Maharashtra News Updates 15th May 2023 : देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या फक्त एका क्लिकवर...

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 15 May 2023 09:41 PM
छत्रपती संभाजीनगर: कालीचरण महाराज यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल, सिल्लोड तालुक्यातील मोढा बुद्रुक येथे हिंदू जनजागरण सभेत चिथावणीखोर भाषण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल 

कालीचरण महाराज यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल 


छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड तालुक्यातील मोढा बुद्रुक येथे हिंदू जनजागरण सभेत चिथावणीखोर भाषण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल 


सिल्लोड ग्रामीण पोलीसांनी विविध कलमान्वये गुन्हे दाखल 


सिल्लोड ग्रामीण पोलीसांनी स्वतः फिर्यादी होऊन केला गुन्हा दाखल 


कालीचरण महाराज व सिल्लोड येथील भाजपच्या शहराध्यक्ष सहित चार लोकांविरुद्ध गुन्हा दाखल

पुणे: तुळजापूर मधून प्रस्थान झालेली मराठा वनवास यात्रा पुणे जिल्ह्यात दाखल





पुणे:  मराठा समाजाला ओबीसी मधूनच आरक्षण मिळावे यासाठी तुळजापूर वरुन मुंबईच्या दिशेने निघालेली मराठा वनवास यात्रा पुणे जिल्ह्यात दाखल झाली आहे. यावेळी पुणे सोलापूरच्या सीमारेषेवर इंदापूर तालुक्यातील हिंगणगाव मध्ये या यात्रेकरूंचं पुष्पवृष्टी करून इंदापूरकरांनी जल्लोषात स्वागत केले.


 

 



 


Maharashtra Politics: महापालिका निवडणुका ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होऊ शकतात - फडणवीस

महापालिका निवडणुका ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होऊ शकतात, असे संकेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.

Gondia News: गोंदियातील देवपायली येथे भीषण अपघातात तिघे जण जागीच ठार

Gondia News:  कोहमारा-देवरी महामार्गावर ट्रेलर व दुचाकी अपघातात तिघांचा जागीच मृत्यु झाला आहे. ही घटना आज 4 वाजताच्या सुमारास घडली आहे. कोहमारा-देवरी या महामार्गावर उड्डाणपुलाचे निर्माण कार्य सुरू आहे. त्यामुळे एकेरी वाहतुक सुरू आहे. देवरी तालुक्यातील शेरपार येथील तिघेजण दुचाकीने देवरीकडे जात असताना त्यांना भरधाव ट्रेलरने चिरडले. या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. संजय गावडे, पतीराम धनपाते, रामचंद गवराने असे अपघातात मृत पावलेल्या तिघांची नावे आहेत.

Thane News: रस्त्यावरील झाड पडल्याने 2 पादचारी जखमी; चार ते पाच  दुचाकी वाहनांचे  नुकसान; शहापुरातील घटना

Thane News:  शहापुर-चेरपोली मार्गावरील शेटे मँरेज हाँल समोर एक भले मोठे झाड अचानक बुडापासून कोसळ्याने झाडाखाली सावलीसाठी उभे असलेले दोन पादचारी जखमी झालेत. झाडाखाली असलेल्या चार ते पाच दुचाकी गाड्यांचे नुकसान झाले आहे.  झाडाच्या सावलीत उभे असलेल्या लोकांनी प्रसंग सावधान राखल्याने सुदैवानं मोठी हानी टळली. मात्र, दुचाकी गाड्यांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे.

Maharashtra Political Crisis: 16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय तातडीने घ्यावा, ठाकरे गटाचं नरहरी झिरवाळांना निवेदन

मुंबई : ठाकरे गट विधानसभा अध्यक्षांना 16 आमदारांच्या अपात्रतेबद्दल 79 पानी निवेदन देणार आहेत. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा सर्व तपशील या निवेदनात समाविष्ट केला जाणार आहे. कोर्टानं जो निर्णय दिला आहे, त्याच्या चौकटीत राहूनच निर्णय घ्यावा, अशी मागणी ठाकरे गट अध्यक्षांकडे करणार आहे. मात्र सध्या विधानसभा अध्यक्ष महाराष्ट्रात नसल्याने ठाकरे गटाने आपल्या मागण्यांचं निवेदन उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांना दिले आहे.


सविस्तर वृत्त वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

एप्रिल महिन्यातील घाऊक महागाई दर शून्य टक्क्यांखाली 

एप्रिल महिन्यातील घाऊक महागाई दर शून्य टक्क्यांखाली 


जुलै 2020 नंतर पहिल्यांदाच घाऊक महागाई दर शून्य टक्क्यांखाली


एप्रिलमध्ये घाऊक महागाई दर उणे 0.92 टक्क्यांवर 


मार्च महिन्यात घाऊक महागाई दर 1.34 टक्के तर फेब्रुवारी महिन्यात 3.85 टक्के होता 


मागील सलग 11 महिन्यांपासून घाऊक महागाई दरात घट 


अन्नधान्य, वीज आणि इंधनाच्या किंमतीत घट झाल्याने घाऊक महागाईत घट 


अन्नधान्य महागाई 0.17 टक्क्यांवर तर इंधन आणि ऊर्जा घाऊक महागाई दर 0.93 टक्क्यांवर 


घाऊक महागाई दर : 


मे : 15.88 टक्के
जून : 15.18 टक्के
जुलै : 13.93 टक्के
ऑगस्ट : 12.41 टक्के
सप्टेंबर : 10.70 टक्के
ऑक्टोबर : 8.39 टक्के
नोव्हेंबर : 5.85 टक्के
डिसेंबर : 4.95 टक्के
जानेवारी : 4.73 टक्के
फेब्रुवारी : 3.85 टक्के
मार्च : 1.34 टक्के
एप्रिल : -0.92 टक्के

पुढील तीन दिवस राज्यातील तापमान स्थिर राहण्याचा अंदाज 

पुढील तीन दिवस राज्यातील तापमान स्थिर राहण्याचा अंदाज 


पुढील तीन दिवस कोणतेही मोठे बदल अपेक्षित नाही 


पुढील तीन दिवसांनंतर मात्र पुन्हा एकदा कमाल तापमानात वाढ होण्याचा अंदाज 


कोकण आणि मध्य महाराष्ट्रात कमाल तापमान 33 ते 38 अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता 


कोकण आणि मध्य महाराष्ट्रात कुठेही उष्णतेच्या लाटेचा अंदाज नाही


मराठवाड्यात कमाल तापमान 39 ते 42 अंश सेल्सिअस दरम्यान काही ठिकाणी राहू शकेल, ज्यात मराठवाड्यात देखील कुठेही उष्णतेची लाट नसेल 


विदर्भात आज वर्धा, अमरावती आणि अकोल्यात काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा अंदाज

पार्श्वभूमी

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...


Make In India: आत्मनिर्भर भारतासाठी संरक्षण मंत्रालयाचा मोठा निर्णय; 928 संरक्षण उत्पादनांवर बंदी


Atmanirbhar Bharat: आत्मनिर्भर भारताच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकत संरक्षण मंत्रालयाने (Defense Ministry) सुट्ट्या भागांसह 928 संरक्षण वस्तूंच्या उत्पादनाला परवानगी दिली आहे. या वस्तूंच्या सुटे भागांच्या नवीन यादीला मंजुरी दिली आहे, जे केवळ देशातील कंपन्यांकडूनच खरेदी केले जाऊ शकतात. संरक्षण उत्पादनात स्वावलंबनाला चालना देण्याच्या उद्देशाने हे पाऊल उचलण्यात आल्याचे  संरक्षण मंत्रालयाने रविवारी (14 मे) सांगितले.


मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की संरक्षण मंत्रालयाने संरक्षण क्षेत्रात 'आत्मनिर्भरता'ला प्रोत्साहन देण्यासाठी आणि संरक्षण सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांची आयात कमी करण्यासाठी चौथ्या जनहित याचिका मंजूर केली आहे. ही चौथी 'पॉझिटिव्ह इंडिजनायझेशन' यादी (पीआयएल) आहे, ज्यामध्ये 'रिप्लेसमेंट युनिट्स', उप-प्रणाली आणि विविध लष्करी प्लॅटफॉर्ममध्ये वापरले जाणारे भाग, उपकरणे आणि शस्त्रे यांचा समावेश आहे. सध्या या उत्पादनांच्या आयातीवर सुमारे 715 कोटी रुपये खर्च केले जातात.


Karnataka : कर्नाटकमध्ये काँग्रेस मुख्यमंत्री कोण? आमदारांनी 'या' नेत्याला दिले अधिकार


Karnataka Congress:  कर्नाटकचा पुढचा मुख्यमंत्री (Karnataka Chief Minister) कोण असेल याचा निर्णय घेण्यासाठी काँग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक बेंगळुरूमध्ये बोलवण्यात आली होती. ही बैठक संपली असून या बैठकीत गटनेत्याची निवड करण्यात आली नाही.  बैठकीत उपस्थित असलेल्या काँग्रेस आमदारांनी (Congress MLA) विधिमंडळ गटनेत्याची निवड करण्याचे अधिकार हे काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांना देण्याचा ठराव मंजूर केला आहे.  येत्या दोन-तीन दिवसांत मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा होऊ शकते, तर गुरुवारी नव्या सरकारचा शपथविधी होण्याची शक्यता आहे. 


सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार डीके शिवकुमार आणि सिद्धरामय्या सोमवारी दिल्लीत जाऊन खर्गे यांची भेट घेण्याची शक्यता आहे. हे दोघेही मुख्यमंत्रीपदासाठी प्रबळ दावेदार आहेत. कर्नाटकात काँग्रेसने 135 जागा जिंकून प्रचंड बहुमत मिळवले आहे. 


डीके शिवकुमार आणि सिद्धरामय्या हे दोघेही कर्नाटकात मुख्यमंत्रीपदाचे प्रबळ दावेदार आहेत. बंगळुरू येथील हॉटेल शांग्री-ला येथे काँग्रेस विधीमंडळ पक्षाची बैठक बोलावण्यात आली होती. हॉटेलमध्ये बैठक सुरू असताना बाहेर दोन्ही नेत्यांचे समर्थक आपापल्या नेत्यांच्या बाजूने घोषणा देत होते. यापूर्वी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले होते की, 'आज विधिमंडळ पक्षाची बैठक होणार असून हा अहवाल हायकमांडला सादर केला जाईल. त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा करण्यास हायकमांडला वेळ लागणार आहे. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.