एक्स्प्लोर

जो माणूस स्वत:च्या मतदारसंघातून निवडून येऊ शकत नाही, तो उद्धव ठाकरेंवर काय टीका करणार?, उदय सामंत यांचा चंद्रकांत पाटलांना टोला

मुख्यमंत्री हॉस्पिटलमध्ये असून हे सरकार बाहेरुन चालवलं जातंय अशी टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी केली होती. त्यावर राज्याचे मंत्री उदय सामंत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. 

रायगड : जो माणूस स्वत: च्या मतदारसंघातून निवडून येत नाही, त्याला निवडून येण्यासाठी पुण्याला जावं लागतं, तो मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्यावर  काय टीका करणार अशा शेलक्या भाषेत राज्याचे मंत्री उदय सामंत यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांचा समाचार घेतला. ते रायगडमध्ये एका कार्यक्रमात बोलत होते. भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी अमरावती हिंसाचार आणि पेट्रोल-डिझेलच्या किंमतीवरुन उद्धव ठाकरेंच्यावर टीका केली होती. 

मंत्री उदय सामंत चंद्रकांत पाटलांचे नाव न घेता म्हणाले की, "जो माणूस स्वत:च्या मतदारसंघातून निवडून येऊ शकत नाही, त्याला निवडून येण्यासाठी पुण्याला जावं लागतं, तो माणूस आपल्या साहेबांवर टीका करतोय." 

भाजप नेते चंद्रकांत पाटील हे मूळचे कोल्हापूरचे असून ते पुण्यातील कोथरुड मतदारसंघातून निवडून आले आहेत. 

काय म्हणाले होते चंद्रकांत पाटील? 
राज्यात सुरु असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावरुन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ठाकरे सरकारवर टीका केली होती. ते म्हणाले की,  "एसटी कामगार आणि शेतकऱ्यांची दिवाळी काळी गेली आहे. इतका अमानवी अत्याचार महाराष्ट्राने या आधी कधीही पाहिला नाही. मुख्यमंत्री हॉस्पिटलमध्ये आहेत, माजी गृहमंत्री तुरुंगात आहेत, सध्याचे गृहमंत्री आताच आजारपणातून बरे झाले आहेत. त्यामुळे हे सरकार बाहेरुन चालवलं जातंय."

अमरावती, नांदेड मध्ये सुरु असलेल्या हिंसेवर बोलताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ठाकरे सरकारवर टीका केली होती. या सरकारची आपल्याला कीव येते, राजकारणासाठी किती लाचार व्हायचं? मुस्लिमांच्या मतांसाठी आज दंगलखोरांवर काहीही बोललं जात नाही असं ते म्हणाले होते. 

संबंधित बातम्या : 

महत्त्वाच्या बातम्या

Narendra Patil : एमडींना अण्णासाहेब पाटील महामंडळाचे वाटोळे करण्याची सुपारी; नरेंद्र पाटील यांचा गंभीर आरोप, अध्यक्षपद सोडण्याचे संकेत
एमडींना अण्णासाहेब पाटील महामंडळाचे वाटोळे करण्याची सुपारी; नरेंद्र पाटील यांचा गंभीर आरोप, अध्यक्षपद सोडण्याचे संकेत
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
Pune Crime News: वर्गमैत्रिणीसोबत प्रेमसंबंधाचा संशय, तरुणाला भररस्त्यात पाठलाग करून संपवलं, पुण्यातील धक्कादायक घटना
वर्गमैत्रिणीसोबत प्रेमसंबंधाचा संशय, तरुणाला भररस्त्यात पाठलाग करून संपवलं, पुण्यातील धक्कादायक घटना
Devendra Fadnavis on Nashik potholes: 'असं रिलॅक्स राहून चालणार नाही, महाकुंभ तोंडावर'; नाशिकमधील खड्ड्यांवरुन देवेंद्र फडणवीसांनी अधिकाऱ्यांना सुनावलं
'असं रिलॅक्स राहून चालणार नाही, महाकुंभ तोंडावर'; नाशिकमधील खड्ड्यांवरुन देवेंद्र फडणवीसांनी अधिकाऱ्यांना सुनावलं

व्हिडीओ

Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
Gold Rate : पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
Ratnagiri News : रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
Prithviraj Chavan: इकडं संजय राऊतांचे केंद्रीय शिक्षण मंत्रीपदासाठी फडणवीसांवरून दाव्यांवर दावे, पण पृथ्वीराजबाबांनी मांडली वेगळीच भूमिका! थेट म्हणाले, 'त्यांना केंद्रात संधी मिळाल्यास देशातील Gen Z आणि काँग्रेस...'
इकडं संजय राऊतांचे केंद्रीय शिक्षण मंत्रीपदासाठी फडणवीसांवरून दाव्यांवर दावे, पण पृथ्वीराजबाबांनी मांडली वेगळीच भूमिका! थेट म्हणाले, 'त्यांना केंद्रात संधी मिळाल्यास देशातील Gen Z आणि काँग्रेस...'
SC-ST आरक्षणात 'क्रिमी लेयर'चे तत्त्व लागू होत नाही, ही संकल्पना केवळ OBC आणि SEBC आरक्षणांना लागू; केंद्र सरकारचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र
SC-ST आरक्षणात 'क्रिमी लेयर'चे तत्त्व लागू होत नाही, ही संकल्पना केवळ OBC आणि SEBC आरक्षणांना लागू; केंद्र सरकारचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र
Abhijeet Dipke: 'मी कुणाला भेटायचं हे पोलिसांनी नाही सांगायचं'; अभिजीत दिपके पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, Video
'मी कुणाला भेटायचं हे पोलिसांनी नाही सांगायचं'; अभिजीत दिपके पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, Video
Sushma andhare: तर शिंदेंना फडणवीस भूमिका घेऊ देतील? मग ते फडणवीस कसले? दोघांच्या कोल्ड वॉरमध्ये जीव मात्र गरीब मराठ्यांचा जातोय; सुषमा अंधारेंचा प्रहार
तर शिंदेंना फडणवीस भूमिका घेऊ देतील? मग ते फडणवीस कसले? दोघांच्या कोल्ड वॉरमध्ये जीव मात्र गरीब मराठ्यांचा जातोय; सुषमा अंधारेंचा प्रहार
Embed widget