(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Maharashtra News: बाळासाहेब ठाकरेंच्या तैलचित्राचा वाद पेटला, तैलचित्रावरून ठाकरे गटाच्या आमदारांची नाराजी
Maharashtra News: 23 जानेवारीला स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्तानं विधीमंडळात तैलचित्र लावण्यात येणार आहे.
मुंबई: विधीमंडळातील बाळासाहेब ठाकरेंच्या ( Balasaheb Thackeray) तैलचित्रावरून वाद पेटण्याची शक्यता आहे. तैलचित्रावरून ठाकरे गटाच्या आमदारांनी नाराजी व्यक्त केली आहे. तैलचित्र अजून चांगलं बनवता आलं असतं, असे म्हणत ठाकरे गटाने तैलचित्रावर आक्षेप घेतला आहे. ठाकरे गटाचे आमदार सभापती, विधानसभा अध्यक्षांना पत्र लिहिणार असल्याची माहिती समोर येत आहे.
बाळासाहेब ठाकरे, महाराष्ट्रातलं एक मोठं नाव आहे. राजकाराणात असून देखील नेहमीच रिमोट कंट्रोलच्या भूमिकेत बाळासाहेब दिसले. त्यांनी स्वतः शेकडो आमदार खासदार सभागृहात पाठवले पण स्वतः विधीमंडळाच्या राजकारणात सक्रिय सहभाग घेतला नाही. मात्र राजकारणातल्या उल्लेखनीय कामकाजाचा गौरव म्हणून त्याचं तैलचित्र विधीमंडळात लावण्यात येणार आहे.
23 जानेवारीला स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्तानं (Balasaheb Thackeray Jayanti) विधीमंडळात तैलचित्र लावण्यात येणार आहे. राजकारणात सध्या परिस्थिती बदलेली आहे. एकेकाळी एकत्र असणारे नेते उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे आता वेगळे झाले आहेत. गेल्या सहा महिन्यात एकदाही हे दोन्ही नेते एकत्र दिसले नाही, मुख्यमंत्री पदावरून पायउतार केल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्याबद्दल ठाकरेंच्या मनात प्रचंड नाराजी आहे.
या कार्यक्रमानिमित्त उद्धव ठाकरे हे एकनाथ शिंदेसोबत एकाच मंचावर दिसणार अशी चर्चा आहे. बाळासाहेब ठाकरे हे दोन्ही पक्षासाठी महत्वाचं आहे, एक बाळासाहेबांचे रक्ताचे वारसदार आहेत तर दुसरीकडे आम्हीच बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार असल्याचं सांगत सत्ता स्थापन केलेले एकनाथ शिंदे आहे या दोघांसाठी बाळासाहेब ठाकरे हा विषय संवेदनशील झालाय, बाळासाहेबाच्या हिदुत्वांचा झेंडा घेत
शिंदेंनी वेगळी चुल मांडली पण आता त्याचा बाळासाहेबांच्या थैलचित्रांच्या निमित्तानं दोघेही एकत्र दिसण्याची शक्यता आहे. यासंदर्भातलं अधिकृत निमंत्रण विधीमंडळाकडून सर्वच पक्षाच्या प्रमुखांना देण्यात येणार आहे त्यामुळे सध्या चर्चा हिच आहे की बाळासाहेबांच्या कार्यक्रमानिमित्तानं उद्धव ठाकरे बाळासाहेब ठाकरेंच्या सेनेसोबत एकत्र दिसणार का? असा सवाल या निमित्ताने उपस्थि होत आहे.