Yashomati Thakur : राज्यातील आणखी एक मंत्री कोरोना पॉझिटिव्ह, यशोमती ठाकूर यांना लागण
Covid-19 : राज्यात दैनंदिन कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यातच ओमायक्रॉन या व्हेरियंटनेही चिंता वाढवली आहे. ठाकरे सरकारमधील मंत्री देखील कोरोनाच्या विळख्यात सापडताना दिसत आहेत.
![Yashomati Thakur : राज्यातील आणखी एक मंत्री कोरोना पॉझिटिव्ह, यशोमती ठाकूर यांना लागण Maharashtra Minister Yashomati Thakur tests positive for Covid-19 Yashomati Thakur : राज्यातील आणखी एक मंत्री कोरोना पॉझिटिव्ह, यशोमती ठाकूर यांना लागण](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/12/31/6430486282a6411a63fc908563bef620_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Maharashtra Minister Yashomati Thakur tests positive for Covid-19 : राज्यात दैनंदिन कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यातच ओमायक्रॉन या व्हेरियंटनेही चिंता वाढवली आहे. ठाकरे सरकारमधील मंत्री देखील कोरोनाच्या विळख्यात सापडताना दिसत आहेत. राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांना कोरोनाची लागण झाली आहे. यशोमती ठाकूर यांनी ट्वीट करत याबाबतची माहिती दिली आहे. संपर्कात आलेल्यांनी कोरोना चाचणी करुन घ्यावी, अशी विनंतीही केली आहे. राज्यातील जनतेलाही मास्कचा वापर करण्याचे आवाहनही यशोमती ठाकूर यांनी केलं आहे. याआधी बाळासाहेब थोरात, राधाकृष्ण विखे पाटील, हर्षवर्धन पाटील, सुप्रिया सुळे आणि वर्षा गायकवाड यांनाही कोरोनाची लागण झाली आहे.
महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलेय की, ' माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आलेली आहे. मला कोणतेही लक्षणे नाहीत, तरीही डॉक्टरांच्या सल्ल्याने मी पुढील उपचार घेणार आहे. माझ्या संपर्कात आलेल्यांनी आपली कोरोना चाचणी करून घ्यावी. सगळ्यांना या निमित्ताने आवाहन करत आहे, आपण मास्क वापरावा, काळजी घ्यावी.'
माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आलेली आहे.
— Adv. Yashomati Thakur (@AdvYashomatiINC) December 31, 2021
मला कोणतेही लक्षणे नाही, तरीही डॉक्टरांच्या सल्ल्याने मी पुढील उपचार घेणार आहे.
माझ्या संपर्कात आलेल्यांनी आपली कोरोना चाचणी करून घ्यावी. सगळ्यांना या निमित्ताने आवाहन करत आहे, आपण मास्क वापरावा, काळजी घ्यावी.
राज्यात शुक्रवारी 8067 कोरोनाबाधितांची नोंद
कोरोनाबाधितांच्या (Coronavirus) दैनंदिन रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ पाहायला मिळत आहे. राज्यात आज तब्बल 8 हजार 67 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 1766 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. मागील काही दिवसांपासून कोरोनाची संख्या ही हजाराच्या पुढेच येत आहे. आज रुगणसंख्येने आठ हजाराचा आकडा देखील ओलंडला आहे. त्यातच नाताळ, वर्षाअखेर आणि नवीन वर्ष यामुळे होणाऱ्या गर्दीमुळे कोरोना रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. तसेच ओमायक्रॉन व्हेरियंटनेही चिंता वाढवली आहे. देशातील सर्वाधिक ओमायक्रॉन बाधित रुग्ण महाराष्ट्रात आहेत.
राज्यात आज चार ओमायक्रॉनबाधितांची नोंद
राज्यात आज चार ओमायक्रॉनबाधित रुग्णांची नोंद झालेली आहे. आतापर्यंत 454 ओमायक्रॉनबाधितांची नोंद राज्यात झाली आहे. त्यापैकी 157 रुग्ण ओमायक्रॉनमुक्त झाले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)