Maharashtra News LIVE Updates : देश विदेशातील महत्वाच्या बातम्यांचा आढावा एका क्लिकवर
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
Background
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
परभणीचे तापमान 42.06 अंशावर, यंदाच्या मोसमातील सर्वोच्च तापमानाची नोंद
परभणी जिल्ह्यात मागच्या आठवडा भरापासून गर्मीने हैराण केले आहे.सातत्याने तापमान हे चाळीशी पार जात असल्याने प्रचंड उकाडा जाणवतोय.आज तर जिल्ह्याचे तापमान हे 42.06 अंशावर गेले असुन यंदाच्या मोसमातील हे सर्वाधिक तापमान आहे.त्यामुळे सकाळी 11 पर्यंत आणि सायंकाळी 5 नंतरच नागरिक घराबाहेर पडताना दिसत आहेत तर गर्मीने उष्माघात होण्याची शक्यता असल्याने महत्वाचे काम असल्यासच दुपारच्या वेळी बाहेर निघावे असे आवाहन ही प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
मंत्री उदय सामंतांच्या कारच्या ताफ्यावर दगडफेक, सुरक्षेत वाढ
उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आलीय. लोकसभा निवडणुक प्रचारा दरम्यान यवतमाळ जिल्ह्यात काही अज्ञातांनी उदय सामंत यांच्या कारच्या ताफ्यावर दगडफेक करण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी उदय सामंत यांच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ केली आहे.























