Maharashtra News Updates 12 February 2023 : मुंबई विजयाचे सर्व रेकॉर्ड ब्रेक करेल : चंद्रशेखर बावनकुळे

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

abp majha web team Last Updated: 12 Feb 2023 02:58 PM
Chandrasekhar Bawankule : मुंबई विजयाचे सर्व रेकॉर्ड ब्रेक करेल : चंद्रशेखर बावनकुळे

Chandrasekhar Bawankule : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विश्वव्यापी नेतृत्व देवेंद्र फडणवीस यांचे रथाचे सारथ्य आणि  आमदार आशिष शेलार यांच्यासारखा अर्जुन आपल्याकडे आहे. त्यामुळं लोकसभा, विधानसभा आणि मुंबई महापालिका निवडणुकीत यावेळी भाजप आजपर्यंतचे सर्व रेकॉर्ड ब्रेक करुन विजयी होईल असा विश्वास भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला. मुंबई भाजपच्या कार्यकारिणीची बैठक आज दादर येथील वसंत स्मृती सभागृहात पार पडली. या बैठकीला सकाळच्या पहिल्या सत्रात भाजपाचे राष्ट्रीय महामंत्री विनोद तावडे यांनी मार्गदर्शन केले. आमदार अतुल भातखळकर यांनी राजकीय प्रस्ताव मांडला. त्याला आमदार अमीत साटम यांनी अनुमोदन दिले. मुंबईचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनीही मार्गदर्शन केले. या बैठकीला खासदार गोपाळ शेट्टी, पुनम महाजन, मनोज कोटक यांच्यासह सर्व आमदार आणि मुंबई पदाधिकारी उपस्थित होते. 

Raju Shetti : केंद्राने कोश्यारींचे लाड पुरवले, नव्या राज्यपालांनी महाराष्ट्राच्या इतिहास, संस्कृतीचा अभ्यास करावा : राजू शेट्टी

Raju Shetti : भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यपाल पदाची गरीमाच घालवली होती. सातत्याने केंद्राने त्यांचे लाड पुरवले होते. मात्र उशिरा का होईना केंद्राला शहाणपण सुचले आहे. त्यांनी यांचा राजीनामा मंजूर केला असल्याचे माजी खासदार राजू शेट्टी म्हणाले. नवीन येणाऱ्या राज्यपालांनी महाराष्ट्राच्या इतिहासाचा सांस्कृतिकतेचा अभ्यास करूनच वक्तव्य करावीत. राज्याचा कारभार करावा, बेताल वक्तव्य करू नयेत असा सल्ला स्वाभिमानीचे संस्थापक राजू शेट्टी यांनी परभणीत दिला. 

मुंबई - पुणे एक्सप्रेस वे वर ओव्हर हेड गॅन्ट्री बसविण्याचे काम सुरू, 12 ते 3 पुण्याला जाणारा रस्ता बंद

मुंबई - पुणे एक्सप्रेस वे वर ओव्हर हेड गॅन्ट्री बसविण्याचे काम सुरू 


दुपारी 12 ते 3 पुण्याला जाणारी मार्गिका राहणार बंद


3 तास पुणे मार्गिका बंद असल्याने वाहतूक वळवण्यात आली आहे


कळंबोली उड्डाणपुलाखालून डाव्या बाजूला जात देवांश ईन हॅाटेल पासून पुन्हा एक्सप्रेस वे ला सोडण्यात येणार वाहणे 


साधारण 1 किलो मीटरपर्यंत पुण्याची लेन बंद राहणार


वाहतूक वळवण्यात आल्याने कळंबोली येथे संथ गतीने वाहणे जात आहेत

मुंबई - पुणे एक्सप्रेस वे वर ओव्हर हेड गॅन्ट्री बसविण्याचे काम सुरू, 12 ते 3 पुण्याला जाणारा रस्ता बंद

मुंबई - पुणे एक्सप्रेस वे वर ओव्हर हेड गॅन्ट्री बसविण्याचे काम सुरू 


दुपारी 12 ते 3 पुण्याला जाणारी मार्गिका राहणार बंद


3 तास पुणे मार्गिका बंद असल्याने वाहतूक वळवण्यात आली आहे


कळंबोली उड्डाणपुलाखालून डाव्या बाजूला जात देवांश ईन हॅाटेल पासून पुन्हा एक्सप्रेस वे ला सोडण्यात येणार वाहणे 


साधारण 1 किलो मीटरपर्यंत पुण्याची लेन बंद राहणार


वाहतूक वळवण्यात आल्याने कळंबोली येथे संथ गतीने वाहणे जात आहेत

पुण्याच्या मावळमध्ये हिंदू जनगर्जनाकडून मोर्चा

Pune: पुण्याच्या मावळमध्ये हिंदू जनगर्जनाकडून मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात आमदार नितेश राणे त्याचप्रमाणे कालीचरण महाराज सहभागी झाले आहेत. लव्ह जिहाद, धर्मातर, गोहत्या विरोधी हा मोर्चा काढण्यात आला आहे. लवकरात लवकर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली कायदा आणण्याचा प्रयत्न करणार असल्याचे नितेश राणे यांनी सांगितले.

शशिकांत वारीसे (Shashikant Warise) यांच्या कुटुंबियांना 25 लाखांची मदत

शशिकांत वारीसे (Shashikant Warise) यांच्या कुटुंबियांना 25 लाखांची मदत देण्यात येणार आहे. मंत्री उदय सामंत यांनी याबाबतची माहिती दिली.


 


 

Thane News बदलापूर एमआयडीसीत रासायनिक कंपनीला भीषण आग

Thane News: बदलापूर एमआयडीसीत रासायनिक कंपनीला भीषण आग लागल्याची घटना घडली. बदलापूर, अंबरनाथ, अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी रवाना. 10 किमी लांब असलेल्या अंबरनाथ शहरातून दिसतायत धुराचे लोट. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू

पोहरादेवी येथे आज 593 कोटी रुपयांच्या विकासकामाचं उद्घाटन होणार

washim : वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी येथे आज 593 कोटी रुपयांच्या विकासकामाचं उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हस्ते पार पडणार आहे. या कार्यक्रमासाठी भव्य तयारी स्थानीक आमदार संजय राठोड यांनी केली आहे. मागील काळात संजय राठोड यांच्यावर झालेले आरोप आणि त्यानंतर राठोड यांनी शिंदे गटात केलेला पक्षप्रवेश यानंतर ठाकरे गटाकडून प्रचंड प्रमाणात संजय राठोड यांच्यावर होणारी टीका यामुळे संपुर्ण समाज आपल्याच बाजूने असल्याचा दाखवण्याचा प्रयत्न संजय राठोड यांच्या वतीने होत आहे. त्यामुळेंच आज संजय राठोड यानी भव्य दिव्य कार्यक्रमाच आयोजन पोहरादेवी येथे करत एकप्रकारे शक्ती प्रदर्शन केलं आहे. हा कार्यक्रम राठोड कुटुंबीयांसाठी अतिशय महत्वाचा आहे. या कार्यक्रमासाठी संजय राठोड यांच्या पत्नी संगीता राठोड या पारंपरिक बंजारा समाजाचा वेशभूषेत कार्यक्रमाला उपस्थित आहेत.

Buldana Accident : बुलढाण्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर दोन ट्रकचा भीषण अपघात, चार जणांचा मृत्यू

Buldana Accident : राष्ट्रीय महामार्ग क्र.06 वर तांदुळवाडी पुलावर दोन ट्रकचा भीषण अपघात झाला आहे. दोन ट्रकच्या भीषण अपघातात चार जणांचा मृत्यू झाला आहे. विटांनी भरलेल्या ट्रकने दुसऱ्या ट्रकला धडक दिली आहे. या अपघातात तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना कुटीर रुग्णालय मलकापूर येथे हलविण्यात आले आहे. पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

Accident : धुळे सोलापूर हायवेला कारचा अपघात, आमदार संदीप क्षीरसागर यांच्या मामाचा मृत्यू

Bedd Accident : भरधाव कार उड्डाणपुलावर दुभाजकाला धडकून अपघात झाल्याची घटना धुळे-सोलापूर हायवेवर घडली. या अपघातात राष्ट्रवादी काँग्रेसचे बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांचे मामा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माणिकराव रायजादे यांचा मृत्यू झाला आहे. बीड गेवराई रस्त्यावर धुळे सोलापूर हायवेला ही घटना घडली. मूळचे नाशिकच्या सिन्नरमधले माणिकराव रायजादे हे त्यांच्या दिवंगत बहीण व आमदार संदीप क्षीरसागर यांच्या आई रेखाताई क्षीरसागर यांच्या धार्मिक विधीसाठी दर महिन्याला बीडला येतात. ते धार्मिक विधी आटोपल्यानंतर परत जात असताना त्यांचा मुलगा प्रीतमसह सिन्नरकडे जात होते. मुलगा प्रीतम कार चालवीत होता तर माणिकराव रायजादे हे बाजूच्या सीटवर बसले होते. यावेळी कार डिव्हायडर धडकून अपघात झाला. यामध्ये माणिकराव रायजादे यांचा जागीच मृत्यू झाला आहे. त्यांचा मुलगा प्रीतम रायजादे हा जखमी झाला प्रीतम रायझादे यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.


 

Bhagat Singh Koshyari : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर, रमेश बैस महाराष्ट्राचे नवे राल 

Bhagat Singh Koshyari : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांचा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राजीनामा (Resignation) मंजूर केला आहे. याबाबतची माहिती राष्ट्रपती भवनाकडून देण्यात आली आहे. रमेश बैस (Ramesh Bais) यांची महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून विरोधी पक्षांनी राज्यपाल कोश्यारी यांच्या विरोधात आवाज उठवला होता. राज्यपालांनी राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधकांनी केली होती. 



Pune Crime News  : पुण्याच्या दापोडीत दुहेरी हत्याकांड, आरोपी रक्ताने माखलेला टिकाव घेऊन रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

Pune Crime News  : पुण्याच्या दापोडीत दुहेरी हत्याकांडाने एकच खळबळ उडाली आहे. आरोपी रक्ताने माखलेला टिकाव घेऊन रस्त्यावर फिरत होता. या प्रकरणी आरोपीला भोसरी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. शंकर नारायण काटे (वय- 60) आणि संगीता काटे (वय- 55) अशी हत्या झालेल्या पती-पत्नींची नावे आहेत. प्रमोद मगरुडकर (वय- 47) असे आरोपीचे नाव असून त्याला भोसरी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे पिंपरी- चिंचवडमध्ये खळबळ उडाली आहे. अद्याप दुहेरी हत्येचे कारण समजू शकेलेले नाही. दापोडीत बेसावध असलेल्या दाम्पत्यावर टीकावाने घाव घालून दुहेरी हत्या करण्यात आली. काटे दाम्पत्य हे त्यांच्या घरात बसले होते. तेव्हा, आरोपी प्रमोद त्यांच्यावर टिकावाचे घाव घातले. ही घटना शनिवारच्या रात्री दहा वाजता समोर आली आहे. आरोपी प्रमोद हा हत्या करून रक्ताने माखलेला टिकाव घेऊन रस्त्यावर दिसला. हे पाहून नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी तत्काळ येऊन आरोपीला ताब्यात घेतले आहे. प्रमोद हा नुकताच दिल्लीवरून आलेला आहे.

पार्श्वभूमी

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...


12 February Headlines:  दिल्ली-वडोदरा-मुंबई एक्सप्रेस-वे च्या पहिल्या टप्प्याचं आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. तर, पुण्यातील पोटनिवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी खऱ्या अर्थाने आजपासून सुरू होणार आहे. तर, शिवसेना ठाकरे गटाचा आज मुंबईत उत्तर भारतीयांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. जाणून घेऊयात आज दिवसभरात...


दिल्ली 
- पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते दिल्ली-वडोदरा-मुंबई एक्सप्रेस-वे च्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन होणार आहे. गुरुग्राम जिल्ह्यातील अलीपूरगाव ते राजस्थानच्या दौसा असा 220 किलोमीटरचा महामार्ग तयार आहे.  दिल्ली ते दौसा हा प्रवास सध्या 6 तास लागतात परंतू या महामार्गामुळे साधारण अडीच तासात हा प्रवास होणार आहे. महामार्ग पूर्ण तयार झाल्यानंतर मुंबई-दिल्ली प्रवास सहा तासात पूर्ण होणार आहे. 


- हिंदवी स्वराजाचा विजय उत्सव आज महाराष्ट्र सदनात केला जाणार आहे. या कार्यक्रमाला ज्योतिरादित्य शिंदे उपस्थित रहाणार आहेत. 



मुंबई  
- काँग्रेस महाराष्ट्र प्रभारी एच के पाटील आज मुंबई दौऱ्यावर असणार आहेत. राज्यातील काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांसोबत त्यांची बैठक होणार आहे. काँग्रेस विधीमंडळ नेतेपदावरून बाळासाहेब थोरात यांनी राजीनामा दिल्यानंतर एच.के. पाटील यांची थोरात यांच्यासोबत बैठक होणार आहे. 


- शिवसेना ठाकरे गटाच्यावतीने उत्तर भारतीयांचा मेळावा घेण्यात येणार आहे. आगामी महापालिका निवडणुकीत उत्तर भारतीयांची मते निर्णायक ठरणार आहेत. स्वत: उद्धव ठाकरे हे या मेळाव्याला संबोधित करणार आहेत. 
 
- आदित्य ठाकरे विभागवार पदाधिकाऱ्यांचे मेळावे घेत आहेत. अंधेरीच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा रंगशारदा होणार आहे. 


- हिंडनबर्गच्या रिपोर्टनंतर अदानी समूहाने केलेला गैरव्यवहार जगासमोर आल्यानंतर सुद्धा केंद्रातील भाजप सरकारकडून कोणतीही कारवाई झाली नसल्यामुळे आम आदमी पार्टी आज मुंबईत केंद्र सरकार विरोधात आंदोलन करणार आहेत. चर्चगेट स्टेशन ते नरिमन पॉईंट येथील भाजप मुख्यालय येथे मोर्चाचे आयोजन


वाशिम 
- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पोहरादेवी येथे असणार आहेत. बंजारा समाजाची काशी असलेल्या पोहरादेवी येथील विकास कामाच्या भूमीपूजनाकरिता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह इतर मंत्री उपस्थित रहाणार आहेत. यावेळी बंजारा समाजाचे प्रतीक असलेल्या नंगारा भवनासमोर संत सेवालाल महाराज यांचा 11 फुटी पंचधातू अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण केलं जाणार आहे.


वर्धा
- वर्ध्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जनजागरण यात्रेचा समारोप आज होणार आहे. जनजागरण यात्रेचा समारोप जाहीर सभेने होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख, महिला प्रदेशाध्यक्ष विद्या चव्हाण, सुबोध मोहिते उपस्थित रहाणार आहेत.


परभणी 
- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वारकरी साहित्य परिषदेच्या 11 व्या अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाला उपस्थित राहणार आहेत. 


बीड 
- परळीमध्ये कार अपघातात जखमी झाल्यानंतर उपचार घेऊन बरे झालेले धनंजय मुंडे पहिल्यांदाच परळी शहरात येत असल्याने गोपीनाथ गडावरून त्यांची रॅली निघणार आहे.


ठाणे
- ठाण्यातील राष्ट्रवादीला आज खिंडार पडणार आहे. ज्येष्ठ नगरसेवक हनुमंत जगदाळे एकनाथ शिंदे यांच्या 'बाळासाहेबांची शिवसेना' पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत. त्यांच्यासह राष्ट्रवादीचे पाच नगरसेवक असणार आहेत. 
 


पुणे 
- चिंचवड पोटनिवडणुकीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार नाना काटे यांच्या प्रचाराचा आज नारळ फुटणार आहे. मोरया गोसावी गणपतीचे दर्शन घेऊन प्रचाराचा शुभारंभ होईल. 


- भाजपच्या उमेदवार अश्विनी जगताप यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन चंद्रकांत पाटील यांचा हस्ते उद्घाटन, सकाळी 10 वाजता.


- मविआ बंडखोर राहुल कलाटे प्रचाराचा नारळ फोडणार आहे.


- भाजपचे कसबा पेठचे उमेदवार हेमंत रासने आणि कॉंग्रेसचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांची पदयात्रा होणार आहे.


नाशिक
- वीज वितरण कंपनीकडून करण्यात आलेल्या दरवाढीच्या निषेधार्थ कुसुमाग्रज स्मारकात ग्राहक पंचायत आणि विज ग्राहक समिती आंदोलन करणार आहे.
 


परभणी
-  स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने एमएसपी परिषदेचे आयोजन केले असून राजू शेट्टी उपस्थित रहाणार आहेत.


 भंडारा 
- मंत्री सुधीर मुनंगटीवार आज जिल्हा दौऱ्यावर आहेत. साकोली येथे होणाऱ्या भटके विमुक्त कल्याणकारी परिषदेला (बिऱ्हाड परिषद) उपस्थित रहाणार आहेत.
 


गोंदिया
- मंत्री सुधीर मुनंगटीवार जिल्हा दौऱ्यावर आहेत. तिरोडा येथे विविध विकास कामांच्या भूमिपूजन कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. 


इतर 
बेंगळुरू 
- 13 तारखेपासून सुरू होणाऱ्या 14 व्या 'एअरो इंडिया शो'चे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होणार आहे.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.