Sattar Vs Thackeray: अब्दुल सत्तारांकडून आदित्य ठाकरेंचा छोटा पप्पूनंतर आता 'रणछोडदास' म्हणून उल्लेख
Aurangabad : सिल्लोड येथील सभेवरून कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी पुन्हा एकदा आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
Aurangbad News: गेल्या काही दिवसांपासून कृषिमंत्री अब्दुल सत्तार आणि युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू आहे. दरम्यान अब्दुल सत्तार यांच्याकडून आदित्य ठाकरे यांचा छोटा पप्पू,दुसरा पप्पू म्हणून उल्लेख करण्यात आला होता. तर आता सत्तार यांनी टीका करतांना आदित्य ठाकरे यांचा रणछोडदास म्हणून उल्लेख केला आहे. सिल्लोड येथे आदित्य ठाकरे यांची होणाऱ्या सभेवर बोलतांना सत्तार यांनी ही टीका केली आहे. उस्मानाबाद येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
यावेळी बोलताना सत्तार म्हणाले की,सिल्लोड येथील सभेला परवानगी नाकारली असल्याची माहिती मिळाली आहे. मात्र खासदार श्रीकांत शिंदे यांची होत असलेल्या सभेचं ठिकाण सोडून इतर कोणत्याही ठिकाणी सभा घेण्यासाठी पोलिसांनी आदित्य ठाकरे यांना परवानगी दिली आहे. आमची सभा असलेल्या ठिकाणपासून ते पंधरा फुटावर परवानगी मागत आहे. त्यामुळे त्यांना परवानगी देणं शक्य नाही. त्यामुळे उगाच पोलिसांच्या नावची बदनामी करून रीकामचोट रणछोडदास बनू नका असा टोला सत्तार यांनी लगावला आहे.
पुढे बोलतांना सत्तार म्हणाले की, आदित्य ठाकरे यांना ज्या ठिकाणी सभा घायची आहे त्या ठिकाणी गरज पडल्यास स्टेज उपलब्ध करून देतो. मंडप नसेल तर मंडप देतो, माईक नसेल तर तेही देतो परंतु सिल्लोडमध्ये आदित्य ठाकरे यांनी सभा घ्यावी असे सत्तार म्हणाले. तर आदित्य ठाकरे हे मुख्यमंत्री यांना चॅलेंज करतात, मात्र मुख्यमंत्र्यांना चॅलेंज करणारा माणूस त्यांच्या मुलासमोर लढू शकत नसेल तर त्याला रणछोडदास म्हणावे लागले, असेही सत्तार म्हणाले.
अन्यथा आमच्या स्टेजवरून भाषण करा...
पुढे बोलतांना सत्तार म्हणाले की, जर आदित्य ठाकरे यांना स्टेज उपलब्ध होत नसेल तर, श्रीकांत शिंदे यांची परवानगी घेऊन आमचे स्टेज आदित्य ठाकरे यांना देतो. त्यामुळे आमची सभा झाल्यावर त्याच स्टेजवर, त्याच लोकांसमोर तुम्हाला काय भाषण करायचे ते करा असेही सत्तार म्हणाले. तर यापूर्वीच मी सांगितले आहे की, सभा घेण्यासाठी हिम्मत लागते,लोकं लागतात, समर्थक लागतात. यांचे किती समर्थक सिल्लोडमध्ये आहेत याची मला जाणीव आहे. त्यामुळे आदित्य ठाकरे यांना सिल्लोडमध्ये हवे असेल तिथे सभा घेण्यासाठी जागा उपलब्ध करून देऊ. त्यापुढेही म्हणत असेल तर आमच्या सभेची जागा त्यांना देतो आणि आम्ही दुसऱ्या ठिकाणी सभा घेतो असेही सत्तार म्हणाले.
शिंदे पुत्र Vs ठाकरे पुत्र! ठिकाण अन् तारीख एकच; आता सामना रंगणार वारसदारांमध्ये