एक्स्प्लोर

मंत्री दादा भुसेंनी युवकाला पोलिसांसमोर फटकावलं; जितेंद्र आव्हाडांकडून व्हिडीओ ट्वीट करत हल्लाबोल

Dada Bhuse: व्हायरल होणारा हा व्हिडीओ कधीचा आहे? कुठला आहे? याबाबत कोणताही माहिती समोर आलेली नाही.

Dadaji Bhuse: बंदरे आणि खनीकर्म मंत्री दादा भुसे यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हाच व्हिडीओ राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीटवर पोस्ट केला आहे. यामध्ये दादा भुसे दोन व्यक्तींना शिव्या आणि मारहाण करताना दिसत आहे. व्हिडीओ पोस्ट करताना जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दादा भुसे यांच्यावर कारवाई कधी होणार? असा प्रश्न विचारला आहे.  पोलिसांसमोर एखाद्या व्यक्तीला मारहाण करण्यात येत आहे, कायदा सुव्यवस्थेचं काय? असा प्रश्न आव्हाडांनी उपस्थित केलाय. 

जितेंद्र आव्हाड यांनी व्हिडीओसोबत राज्य सरकारला प्रश्न विचारला आहे. जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, " मंत्री दादा भूसे फटकावतात. शिव्या देतात, मुख्यमंत्री साहेब... कुठला गुन्हा पोलिस घेणार... पोलिसांसमोर मारले.. माझा नग्न फोटो फेसबुकवर टाकणाऱ्याला आपण मांडीवर  बसवलत. सीबीआय चौकशी लागावी म्हणून वकिलांची फौज उभी केलीत. सुप्रीम कोर्टामध्ये  (supreme court) रात्री त्या विकृत बरोबर आपली बैठक झाली... आता बोला. "

पाहा जितेंद्र आव्हाड यांचं ट्वीट -  

त्या व्हिडीओत नेमकं काय आहे?
जितेंद्र आव्हाड यांनी पोस्ट केलेला दादा भुसे यांचा व्हिडीओ हिरकणी कक्षातील आहे. या व्हिडीओमध्ये दादा भुसे दोन व्यक्तींना काही प्रश्न विचारत आहे. हे दोन्ही तरुण मद्यपान केलेले दिसत आहे. दादा भुसे यांच्या बोलण्यातून, त्या दोन्ही तरुणाला रविवारी त्यांनी पोलिसांच्या स्वाधीन केले होते. आज त्यांची सुटका झाली आहे. दादा भुसे त्यामधील एका व्यक्तीला मारहाण करत आहेत. त्याशिवाय त्यांना शिव्याही दिलेल्या व्हिडीओत दिसत आहे. त्या दोन्ही तरुणांची नेमकी चूक काय होती? कोणत्या कारणासाठी दादा भुसे मारहाण करत आहेत? हा व्हिडीओ कधीचा आहे? कुठला आहे? याबाबत कोणताही माहिती समोर आलेली नाही. जितेंद्र आव्हाड यांनी व्हिडीओ पोस्ट केल्यानंतर सोशल मीडियावर याची चर्चा सुरु आहे. यावर सत्ताधाऱ्यांकडून काय उत्तर येतेय? विरोधक याबाबत हिवाळी अधिवेशनात आवाज उठवणार का? हे लवकरच समजेल. 

दादा भुसेंच्या अडचणी वाढणार का?
एकनाथ शिंदे यांचे मंत्रीमंडळातील सहकारी अब्दुल सत्तार यांच्यावर विरोधकांनी आधीच टीका करण्यास सुरुवात केली आहे. अब्दुल सत्तार यांच्यावर गायरन जमीन घोटाळा प्रकरण आणि कृषी महोत्सवासाठी देणगीच्या नावाखाली पैसे लाटण्याचा आरोप त्यांच्यावर आहे. त्यानंतर आता दादा भुसे यांचा हा व्हिडीओ समोर आला आहे. याप्रकरणी विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात विरोधक मुद्दा लावून धरण्याची शक्यता आहे. त्यामुळे एकीकडे अब्दुल सत्तार तर दुसरीकडे दादा भुसे यांचा या व्हिडीओचा प्रकार यामुळे सत्ताधाऱ्यांची तारेवरची कसरत होणार आहे. दादा भुसे व्हायरल व्हिडीओवर काय उत्तर देतात, आणि यावर विरोधकांचं समाधान होतेय का? याकडे सर्वांचं लक्ष लागलेय. 

महत्त्वाच्या बातम्या

Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव
Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
देशात सर्वाधिक साखर उत्पादन करणारी राज्य कोणती? महाराष्ट्राचा कितवा नंबर? जाणून घ्या संपूर्ण यादी 
देशात सर्वाधिक साखर उत्पादन करणारी राज्य कोणती? महाराष्ट्राचा कितवा नंबर? जाणून घ्या संपूर्ण यादी 

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bhuleshwarcha Raja : मुंबईतील भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत अपघात,आगमन मिरवणुकीत घडला प्रकार, तीन जण जखमी
मुंबईतील भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत दुर्घटना, अपघातात तीन जण जखमी
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव
Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव
Rahul Gandhi: ही गोष्ट निशाची नाही, सर्व आदिवासी विद्यार्थ्यांची, संपूर्ण देशाची महाराष्ट्राची, राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीनं अडचणींचा पाढा वाचला 
आदिवासी विकास विभागाचे मंत्री म्हणतात आय एम सॉरी, निशानं राहुल गांधींसमोर धडाधड समस्या मांडल्या
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
Embed widget