न करता या सर्वांसाठी ते शेंद्रिय खत वापरतात, हे विशेष. भंडारा जिल्ह्यात प्रथमच वेखंडाची शेती करण्याचा यशस्वी प्रयोग गायधने या शेतकऱ्यानं केला असून त्यात ते यशस्वी झाले आहेत. पाऊण एकरात त्यांनी वेखंड लागवड केली तीन टन उत्पादन झाले. प्रती किलो 80 ते 100 रुपये दर मिळतो. सर्व खर्च वजा जाता त्यांना सुमारे 1 ते दीड लाखांपर्यंत नफा मिळाला. त्यांनी उत्पादन घेतलेलं वेखंड देशातील विविध भागात विक्रीसाठी पाठवितात. आधुनिक पद्धतीनं घेतलेल्या या उत्पादनातून त्यांनी चांगली आर्थिक प्रगती साधली आहे. गायधने यांनी वेखंडापासून वेखंड प्लस पावडर तयार केली असून त्याचा उपयोग वर्षभर धान्य साठवणुकीसाठी तसेच बियाणे दीर्घकाळ टिकविण्यासाठी होतो. *वेखंड अर्क, खत तयार केलं असून त्यांच्या प्रयोगाची दखल अमेरिकेतील जॉर्जिया विद्यापीठानं घेतली आहे.

गेवराईत तलावात बुडून 32 वर्षीय तरुणाचा मृत्यू
गेवराई शहराजवळ असलेल्या गोविंदवाडीच्या तलावामध्ये एका 32 वर्षे तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे..अमर शेख अस या तरुणाचे नाव असून तो तलावाच्या बाजूला असलेल्या दर्ग्यावर दर्शन घेण्यासाठी गेला होता, त्यावेळी पाय धुण्यासाठी तलावात उतरला असता त्याचा तोल गेला आणि तो पाण्यात पडला, आणि यातच तलावात बुडून त्याचा मृत्यू झाला आहे..

 
बीडच्या जिल्हा परिषद शाळेत शिकणारे विद्यार्थी नासा आणि ईस्रोला भेट देणार
बीड जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळे शिकणारे विद्यार्थी इस्रोसह नासाला भेट देणार आहेत.. यामध्ये तेहतीस विद्यार्थी हे श्रीहरीकोटा येथील इस्त्रोच्या स्पेस सेंटरला भेट देणार आहेत तर अकरा विद्यार्थी अमेरिकेतील नासा येथील स्पेस सेंटरला भेट देतील अशी माहिती अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सोळंके यांनी दिली आहे.. 

 

विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा त्याचबरोबर संशोधन वृत्तीचा विकास व्हावा आणि शास्त्रज्ञाच्या कार्यपद्धतीची जवळून ओळख व्हावी यासाठी हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.. तर इयत्ता पाचवी ते आठवीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची परीक्षेच्या माध्यमातून यासाठी निवड करण्यात येणार आहे..
Vasai News : महाशिवरात्रीला पालिकेच्या विशेष बससेवा; 38 बसच्या जवळपास 1100 फे-या होणार

Vasai News : महाशिवरात्रीनिमित्त वसईच्या प्रसिद्ध तुंगारेश्वर मंदिरात भाविकांची मंदियाळी असते. जवळपास अडीच लाख भाविक महादेवाच्या दर्शनासाठी येत असतात. भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी यंदा पालिकेने नालासोपारा, वसई, विरार, शिरसाट फाटा येथून विशेष बस सेवा सुरु केल्या आहेत. वसई पूर्वेहून दर 3 मिनिटाला, नालासोपारा पूर्व येथून दर 5 मिनिटाला, विरार पूर्वेहून दर 20 मिनिटाला तर शिरसाट फाटा येथून दर 20 मिनिटाला एक बस धावणार आहे. शुक्रवार दुपार पासून शनिवारी रात्रीपर्यंत 38 बसच्या जवळपास 1100 फे-या होणार आहेत. त्यामुळे विविध भागांतून दर्शनासाठी येणा-या भाविकांची गैरसोय होणार नाही. त्याच बरोबर पालिकेने यावेळी आपलं आरोग्य पथक, अग्निशमन पथकही तैनात केलं आहे. 

मुख्यमंत्र्यांच्या सभेत पाकीटमारांचा सुळसुळाट!

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बुधवारी उल्हासनगरात विविध विकास प्रकल्पांचा लोकार्पणासाठी आले होते. या कार्यक्रमात पाकीटमारांचा सुळसुळाट पाहायला मिळाला. राजकीय कार्यकर्त्यांसोबतच पत्रकारांचीही पाकीटं पाकीटमारांनी मारली.


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बुधवारी उल्हासनगरच्या सी ब्लॉक परिसरातील सेंच्युरीरी मैदानावर जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेला हजारो नागरिक उपस्थित होते. या सभेत उपस्थित असलेले राजकीय कार्यकर्ते आणि पत्रकार यांची पाकीटं अज्ञात पाकीटमारांनी मारली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सभा झाल्यानंतर कचऱ्याच्या गाड्यांचं लोकार्पण करण्यासाठी मैदानाच्या दुसऱ्या बाजूला गेले होते, यावेळी मोठी गर्दी झाली होती. याच गर्दीचा फायदा घेत पाकीटमारांनी ही हातसफाई केली. यामध्ये उल्हासनगरमधील माजी नगरसेवक डॉक्टर प्रकाश नाथानी, भाजपचे कार्यकर्ते अनिल पांडे, यांच्यासह लोकशाही वृत्तवाहिनीचे पत्रकार मयुरेश जाधव यांचं पाकीट मारण्यात आलं. या ३ चोऱ्यांमध्ये मिळून एकूण ३० ते ३५ हजार रुपये रोख रकमेसह महत्त्वाची कागदपत्रं चोरीला गेली असून यामुळे हे राजकीय कार्यकर्ते आणि पत्रकारांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभेसाठी उल्हासनगर महापालिकेचे अधिकारी,.पत्रकार राजकीय कार्यकर्ते, नगरसेवक आणि व्हीआयपी असे पासेस देण्यात आले होते. तरीही मुख्यमंत्र्यांच्या सभोवताली असलेल्या राजकीय पदाधिकारी आणि पत्रकारांची पाकीटं मारण्यासाठी हा चोरटा कुठून आणि कसा पोहोचला असावा? असा प्रश्न यानंतर उपस्थित झाला आहे. याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात ३ गुन्हे दाखल करण्यात आले असून पोलीस सध्या पाकीटमाराचा शोध घेत आहेत.

yavatmal News : दहाची जुनी नोट विक्री करणं पडलं 22 हजारांत; तरुणाची ऑनलाईन फसवणूक

yavatmal News : दहा रुपयांच्या जुन्या नोटांची चांगल्या दरात विक्री करून देतो असे म्हणून एका तरुणाची ऑनलाईन 22 हजारांनी फसवणूक करण्यात आली. ही घटना यवतमाळच्या शारदानगर येथील शिरे ले-आऊट परिसरात उघडकीस आली. आकाश नामदेवराव उईके रा. शारदा नगर शिरे ले-आऊट आणि रोड वडगाव यवतमाळ असे फसवणूक झालेल्या तरुणाचे नाव आहे. 

अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याने बदनामीच्या भीतीने मुलीच्या आईची आत्महत्या
बीडच्या केस तालुक्यातील एका आदिवासी वस्तीवर अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची घटना घडली होती आणि त्यानंतर बदनामीच्या भीतीपोटी मुलीची आईने घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.. मुलीवर अत्याचार करणाऱ्या मुलाच्या मामाने या महिलेला पोलिसात तक्रार न करण्याची धमकी दिली होती आणि त्यानंतर या महिलेने बदनामीच्या भीतीने आत्महत्या केली आहे..याप्रकरणी केज पोलीस ठाण्यात दोघा विरोधात  गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

 
भंडाऱ्यातील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचं कामबंद आंदोलन, जिल्ह्यातील 400 कर्मचारी सहभागी

शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या शासनाकडे मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. या मागण्या पूर्ण कराव्या यासाठी राज्यातील शिक्षकेत्तर कर्मचारी एकदिवसीय आंदोलनात उतरले आहेत. या आंदोलनात भंडारा जिल्ह्यातील सुमारे 400 शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनीही सहभाग घेतला आहे. जुनी पेन्शन लागू करावी, यासह विविध मागण्यांना घेवून हे आंदोलन करण्यात येत आहे. लिपिक, प्रयोगशाळा कर्मचारी, शिपाई या प्रवर्गाचे कर्मचारी कामबंद आंदोलनात सहभागी झालेले आहेत. सध्या दहावी, बारावीच्या परीक्षा येत्या दिवसात होत आहेत, त्यामुळे यावर शासनाने तातडीने तोडगा न काढल्यास भविष्यात उग्रस्वरुपाचं आंदोलन करण्याचा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला आहे. परिक्षांवर आंदोलनाचा परिणाम पडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Maharashtra Budget : अर्थसंकल्पातील 47 टक्के निधीचं खर्च, 53 टक्के निधी खर्च करणे बाकी

Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पात (Budget) तरतूद केलेल्या एकूण निधीपैकी आत्तापर्यंत केवळ 47 टक्केच निधी खर्च झाल्याचे समोर आले आहे. 2022-23 च्या अर्थसंकल्पात विविध विभागांसाठी आणि विकासकामांसाठी 6 लाख 46 हजार 536 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. त्यापैकी 14 फेब्रुवारीपर्यंत केवळ 3 लाख 4 हजार 430 कोटी रुपये निधी खर्च करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.

Supreme Court: महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षावर आज सलग तिसऱ्या दिवशी सुप्रिम कोर्टात सुनावणी

Supreme Court: महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाबाबत सुप्रीम कोर्टात दोन दिवस चाललेली सुनावणी, आज तिसऱ्या दिवशीही सुरू आहे... सकाळपासून शिंदे गटाकडून महेश जेठमलानी आणि मनिंदर सिंह यांनी युक्तिवाद केले आता ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल यांचा प्रतिवाद सुरू आहे. हे प्रकरण पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडेच राहणार की ७ न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडे जाणार?, यावर आज निर्णय होण्याची शक्यता आहे. 

Ravikant Tupakr : रविकांत तुपकरांसह 25 कार्यकर्त्यांची सुटका, कारागृहाबाहेर आई आणि पत्नीनं केलं औक्षण 

Ravikant Tupakr : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे (Swabhimani Shetkari Sanghatana) नेते रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) यांच्यासह 25 कार्यकर्त्यांची अकोला जिल्हा कारागृहातून सुटका झाली आहे. काल (15 फेब्रुवारी) बुलढाणा न्यायालयानं (Buldana) तुपकरांसह त्यांच्या कार्यकर्त्यांना जामीन मंजूर केला होता. आज सकाळी त्यांची सुटका झाली आहे. कारागृहाबाहेर आई आणि पत्नीनं औक्षण करुन रविकांत तुपकर यांचे स्वागत केले.

सरकारनं कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मदत करावी; नंदूरबारमध्ये आम आदमी शेतकरी संघटनेची मागणी

Cotton News : मागील वर्षीच्या तुलनेत यंदा कापसाच्या दरात (Cotton Price) मोठी घट झाली आहे. याचा फटका कापूस उत्पादक शेतकऱ्यांना (Farmers) बसत आहे. त्यामुळं सरकारनं कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मदत जाहीर करावी, अशी मागणी नंदूरबार (Nandurbar) जिल्ह्यातील आम आदमी शेतकरी संघटनेनं केली आहे. दर वाढत नसल्यानं शेतकऱ्यांनी कापसाची विक्री थांबवली आहे. शेतकऱ्यांचा कापूस घरातच पडून आहे. 

शिवनेरीवरील शासकीय शिवजयंती सोहळ्यावर बहिष्कार : खासदार अमोल कोल्हे

Pune News: पुण्यातील शिवनेरीवर साजरा होणाऱ्या शासकीय शिवजयंती सोहळ्यावर खासदार अमोल कोल्हे यांनी बहिष्कार करत असल्याचं जाहीर केलंय. छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थान असताना अद्याप शिवनेरीवर भगवा ध्वज कायमस्वरूपी फडकविला नाही. म्हणून कोल्हे यांनी ही भूमिका घेतलेली आहे. कोल्हे स्वतः जुन्नरचे रहिवाशी असून त्यांच्या शिरूर लोकसभा मतदारसंघात हा शिवनेरी किल्ला येतो. खासदार कोल्हे यांनी गडावर कायमस्वरूपी भगवा ध्वज लावावा यासाठी लोकसभेत ही मागणी केली होती. मात्र त्यांच्या मागणीला कोणी दाद दिली नाही, म्हणून आता त्यांनी शिवनेरीवर शासकीय शिवजयंतीवर बहिष्कार करण्याचा निर्णय घेतला आहे. 

मुंबईत शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी 'काम बंद आंदोलन' पुकारल्याने मुंबईतील आज अनेक महाविद्यालय बंद
मुंबईत शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी 'काम बंद आंदोलन' पुकारल्याने मुंबईतील आज अनेक महाविद्यालय बंद, विद्यार्थ्यांच्या परीक्षांना या आंदोलनामुळे फटका

 

लेखी मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहणार असल्याचा शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचा पवित्रा

 

राज्यातील अ कृषी विद्यापीठे त्यासोबतच महाविद्यालयांमध्ये शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने आज एक दिवसाच्या लाक्षणिक संपावर गेले आहेत

 

काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली मात्र जोपर्यंत मागण्या लेखी मान्य होत नाहीत तोपर्यंत हे आंदोलन मागे घेतले जाणार नाही असा पवित्रा शिक्षकेतर कर्मचारी संघटनेने घेतला आहे

 

त्यामुळे आज अनेक महाविद्यालयांमध्ये शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारला आहे

 

बारावी प्रात्यक्षिक परीक्षा सुरू असताना त्यासोबतच लेखी परीक्षा 21 फेब्रुवारीपासून सुरू होणार असल्याने याचा फटका पदवी त्यासोबतच बोर्डाच्या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना बसू शकतो

 

 
स्वाभिमानीचे नेते रविकांत तुपकर यांच्यासह 25 कार्यकर्त्यांची अकोला जिल्हा कारागृहातून सुटका

स्वाभिमानीचे नेते रविकांत तुपकर यांच्यासह 25 कार्यकर्त्यांची अकोला जिल्हा कारागृहातून सुटका. काल बुलडाणा न्यायालयाने जामीन केला होता मंजूर. कारागृहाबाहेर आई आणि पत्नीने केलं तुपकरांचं औक्षण करून स्वागत.11 फेब्रूवारीला बुलडाणा येथे तुपकरांनी केला होता आत्मदहनाचा प्रसंग. आंदोलनात झालेल्या प्रचंड राड्यानंतर तुपकरांसह 40 वर कार्यकर्त्यांवर दंगलीचे गुन्हे झाले होते दाखल. गुन्हे दाखल झाल्यानंतर तुपकरांसह 25 कार्यकर्त्यांची झाली होती अकोला कारागृहात रवानगी

शिक्षक संघटनांचं कोकणात अधिवेशन, हजारोंच्या संख्येने शिक्षक उपस्थित, बारामतीत 278 पैकी फक्त 62 शाळा सुरु

Baramati News : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ आणि समिती या दोन शिक्षक संघटनांचा अधिवेशन कोकणात सुरु आहे. या अधिवेशनाला हजारोंच्या संख्येने शिक्षक राज्यभरातून दाखल झाले आहेत. 15 ते 17 तारखेला दरम्यान हे अधिवेशन चालणार आहे. परंतु राज्यातील बहुतांश शाळा बंद करुन अधिवेशनाचा घाट घाटण्यात आलाय. बारामती तालुक्यातील 278 पैकी फक्त 62 शाळा सुरु आहेत. तर 216 शाळांना कुलूप लावण्यात आला आहे. बारामती तालुक्यात एकूण 768 प्राथमिक शिक्षक आहेत. त्यातील 660 शिक्षक हे अधिवेशनासाठी गेलेले आहेत. तर नऊ शिक्षक हे किरकोळ रजेवर आहेत. त्यामुळे 278 शाळांमधील फक्त 99 शिक्षक हे सध्या कार्यरत आहेत. त्यामुळे बारामती तालुक्यातील 278 पैकी 62 शाळा सुरु आहेत. 

वर्ध्यातील सालोड शिवारात शॉर्टसर्किटने जळाले गव्हाचे पीक

Wardha News : वीजेच्या खांबावर झालेल्या वीज तारांच्या स्पार्किंगची ठिणगी गव्हात पडल्याने कापणीला आलेला उभा गहू जळून राख झाला. ही घटना सालोड हिरापूर येथील शामपूर शेतशिवारात किशोर भगवान झोड यांच्या शेतात घडली. किशोर झोड यांनी खरिपात सोयाबीनची लागवड केली, मात्र अतिवृष्टीने शेती खरडून गेली. खचून न जाता रब्बीत दोन एकरात गव्हाची लागवड केली. गहू कापणीला आला असताना शेतात असलेल्या वीजेच्या तारांमध्ये झालेल्या घर्षणातून ठिणगी उभ्या असलेल्या गव्हाच्या पीकात पडली आणि क्षणात उभे पीक जळून राख झाले. यात जवळपास पाऊन एकरातील पीक जळून राख झाले. या आगीत शेतकऱ्याचे किमान 25 हजारांचे नुकसान झाले आहे.

सांगलीच्या शिराळा तालुक्यातील कुसळेवाडीमधील कालव्यावरील पूल ढासळला
Sangli News : सांगलीच्या शिराळा तालुक्यातील कुसळेवाडी येथील कालव्यावरील एक छोटा पुल ढासळला आहे. या घटनेत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. पूल कोसळल्याने येथील शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी बराच अंतर कापून जावे लागणार असल्याने या पुलाचे काम लगेच करावे अशी मागणी होत आहे. पूल कोसळला त्या वेळत शेतकऱ्यांची अथवा कोणत्याही प्रकारची वाहतूक सुरु नव्हती. त्यामुळे या घटनेत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. याबाबत संबंधित विभाग लक्ष देऊ, नुतन पुलाची उभारणी करुन येथील शेतकऱ्यांची अडचण दूर करावी अशी मागणी होत आहे. 
शिराळा तालुक्यातील कुसळेवाडी मधील कालव्यावरील पूल ढासळला
शिराळा तालुक्यातील कुसळेवाडी येथील कालव्यावरील एक छोटा पुल ढासळला आहे. या घटनेत कोणत्याही प्रकारची जिवीतहानी झाली नाही. पूल कोसळल्याने येथील शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी बराच अंतर कापून जावे लागणार असल्याने या पुलाचे काम लगेच करावे अशी मागणी होत आहे. शिराळा पश्चिम भागांत कुसळेवाडी हे एक हजार लोक संख्येचे गाव आहे.गावा जवळूनच वारणा डावा कालवा गेला आहे.गावची नव्वद टक्के शेती पुलाच्या पलीकडे आहे. त्यामुळे कालव्यावरील पुलावरून सतत शेतकऱ्यांची रहदारी सुरू होती.पुलाच्या पलिकडे दहा कुटुंब रहात आहेत.गेल्या अनेक महिन्यांपासून पुलाची दुरवस्था झाली होती. पुलावरील पोल गायब झाले होती. पूलाच्या मधील दगडी भिंतीची दगडे हळूहळू ठासळू लागली होती.तर एका बाजूने पुलाचा भराव ही ठासळू लागला होता. पूल कोसळला त्या वेळत शेतकऱ्यांची अथवा कोणत्याही प्रकारची वहातूक सुरू नव्हती. त्यामुळे या घटनेत कोणत्याही प्रकारची जिवीतहानी झाले नाही. आता शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी पणुंब्रे वारूण गावच्या पुलावरून वहातुक तसेच कालव्याला कायम पाणी राहील्यास ये-जा ही याचं मार्गांवरून करावी लागणार आहे. याबाबत संबंधित विभाग लक्ष देऊ नुतन पुलाची उभारणी करून येथील शेतकऱ्यांची अडचण दूर करावी, अशी मागणी होत आहे. 
बीडच्या जिल्हा परिषद शाळेत शिकणारे विद्यार्थी नासा आणि इस्रोला भेट देणार

Beed News : बीड जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळे शिकणारे विद्यार्थी इस्रोसह नासाला भेट देणार आहेत. यामध्ये 33 विद्यार्थी हे श्रीहरीकोटा येथील इस्रोच्या स्पेस सेंटरला भेट देणार आहेत तर अकरा विद्यार्थी अमेरिकेतील नासा येथील स्पेस सेंटरला भेट देतील अशी माहिती अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सोळंके यांनी दिली आहे. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा त्याचबरोबर संशोधन वृत्तीचा विकास व्हावा आणि शास्त्रज्ञाच्या कार्यपद्धतीची जवळून ओळख व्हावी यासाठी हा उपक्रम राबवण्यात येणार आहे.

ठाण्यातील नौपाडामध्ये इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर आग, अडकलेल्या रहिवाशांना बाहेर काढण्याचं काम सुरु, सिलेंडर गळतीमुळे आग लागल्याची शक्यता

Thane Fire : ठाण्यातील नौपाडा येथील सेंट जॉन स्कूलच्या समोर असणाऱ्या गुरुप्रेरणा इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर आग लागली आहे. घटनास्थळी तातडीने नौपाडा पोलीस ठाण्याचे कर्मचारी, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी एका पिकअप वाहनासह, अग्निशमन दलाचे जवान, 3 फायर वाहन, 1 रेस्क्यू वाहन, 1 वॉटर टँकरसह 1 जम्बो वॉटर टँकरसह रवाना होऊन सध्या आग विजवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. इमारतीमध्ये काही रहिवासी अडकले असून त्यांनाही बाहेर काढण्याचे काम सुरु आहे. अग्निशमन दलाचे जवान आणि आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी यांचे मार्फत आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. अद्याप कोणतीही जीवितहानी नसून सिलेंडर गळतीमुळे आग लागल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Solapur News: सततच्या आजाराला कंटाळून बार्शीत तरुणाची रुग्णालयातच आत्महत्या

Solapur News: सोलापूर जिल्ह्यातील बार्शीत एका खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारास दाखल केलेल्या तरुणाने गळफास घेत आत्महत्या केलीय. सोमनाथ बिभीषण पिसाळअसे आत्महत्या केलेल्या  32 वर्षीय तरुणाचे नाव आहे. ही घटना बुधवारी  दुपारी घडली. सोमनाथ पिसाळ बार्शी तालुक्यातील पिंपळगाव ढाळे या गावचा रहिवासी आहे. तो गावातच फॅब्रिकेशनचा व्यवसाय करीत होता. त्यास सतत पित्ताशयाचा, मणक्याचा,सतत पोटात दुखण्याचा त्रास होत होता. त्यामुळे तो सतत मानसिक त्रासात देखील होता. त्यामुळे नातेवाइकांनी बार्शीतल्या खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारास दाखल केले. बुधवारी सकाळी 11 च्या सुमारास बाथरूमला जाण्याच्या बहाणा करून तो बांधकाम चालू असलेल्या वरच्या मजल्यावर गेला. तिथे रुग्ण नसलेल्या एका रूममध्ये स्लॅबच्या हूकला नॉयलानची दोरी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे दिसून आले. दरम्यान, पोलिसांनी ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

Tripura Election: त्रिपुरा विधानसभेसाठी आज मतदान

Tripura Assembly Election Voting: त्रिपुरातील निवडणुकीची (Tripura Assembly Election 2023) सर्व तयारी पूर्ण झाली आहे. राज्यात आज विधानसभा निवडणुकांसाठी मतदान (Voting) पार पडणार आहे. याबाबत माहिती देताना मुख्य निवडणूक अधिकारी (सीईओ) गित्ते किरणकुमार दिनकारो यांनी सांगितलं की, गुरुवारी 60 सदस्यीय त्रिपुरा (Tripura) विधानसभेसाठी मुक्त, निष्पक्ष आणि शांततापूर्ण निवडणुका पार पाडण्यासाठी सर्व तयारी पूर्ण झाली आहे. कडेकोट बंदोबस्तात 3,337 मतदान केंद्रांवर सकाळी 7 ते दुपारी 4 या वेळेत मतदान होणार असल्याचंही यावेळी माहिती देताना दिनकरो यांनी सांगितलं. यापैकी 1,100 मतदान केंद्रे संवेदनशील आणि 28 अतिसंवेदनशील आहेत.

Jitendra Awhad : महेश आहेर हल्ला प्रकरण, जितेंद्र आव्हाड यांच्यासह सात जणांवर गुन्हा दाखल

Jitendra Awhad : ठाण्याचे (Thane) अतिक्रमण विभागाचे सहाय्यक आयुक्त महेश आहेर (Assistant Municipal Commissioner Mahesh Aher) यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड (MLA Jitendra Awhad) यांच्यासह सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. नौपाडा पोलिसांनी (Naupada Police) हा गुन्हा दाखल केला आहे. भादंवी कलम 353, 307, 332, 506(2), 143, 148, 149, 120 (ब), या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नगरपालिका अधिनियम 3/25, 4/25 अन्वये एफआयआर (क्रमांक 60/2023) नोंदवण्यात आला आहे.


पार्श्वभूमी

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...


सलग तिसऱ्या दिवशी सुप्रीम कोर्टात महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची सुनावणी होणार आहे. महाराष्ट्रातील प्रकरण 7 न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे सोपवावं की नाही याबाबत कोर्ट निर्णय घेणार आहे. त्याशिवाय अधिकारी मारहाण प्रकरणी जितेंद्र आव्हाडांना अटक होण्याची शक्यता आहे.  तर विद्यापीठातील महाविद्यालयात शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे आजपासून कामबंद आंदोलन होणार आहे. यासह आज दिवसभरात काही महत्वाच्या घटना घडणार आहेत. याचा थोडक्यात आढावा... 


महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षावर सुप्रीम कोर्टात सुनावणी 


महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाबद्दल सलग 2 दिवस सुनावणी झाल्यानंतर आता पुन्हा आज सुनावणी होणार आहे.   मंगळवारच्या सुनावणीमध्ये ठाकरे गटाकडून युक्तिवाद मांडण्यात आला होता. त्यानंतर बुधवारच्या सुनावणीत शिंदे गटाचे वकील हरिश साळवे, नीरज किशन कौल यांनी युक्तिवाद मांडला. हे प्रकरण 7 न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे सोपवावं की नाही याबाबत कोर्ट निर्णय घेणार आहे.


हरिश साळवे यांनी 45 मिनिटे युक्तिवाद केला. नबाम रेबिया खटल्याचा निकाल ती या प्रकरणाला लागू करावी अशी मागणी केली.  राज्यपालांच्या बाजूने वकिलांनी कोर्टात बाजू मांडली. प्रत्येक सदस्यांचे हक्क आणि अधिकार यांच्याबाबत चर्चा झाली. त्याशिवाय मंगळवारच्या युक्तिवादात सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एकमेकांशी चर्चाविनिमय करत होते. आता आज सुप्रीम कोर्टात काय होतेय? याकडे सर्वांचं लक्ष लागलेय.


अधिकारी मारहाण प्रकरणी जितेंद्र आव्हाडांना अटक होण्याची शक्यता


राष्ट्रवादी कॉग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांना मारहाण करण्यात आली आहे. हे प्रकरण आता तापण्याची शक्यता आहे. महेश आहेर यांच्याकडून आव्हाडांच्या कुटुंबियांना मारण्याची ऑडिओ क्लिप वायरल झाल्यानंतर मारहाण करण्यात आली आहे. कळवा भागात एलईडी स्क्रिन हटवल्याच्या कारणावरून मारहाण झाल्याची माहिती मिळाली. या प्रकरणातील संबंधीत कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आलाय. त्यांना आज न्यायालयात हजर केलं जाणार आहे.  महेश आहेर पोलिसात तक्रार दाखल करणार असल्याचं वृत्त आहे.  
 
वंचित-शिवसेना चर्चा 
मुंबई – ठाकरे गट आणि वंचितची आघाडी असताना आता पिंपरी-चिंचवड आणि कसबा पोटनिवडणुकी वंचित बहुजन आघाडी काय करणार यासंदर्भात दोन्ही गटातील नेत्यांची चर्चा होणार आहे. पिंपरी-चिंचवडच्या पोटनिवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडी आपली वेगळी भूमिका मांडेल अशी शक्यता आहे. पिंपरी चिंचवडच्या पोटनिवडणुकीमध्ये ठाकरे गटाचा उमेदवार नसल्यामुळे वंचित बहुजन आघाडी वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे असे कळते.  


शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे आजपासून कामबंद आंदोलन
विद्यापीठातील महाविद्यालयात शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे आजपासून कामबंद आंदोलन होणार आहे.  राज्यातील विद्यापीठ, महाविद्यालयातील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरूच राहणार आहे. उपमुख्यमंत्री यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर सुद्धा लेखी आश्वासन मागण्यांसंदर्भात दिले जावे अशी मागणी करण्यात आली आहे.  
त्यामुळे आज विद्यापीठात महाविद्यालयात कामबंद आंदोलन सुरू राहणार आहे.  बैठकित सेवाअंतर्गत आश्वासित प्रगती योजना, 58 महिन्याची थकबाकी, 1410 कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करणे, या मागण्या आहेत. .


मुख्यमंत्र्यांचा सिंधुदुर्ग आणि जळगाव दौरा


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर आहेत. सकाळी 10.30 वाजता जिल्ह्यात पोहचणार आहेत. सकाळी 11 वाजता, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे 17 वे त्रैवार्षिक अधिवेशन आणि शिक्षण परिषद होणार आहे. दुपारी 12 वाजता, वेंगुर्ले बंदर येथील झुलत्या पूलाचा आणि निशांत तलाव टप्पा 2 चा लोकार्पण सोहळा होणार आहे.  


त्रिपुरात आज मतदान 
त्रिपुरातील आठ जिल्ह्यात आज विधानसभेसाठी मतदान होणार आहे.  धलाई, गोमती, खोवाई, उत्तरी त्रिपुरा, सेपहिजाला, दक्षिण त्रिपुरा, उनाकोटी आणि पश्चिम त्रिपुरा येथील 60 मतदार संघात मतदान होणार आहे. 31 महिलांसह 259 उमेदवार मैदानात उतरले आहेत. सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात होणार आहे. 


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज जळगाव जिल्हा दौऱ्यावरही जाणार आहेत. दुपारी 3 वाजता भोकर येथे तापी नदीवरील उंच पुल आणि जोड रस्त्याचे भूमिपूजन कार्यक्रम होणार आहे. संध्याकाळी 6 वाजता एनईएस हायस्कूल पटांगण, पारोळा येथे विविध विकास कामांचे भूमीपुजन आणि जाहीर सभा होणार आहे.


पिंपरी – भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीच्या अनुषंगाने पत्रकार परिषद घेणार आहेत, दुपारी 1 वाजता. 


दर्गाचा उरूस, 649  वर्षांची परंपरा 
सांगली –हिंदू-मुस्लीम ऐक्याचं प्रतीक असलेल्या मिरज मधील हजरत ख्वाजा शमना मिरासाहेब दर्गाचा उरूस आजपासून सुरू होतोय. यंदाचे 649 वर्ष असून मानाच्या चर्मकार समाजाच्या गलेफ अर्पणा नंतर उरुसाला प्रारंभ होणार आहे.


राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा आज वाढदिवस आहे. जयंत पाटील हे सकाळी 11 ते 4 वाजेपर्यंत इस्लामपूर येथील साखर कारखान्यावर शुभेच्छा स्वीकारणार आहेत.
 
कृषी अभियांत्रिकी विद्यार्थ्यांचे आंदोलन 
शिर्डी – गेल्या 22 दिवसापासून राहुरी कृषी विद्यापीठात कृषी अभियांत्रिकी विद्यार्थ्यांचे आंदोलन अद्याप ही सुरू असून राज्य सरकार आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने दखल घेतली नाही. पुढील 2 दिवसात दखल न घेतल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा विद्यार्थ्यांनी दिलाय.


"सिव्हिल सोसायटी"ची बैठक 


- जी 20 राष्ट्र समूहाचे अध्यक्षपद यंदा भारताकडे असून नागपूरसह भारतातील विविध शहरात जी 20 च्या विविध उपसमित्यांच्या बैठका सध्या होतायत. मार्च महिन्यात नागपुरात जी 20 समूहाची "सिव्हिल सोसायटी" या विषयावरील उपसमितीची बैठक होणार आहे. त्यासाठी अनेक परकीय पाहुणे नागपुरात येणार असल्याने सध्या नागपूरातील विविध रस्त्यांवर सौंदर्यीकरण आणि स्वच्छतेचे काम जोरात सुरू आहे. अनेक ठिकाणी एरवी पानाच्या थुंकीने भरलेल्या भिंती सुंदर अशा चित्रकारीने सजवल्या जात आहेत. अनेक ठिकाणी नागपूर दुबई सारखा वाटावा यासाठी पामचे वृक्ष लावले जातायत.


वाशिम – जिल्ह्यात त्रून धान्य जनजागृती मुळे ज्वारी पिक पेऱ्यात वाढ झालीये. जिल्ह्यात 344 हेक्टरवर ज्वारीचा पिक पेरा करण्यात आलाय. त्यामुळे ज्वारीच्या उत्पादनात वाढ होणार असून जनावरांसाठी मुबलक चारा उपलब्ध होणार आहे.
 
आनंद भीमटे यांचे 'गद्दार' आज पुस्तक रुपात येणार 
चंद्रपूर – झाडीपट्टी रंगभूमीचे प्रख्यात नाट्यलेखक आनंद भीमटे यांचे 'गद्दार' हे नाटक पुस्तक रुपात येत असून आज त्याचे प्रकाशन होणार आहे. प्रसिद्ध सिने अभिनेता मकरंद अनासपुरे यांच्या हस्ते शंकरपूर येथे या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे. या वेळी पद्मश्री परशुराम खुणे हे प्रमुख अतिथी राहणार आहेत. विशेष म्हणजे गद्दार या नाटकात मकरंद अनासपुरे हे स्वतः भूमिका करत असून पुस्तक प्रकाशनानंतर हे नाटक देखील सादर होणार आहे.


 गोंदिया – गोंदिया शहराच्या मध्यभागी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची मागणी नागरिकांनी केली होती. अखेर शिवजयंतीचे औचित्य साधून छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती नाशिकहून बनविण्यात आली आहे. या मूर्तीचे आज गोंदिया शहरात आगमन होणार आहे.


भंडारा – शेतकऱ्यांच्या विविध समस्यांना घेवून तुमसर - मोहाडी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार चरण वाघमारे यांच्या नेतृत्वात गुरुवारी दुपारी मोहाडी तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चानंतर तहसील कार्यालयात शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेवून तिथेच मार्ग काढण्याचा त्यांचा उद्देश आहे. त्यामुळे मोर्चा नंतर जनसुनावणी कार्यक्रम होत आहे.


रिपब्लिकन पक्षाचे आंदोलन 
मुंबई – प्रसिद्ध अभिनेत्री राखी सावंत यांचे आदिल खान यांच्या सोबत लग्न झाले होते. मात्र लग्नानंतर आदिल खान यांनी अभिनेत्री राखी सावंत यांच्यावर अत्याचार आणि घोर अन्याय केल्याच्या निषेधार्थ, दुपारी 3 वाजता रिपब्लिकन पक्षाच्या वतीने ओशिवरा पोलीस ठाणे जोगेश्वरी पश्चिम येथे आरोपी आदिल खान याच्या विरुद्ध तीव्र निषेध आंदोलन करण्यात येणार आहे.  


 कुलाबा–वांद्रे–सीप्झ मेट्रो-3 प्रकरणी आज सुनावणी
-  राज्य सरकारनं कुलाबा–वांद्रे–सीप्झ मेट्रो-3 प्रकल्पाच्या मार्गिकेसाठी उभारण्यात येणारी कारशेड पुन्हा आरे वसाहतीत हलविण्याचे निश्चित केल्यानंतर काही झाडे कापण्यासाठी परवानगी मिळावी म्हणून मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन (एमएमआरडीएल) ने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. नोव्हेंबर 2022 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने 84 झाडे कापण्यासाठी एमएमआरडीएला परवानगी दिली. मात्र प्रत्यक्षात 177 झाडांची कत्तल करण्यासाठी एमएमआरडीएलने वृक्ष प्राधिकरणाकडे अर्ज केला असून प्राधिकरणाकडूनही नोटीस बजावून सुचना-हरकती मागण्यात आल्या आहेत. त्या जाहीर नोटीसीला पर्यावरणप्रेमी झोरू बाथेना यांनी उच्च न्यायालयान आव्हान दिले आहे, त्यावर आज हायकोर्टात सुनावणी.


-    टिव्ही कलाकार तुनिषा शर्मा आत्महत्या प्रकरणी सहकलाकार शिझान खानला अटक करण्यात आली आहे. शिझानला सत्र जामीन नाकारल्याच्या निर्णयाला त्यानं हायकोर्टात आव्हान दिलं आहे. त्यावर सुनावणी होईल.


-   हसन मुश्रीफ यांच्या तिन्ही मुलांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी. नाविद, आबिद आणि साजिद मुश्रीफ यांनी ईडीच्या रेडनंतक पीएमएलए न्यायालयात दाखल केलाय अटकपूर्व जामीन अर्ज. राजकीय हेतून तपासयंत्रणोच्या माध्यमातून अटकेच्या धमक्यांचा वापर केला जात असल्याचा अर्जात उल्लेख.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.