एक्स्प्लोर

Nashik Sanjay Raut : मोदी-शाह पायउतार झाल्यावर अनेक प्रकरणं बाहेर येतील, संजय राऊतांचं सूचक वक्तव्य

Sanjay Raut at Nashik: उद्या मोदी सत्तेवरून उतरल्यानंतर अनेक अशी प्रकरणं आहेत. ज्यामुळे त्यांच्याकडे लोक जबाब घ्यायला जाऊ शकतात, असं सूचक वक्तव्य संजय राऊतांनी केले आहे.

Nashik Sanjay Raut : नरसिंहराव पंतप्रधान होते, तेव्हा त्यांच्याकडेही पोलीस गेले होते. इंदिरा गांधी (Indira Gandhi) पंतप्रधान होत्या, तेव्हा त्यांनाही अटक करण्यासाठी पोलीस गेले होते. उद्या मोदी-शाह सत्तेवरून पायउतार झाल्यानंतर, अनेक अशी प्रकरणं आहेत, ज्यामुळे त्यांच्याकडे लोक जबाब घ्यायला जाऊ शकतात. तुमच्यापर्यंत लोकांनी पोहोचायचं नाही का? असा सवाल संजय राऊत (Sanjay Raut) यांनी उपस्थित केला आहे. दरम्यान, नाशिकमध्ये माध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी थेट भाजपवर टीकास्त्र डागलं. 

संजय राऊत (Sanjay Raut) हे कालपासून नाशिक (Nashik) शहरात आहेत. त्यांनी आज सकाळी माध्यमांशी संवाद साधतांना सरकारवर चांगलाच निशाणा साधला आहे. यामध्ये देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केलेल्या 'महाविकास आघाडी मला अटक करणार होती' या वक्तव्यावर जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. ते म्हणाले की, देवेंद्र फडणवीस अलीकडे बोलत आहेत की, 'मला अटक करणार होते, मला अटक करणार होते'. कधीकाळी त्यांची भाषणं ऐकलेली आहेत, ते म्हणायचे की, आम्ही वाघाच्या जबड्यात हात घालून दात मोजतो', असा हिम्मतवाला माणूस अटकेला कशाला घाबरेल? आम्ही घाबरलो का? आमच्यावर खोटे खटले दाखल केले. अनिल देशमुखांवर खोटे खटले दाखल केले. नवाब मलिक यांच्यावर देखील खोटे गुन्हे दाखल केले आहेत, असं म्हणत संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीसांना थेट सवाल केला. 

संजय राऊत पुढे म्हणाले की, केंद्रीय तपास यंत्रणांचा दबाव टाकून देशभरात धाडी टाकल्या जात आहेत, तेव्हा तुम्हाला लक्षात येत नाही की, आपल्या राजकीय सहकाऱ्यांवर चुकीच्या पद्धतीनं कारवाया करत आहोत. दुसऱ्या बाजूला तुमच्याच पक्षातील चोर, लफंगे यांना तुम्ही क्लीन चिट देता. विक्रांत घोटाळा, यात लोकांचे पैसे गोळा केलेत आणि अशा लोकांना तुम्ही क्लीनचीट देतात. बँकांना लुटणारे त्यांना तुम्ही क्लीन चिट देताय, अशी अनेक प्रकरणे आहेत. तपास पूर्ण झाल्याशिवाय तुम्ही गुन्हे मागे कसे घेऊ शकतात? ही तुमची काम करण्याची पद्धत आहे. मग स्वतःच्या संदर्भात काही प्रकरण आलं की, बोभाटा करायचा, देवेंद्र फडणवीस यांना कोणी अटक करणार नव्हतं, अशा प्रकारचं घाणेरडे कृत्य अडीच वर्षांमध्ये महाविकास आघाडी सरकारमध्ये झालेलं नाही आणि आम्ही केलंही नसतं, असं स्पष्टीकरण संजय राऊत यांनी दिले. 

माणसं विकत घेण्यासाठी रेटकार्ड... 

उद्धव ठाकरे हे अतिशय सुसंस्कृत आणि सभ्य मुख्यमंत्री होते. राज्याच्या विरोधी पक्षनेत्याला कोणी अटक करतं का? तुमच्याकडे तुमचा जबाब घ्यायलाही जायचं नाही का, आमच्याकडे येतात. कारस्थानं करून यंत्रणांचा दबाव आणून, ईडी, सीबीआयचा वापर करून आमदार फोडण्यात आले. पैशाचा इतका बेफाम वापर महाराष्ट्राचा राजकारणात कधीच कोणी पाहिला नाही, प्रत्येक गोष्टीत फक्त माणसं विकत घ्यायची, ग्रामपंचायत सदस्यापासून नगरसेवक, आमदार, खासदार, पदाधिकारी विकत घेण्यासाठी रेटकार्ड लावलेला आहे, गावागावात शहरात कमिशन एजंट नेमलेले आहेत. ते ठरवितात काय द्यायचं ते, असा खळबळजनक आरोप संजय राऊत यांनी केला आहे. 

मोदी-शहा सत्तेतून उतरल्यावर... 

नरसिंहराव प्रधानमंत्री होते, तेव्हा त्यांच्याकडेही गेले होते. इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या, तेव्हा त्यांनाही अटक करण्यासाठी लोक गेले होते. उद्या मोदी शाह सत्तेवरून उतरल्यानंतर अनेक अशी प्रकरण आहेत, ज्यामुळे त्यांच्याकडे लोक जबाब घ्यायला जाऊ शकतात. तुमच्यापर्यंत लोकांनी पोहोचायचं नाही का? कायद्याचं राज्य आहे ना, मग प्रत्येकाने कायद्यासमोर जायला हवं, आम्हीही गेलो, आम्ही रडत बसलो का? आम्ही काल लढलो, उद्या लढू, आणि लढत लढत राहू आणि याच लढाईतून आमचं सरकार महाराष्ट्रात येईल. हे तुम्ही लिहून घ्या. महाविकास आघाडी सरकारमध्ये असताना तो संपूर्ण काळ त्यांच्या नैराश्याचा काळ होता. म्हणून मला एकदा अटक करा, मी प्रकाशात येईल, असा त्यांचा कांगावा होता. पोलीस त्यांच्या घरी गेले, आमच्यासारखं त्यांना बोलावलं नाही. घरी येऊन धाडी नाही टाकल्या, असेही संजय राऊत म्हणाले. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Nashik Sanjay Raut: कसबा-चिंचवड परीक्षेत महाविकास आघाडी चांगल्या मार्कांनी उत्तीर्ण होईल, संजय राऊतांचा विश्वास

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Accident : काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Eknath Shinde on Uddhav Thackeray  | जे गेटमधून बाहेर निघत नव्हते ते शेताच्या बांधावर पोहोचले, शिंदेंची टीकाManoj Jarange Parbhani : लोकसभेत धडा मिळाला, आता अंत पाहू नका, मराठा महिलांचा सरकारला इशाराSambhajiraje chhatrapatil on Vishalgad : विशाळगड अतिक्रमण मुक्त करा, संभाजीराजेंची मागणीManoj Jarange Parbhani :

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Accident : काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
जी चूक झाली ती झाली, भुजबळांवर निशाणा, सरकारला इशारा, मराठ्यांना आवाहन; जरांगेंचं परभणीतलं भाषण
जी चूक झाली ती झाली, भुजबळांवर निशाणा, सरकारला इशारा, मराठ्यांना आवाहन; जरांगेंचं परभणीतलं भाषण
Eknath Shinde on Uddhav Thackeray : गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
Embed widget