एक्स्प्लोर

विखेंना रॉयलस्टोन, सत्तारांना पन्हाळगड तर केसरकरांना रामटेक; 16 मंत्र्यांना मिळालेल्या बंगल्यांची यादी

Maharashtra minister bungalow list : 16 मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप करण्यात आले आहे. यामध्ये राधाकृष्ण विखे पाटील यांना रॉयलस्टोन बंगला मिळालाय तर अब्दुल सत्तार यांना न्हाळगड बंगला मिळाला आहे.

Maharashtra Minister Bungalow : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये 18 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली होती. या मंत्र्यांचं खातेवाटपही झालं. आता या मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप करण्यात आले आहे. यामध्ये राधाकृष्ण विखे पाटील यांना रॉयलस्टोन बंगला मिळालाय तर अब्दुल सत्तार यांना पन्हाळगड बंगला मिळाला आहे. मुनगंटीवार यांना पर्णकुटी बंगला मिळाला आहे. 

मंत्रिमंडळ विस्तारानंतर शिंदे सरकारचं पहिलं अधिवेशन सुरु आहे. विधानसभेत सत्ताधारी आणि विरोधी नेत्यांची खडाजंगी पाहायला मिळतेय. अधिवेशनात विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांना गुवाहटी ट्रीप व गद्दारी या मुद्द्यावरुन लक्ष्य केलं जातेय. विधानसभा अधिवेशन सुरु असतानाच सुप्रीम कोर्टात एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांची लढाईही सुरु आहे. मंगळवारी झालेल्या सुनावणीत सुप्रीम कोर्टाकडून खंडपीठ नेमण्यात येणार असल्याचं स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे आता ही लढाई आणखी काही दिवस कोर्टात चालणार आहे. त्यातच मंगळवारी मंत्र्यांना बंगल्याचं वाटप करण्यात आले आहे. त्यानुसार उदय सामंत यांना मुक्तागिरी बंगला मिळाला आहे तर वादग्रस्त ठरलेले मंत्री संजय राठोड यांना शिवनेरी बंगला मिळाला आहे. 

 पाहूयात कोणत्या मंत्र्यांना कोणता बंगला मिळाला? पाहा संपूर्ण यादी

अ. क्रमांक मंत्र्यांचं नाव बंगला/ निवासस्थान
1 राधाकृष्ण एकनाथराव विखे-पाटील रॉयलस्टोन
2 सुधीर सच्चिदानंद मुनगंटीवार पर्णकुटी
3 चंद्रकांत बच्चू पाटील  ब-1 सिंहगड
4 विजयकुमार कृष्णराव गावित चित्रकुट
5 गिरीश दत्रात्रय महाजन सेवासदन
6 गुलाबराव रघुनाथ पाटील जेतवन
7 संजय दुलीचंद राठोड शिवनेरी
8 सुरेश दगडू खाडे  ज्ञानेश्वरी
9 संदिपानराव आसाराम भुमरे  ब- रत्नसिंधु
10 उदय रविंद्र सामंत  मुक्तागिरी
11 रविंद्र दत्तात्र्य चव्हाण अ-6 रायगड
12 अब्दुल सत्तार ब -7 पन्हाळगड
13 दीपक वसंतराव केसरकर रामटेक
14 अतुल मोरेश्वर सावे अ-3 शिवगड
15 शंभूराज शिवाजीराव देसाई  ब-4 पावनगड
16 मंगल प्रभात लोढा ब-5 विजयदुर्ग

उपमुख्यमंत्र्यांसाठी असलेला 'देवगिरी' बंगला अजित पवारांकडे कायम
सत्ता गेल्यानंतर सर्व अधिकार जातात तसेच शासकीय घर सुद्धा सोडावं लागत. पण महाराष्ट्राचे विरोध पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांना मात्र त्यांचे शासकीय घर सोडावे लागले नाही. कारण मलबार हिल येथील देवगिरी बंगला (Devgiri Bungalow) अजित पवार यांनाच देण्यात  निर्णय  शिंदे-फडणवीस सरकारने घेतला आहे. अजित पवार यांनी देवगिरी बंगला कायम राहवा यासाठी  देवेंद्र फडणवीस यांना दोन वेळा पत्र लिहून विनंती केली.  त्यानंतर राज्य सरकारनकडीन देवगिरी बंगला हा अजित पवार यांना मिळणार असल्याचे शासकिय परीपत्रक काढले. मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यानंतर देवगिरी बंगला हा भव्य मानला जातो. फडणवीसांनी मनाचा मोठेपणा दाखवत हा बंगला अजित पवार यांच्याकडे काम ठेवला आहे. अजित पवार आणि देवगिरी बंगल्याचे नाते अतूट आहे कारण अजित पवारांनी या बंगल्यात जवळपास 16 वर्षाहून अधिक काळ वास्तव्य केले आहे. अजित पवार हे  1999 ते 2014 या काळात देवगिरी बंगल्यावरच राहत होते. त्यांनंतर 2014 ला भाजपची सत्ता आल्यानंतर हा बंगला सुधीर मुनगंटीवार यांना मिळाला. महाविकासआघाडीचे सरकार 2019 साली आल्यानंतर अजित पवारांना पुन्हा हा बंगला मिळाला होता. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nashik News : आमदार सुहास कांदे यांच्या अंगरक्षकाने हॉटेल कर्मचाऱ्याला दाखवला बंदुकीचा धाक, घटनेचा व्हिडिओ व्हायरल
आमदार सुहास कांदे यांच्या अंगरक्षकाने हॉटेल कर्मचाऱ्याला दाखवला बंदुकीचा धाक, घटनेचा व्हिडिओ व्हायरल
Walmik Karad : काल मोक्यातून सुटला, पण आज वाल्मिक कराडला झटका; सीआयडीत कोठडीत असतानाच जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाईचा 'चाप' ओढला
काल मोक्यातून सुटला, पण आज वाल्मिक कराडला झटका; सीआयडीत कोठडीत असतानाच जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाईचा 'चाप' ओढला
Mumbai Police : मुन्नाभाई MBBS स्टाईलनं कॉपी करायला गेला अन् हाती बेड्या पडल्या, मुंबई पोलिसांकडून  तरुणाला अटक
मुंबई पोलिसांकडून 'मुन्नाभाई MBBS' चा गेम, तरुणाला लेखी परीक्षेत हायटेक कॉपी करणं भोवलं, थेट तुरुंगात टाकलं
सरकार येऊनही फडणवीसांना उपमुख्यमंत्री व्हावं लागलं त्यावेळी डोळ्यात पाणी आलं होतं, चंद्रशेखर बावनकुळेचं वक्तव्य
सरकार येऊनही फडणवीसांना उपमुख्यमंत्री व्हावं लागलं त्यावेळी डोळ्यात पाणी आलं होतं, चंद्रशेखर बावनकुळेचं वक्तव्य
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Eknath Shinde Sports Car : एकनाथ शिंदेंना शेजारी बसवून गौतम सिंघानियांनी मारली ड्रिफ्ट | VIDEOEknath Shinde Sports Car : सिंघानियांनी गरगर कार फिरवली..एकनाथ शिंदे म्हणाले, मला भीती वाटते!Thane Eknath Shinde At Raymond vintage Car Exhibition : एकनाथ शिंदे यांनी अनुभवलं कार ड्रिफ्टिंगSanjay Raut Full PC : कुणाला मिरच्या लागण्याचे कारण नाही;काँग्रेस नेत्यांनी ऐकून घेण्याची सवय ठेवावी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik News : आमदार सुहास कांदे यांच्या अंगरक्षकाने हॉटेल कर्मचाऱ्याला दाखवला बंदुकीचा धाक, घटनेचा व्हिडिओ व्हायरल
आमदार सुहास कांदे यांच्या अंगरक्षकाने हॉटेल कर्मचाऱ्याला दाखवला बंदुकीचा धाक, घटनेचा व्हिडिओ व्हायरल
Walmik Karad : काल मोक्यातून सुटला, पण आज वाल्मिक कराडला झटका; सीआयडीत कोठडीत असतानाच जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाईचा 'चाप' ओढला
काल मोक्यातून सुटला, पण आज वाल्मिक कराडला झटका; सीआयडीत कोठडीत असतानाच जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाईचा 'चाप' ओढला
Mumbai Police : मुन्नाभाई MBBS स्टाईलनं कॉपी करायला गेला अन् हाती बेड्या पडल्या, मुंबई पोलिसांकडून  तरुणाला अटक
मुंबई पोलिसांकडून 'मुन्नाभाई MBBS' चा गेम, तरुणाला लेखी परीक्षेत हायटेक कॉपी करणं भोवलं, थेट तुरुंगात टाकलं
सरकार येऊनही फडणवीसांना उपमुख्यमंत्री व्हावं लागलं त्यावेळी डोळ्यात पाणी आलं होतं, चंद्रशेखर बावनकुळेचं वक्तव्य
सरकार येऊनही फडणवीसांना उपमुख्यमंत्री व्हावं लागलं त्यावेळी डोळ्यात पाणी आलं होतं, चंद्रशेखर बावनकुळेचं वक्तव्य
Bangladesh Squad Champions Trophy : बोर्डाचा कठोर निर्णय! चॅम्पियन्स ट्रॉफीच्या संघातून माजी कर्णधाराचा पत्ता कट; जाणून घ्या संपूर्ण टीम
बोर्डाचा कठोर निर्णय! चॅम्पियन्स ट्रॉफीच्या संघातून माजी कर्णधाराचा पत्ता कट; जाणून घ्या संपूर्ण टीम
दादा अख्खा महाराष्ट्र म्हणतोय, चुकीचं घडलंय, चुकीचा पायंडा मांडू नका, विषवल्ली मोडण्यासाठी प्रखर भूमिका घ्या; विजय बापू शिवतारेंच्या दादांवर फैरींवर फैरी!
दादा अख्खा महाराष्ट्र म्हणतोय, चुकीचा पायंडा मांडू नका, विषवल्ली मोडण्यासाठी प्रखर भूमिका घ्या; विजय बापू शिवतारेंच्या फैरींवर फैरी!
Suresh Dhas : राखेची वाहतूक करताना परळीमध्ये सरपंचाचा अपघातात बळी, आमदार सुरेश धसांचा गंभीर आरोप; म्हणाले, 'पोलीस आणि थर्मल पॉवर अधिकारी...'
राखेची वाहतूक करताना परळीमध्ये सरपंचाचा अपघातात बळी, आमदार सुरेश धसांचा गंभीर आरोप; म्हणाले, 'पोलीस आणि थर्मल पॉवर अधिकारी...'
कोयता गँगचे टोळके ॲक्टीव्ह! रात्रीच्या अंधारात हातात कोयता घेऊन येतात अन्.. संभाजीनगरमध्ये दहशत वाढली
कोयता गँगचे टोळके ॲक्टीव्ह! रात्रीच्या अंधारात हातात कोयता घेऊन येतात अन्.. संभाजीनगरमध्ये दहशत वाढली
Embed widget