Vinod Tawde :  महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी अवघे काही तास राहिले असतानाच भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी विवांट हॉटेलमध्ये लोकांना पैसे वाटल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. कार्यकर्त्यांनी विनोद तावडेंना घेरल्याने ते हाॅटेलमध्येच अडकून पडले. तावडे ज्या हॉटेलमध्ये थांबले होते त्या हॉटेलला शेकडो कार्यकर्त्यांनी घेराव घातला. त्यामुळे बराच काळ गदारोळ झाला. त्यानंतर पोलिसांनी विनोद तावडे यांना सुरक्षित बाहेर काढले. हॉटेलमध्ये 9 लाखांची रोकड जप्त करण्यात आली. 


कुठे नेऊन ठेवलाय महराष्ट्र? बविआ कार्यकर्त्याची तावडेंसमोर प्रश्नांची सरबत्ती!


दरम्यान, तावडे पैसे घेऊन आल्याचा दावा करण्यात आल्यानंतर बविआचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात पोहोचले. यावेळी भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांना कार्यकर्त्यांनी घेरले. इतकेच नव्हे, तर त्यांनी तावडे तुम्ही इकडे कशासाठी आला आहात? तुमचा इकडे काय संबंध? कुठे नेऊन ठेवलाय महराष्ट्र? अशी प्रश्नांची सरबत्ती केली. बहुजन विकास आघाडी (बीव्हीए) पक्षाच्या समर्थकांनी हॉटेलमध्ये घुसून तावडे यांच्या तोंडावर रोख रक्कम फेकली. तावडे यांनी मनवेलपाडा येथील विवांत हॉटेलमध्ये बैठक आयोजित केल्याची माहिती त्यांना मिळाली. तावडे यांनी उपस्थित लोकांमध्ये पैसे वाटताना पाहिल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला.



 


विनोद तावडेंच्या डायरीत काय सापडलं?


क्षितिज ठाकूर यांनी दावा केला की, तावडे यांच्याकडे 5 कोटी रुपये आणि नावे असलेल्या दोन डायरीही सापडल्या आहेत. विनोद तावडे हॉटेलमध्ये सभा घेत असताना हॉटेलचे मुख्य गेट बंद असल्याचा आरोप बीव्हीएने केला. BVA ने नालासोपारा मतदारसंघातील सर्व 507 मतदान केंद्रांवर वेबकास्टिंगवर चिंता व्यक्त केली आहे. पालघर जिल्ह्यातील दोन महत्त्वाच्या मतदान केंद्रांपैकी एका मतदान केंद्राचा या भागात समावेश आहे.


भाजप आणि बीव्हीएचे कार्यकर्ते आले


विनोद तावडे यांनी हॉटेलमध्ये पैसे वाटले आणि डझनभर लोक तेथे उपस्थित होते, असा दावा बीव्हीए नेत्यांनी केला आहे. विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाने नियमानुसार कारवाई करावी, असे बीव्हीएचे उमेदवार क्षितिज ठाकूर यांनी सांगितले. विनोद तावडे यांनाही लाज वाटली पाहिजे. विनोद तावडे पाच कोटी रुपये आणणार असल्याची माहिती आधीच मिळाल्याचा दावा त्यांनी केला. तावडे असलेल्या हॉटेलला कार्यकर्त्यांनी घेराव घातला. तावडे आत दुसऱ्या मजल्यावर होते. मोठ्या संख्येने कार्यकर्ते खाली जमले होते. तावडे यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे असं हितेंद्र ठाकूर यांनी म्हटलं आहे.


इतर महत्वाच्या बातम्या