सर्व विद्यापीठांच्या कुलगुरुंशी चर्चा करूनच परीक्षा न घेण्याचा निर्णय : उदय सामंत
यूजीसीच्या (विद्यापीठ अनुदान आयोग) परीक्षा व शैक्षणिक कॅलेंडरच्या सुधारित मार्गदर्शक सूचनांनुसार देशातील विद्यापीठ आणि उच्च शिक्षण संस्थांना सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
मुंबई : यूजीसीच्या (विद्यापीठ अनुदान आयोग) परीक्षा व शैक्षणिक कॅलेंडरच्या सुधारित मार्गदर्शक सूचनांनुसार देशातील विद्यापीठ आणि उच्च शिक्षण संस्थांना सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यासंदर्भात यूजीसीचे उपाध्यक्ष डॉ.भूषण पटवर्धन यांनी एबीपी माझाला एक्स्क्लुझिव्ह मुलाखत दिली. त्यात त्यांनी अनेक मुद्द्यांवर चर्चा केली. परंतु, उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी डॉ.भूषण पटवर्धन यांची मुलाखत पाहिली असून ही मुलाखत झाल्यानंतर संभ्रम निर्माण झाला असल्याचं पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले. यूजीसीच्या नव्या गाइडलाइन्स आणि राज्यातील विद्यापीठांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षांसंदर्भात उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेतली होती. तसेच यावेळी बोलताना त्यांनी राज्यातील विद्यापीठांच्या कुलगुरूंशी चर्चा करूनच परीक्षा न घेण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलं.
उदय सामंत बोलताना म्हणाले की, "सप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत विद्यार्थ्यांना संभ्रमावस्थेत ठेवता येणार नाही. आता विद्यार्थ्यांच्या संभ्रमावस्थेत अधिक भर पडली आहे. लाखो विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी आणि भवितव्यासाठी आम्ही आमची भूमिका मांडली आहे. 6 एप्रिल रोजी आमची पहिली बैठक झाली. त्या बैठकीत करोनाच्या पार्श्वभूमीवर परीक्षा कशा घ्यायच्या याची पडताळणी करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली. त्यासाठी सहा कुलगुरूंची एक समिती स्थापन करण्यात आली होती आणि डॉ. सुहास पेडणेकर हे त्या समितीचे प्रमुख होते. त्यानंतर 29 एप्रिल रोजी यूजीसीच्या गाडईलाईन्स आल्या. त्यामध्ये कोरोनाच्या परिस्थितीत तिथल्या शासनानं निर्णय घ्यावा, तसंच कोरोनाची परिस्थिती पाहून तिथल्या शासनानं आणि विद्यापीठांनी गाईडलाईन्स ठरवण्याचं सांगण्यात आलं होतं." असं उदय सामंत यांनी यावेळी सांगितलं.
पाहा व्हिडीओ : सर्व विद्यापीठांच्या कुलगुरुंशी चर्चा करूनच परीक्षा न घेण्याचा निर्णय - उदय सामंत
पुढे बोलताना उदय सामंत यांनी सांगितलं की, "यूजीसीने 29 एप्रिल रोजी दिलेल्या गाडईलाईन्सनुसार, कुलगुरु परिस्थितीनुसार जो निर्णय घेतील, त्यानुसारच परीक्षांसंदर्भात निर्णय घेण्याचं शासनाच्या वतीने ठवण्यात आलं. समितीने 6 मे रोजी आपला अहवाल दिला. त्यानंतर आम्ही या प्रकरणी राज्यपालांशी चर्चा केली. 8 मे रोजी शासनानं समितीचा अहवाल स्वीकारत 17 मे रोजी यूजीसीला अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याची विनंती केली. तसेच व्यावसायिक आणि अव्यावसायिक अभ्यासक्रमांच्या अंतिम वर्षांच्या परीक्षा रद्द करण्यासंदर्भातही पत्रव्यवहार करण्यात आला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीदेखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून परीक्षा रद्द करण्याची विनंती केली होती. लाखो विद्यार्थ्यांच्या हितासाठी हा निर्णय घेण्यात आला." पुढे बोलताना ते म्हणाले की, "यूजीसीच्या गाडईलाईन्सनुसारचं सरकाराने निर्णय घेतला, मात्र त्यानंतर यूजीसीने निर्णय फिरवत सप्टेंबरपर्यंत परीक्षा घेण्यास सांगितलं."
पाहा मुलाखत : यूजीसीच्या गाईडलाईन बंधनकारक : UGC उपाध्यक्ष डॉ.भूषण पटवर्धन
कुलगुरुंशी चर्चा करुनच परीक्षा न घेण्याचा निर्णय
राज्यातील विविध विद्यापीठांच्या कुलगुरुंशी चर्चा करुनच परीक्षा न घेण्याचा निर्णय घेतल्याचं उदय सामंत यांनी सांगितलं. ते म्हणाले की, "राज्यातील सर्व कुलगुरुंनी परीक्षा घेण्यासाठी नकार दिला. परीक्षा न घेण्यासंदर्भात त्यांनी आपली मतं मांडली. राज्यातील 13 कुलगुरु या बैठकीला उपास्थित होते. कुलगुरुंनी आपली भूमिका ठाम राखण्यासाठी चार तारखेला पुन्हा बैठक झाली. या बैठकीत एटीकेटीच्या विद्यार्थ्यांना ग्रेस मार्कद्वारे पास करावं असं मतं मांडलं. तसंच ज्यांना परीक्षा द्यायच्या आहेत त्यांना पर्याय ठेवावा, असं सांगितलं."
महत्त्वाच्या बातम्या :
परीक्षांबाबत फेरविचार नाही, यूजीसीच्या गाईडलाईन बंधनकारक : UGC उपाध्यक्ष डॉ.भूषण पटवर्धन
यूजीसीने जारी केलेल्या गाईडलाईन्स विद्यार्थ्यांच्या दृष्टीने धक्कादायक : उदय सामंत
युजीसीच्या सुधारित गाईडलाइन्सनुसार विद्यापीठ अंतिम वर्षाच्या परीक्षा सप्टेंबरमध्ये होणार