BJP MLA Suspension Live updates : 12 आमदारांचं निलंबन सुप्रीम कोर्टाकडून रद्द, वाचा प्रत्येक अपडेट्स

BJP MLA Suspension Live updates :  वर्षभरासाठी निलंबित करण्यात आलेल्या भाजपच्या सर्व 12 आमदारांचं निलंबन सुप्रीम कोर्टाने रद्द केलं आहे.

abp majha web team Last Updated: 28 Jan 2022 11:04 AM
12 MLA Suspension : Majority असलेल्या कुठल्याही सरकारच्या डोळ्यात अंजन घालणारा निर्णय - चंद्रकांत पाटील

12 MLA Suspension : सुप्रीम कोर्टाच्या निकालावर आम्ही भाष्य करत नाही : प्रवक्ते नवाब मलिक ABP Majha

12 MLA Suspension : सुप्रीम कोर्टाच्या निकालावर आम्ही भाष्य करत नाही : प्रवक्ते नवाब मलिक ABP Majha



12 MLA Suspension : BJP 12 आमदारांच्या निलंबनाबाबत सर्वोच्च न्यायालय काय म्हणालं? ABP Majha

12 MLA Suspension : BJP 12 आमदारांच्या निलंबनाबाबत सर्वोच्च न्यायालय काय म्हणालं? ABP Majha


मंत्री म्हणतात, निलंबनाचा निर्णय सरकारचा नाही; आताही कोर्टाची निकालाची प्रत आल्यावर विधिमंडळच निर्णय घेईल...

मंत्री म्हणतात, निलंबनाचा निर्णय सरकारचा नाही; आताही कोर्टाची निकालाची प्रत आल्यावर विधिमंडळच निर्णय घेईल...



 



https://marathi.abplive.com/news/maharashtra/nawab-malik-jayant-patil-chhagan-bhujbal-on-bjp-mla-suspension-quashes-by-supreme-court-suspension-of-12-bjp-maharashtra-mla-1028861

लोकशाहीविरोधी, बेकायदा, अवैध, असमर्थनीय प्रकार लोकशाहीत कधीच खपवून घेतले जात नसतात- फडणवीस

नेमकं काय म्हणाले फडणवीस


राज्य विधिमंडळात ओबीसींच्या हक्कांसाठी संघर्ष करणाऱ्या भाजपाच्या 12 आमदारांचे बेकायदेशीर निलंबन रद्द ठरविणारा, लोकशाही वाचविणारा आणि ऐतिहासिक निकाल दिल्याबद्दल मा. सर्वोच्च न्यायालयाचे मन:पूर्वक आभार!  या निकालाचे आम्ही स्वागत करतो. सातत्याने संविधानाची पायमल्ली करीत तानाशाही पध्दतीने सरकार चालविण्याचा प्रकार महाविकास आघाडी सरकारकडून होत होता. त्याला सर्वोच्च न्यायालयाने दिलेली ही जोरदार चपराक आहे. लोकशाहीविरोधी, बेकायदा, अवैध, असमर्थनीय प्रकार लोकशाहीत कधीच खपवून घेतले जात नसतात, आज न्यायालयाने त्यावर शिक्कामोर्तब केला. हे निलंबन रद्द झाल्याबद्दल भाजपाच्या 12 आमदारांचे मी मनःपूर्वक अभिनंदन करतो. कुठलेही कारण नसताना आणि इतक्या प्रदीर्घ कालावधीसाठी निलंबन हे असंवैधानिक आहे, केवळ कृत्रिम बहुमतासाठी ते करण्यात आले, हे आम्ही प्रारंभीपासूनच सांगत होतो. आज सर्वोच्च न्यायालयाने तेच सांगितले. हा केवळ 12 आमदारांच्या निलंबनाचा प्रश्न नव्हता तर त्या मतदारसंघातील 50 लाखाहून अधिक मतदारांचा प्रश्न होता. माननीय  सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयामुळे लोकशाही मूल्यांचे रक्षण होईल. या निर्णयाने महाविकास आघाडी सरकारच्या तोंडावर आणखी एक चपराक बसली असल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे. तसेच आज लोकशाहीचे संरक्षण झाले असेही त्यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे.



 

कृत्रिम बहुमत मिळवण्याची आमच्या महाविकासआघाडीला कधी गरज वाटली नाही- जयंत पाटील 

बारा आमदारांचे निलंबन रद्द झाले... या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची प्रत येईल...तेव्हा विधानसभा अध्यक्ष विधानसभा कार्यालय याबाबत अभ्यास करील आणि योग्य तो निर्णय घेईल. झालेला प्रकार विसरता येणार नाही, या प्रकारामुळे हे निलंबन झालं होतं.  भारतात याआधी सुद्धा मोठ्या कालावधीसाठी निलंबन झालेली आहेत. सर्वोच्च न्यायालय जो निर्णय दिला आहे त्याची सगळी कारणमीमांसा तपासली जाईल. हे राजकीय सूडापोटी निलंबन नव्हतं आमदारांच्या वागणुकीनंतर हे निलंबन झालं होतं.आमच्याकडे 170 पर्यंत आमदार आमच्या बाजूने आहेत... त्यामुळे बारा जण निलंबित करून कृत्रिम बहुमत मिळवण्याची आमच्या महाविकासआघाडीला कधी गरज वाटली नाही. राज्यपाल नियुक्त आमदार बाबत अजूनही राज्यपालांनी निर्णय घेतलेला नाही, वर्षभर उलटून गेले. सर्व कायद्याच्या चौकटीत बसवून व्हायला पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे..
- जयंत पाटील, राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष

सरकारच्या डोळ्यात अंजन घालणारा निर्णय - चंद्रकांत पाटील

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले, आधी भाजपवर विश्वास नाही, निवडणूक आयोगावर विश्वास नाही आता सुप्रीम कोर्टवर देखील विश्वास नाही का?, 12 आमदारांचं निलंबन मागे घेतलं नाही तर लोकशाहीला धोका होईल असं सुप्रीम कोर्टाने म्हटलं


सरकारच्या डोळ्यात अंजन घालणारा हा निर्णय आहे. या सरकारचा एकही निर्णय कोर्टात टिकला नाही, तरीही ते का निर्णय करतात कळत नाही

आमदार अतुल भातखळकर यांच्या कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांचा जल्लोष

राज्यात भाजपच्या बारा आमदारांच्या निलंबनाचा सर्वोच्च न्यायालयाकडून आज निकाल आल्यानंतर मुंबईचा कांदिवलीमध्ये आमदार अतुल भातखळकर यांच्या कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांचा जल्लोष,,, आमदार अतुल भातखळकर यांनी कार्यकर्त्यांना मिठाई देऊन आणि फटाके फोडून कार्यालयात केले सेलिब्रेशन 

लोकशाही वाचविणारा आणि ऐतिहासिक निकाल दिल्याबद्दल मा. सर्वोच्च न्यायालयाचे मन:पूर्वक आभार- फडणवीस

लोकशाही वाचविणारा आणि ऐतिहासिक निकाल दिल्याबद्दल मा. सर्वोच्च न्यायालयाचे मन:पूर्वक आभार- फडणवीस





SC on BJP MLA Suspension : सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला चपराक दिलीय - गिरीश महाजन

SC on BJP MLA Suspension : सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला चपराक दिलीय - गिरीश महाजन


SC on BJP MLA Suspension : आमच्या बारा आमदारांची फाईल राजकीय सुडापोटी दाबून ठेवलीय - संजय राऊत

SC on BJP MLA Suspension : आमच्या बारा आमदारांची फाईल राजकीय सुडापोटी दाबून ठेवलीय - संजय राऊत


राज्यातील ठाकरे सरकार अहंकारात असून त्यांनी अहंकारात शहाणपण गमावलं - आशिष शेलार

राज्यातील ठाकरे सरकार अहंकारात असून त्यांनी अहंकारात शहाणपण गमावलं असल्याची टीका भाजप नेते आशिष शेलार यांनी केली आहे. राज्य सरकारने भाजप आमदारांविरोधात केलेल्या निलंबनाच्या ठरावावर सुप्रीम कोर्टाने ताशेरे ओढले असून हा निकाल देशातील लोकशाहीच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरणार असल्याचे शेलार यांनी म्हटले. 


सुप्रीम कोर्टाने भाजपच्या 12 आमदारांचे निलंबन रद्द केल्यानंतर पत्रकार परिषदेत आशिष शेलार यांनी आपली भूमिका मांडली. यावेळी त्यांनी राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले. राज्य विधानसभेत सरकारने केलेला ठराव असंविधानिक, अवैध आणि तर्कहीन असल्याचे ताशेरे सुप्रीम कोर्टाने ओढले. अशा प्रकारचे ताशेरे पहिल्यांदाच राज्य सरकारवर ओढण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. राज्य सरकारने केलेलं निलंबन हे त्यांच्या हकालपट्टीपेक्षाही भयंकर असल्याचे सुप्रीम कोर्टाने म्हटले होते असे शेलार यांनी सांगितले. 

12 आमदारांचं निलंबन रद्द, सुप्रीम कोर्टाने नेमकं काय म्हटलंय? 

12 आमदारांचं निलंबन रद्द, सुप्रीम कोर्टाने नेमकं काय म्हटलंय? 



भाजपच्या 12 आमदारांवर निलंबनाची कारवाई सुप्रीम कोर्टाकडून रद्द  


आमदारांच्या निलंबनावर सुप्रीम कोर्टाचा हा पहिलाच निर्णय


5 जुलै 2021 रोजी महाराष्ट्राच्या पावसाळी अधिवेशनात हे निलंबन झालं होतं, मात्र हे निलंबन त्याच अधिवेशनापुरतं योग्य


एक वर्ष इतक्या प्रदीर्घ काळासाठी निलंबन हे असंवैधानिक


एका आमदाराचं वर्षभरासाठी निलंबन म्हणजे संपूर्ण मतदारसंघाला शिक्षा देण्यासारखे


आमदारांना 60 दिवसांपेक्षा निलंबित करणे म्हणजे बडतर्फ करण्यासारखे 


कुठलाही मतदारसंघ हा सहा महिन्यांपेक्षा जास्त काळ विनाप्रतिनिधी राहणं अयोग्य

सर्वोच्च न्यायालयाने सरकारची कानउघाडणी केली- आशिष शेलार


सर्वोच्च न्यायालयाने सरकारची कानउघाडणी केली आहे


तुम्ही जो केलेला ठराव आणि निर्णय हा लोकशाहीला घातक आहे असे कोर्टाने म्हटले आहे


हा ठराव तर्कहीन असल्याचे देखील कोर्ट म्हणाले


हे निलंबन कायदेशीर नाही. 


सत्र संपण्याआधी सर्व 12 आमदारांना कायदेशीर अधिकार, फायदे द्यावे लागतील


राज्य सरकारने या पद्धतीने वागू नये तसेच स्वतःची चूक सुधरवण्याची संधी देखील कोर्टाने दिली होती

सरकारनं हे षडयंत्र रचलं होतं- गिरीश महाजन

गिरीश महाजन यांनी म्हटलं की, सरकारनं हे षडयंत्र रचलं होतं. सुप्रीम कोर्टाचा निर्णय अतिशय योग्य आहे. आमच्या मोठा अन्याय केला होता. हा निर्णय ऐतिहासिक आहे. सरकारच्या हुकुमशाहीच्या निर्णयाला चपराक बसली आहे, असं महाजन म्हणाले. राजकीय सोईसाठी आमदारांचं निलंबन केलं गेलं. हे आता यापुढं चालणार नाही, असंही महाजन म्हणाले.

भास्कर जाधव काय म्हणाले...

भास्कर जाधव म्हणाले, विधानमंडळाला संविधानानं दिलेले अधिकार आहेत. लोकशाहीत परस्पर आदर करण्याची प्रथा आहे. भाजपनं देखील आम्हाला निलंबित केलं होतं. मी भाजप आणि कोर्टाला प्रश्न विचारतो की, राज्यपालांनी 12 विधानपरिषदेच्या आमदारांची यादी प्रलंबित ठेवली आहे. राज्यपालांनी 12 आमदारांना बाहेर ठेवलं आहे यावर सुप्रीम कोर्ट काय निर्णय देणार आहे, असं जाधव म्हणाले.

निलंबित केलेले आमदार 

 


आशिष शेलार (वांद्रे पश्चिम)


अभिमन्यू पवार (औसा)


गिरीश महाजन (जामनेर)


पराग अळवणी (विलेपार्ले)


अतुल भातखळकर (कांदिवली पूर्व)


संजय कुटे (जामोद, जळगाव)


योगेश सागर (चारकोप)


हरीश पिंपळे (मूर्तीजापूर)


जयकुमार रावल (सिंधखेड)


राम सातपुते (माळशिरस)


नारायण कुचे (बदनपूर, जालना)


बंटी भांगडिया (चिमूर)





 


वर्षभरासाठी निलंबित करण्यात आलेल्या भाजपच्या सर्व 12 आमदारांचं निलंबन सुप्रीम कोर्टाकडून रद्द

नवी दिल्ली : महाराष्ट्र भाजपच्या 12 आमदारांच्या निलंबनाबाबत सुप्रीम कोर्टाने मोठा निर्णय दिला आहे. वर्षभरासाठी निलंबित करण्यात आलेल्या भाजपच्या सर्व 12 आमदारांचं निलंबन सुप्रीम कोर्टाने रद्द केलं आहे. विधानसभा अध्यक्षांच्या दालनात राडा केल्याने, अध्यक्षांना शिवीगाळ केल्याने तसंच तत्कालिन तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांच्या अंगावर धावून गेल्याचा आरोप करत, भाजपच्या बारा आमदारांचं 5 जुलै 2021 रोजी वर्षभरासाठी निलंबन करण्यात आलं होतं. याप्रकरणी भाजपने सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. कोर्टाने ऐतिहासिक निकाल देत भाजपच्या आमदारांचं निलंबन रद्द केलं.  

पार्श्वभूमी


BJP MLA suspension : नवी दिल्ली : महाराष्ट्र भाजपच्या 12 आमदारांच्या निलंबनाबाबत सुप्रीम कोर्टाने मोठा निर्णय दिला आहे. वर्षभरासाठी निलंबित करण्यात आलेल्या भाजपच्या सर्व 12 आमदारांचं निलंबन सुप्रीम कोर्टाने रद्द केलं आहे. विधानसभा अध्यक्षांच्या दालनात राडा केल्याने, अध्यक्षांना शिवीगाळ केल्याने तसंच तत्कालिन तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांच्या अंगावर धावून गेल्याचा आरोप करत, भाजपच्या बारा आमदारांचं 5 जुलै 2021 रोजी वर्षभरासाठी निलंबन करण्यात आलं होतं. याप्रकरणी भाजपने सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. कोर्टाने ऐतिहासिक निकाल देत भाजपच्या आमदारांचं निलंबन रद्द केलं. कोर्टानं आपल्या निर्णयात म्हटलं आहे की, एका अधिवेशनापेक्षा जास्त काळाचं निलंबन सभागृहाच्या अधिकारक्षेत्रात नाही. असा निर्णय घेणं असंविधानिक आहे.


सुप्रीम कोर्टाने सरकारला फटकारलं 
दरम्यान, बारा आमदारांच्या निलंबनावरील सुनावणीवेळी सुप्रीम कोर्टाने ठाकरे सरकारला फटकारलं होतं. तब्बल एक वर्षासाठी आमदारांचं निलंबन करणं योग्य होणार नाही. कारण एका आमदारांचं निलंबन म्हणजे केवळ एकट्याचं नव्हे तर त्या संपूर्ण मतदारसंघाचं निलंबन होतं. त्यामुळे त्या मतदारसंघालाही दिलेली ही एकप्रकारची शिक्षाच आहे, असं सुप्रीम कोर्टाने म्हटलं होतं. 


अशाप्रकारचे निलंबन करणे म्हणजे लोकशाहीमध्ये चुकीचा पायंडा पडू शकतो. आमदारांना 60 दिवसांपेक्षा निलंबित करणे म्हणजे तो बडतर्फ झाल्यासारखे आहे. त्यामुळे कुठलाही मतदारसंघ हा सहा महिन्यांपेक्षा जास्त काळ विनाप्रतिनिधी राहणं अयोग्य आहे. म्हणूनच आमदारांचं 1 वर्षासाठी निलंबन करणं चुकीचं आहे", असंही कोर्टाने नमूद केलं होतं. 


भास्कर जाधव म्हणाले, विधानमंडळाला संविधानानं दिलेले अधिकार आहेत. लोकशाहीत परस्पर आदर करण्याची प्रथा आहे. भाजपनं देखील आम्हाला निलंबित केलं होतं. मी भाजप आणि कोर्टाला प्रश्न विचारतो की, राज्यपालांनी 12 विधानपरिषदेच्या आमदारांची यादी प्रलंबित ठेवली आहे. राज्यपालांनी 12 आमदारांना बाहेर ठेवलं आहे यावर सुप्रीम कोर्ट काय निर्णय देणार आहे, असं जाधव म्हणाले.


गिरीश महाजन यांनी म्हटलं की, सरकारनं हे षडयंत्र रचलं होतं. सुप्रीम कोर्टाचा निर्णय अतिशय योग्य आहे. आमच्या मोठा अन्याय केला होता. हा निर्णय ऐतिहासिक आहे. सरकारच्या हुकुमशाहीच्या निर्णयाला चपराक बसली आहे, असं महाजन म्हणाले. राजकीय सोईसाठी आमदारांचं निलंबन केलं गेलं. हे आता यापुढं चालणार नाही, असंही महाजन म्हणाले.


विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी म्हटलं आहे की, कुठल्याही प्रकारचे निर्णय हे निष्पक्ष पद्धतीनं घ्यावे लागतात. जनतेच्या दरबारात सगळा न्याय होतो.


निलंबित केलेले आमदार 


आशिष शेलार (वांद्रे पश्चिम)


अभिमन्यू पवार (औसा)


गिरीश महाजन (जामनेर)


पराग अळवणी (विलेपार्ले)


अतुल भातखळकर (कांदिवली पूर्व)


संजय कुटे (जामोद, जळगाव)


योगेश सागर (चारकोप)


हरीश पिंपळे (मूर्तीजापूर)


जयकुमार रावल (सिंधखेड)


राम सातपुते (माळशिरस)


नारायण कुचे (बदनपूर, जालना)


बंटी भांगडिया (चिमूर)





 


- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.