आमची भीती खरी ठरली.. महिलेवर खोटी तक्रार केल्याची कारवाई करा, भाजप नेते मुनगंटीवार यांची मुंडे प्रकरणावर प्रतिक्रिया
तक्रारकर्त्यावर दबाव येऊ नये यासाठी आम्ही राजीनाम्याची मागणी करत होतो. आता त्या महिलेवर खोटी तक्रार केल्याची कारवाई करा, अशी प्रतिक्रिया भाजप नेते मुनगंटीवार यांनी मुंडे तक्रार प्रकरणावर दिली आहे.
चंद्रपूर : मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचे आरोप करणाऱ्या महिलेने आपली तक्रार मागे घेतल्याने आता मुंडेंवर निशाणा साधणारे पेचात पडले आहेत. यासंदर्भात भाजप नेते आणि माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तक्रारकर्त्यावर दबाव येऊ नये यासाठी राजीनामा आवश्यक असतो, सेटिंग-फिटिंग हा गंभीर विषय दाबण्याचा प्रयत्न झाला का? आता त्या महिलेवर खोटी तक्रार केल्याची कारवाई करा, अशी मागणी भाजप नेते मुनगंटीवार यांनी केली आहे.
तक्रारकर्त्यावर दबाव येऊ नये यासाठी राजीनामा आवश्यक असतो, अशी प्रतिक्रिया भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी मुंडे यांच्यावर बलात्कार आरोप प्रकरणी तक्रार वापसी प्रकरणावर दिली आहे. त्यांच्या मते हा सेटिंग-फिटिंगने गंभीर विषय दाबण्याचा प्रयत्न तर झाला नाही. आता त्या महिलेवर खोटी तक्रार केल्याची कारवाई करा, असे मत त्यांनी व्यक्त केले. भाजप नेते दबावाखाली तक्रारकर्ता प्रभावित होऊ नये यासाठी राजीनामा मागत होते आणि आमची भीती खरी ठरली, असेही मुनगंटीवार म्हणाले.
धनंजय मुंडे यांना मोठा दिलासा सामाजिक न्यायमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. कारण धनंजय मुंडे यांच्याविरोधातील बलात्काराची तक्रार मागे घेण्यात आली आहे. कौटुंबिक कारणं आणि या प्रकरणाचं राजकारण होत असल्याने तक्रार मागे घेत असल्याचं महिलेने म्हटलं आहे.
काही दिवसांपूर्वी धनंजय मुंडे यांच्यावर एका महिलेने बलात्काराचा गंभीर आरोप केला होता. संबंधित महिलेने मुंडे यांच्याविरुद्ध ओशिवारा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. यानंतर धनंजय मुंडे यांनी फेसबुक पोस्ट लिहीत यावर स्पष्टीकरण दिलं होतं. आपले करुणा शर्मा नावाच्या महिलेसोबत संबंध होते आणि या संबंधातून दोन मुले असल्याचा खुलासा त्यांनी केला होता.
या आरोपांनंतर एकच खळबळ उडाली होती. विरोधकांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. तर राष्ट्रवादी काँग्रेसनेही याची गांभीर्याने दखल घेतली होती. परंतु पोलिसांच्या तपासात धनंजय मुंडे यांच्याविरुद्ध काही सिद्ध झालं तरच पक्ष योग्य तो निर्णय घेईल. तोपर्यंत त्यांच्या राजीनाम्याची आवश्यकता नाही, असं पक्षाकडून सांगण्यात आलं होतं.
मुंडेंवरील आरोपामुळे त्यांच्यासह कुटुंबाची, पक्षाची बदनामी झाली, खोटे आरोप करणं क्लेशदायक -अजित पवार