एक्स्प्लोर

SSC HSC Exam: दहावी व बारावीच्या परीक्षेत सवलतीच्या गुणांसाठी लागतील 50 रुपये, राज्य शिक्षण मंडळाचा फतवा

SSC-HSC Board Exam: राज्य शिक्षण मंडळाच्या या फतव्यानंतर विद्यार्थी आणि पालकांमध्ये नाराजी पाहायला मिळत आहे. 

SSC-HSC Board Exam: यापुढे दहावी व बारावीच्या परीक्षेत सवलतीच्या अतिरिक्त गुणांचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्काव्यतिरिक्त माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडे अतिरिक्त 50 रुपये द्यावे लागणार आहेत. फेब्रुवारी-मार्च 2023 च्या परीक्षेपासून हे छाननी शुल्क सवलतीच्या अतिरिक्त गुणांसाठी आकारले जाणार आहेत. राज्य शिक्षण मंडळाच्या या फतव्यानंतर विद्यार्थी आणि पालकांमध्ये नाराजी पाहायला मिळत आहे. 

शिक्षणाधिकारी, जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांमार्फत सवलतीच्या अतिरिक्त गुणांचे प्रस्ताव शाळा तसेच  विभागीय शिक्षण मंडळाकडे येत असतात. या सर्व प्रस्तावांची छाननी करावी लागते. त्यानंतर त्यात काही त्रुटी आढळल्यास संबंधितांशी पत्रव्यवहार करून त्रुटींची पूर्तता करावी लागते. त्यासाठी विभागीय मंडळ स्तरावर रोजंदारी कर्मचारी नेमावे लागतात. या कामासाठी लागणारा वेळ, श्रम याचा विचार करून छाननी शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला आहे. असे परीक्षा मंडळाकडून सांगण्यात आले असल्याचे वृत्त 'लोकमत'ने दिले आहे. 

शास्त्रीय कला, चित्रकला क्षेत्रात प्रावीण्य मिळविणाऱ्या तसेच लोककला, क्रीडा, एनसीसी, स्काउट व गाइड प्रकारात सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना सवलतीचे अतिरिक्त गुण देण्याची ही योजना शिक्षण मंडळाकडून राबविली जाते. यंदाच्या परीक्षेपासून शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांनी सवलतीच्या अतिरिक्त गुणांसाठी विद्यार्थ्यांकडून 50  रुपये चलनाद्वारे किंवा रोखीने घ्यावेत व ते विभागीय मंडळ स्तरावर प्रस्ताव सादर करावेत, शिक्षण मंडळाच्या या शिफारशीला परीक्षा समितीनेदेखील मंजुरी दिली आहे. तर परीक्षेच्या प्रस्तावासोबतच हे छाननी शुल्क स्वीकारावे. छाननी शुल्क न आकारता किंवा कमी शुल्क आकारून प्रस्ताव स्वीकारण्यात येऊ नयेत, याची खबरदारी घ्यावी, अशा सूचना देखील मंडळाने केल्या आहेत.

परीक्षांबाबत मोठा बदल

यावर्षी बारावीची परीक्षा 21  फेब्रुवारी ते 20 मार्च 2023 या कालावधीत होणार असून, दहावीची परीक्षा 2 मार्च 2023  ते 25  मार्च या कालावधीत होणार आहे. मात्र आगामी दहावी-बारावीच्या परीक्षांबाबत मोठा बदल करण्यात आला आहे. कारण फेब्रुवारी-मार्च महिन्यात घेण्यात येणाऱ्या दहावी-बारावीच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना देण्यात आलेले होमसेंटर सुविधा आणि पेपर लिहिण्यासाठी दिलेला अर्धा तासाचा वाढीव वेळ रद्द करण्यात आला असल्याची माहिती औरंगाबाद विभागीय शिक्षण मंडळाने दिली आहे. सोबतच या परीक्षा पूर्ण अभ्यासक्रमावर आधारित होईल. तसेच 80  गुणांच्या पेपरसाठी दिलेला वाढीव अर्धा तास यावेळी मिळणार नाही. 60-40 गुणांसाठी असलेली अधिकची पंधरा मिनिटांची सवलत यंदा होणाऱ्या परीक्षेत विद्यार्थ्यांना मिळणार नाही. तसेच यंदा शंभर टक्के अभ्यासक्रमावर आधारित परीक्षा होईल. ( गेल्यावेळी 25% अभ्यासक्रम वगळला होता) मात्र, दिव्यांगांना मिळणारी सवलत कायम राहणार आहे.

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

महत्त्वाच्या बातम्या

गोपीचंद पडळकरांना डोनाल्ड ट्रम्पही घाबरतात; चंद्रकांत पाटलांकडून दोन चॉकलेट देत आमदारास मोलाचा सल्ला
गोपीचंद पडळकरांना डोनाल्ड ट्रम्पही घाबरतात; चंद्रकांत पाटलांकडून दोन चॉकलेट देत आमदारास मोलाचा सल्ला
लोहगड केतन अग्रवाल मृत्यूप्रकरणात अखेर उज्ज्वल निकमांची नियुक्ती; कुटुंबीयांकडून CM फडणवीसांचे आभार
लोहगड केतन अग्रवाल मृत्यूप्रकरणात अखेर उज्ज्वल निकमांची नियुक्ती; कुटुंबीयांकडून CM फडणवीसांचे आभार
धक्कादायक! प्रदीप पूर्णेकरांच्या पुतणीला फोनवर धमकी,
धक्कादायक! प्रदीप पूर्णेकरांच्या पुतणीला फोनवर धमकी, "तुझा नेक्स्ट गेम" म्हणत पाठवला मेसेज, कुटुंबीय भीतीच्या छायेत
सांत्वनाला आलेल्या प्रताप सरनाईकांसमोर पूर्णेकर कुटुंबाने आक्रोश मांडला; म्हणाले, मीनाक्षी शिंदेला तात्काळ हटवा
सांत्वनाला आलेल्या प्रताप सरनाईकांसमोर पूर्णेकर कुटुंबाने आक्रोश मांडला; म्हणाले, मीनाक्षी शिंदेला तात्काळ हटवा

व्हिडीओ

SIR Election Commision And BJP : मुद्दा एसआयआरच्या घोळाचा, आरोप सत्तेच्या खेळाचा | Special Report ABP Majha
Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 ऑक्टोबर 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 ऑक्टोबर 2026 | शनिवार
Abhijeet Dipke: सीजेपीच्या अभिजीत दिपकेंची सशर्त जामिनावर सुटका; शांतता राखण्यासाठी बाँडवर सही सुद्धा घेतली
सीजेपीच्या अभिजीत दिपकेंची सशर्त जामिनावर सुटका; शांतता राखण्यासाठी बाँडवर सही सुद्धा घेतली
गोपीचंद पडळकरांना डोनाल्ड ट्रम्पही घाबरतात; चंद्रकांत पाटलांकडून दोन चॉकलेट देत आमदारास मोलाचा सल्ला
गोपीचंद पडळकरांना डोनाल्ड ट्रम्पही घाबरतात; चंद्रकांत पाटलांकडून दोन चॉकलेट देत आमदारास मोलाचा सल्ला
Gokul Election: कुठं नेऊन ठेवलं गोकुळ आमचं? महायुतीच्या नेत्यांनी गोकुळच्या निवडणुकीत यल्लमाच्या परडी आणि भंडाऱ्यावर हात मारून शपथ घ्यायला लावल्या! मुश्रीफ, धनंजय महाडिकांचा थेट व्हिडिओ व्हायरल
कुठं नेऊन ठेवलं गोकुळ आमचं? महायुतीच्या नेत्यांनी गोकुळच्या निवडणुकीत यल्लमाच्या परडी आणि भंडाऱ्यावर हात मारून शपथ घ्यायला लावल्या! मुश्रीफ, धनंजय महाडिकांचा व्हिडिओ व्हायरल
लोहगड केतन अग्रवाल मृत्यूप्रकरणात अखेर उज्ज्वल निकमांची नियुक्ती; कुटुंबीयांकडून CM फडणवीसांचे आभार
लोहगड केतन अग्रवाल मृत्यूप्रकरणात अखेर उज्ज्वल निकमांची नियुक्ती; कुटुंबीयांकडून CM फडणवीसांचे आभार
धक्कादायक! प्रदीप पूर्णेकरांच्या पुतणीला फोनवर धमकी,
धक्कादायक! प्रदीप पूर्णेकरांच्या पुतणीला फोनवर धमकी, "तुझा नेक्स्ट गेम" म्हणत पाठवला मेसेज, कुटुंबीय भीतीच्या छायेत
UP News : एकाच कुटुंबातील 5 जणांचा संशयास्पद मृत्यू; 'फूड पॉइजनिंग'चा प्राथमिक अंदाज, रात्री झोपले अन्...
एकाच कुटुंबातील 5 जणांचा संशयास्पद मृत्यू; 'फूड पॉइजनिंग'चा प्राथमिक अंदाज, रात्री झोपले अन्...

Embed widget