Maharashtra News Updates 09 February 2023 : मोहित कंबोज यांना मुख्यमंत्री शिंदेंचा दिलासा, सांताक्रुझमधील चार प्लॅटमधील अनधिकृत बांधकाम नियमित करण्याची परवानगी

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 09 Feb 2023 03:08 PM
राष्ट्रीय वेटलिफ्टर संकेत सरगरला सांगली जिल्हा परिषदेकडून 5 लाखांची मदत
राष्ट्रकुल स्पर्धेत वेटलिफ्टिंग मध्ये भारताला रौप्यपदक मिळवून देणाऱ्या सांगलीच्या संकेत सरगर याला सांगली जिल्हा परिषदेकडून आर्थिक स्वरूपाची मदत करण्यात आली आहे. सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश खाडे आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांच्या हस्ते सांगली जिल्हा परिषदेमध्ये आज पार पडलेल्या कार्यक्रमात वेटलिफ्टर संकेत सरगर याच्या आई वडिलांकडे पाच लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला.  मूळचा आटपाडी तालुक्यातील तळेवाडी येथील संकेत महादेव सरगर हा सध्या सांगली शहरातील संजयनगर भागात राहतो. संकेतने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत केलेल्या कामगिरीनंतर अनेकांनी त्याला मदत देण्याचं घोषित केले होते. त्यानुसार  सांगली जिल्हा परिषदेकडून संकेतचापाच लाख आणि सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. सन 2022 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत च्या वेटलिफ्टिंगमध्ये संकेतने रौप्यपदक पटकावून जिल्ह्याचे नाव उंचावले होते. तसेच देशाच्या लौकिकातही मोलाची कामगिरी केली होती. 

 

भारताला रौप्यपदक मिळवून दिल्यानंतर महाराष्ट्र शासनाकडून तीस लाख रुपये देण्याचा जाहीर करण्यात आलं होतं, त्याचबरोबर संकेतला शासकीय नोकरीमध्ये देखील समावेश करण्याचा राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आला होते.मात्र अद्यापही राज्य सरकारकडून त्याला कोणतीच मदत मिळालेली नाही,मात्र सांगली जिल्हा परिषदेकडून संकेतला पाच लाख रुपयांची मदत देऊ करण्यात आली आहे, तर या कार्यक्रमादरम्यान सांगलीचे पालकमंत्री व कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी राज्य सरकारच्या माध्यमातून संकेत याला लवकरच शासकीय नोकरीत समावेश करून घेऊ असा आश्वासन दिले आहे.
नांदेड येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थी अभ्यासासोबत गिरवताहेत, सेंद्रिय शेतीचे धडे

सेंद्रिय शेतीतील उत्पादने विषमुक्त असल्याने अशा पद्धतीच्या शेतीचे प्रयोग ठिकठिकाणी होत आहेत. नांदेड येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थी अभ्यासासोबत, आता सेंद्रीय शेतीचे धडे गिरवत आहेत.ज्यात शाळेच्या आवारात या विद्यार्थ्यांनी सांडपाण्यापासून परसबाग फुलवलीय. शाळेतील या परसबागेतून उगवलेल्या भाजीपाल्याचा विद्यार्थ्यांच्या मध्यान्ह भोजनात उपयोग होतोय. दरम्यान, ही परसबाग सांडपाण्याचा वापर करत ठिबक सिंचनाद्वारे पाणी देऊन फुलवली आहे. 

मोहित कंबोज यांना मुख्यमंत्री शिंदेंचा दिलासा, सांताक्रुझमधील चार प्लॅटमधील अनधिकृत बांधकाम नियमित करण्याची परवानगी

भाजप नेते मोहित कंबोज यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलासा दिला आहे. कंबोज यांच्या सांताक्रुझमधील चार प्लॅटमधील अनधिकृत बांधकाम नियमित करण्याची परवानगी देण्यात आली आहे. मंजूर आराखड्यानुसार, बांधकाम नसल्यानं तत्कालीन महाविकास आघाडी सरकारनं कंबोज यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. त्यानंतर सरकार बदलल्यानंतर कंबोज यांनी नगरविकास खात्याकडे अपील केली होती. त्यावर मुख्यमंत्र्यांनी निर्णय देत कंबोज यांना दिलासा दिला आहे. खास बाब म्हणून निर्णय दिला असून इतर प्रकरणांमध्ये हे प्रकरण उदाहरण म्हणून मानलं जाऊ नये, असंही सरकारनं स्पष्ट केलं आहे. 

भंडाऱ्याच्या मोहाडीत विद्यार्थ्यांचं एसटी बस स्थानकात आंदोलन, प्रवासी वाहतूक थांबवणाऱ्या आंदोलक पोलिसांच्या ताब्यात

Bhandara News : शिक्षणासाठी वेळेवर एसटी बस येत नसल्याने भंडारा जिल्ह्यातील मोहाडीतील विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होत होतं. त्यामुळे गेल्या दोन महिन्यांपासून एसटी बस संदर्भातील विद्यार्थ्यांच्या सर्व समस्या सोडवण्यासाठी विभागीय नियंत्रकांना निवेदनाद्वारे बसवर 'अंडा फेको' आंदोलनाचा इशारा दिला होता. मात्र, त्यावर कुठलीही कारवाई महामंडळाडून करण्यात आली नाही, त्यामुळे संतप्त विद्यार्थ्यांनी एसटी बस स्थानकावर आंदोलन करुन प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसेस अडवून धरल्याचा प्रकार भंडाराच्या मोहाडी इथ घडला. याप्रकरणी मोहाडी पोलिसांनी आंदोलनाचे नेतृत्व करणारे कॉम्रेड वैभव चोपकर यांना ताब्यात घेतल्यानंरत एसटी बसेस पुढील प्रवासासाठी निघाल्या. 

उल्हासनगर महापालिकेत 550 कोटी रुपयांच्या कराची थकबाकी, आयुक्तांचा करबुडव्यांना मालमत्ता जप्तीच्या कारवाईचा इशारा
Ulhasnagar News : उल्हासनगर महापालिकेत यंदा मालमत्ता कराची तब्बल 550 कोटी रुपयांची थकबाकी आहे. त्यामुळे महापालिकेचं आर्थिक गणित बिघडत असल्याने महापालिका आयुक्तांनी यंदा थेट मालमत्ता जप्तीचा इशारा करबुडव्यांना दिला आहे. उल्हासनगर महापालिकेत पूर्वीची 450 कोटी कर थकबाकी असून चालू वर्षातला 100 कोटी रुपये कर आहे. या कर वसुलीसाठी महापालिकेने अभय योजना, व्याजमाफी या माध्यमातून आवाहन केलं, मात्र कर बुडव्यांनी त्याला प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे यंदा मागील 10 महिन्यात फक्त 35 कोटी रुपयांची वसुली होऊ शकली आहे. उल्हासनगर महापालिकेचा उत्पन्नाचा मुख्य स्रोत मालमत्ता कर हाच आहे. त्यामुळे कर थकबाकीमुळे महापालिकेचं आर्थिक गणित बिघडलं आहे. परिणामी यंदा थकबाकी वसूल झाली नाही, तर कर बुडव्यांच्या मालमत्ता जप्त करण्याचा इशारा उल्हासनगर महापालिकेचे आयुक्त अजिझ शेख यांनी दिला आहे. त्यांच्या या इशाऱ्यानंतर तरी कर वसुली होते का? हे पाहावं लागणार आहे.
Bullet Train:  बुलेट ट्रेनला हायकोर्टाचा हिरवा कंदील, विक्रोळीतील जीमनीबाबत गोदरेजची याचिका हायकोर्टानं फेटाळली

Bullet Train:  विक्रोळीतील जीमनीबाबत गोदरेजची याचिका हायकोर्टानं फेटाळली आहे.  गोदरेजला कोणताही दिलासा देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. निकालाला दोन आठवड्यांची स्थगिती देण्याची मागणी फेटाळली आहे. विक्रोळीतील जमीन अधिग्रहणाबाबत राज्य सरकारचा निर्णय योग्य आहे. हा केंद्र सरकारचा बहुउद्देशीय आणि लोकोपयोगी प्रकल्प आहे


 

मुंबई-वडोदरा द्रुतगती मार्गाचा मार्ग मोकळा, कामात अडथळा ठरणारी 350 खारफुटी कापण्यास हायकोर्टाची परवानगी

Mumbai Vadodara Expressway : मुंबई-वडोदरा द्रुतगती महामार्गाचा मार्ग मोकळा


कामात अडथळा ठरणारी 350 खारफुटी कापण्यास हायकोर्टाची परवानगी


एनएचआरएआनं मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका स्वीकारली


मुंबई - दिल्ली एक्सप्रेसवेमधील महत्त्वाचा टप्पा लवकर मार्गी लागण्याचा मार्ग खुला

Rahul Gandhi: लोकसभेत राहुल गांधींच्या भाषणातला बहुतांश भाग कामकाजातून वगळण्यात आलाय, मोदी-अदानी यांच्या संबंधांबाबतचे सगळे मुद्दे वगळले

लोकसभेत राहुल गांधींच्या भाषणातला बहुतांश भाग कामकाजातून वगळण्यात आला आहे. 


मोदी आणि अदानी यांच्या संबंधांबाबतचे सगळे मुद्दे वगळण्यात आले आहेत. 


राहुल गांधी यांनी विचारलेले प्रश्नही कामकाजात ठेवले गेलेले नाहीत.

Ahamdnagar News: अहमदनगर जिल्ह्याच्या नामांतराचा प्रश्न पुन्हा पेटण्याची शक्यता

अहमदनगर जिल्ह्याच्या नामांतराचा प्रश्न पुन्हा पेटण्याची शक्यता आहे. भाजप आमदार गोपीचंद पडळकरांनी नामांतराची मागणी केली होती. त्या पार्श्वभूमीवर नामांतराच्या मागणीसाठी आजपासून चौंडी येथून रथयात्रा सुरू होणार आहे. गोपीचंद पडळकर यांच्या हस्ते रथयात्रेची सुरुवात होणार आहे. पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर नगर नामांतर कृती समितीच्या वतीने रथयात्रेचं नियोजन करण्यात आलंय. 20 फेब्रुवारीला या रथयात्रेचा नगर जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चाचाे समारोप होणार आहे.

Yavatmal News: यवतमाळमध्ये आज ठाकरे गटाकडून चक्काजाम आंदोलन

Yavatmal News: सध्या राज्यात हवामान बदलामुळे शेती पिकांचं नुकसान झालंय. त्यामुळे बळीराजा आधीच संकटात सापडलाय. त्यामुळे शेतकऱ्यासमोर मोठं आव्हान आहे. हवामान बदलामुळे शेतमालाला चांगला हमी भाव मिळत नसल्यानं शेतकऱ्यासमोर मोठं आव्हान आहे. त्याय सरकारकडूनही मदत न मिळाल्यानं शेतकरी चिंतेत सापडलाय. यासाठी यवतमाळमध्ये आज ठाकरे गटाकडून चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे.


कापसाला प्रति क्विंटल 10 हजार हमी भाव जाहीर करावा, आणि त्याची खरेदी लवकर सुरू करावी, अशी मागणी ठाकरे गटाच्या वतीनं करण्यात आलीय.तसंच कापसासोबतच सोयाबीनलाही 7 हजारांपर्यंतचा हमी भाव, आणि हरभरा तुरीची नाफेड मार्फत ऑनलाईन खरेदी सुरु करावी, अशी मागणीही ठाकरे गटाकडून करण्यात येतेय.यासाठी आज दुपारी 12 वाजता हे आंदोलन करण्यात येणारेय.  

Saamana Editorial on Maharashtra Congress: थोरातांचा वाद चिघळू देऊ नका, अन्यथा भाजपला आयती संधी मिळेल; सामनातून काँग्रेसला सल्ला

Saamana Editorial on Maharashtra Congress: राज्यात कांग्रेसमध्ये सुरू असलेल्या गृहकलहावरून शिवसेनेनं सामनामधून काँग्रेसला सुनावलंय. थोरातांचा वाद चिघळू देऊ नका अन्यथा भाजपला आयती संधी मिळेल असं सामनामधून काँग्रेसला सल्ला देण्यात आलाय. राहुल गांधींनी भारत जोडो मधून काँग्रेसला नव संजीवनी दिलेय. त्याच्या विपरीत काम करू नका असंही शिवसेनेनं काँग्रेसला सुचवलंय. पाहुया सामनाच्या अग्रलेखात काँग्रेसाल कोणता सल्ला देण्यात आलाय. 

Pradnya Rajeev Satav: हल्ला करण्यामागे आम्हाला घरी बसण्याचा कट असू शकतो : प्रज्ञा सातव
Pradnya Rajeev Satav: दिवंगत खासदार राजीव सातव यांच्या पत्नी आणि विधान परिषद आमदार प्रज्ञा सातव यांच्यावर आज कसबे दवंडा या गावांमध्ये  एका व्यक्तीने हल्ला केला आहे. ही माहिती प्रज्ञा सातव यांनी स्वतः फेसबुक आणि ट्विटरच्या माध्यमातून पोस्ट करून दिली आहे.  या प्रकरणामध्ये आखाडा बाळापूर पोलिसांनी तत्काळ हल्लाखोरांला ताब्यात घेतले होते. त्यानंतर या प्रकरणांमध्ये रात्री उशिरा आखाडा बाळापूर पोलिसांमध्ये प्रज्ञा सातव यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आम्हाला हल्ला करून घरी बसण्याचा कट असू शकतो. महिला प्रतिनिधी आहे, भीती दाखवली, घाबरले तर घरी बसतील, या कारणाने हा हल्ला झाल्याचं प्रज्ञा सातव यांनी माझाशी बोलताना सांगितलं आहे. 

 

पार्श्वभूमी

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज आपला 60 वा वाढदिवस साजरा करत आहेत. त्याच्या वाढदिवसानिमित्त राज्यभर अनेक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. तसेच आज युवासेना नेते आदित्य ठाकरे औरंगाबाद दौऱ्यावर असून माजी मंत्री संदिपान भुमरे यांच्या मतदारसंघात ते सभा घेणार आहेत. यासह आज दिवसभरात घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. 


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा 60 वा वाढदिवस
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आज 60 वा वाढदिवस आहे. राज्यात अनेक ठिकाणी मुख्यमंत्र्यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. वाढदिवसानिमीत्त मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा देण्यासाठी ठाण्यात अनेक कार्यकर्ते येण्याची शक्यता आहे. ठाण्याच्या कोपरी पुलाचं उद्घाटन आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घघाटन होणार आहे. 


मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रम :
- आज दुपारी 1.30 वाजता एमएमआरडीएनं बांधलेल्या कोपरी ब्रिजचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.
- टेंभी नाका येथे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लहान मुलांना शैक्षणिक साहित्य आणि खेळाच्या साहित्याचं वाटप केल जाणार आहे.
- मुख्यमंत्र्यांच्या हस्ते बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या लिगल सेलचे उद्घाटन. 
- त्यानंतर दुपारी मुख्यमंत्री वर्षावर जातील, तिथेही वाढदिवस साजरा केला जाणार.


आदित्य ठाकरे यांचा औरंगाबाद दौरा
युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या शिवसंवाद यात्रेचा सातवा टप्पा सुरू आहे. आज आदित्य ठाकरेंच्या दौऱ्याचा चौथा आणि शेवटचा दिवस आहे. आज आदित्य ठाकरेंची तोफ मंत्री संदिपान भुमरे यांच्या मतदारसंघात धडाडणार आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील शिवसैनिक आणि नागरिकांशी ते संवाद साधणार आहेत.


बुलेट ट्रेनला मिळणार का हिरवा कंदील?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या बुलेट ट्रेनबाबत आज हायकोर्ट फैसला सुनावणार आहे. गोदरेजनं विक्रोळीतील जमीन अधिग्रहणाला आव्हान देत हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर हायकोर्ट आज आपला अंतिम निकाल देणार आहे. गोदरजेच्या याचिकेला राज्य सरकारनं जोरदार विरोध केला होता. केवळ गोदरेजच्या आडमुठे भूमिकेमुळंच हा बहुउद्देशीय लोकोपयोगी प्रकल्प रखडल्याचा राज्य सरकारचा दावा आहे. 


यवतमाळमध्ये ठाकरे गटाकडून चक्काजाम आंदोलन
शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं आज चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे.  कापसाला प्रति क्विंटल 10,000 हमीभाव जाहीर करून त्वरित खरेदी चालू करावी, सोयाबीनला प्रति क्विंटल 7,000 रुपये हमीभाव जाहीर करावा, हरभरा आणि तुरीची नाफेडमार्फत ऑनलाईन नोंदणी करून खरेदी त्वरित सुरु करावी अशा मागण्यासाठी आज दुपारी 12 वाजता जिल्हाभरात चक्का जाम आंदोलन करण्यात येणार आहे.


नगर जिल्ह्याच्या नामांतरासाठी यांची रथयात्रा 
अहमदनगर जिल्ह्याचे नाव पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नगर करावे ही मागणी घेऊन आजपासून चौंडी येथून एक रथयात्रा सुरू होणार आहे. रथयात्रेची सुरूवात आमदार गोपीचंद पडळकर यांच्या हस्ते सुरू होण्याची शक्यता आहे. सकाळी 10 वाजता यात्रेला सुरूवात होणार आहे. पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर नगर नामांतर कृती समितीच्या वतीने या यात्रेचे नियोजन करण्यात आलंय. कर्जत, श्रीगोंदा, पारनेर, संगमनेर, कोपरगाव, श्रीरामपूर, राहुरी, नेवासा, शेवगाव, पाथर्डी, नगर शहर असा प्रवास करीत सोमवारी 20 फेब्रुवारीला या रथयात्रेचा नगर जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चेने समारोप होणार आहे. या रथयात्रेमुळे पुन्हा एकदा नगरच्या नामांतराचा मुद्दा तापण्याची शक्यता आहे.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.