सोलापूर : गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. आता प्रत्यक्ष शाळा सुरु झाल्या आहेत पण अभ्यासक्रम भरुन काढण्याचं शिक्षकांसमोर एक मोठं आव्हान उभं ठाकलंय. यावरुन आता शिक्षकांनी शनिवार, रविवारी शाळा सुरु ठेवून अभ्यासक्रम भरुन काढला पाहिजे, असं आवाहन राज्यातील शिक्षकांना उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केलं आहे. सोलापूर जिल्हा परिषदेच्या स्वच्छ शाळा, सुंदर शाळा उपक्रमाच्या पारितोषिक वितरण कार्यक्रमात बोलताना अजित पवारांनी हे आवाहन केलं आहे.
अजित पवार म्हणाले, दोन वर्षे कोरोनामुळे मुले शाळेत गेली नाहीत. मात्र ही मुलं चांगल्या,स्वच्छ व सुंदर वातावरणात शाळेला जावीत यासाठी तुम्ही स्वच्छ व सुंदर अभियान राबविले ते अतिशय कौतुकास्पद आहे. हे अभियान मी पुणे जिल्हा व राज्यात राबविण्यासाठी सूचना करणार आहे. पावणे सात कोटी लोकवर्गणीतून जमा करणे येड्या गबाळ्याचे काम नाही. मात्र मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी तुमच्या टीमने हे काम केले, पावणे तीन हजार शाळा स्वच्छ व सुंदर केल्या. ही जिल्हा आणिराज्यासाठी अभिमानाची बाब आहे. मात्र यात सातत्य ठेवा अशी सक्त सूचना करत त्यांनी शाळेचा अभ्यासक्रम भरून काढण्यासाठी शनिवारी अजित पवारांनी स्वामी यांना दिल्या आहेत.
दरम्यान, कोरोना महामारीच्या काळात राज्यातील शाळा सातशे दिवस बंद होत्या. आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत आहे, त्यामुळे पुन्हा एकदा शाळा सुरु करण्यात आला आहे. ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा धोका कमी झाला आहे अशा जिल्ह्यांमध्ये शाळा सुरू करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. परंतु, शाळा सुरू होत असल्या तरी पालकांनी विद्यार्थ्यांना शाळेत पाठवणं बंधनकारक नाही. सध्याच्या परिस्थितीनुसार ज्यांना योग्य वाटतं त्या पालकांनी विद्यार्थ्यांना शाळेत पाठवावे.
इतर महत्त्वाचे बातम्या :
- HSC Board Exam : बारावी बोर्ड परीक्षेचे हॉल तिकीट उद्यापासून मिळणार ऑनलाईन, कसं कराल डाऊनलोड?
- Maharashtra HSC Time Table 2022 : बारावीच्या परीक्षेचे वेळापत्रक जारी; 4 मार्च रोजी पहिला पेपर, पाहा संपूर्ण Time Table
- Maharashtra HSC SSC Exam : दहावी-बारावीच्या लेखी परीक्षेसाठी आता साडेतीन तासांचा वेळ
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha