एक्स्प्लोर

मोठी बातमी! प्रस्तावित वीज दरवाढीला न्यायालयात आव्हान, औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल

Electricity Price Hike : महावितरणचे माजी अभियंता अजित देशपांडे यांनी अॅड. गिरीश नाईक- थिगळे यांच्यामार्फत याचिका दाखल केली.

Electricity Price Hike : मुंबईसह राज्यातील वीज (Electricity) दरवाढीचा बॉम्ब लवकरच फुटणार आहे. वीज कंपन्यांनी सादर केलेल्या वीज दर निश्चितीच्या याचिकेवर महाराष्ट्र वीज नियामक आयोगासमोर जनसुनावणी पार पडली आहे. त्यामुळे नवे वीजदर लवकरच लागू करावे लागणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर वीज आयोगाचे वीज दराचे आदेश तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले असून, त्याबाबत लवकरच आदेश जारी केला जाणार आहे. मात्र आता याच प्रस्तावित वीज दरवाढीला महावितरणच्या माजी अभियंत्यानेच औरंगाबाद खंडपीठात आव्हान दिले आहे. तर प्रस्तावित वीज दरवाढ रोखण्याची विनंती या याचिकेत करण्यात आली आहे.

महावितरणचे माजी अभियंता अजित देशपांडे यांनी अॅड. गिरीश नाईक- थिगळे यांच्यामार्फत याचिका दाखल केली. या याचिकेवर 10 एप्रिल रोजी प्राथमिक सुनावणी होणार आहे.  विशेष म्हणजे यात ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव, एमएसईबीच्या होल्डिंग कंपनीचे अध्यक्ष (ऊर्जामंत्री), वीज नियामक आयोगाचे सचिव, महावितरणचे संचालक (वाणिज्यिक) व महावितरणच्या अध्यक्षांसह व्यवस्थापकीय संचालक यांना प्रतिवादी करण्यात आले आहे. 

काय म्हटले आहे याचिकेत? 

महाराष्ट्रातील घरगुती ग्राहकांचे वीजदर शेजाऱ्याच्या राज्यांच्या तुलनेत आधीपासूनच जास्त असतानाही येत्या 1 एप्रिलपासून वीजदरवाढ लागू करण्याचा प्रस्ताव आहे. वीजदर जास्त असल्यामुळेच महाराष्ट्रात येणारे उद्योग इतर राज्यांत असून त्याचा राज्याच्या औद्योगिक विश्वावर परिणाम होत आहेत. त्यामुळे या प्रस्तावित वीज दरवाढीला थांबवावे अशी मागणी याचिकाकर्ते यांनी केली आहे. तर कृषिपंपाच्या अश्वशक्तीचा भार शेतकऱ्यांना न कळवताच वाढवून त्यांच्या नावे कोट्यवधींची थकबाकी दाखवून शासनाची, शेतकऱ्यांची आणि सर्वसामान्य ग्राहकांचीही फसवणूक केल्याप्रकरणाची उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तीच्या समितीमार्फत चौकशी करावी, अशी विनंती देखील याचिकेत करण्यात आली आहे. 

अशी असणार वीज दरवाढ...

महाराष्ट्रात घरगुती ग्राहकांना 101 ते 300 युनिटसाठी (वर्षे 2023-24) 12 रुपये 17 पैसे प्रतियुनिटप्रमाणे दर आकारला जातो. प्रस्तावित दराप्रमाणे 2023-24 साठी प्रतियुनिट 15 रुपये तर 2024-25 साली हाच दर 17 रुपये आकारला जाईल. 300 ते 500 युनिटचा सध्याचा दर 16. 24 रुपये तर प्रस्तावित 20.80 रुपये तर 2025-26 साली 23.28 रुपये असेल. 500 व त्यापुढील दर 18. 18 रुपये तर प्रस्तावित दराप्रमाणे 2023-24 साली 23.44 रुपये तर 2024-25 साठी 26.25 रुपये राहील.

इतर महत्वाच्या बातम्या : 

Chhatrapati Sambhaji Nagar : महाविकास आघाडीच्या 'वज्रमूठ सभे'ला परवानगी मिळाली, मात्र 'हे' नियम पाळावे लागतील

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Shinde - Vinod Tawde : आधी कुजबूज, नंतर टाळी दिली! शिंदे-तावडेंमध्ये काय चर्चा?
Eknath Shinde - Vinod Tawde : आधी कुजबूज, नंतर टाळी दिली! शिंदे-तावडेंमध्ये काय चर्चा?
पेट्रोलचा टँकर पलटी झाला, फोंडा घाटाचा रस्ता सरसर वणव्यासारखा पेटत गेला अन्...
पेट्रोलचा टँकर पलटी झाला, फोंडा घाटाचा रस्ता सरसर वणव्यासारखा पेटत गेला अन्...
Devendra Fadnavis Chief Minister : देवेंद्र फडणवीसांची झंझावाती कारकीर्द, कमबॅकची कहाणी माझा वर
Devendra Fadnavis Chief Minister : देवेंद्र फडणवीसांची झंझावाती कारकीर्द, कमबॅकची कहाणी माझा वर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 डिसेंबर 2024 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 डिसेंबर 2024 | बुधवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Special Report on Devendra Fadnavis : सर्वसमावेशक अनुमोदन, देवेंद्र फडणवीस भाजप विधिमंडळ पक्षनेतेपदीSudhir Mungantiwar on Oath Ceremony : उद्या फक्त 3 जण शपथ घेतील, सुधीर मुनगंटीवारांची मोठी माहितीZero Hour : शपथविधीआधी देवेंद्र फडणवीसांसमोर सर्वात मोठी आव्हानं, एकनाथ शिंदेच्या नाराजीचा अर्थ काय?Eknath Shinde - Vinod Tawde : आधी कुजबूज, नंतर टाळी दिली! शिंदे-तावडेंमध्ये काय चर्चा?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde - Vinod Tawde : आधी कुजबूज, नंतर टाळी दिली! शिंदे-तावडेंमध्ये काय चर्चा?
Eknath Shinde - Vinod Tawde : आधी कुजबूज, नंतर टाळी दिली! शिंदे-तावडेंमध्ये काय चर्चा?
पेट्रोलचा टँकर पलटी झाला, फोंडा घाटाचा रस्ता सरसर वणव्यासारखा पेटत गेला अन्...
पेट्रोलचा टँकर पलटी झाला, फोंडा घाटाचा रस्ता सरसर वणव्यासारखा पेटत गेला अन्...
Devendra Fadnavis Chief Minister : देवेंद्र फडणवीसांची झंझावाती कारकीर्द, कमबॅकची कहाणी माझा वर
Devendra Fadnavis Chief Minister : देवेंद्र फडणवीसांची झंझावाती कारकीर्द, कमबॅकची कहाणी माझा वर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 डिसेंबर 2024 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 डिसेंबर 2024 | बुधवार
Maharashtra CM : शपथ विधिबाबत एकनाथ शिंदेंचा सस्पेन्स कायम; समजूत काढण्यासाठी शिवसेनेचे आमदार वर्षावर
शपथ विधिबाबत एकनाथ शिंदेंचा सस्पेन्स कायम; समजूत काढण्यासाठी शिवसेनेचे आमदार वर्षावर
Eknath Shinde : देवेंद्र फडणवीस यांची विनंती अन् उपमुख्यमंत्रिपदाबाबतचा प्रश्न, एकनाथ शिंदे पत्रकार परिषदेत काय म्हणाले?
देवेंद्रजींनी मुख्यमंत्री व्हावं असं पाठिंब्याचं पत्र सेनेनं दिलं, एकनाथ शिंदेंनी सांगितला अडीच वर्षांपूर्वीचा प्रसंग
Devendra Fadnavis : Eknath Shinde मंत्रिमंडळात राहणार नाही? फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Devendra Fadnavis : Eknath Shinde मंत्रिमंडळात राहणार नाही? फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Rahul Narwekar : राहुल नार्वेकर पुन्हा विधानसभा अध्यक्ष होणार, सूत्रांची माहिती, विशेष अधिवेशनाच्या तारखा समोर
राहुल नार्वेकर पुन्हा विधानसभा अध्यक्ष होणार, सूत्रांची माहिती, विशेष अधिवेशनाच्या तारखा समोर
Embed widget