मुंबई : दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना ऑफलाईन परीक्षेवरून आंदोलनासाठी भडकवल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या युट्यूबर - व्लॉगर हिंदुस्तानी भाऊ उर्फ विकास पाठकने वांद्रे दंडाधिकारी न्यायालयात दाखल केलेला जामीन अर्ज न्यायालयाने मंगळवारी फेटाळून लावण्यात आला आहे. दंडाधिकारी न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळल्यानंतर आता मुंबई सत्र न्यायालयात या निर्णयाला आव्हान देण्याचा पर्याय हिंदुस्तानी भाऊपुढे उपलब्ध आहे.


राज्यातील दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षा ऑफलाईन ऐवजी ऑनलाईन घेण्यात याव्यात या मागणीसाठी विनंती पत्र शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना देण्यासाठी जात असल्याचं भाऊन जाहीर केलं. आणि त्यासाठी त्यानं एक व्हिडिओ संदेश जारी करत तमाम मुलांनाही तिथं हजर राहण्यास सांगितलं. सोशल मीडिया स्टार असलेस्या भाऊच्या या हाकेला प्रतिसाद देत शेकडो विद्यार्थी रस्त्यावर उतरले आणि त्यांनी अचानक आंदोलन सुरू केले. मुंबईत शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या घराबाहेर मोठ्या संख्येत विद्यार्थी एकवटले आणि आंदोलन सुरू केले. विद्यार्थ्यांच्या या आंदोलनामुळे एकच खळबळ उडाली.


या प्रकरणात मुंबई पोलिसांनी कारवाई करत युट्यूबर - व्लॉगर हिंदुस्तानी भाऊ अर्थात विकास पाठकला अटक केली होती. त्यांतर त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. त्यामुळे जामीनाचा मार्ग मोकळा झाल्यामुळे हिंदुस्थानी भाऊने वांद्रे दंडाधिकारी न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता. मात्र, या प्रकरणाचा तपास प्राथमिक टप्प्यात असून अधिकची चौकशी आणि तपास आवश्यक असल्याचा दावा मुंबई पोलिसांकडून न्यायालयात केला आणि त्यांनी भाऊच्या जामीन अर्जाला विरोध केला. त्यांची बाजू ग्राह्य धरत न्यायालयाने हिंदुस्थानी भाऊचा जामीन अर्ज फेटाळून लावला.


महत्वाच्या बातम्या