Politics:शिवसेनेचा 'संजय पॅटर्न' आधी सत्तास्थापनेसाठी आणि आता पाडण्यासाठी
Shiv Sena politics: शिवसेनेतील संजय नावाचे तीन आमदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहे .
Aurangabad: विधानसभा निवडणुकीनंतर भाजप-शिवसेनेच्या सत्तासंघर्षात महत्वाची भूमिका निभावणारे आणि त्यांनतर महाविकास आघाडीची सत्ता राज्यात आणण्यासाठी पुढाकार घेणारे संजय राऊत याची वेगळी ओळख सांगण्याची गरज नाही. असे असताना एका संजयने शिवसेनेची सत्ता आणली तर दुसरीकडे पक्षातील तीन संजय नावाचे आमदार मात्र सत्ता पाडण्याची भूमिका निभावतांना पाहायला मिळत असल्याची चर्चा आहे. कारण औरंगाबादचे आमदार संजय शिरसाट, बुलडाण्याचे संजय रायमुलकर आणि संजय गायकवाड हे तीनही 'संजय' एकनाथ शिंदेंच्या गटात असल्याची चर्चा आहे.
शिवसेना आणि संजय नावाचे जरा हटके कनेक्शन आहे. कारण शिवसेनेची मदार सांभाळणारे खासदार राऊत यांचे नाव संजय असून, पक्षात आणखी चार आमदार सुद्धा संजय नावाचे आहेत. एकीकडे संकटात सापडलेल्या पक्षाला वाचवण्यासाठी एक संजय धरपड करत असताना दुसरीकडे तीन संजय एकनाथ शिंदेंच्या नाराज गटात सहभागी झाले आहेत. त्यामुळे शिवसेनेचा 'संजय पॅटर्न' आधी सत्तास्थापनेसाठी आणि आता पाडण्यासाठी सुरु असल्याची चर्चा रंगत आहे. विशेष म्हणजे आणखी एक आमदार असलेले संजय राठोड सुद्धा शिवसेनेच्या बैठकीत नव्हते.
राज्यसभेत सुध्दा 'संजय'नांचा संधी...
शिवसेनेचा संजय पॅटर्न राज्यसभा निवडणुकीत सुद्धा पाहायला मिळाला होता. कारण राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेने ज्या दोन उमदेवारीची घोषणा केली होती त्यात एक संजय राऊत तर दुसरे संजय पवार यांचे नाव होते. त्यामुळे शिवसेना आणि संजय कनेक्शन आता चर्चेचा विषय बनला आहे.
एकनाथ शिंदेंसोबत सूरतमध्ये कोणते आमदार? एबीपी माझाच्या हाती यादी
मुंबई
1. मागाठाणे आमदार प्रकाश सुर्वे
मराठवाडा
1. सिल्लोडचे आमदार आणि राज्यमंत्री अब्दुल सत्तार.
2. पैठणचे आमदार आणि राज्यमंत्री संदिपान भुमरे
3. औरंगाबाद पश्चिमचे आमदार संजय शिरसाट
4. कन्नडचे आमदार उदयसिंग राजपूत
5. वैजापूरचे आमदार प्रा. रमेश बोरनारे
6. नांदेडचे बालाजी कल्याणकर
कोकण
1. अलिबागचे आमदार महेंद्र दळवी
2. कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे
3. महाडचे आमदार भरतशेठ गोगावले
पश्चिम महाराष्ट्र
1. आटपाडीचे आमदार अनिल बाबर
2. भुदरगडचे आमदार प्रकाश अबिटकर
3. पाटणचे आमदार आणि गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई
4. सांगोल्याचे आमदार शहाजी पाटील
5. साताऱ्यातील कोरेगावचे आमदार महेश शिंदे
ठाणे
1. अंबरनाथचे आमदार बालाजी किणीकर
2. पालघरचे आमदार श्रीनिवास वनगा
3. भिवंडी ग्रामिणचे आमदार शांताराम मोरे
4. कल्याण पश्चिमचे आमदार विश्वनाथ भोईर
उत्तर महाराष्ट्र
1. पाचोराचे आमदार किशोर आप्पा पाटील
विदर्भ
1. मेहकरचे आमदार संजय रायमुलकर
2. बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड