मुंबई :  महाराष्ट्रातील कोरोना आणि ओमायक्रॉनची रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे.  मुंबईतील कोरोनाची वाढती रुग्णसंख्या चिंतेचा विषय आहे. या संदर्भात राज्याने वेळीच पावले उचलायला हवी, असा सल्ला देखील  डॉ. भारती पवार यांनी व्यक्त केले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आणि ओमायक्रॉनबाबत आज केंद्रीय मंत्री भारती पवार यांनी आढावा घेतला आहे. 


राज्याचे काम संथ गतीने सुरू


डॉ.  भारती पवार म्हणाल्या, राज्य  सरकारने लसीची मागणी केली आहे. सध्या राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढली तर काय काळजी घ्यायला हवी तसेच त्या त्या राज्यांनी काय निर्णय घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. आम्ही राज्याच्या मागण्या पूर्ण करत आहे. आता राज्याने काम करण्याची गरज आहे.  तसेच सध्या राज्य सरकारचे काम संथ गतीने सुरू आहे. राज्य सरकार काम करत आहे परंतु राज्य सरकारने आपल्या कामाची गती वाढवली पाहिजे, असे मत केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी व्यक्त केले आहे..


प्रत्येक राज्यावर केंद्राचं लक्ष 


प्रत्येक राज्यावर केंद्राचं लक्ष आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यास लॉकडाऊन करण्याचे अधिकार राज्याला दिले आहे. राज्यातील कोरोनाची स्थिती पाहून त्यांनी या संदर्भात निर्णय घेण्याचे आदेश केंद्र सरकारने दिले आहे. आताच काळजी घेतली तर प्रसार रोखता येईल. यासाठी केंद्र सरकार सातत्याने नियमावली देत आहे.  केंद्रीय आरोग्य सचिव सर्व राज्यातील आरोग्य सचिवांसोबत  चर्चा करत आहे,  असे देखील डॉ. भारती पवार या वेळी म्हणाल्या.


केंद्र राज्याच्या मागण्या पूर्ण करत आहे


केंद्राने सर्वच बाबतीत राज्याला मदत दिलेली आहे. केंद्र राज्याच्या मागण्या पूर्ण करत नाही हे जर  मला मंत्र्यांनी लेखी दिलं तर बरं होईल.  आता केंद्राने ज्या  सूचना केल्या आता अंमलबजावणी राज्यांनी करावी. आयसीयू, बेड्स उपलब्धता याबाबत केंद्राने गाईडलाईन दिल्या आहेत. तसेच  किट्ससाठी राज्यांना निधी दिला आहे, असे डॉ. भारती पवार म्हणाल्या.


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha



संबंधित बातम्या


Coronavirus Omicron Variant : लहान मुलांना देखील ओमायक्रॉनचा धोका? पाहा काय म्हणाले तज्ज्ञ


Fact Check : अमेरिकेच्या रोग नियंत्रण केंद्राने RTPCR टेस्ट केली बंद? जाणून घ्या व्हायरल पोस्ट मागचं सत्य


Healthy Fruits : मधुमेह, हृदय आणि कर्करोगावर गुणकारी 'ड्रॅगन फ्रूट', फायदे जाणून घ्या