एक्स्प्लोर

Chandrakant Khaire Vs Vanchit : खैरेंच्या 'त्या' विधानानंतर 'वंचित'ने बोलावली तातडीची बैठक; आक्रमक भूमिका घेण्याची शक्यता

प्रकाश आंबेडकर यांनी भाजपकडून एक हजार कोटी घेतल्याचा आरोप चंद्रकांत खैरे यांनी केला आहे.

Chandrakant Khaire Vs Vanchit: वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी लोकसभा निवडणुकीत भाजपकडून एक हजार कोटी रुपये घेतल्याचा आरोप शिवसेनेचे जेष्ठ नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी केला आहे. त्यांच्या याच विधानावरून आता नवीन राजकीय वाद पेटण्याची शक्यता आहे. कारण खैरेंच्या विधानाला उत्तर देण्यासाठी वंचित बहुजन आघाडीकडून औरंगाबादमध्ये तातडीची बैठक बोलवण्यात आली आहे. 

खैरे यांनी केलेल्या आरोपानंतर वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये संतापाचे वातावरण पाहायला मिळत आहे. त्यामुळे आज वंचित बहुजन आघाडीच्या शहर आणि जिल्ह्यातील सर्व पदाधिकाऱ्यांची दुपारी 3 वाजता तातडीची बैठक बोलवण्यात आली आहे. सुभेदारी शासकीय विश्रामगृहात ही  बैठक पार पडणार आहे. वंचित बहुजन आघाडी, वंचित बहुजन युवक आघाडी, वंचित बहुजन महिला आघाडी, वंचित बहुजन कामगार आघाडी, सम्यक विद्यार्थी आंदोलन आघाडीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना बैठकीसाठी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तर खैरेंनी केलेल्या आरोपाच्या निषेधार्थ पक्षाची पुढील दिशा या बैठकीत ठरवली जाणार आहे. 

काय म्हणाले होते खैरे... 

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर आणि एमआयएमने लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपकडून एक हजार कोटी रुपये घेतल्याचा आरोप शिवसेनेचे जेष्ठ नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी केला होता. तुम्ही किती कमवले, कुठून आले एवढे पैसे तुमच्याकडे. लोकसभा निवडणुकीत एक हजार कोटी रुपये वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएमला भाजपने दिले होते. उत्तर प्रदेशमध्ये आता निवडणूक झाली. त्याठिकाणी समाजवादी पार्टीच्या लोकांना फोडण्यासाठी कशाला पैसे दिले. तुम्ही हे सर्व धंदे करतात, आले कुठून हे पैसे असा आरोप खैरे यांनी यावेळी केला आहे.

जलील यांचे उत्तर... 

प्रकाश आंबेडकर यांच्याबरोबरच एमआयएमवर सुद्धा एक हजार कोटी घेतल्याचा आरोप खैरे यांनी केला आहे. त्यामुळे या आरोपावर बोलताना एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत झालेला पराभव खैरे अजूनही पचवू शकले नाही असे त्यांच्या विधानावरून जाणवत आहे. त्यामुळे आम्ही त्यांचे आरोप एन्जॉय करतोय, असा टोला जलील यांनी खैरेंना लगावला आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Dhananjay Munde : ...तर धनंजय मुंडेंना बीडच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी देता येईल; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या
...तर धनंजय मुंडेंना बीडच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी देता येईल; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या
गोदामातील साखरेची परस्पर विक्री; माजी आमदारासह 23 जणांवर जिल्हा बँकेची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल, सोलापुरात खळबळ
गोदामातील साखरेची परस्पर विक्री; माजी आमदारासह 23 जणांवर जिल्हा बँकेची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल, सोलापुरात खळबळ
Hasan Mushrif : ना कोल्हापूर, ना सांगली, मुश्रीफांच्या गळ्यात थेट वाशिमचे पालकत्व! श्रद्धी, सबुरी अन् आता इलाज नाही म्हणत मुश्रीफ पालकमंत्रीपदावर म्हणाले तरी काय?
ना कोल्हापूर, ना सांगली, मुश्रीफांच्या गळ्यात थेट वाशिमचे पालकत्व! श्रद्धी, सबुरी अन् आता इलाज नाही म्हणत मुश्रीफ पालकमंत्रीपदावर म्हणाले तरी काय?
Raigad Guardian Minister : भरत गोगावलेंना मंत्रिपदाचा कोट मिळाला पण पालकमंत्रीपदाचा मुकूट दूर राहिला; रायगडमध्ये अदिती तटकरेंसोबतचा वाद वाढणार?
भरत गोगावलेंना मंत्रिपदाचा कोट मिळाला पण पालकमंत्रीपदाचा मुकूट दूर राहिला; रायगडमध्ये अदिती तटकरेंसोबतचा वाद वाढणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Saif Ali Khan Accused Arrested : सैफ अली खानचा हल्लेखोर मोहम्मद आलियानला ठाण्यातून अटकABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 18 January  2024Special Report Saif Ali Khan : करिनाचा जबाब, कोणते धागेदोरे? करिनाने सांगितला हत्येचा घटनाक्रमBeed Santosh Deshmukh Accuse CCTV : संतोष देशमुख यांच्या आरोपींचे तिरंगा हॉटेल येथिल CCTV पोलिसांच्या हाती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dhananjay Munde : ...तर धनंजय मुंडेंना बीडच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी देता येईल; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या
...तर धनंजय मुंडेंना बीडच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी देता येईल; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या
गोदामातील साखरेची परस्पर विक्री; माजी आमदारासह 23 जणांवर जिल्हा बँकेची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल, सोलापुरात खळबळ
गोदामातील साखरेची परस्पर विक्री; माजी आमदारासह 23 जणांवर जिल्हा बँकेची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल, सोलापुरात खळबळ
Hasan Mushrif : ना कोल्हापूर, ना सांगली, मुश्रीफांच्या गळ्यात थेट वाशिमचे पालकत्व! श्रद्धी, सबुरी अन् आता इलाज नाही म्हणत मुश्रीफ पालकमंत्रीपदावर म्हणाले तरी काय?
ना कोल्हापूर, ना सांगली, मुश्रीफांच्या गळ्यात थेट वाशिमचे पालकत्व! श्रद्धी, सबुरी अन् आता इलाज नाही म्हणत मुश्रीफ पालकमंत्रीपदावर म्हणाले तरी काय?
Raigad Guardian Minister : भरत गोगावलेंना मंत्रिपदाचा कोट मिळाला पण पालकमंत्रीपदाचा मुकूट दूर राहिला; रायगडमध्ये अदिती तटकरेंसोबतचा वाद वाढणार?
भरत गोगावलेंना मंत्रिपदाचा कोट मिळाला पण पालकमंत्रीपदाचा मुकूट दूर राहिला; रायगडमध्ये अदिती तटकरेंसोबतचा वाद वाढणार?
तो 17 वर्षांचा, ती 16 वर्षांची, इन्स्टावरून ओळख अन् लैंगिक संबंध; गरोदर होताच मुंबईतून गोळ्या पाठवल्या, गर्भपात करून अर्भक नाल्यात फेकले
तो 17 वर्षांचा, ती 16 वर्षांची, इन्स्टावरून ओळख अन् लैंगिक संबंध; गरोदर होताच मुंबईतून गोळ्या पाठवल्या, गर्भपात करून अर्भक नाल्यात फेकले
Nashik Crime : पहिल्या पत्नीकडे जास्त जातो म्हणून दुसऱ्या पत्नीची सटकली, भावांच्या मदतीने काढला पतीचा काटा; नाशिकमध्ये खळबळ
पहिल्या पत्नीकडे जास्त जातो म्हणून दुसऱ्या पत्नीची सटकली, भावांच्या मदतीने काढला पतीचा काटा; नाशिकमध्ये खळबळ
Saif Ali Khan Accused Arrested : सैफ अली खानचा हल्लेखोर मोहम्मद आलियानला ठाण्यातून अटक
Saif Ali Khan Accused Arrested : सैफ अली खानचा हल्लेखोर मोहम्मद आलियानला ठाण्यातून अटक
EPFO सदस्यांसाठी मोठी बातमी, वैयक्तिक तपशील बदलासाठी कंपनीच्या परवानगीची गरज नाही, काय आहे नवा बदल?
EPFO सदस्यांसाठी मोठी बातमी, वैयक्तिक तपशील बदलासाठी कंपनीच्या परवानगीची गरज नाही, काय आहे नवा बदल?
Embed widget