माथेरान :  मुंबईनजिकचं थंड हवेचं ठिकाण अशी ओळख असलेल्या माथेरानच्या डोंगरावर वणवा पेटला आहे. डोंगरमाथ्यावरच्या माथेरानपासून काही अंतरावर असलेल्या जुम्मापट्टी परिसरात सायंकाळच्या सुमारास अचानक वणवा लागला. त्यानंतर काही क्षणातच या आगीनं सारा डोंगर परिसर व्यापायला सुरुवात केली. या वणव्यात मोठ्या प्रमाणावर वनसंपदा भक्ष्यस्थानी पडली असून, वनसंपदेचं मोठं नुकसान झाल्याची माहिती आहे. वनविभागाकडून अजूनही वणव्यावर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. 


माथेरानच्या डोंगरावर हा वणवा कशामुळं लागला यासंदर्भात अद्याप कोणतीही माहिती मिळू शकली नाही. गेल्या दोन दिवसांपासून उन्हाचा पारा चढल्यामुळं उष्णतेच्या झळा आधीपासूनच माथेरानच्या नागरिकांना जाणवत आहेत. त्यात डोंगरावर लागलेल्या वणव्यामुळं माथेरानच्या तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.


आगीची माहिती मिळताच वनविभागाची टीम घटनास्थळी दाखल झाली. वणवा विझविण्यास सुरु वात केली. सायंकाळनंतर वारा सुटल्याने आग झपाट्याने पसरली आहे. रायगड जिल्ह्यात वनक्षेत्र मोठ्यात आले. मात्र याठिकाणी वणवा लागण्याचे प्रकारही गेल्या काही दिवसांत वाढले आहे. वाढत्या तापमानाबरोबरच मानवनिर्मिती वणव्यांमुळे नैसर्गिक संपदेचा मोठ्या प्रमाणात ऱ्हास होत आहे.


वणवा का लागतो?


जंगलांच्या परिसरात साधारणतः फेब्रुवारी ते एप्रिल महिन्यात वणवे लागतात. मात्र गेल्या काही वर्षांपासून जानेवारी आणि मार्चमध्येही वणवे लागल्याच्या घटना घडत आहेत. जंगले ओसाड पडतात नैसर्गिक तसेच मानवी हस्तक्षेपातून लागणा-या वणव्यांमुळे मौलिक वनसंपदेचा बळी जात असतो. तसेच, याठिकाणी असलेल्या वन्यजीवही या वणव्यांमध्ये होरपळत असतात. दुर्मिळ वनस्पतींच्या प्रजाती नष्ट होतात जमिनीची जलधारण क्षमता कमी होते.  जल पातळी खालावते तपमानवाढीस कारणीभूत ठरते. अनेक वनक्षेत्रात दरवर्षी वणवे लागतात. ग्रामीण भागामध्ये आजही डोंगरांवर वणवे लावले जातात. गवत चांगले येते या गैरसमजुतीने नेहमी डोंगरात वणवा पेटतो. त्यातून निसर्ग व प्राण्यांची मोठ्या प्रमाणात हानी होते. पण, प्रबोधनाअभावी दरवर्षी वणवे पेटतच जातात. 


इतर महत्त्वाच्या बातम्या :


Trending : जीव वाचवण्यासाठी वडिलांनी मुलाला इमारतीवरून फेकलं; पाहा अंगावर शहारे आणणारा व्हिडीओ