लातूर : महाराष्ट्र राज्य वैद्यकीय शिक्षक संघटनेने असहकार आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. दोन दिवसांपासून राज्यातील 19 महाविद्यालयातील बाह्यरुग्न सेवा बंद करण्यात आली आहे. एकाच दिवसात 1200 शस्त्रक्रिया झाल्याचा नाहीत. मागण्या मान्य नाही झाल्या तर अत्यावश्यक रुग्ण सेवा ही बंद करण्यात येणार असल्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे.  राज्यातील सर्व वैद्यकीय महाविद्यालयातील शिक्षक 50 दिवसांपासून संपावर आहे 


लातूर येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील तसेच राज्यातील सर्व वैद्यकीय महाविद्यालयातील शिक्षक संपावर आहेत. मागील 50 दिवसांपासून विविध मागण्यांसाठी ते आंदोलन करत आहेत. रोज काही वेळासाठी महाविद्यालयतील प्रांगणात एकत्र येत मागण्यांसाठी आंदोलन केले जात आहे. मात्र सरकार त्याच्या मागण्याची दखल घेत नाही. यामुळे मागील दोन दिवसांपासून बाह्य रुग्ण सेवा बंद करण्यात आली आहे.  रुग्णालयात रोज रुग्ण येत असतात त्यांच्या तपासणीवर परिणाम होत आहे.  शिकाऊ डॉक्टर येथे काम करत आहेत मात्र योग्य उपचार आणि मार्गदर्शन मिळत नाही. आरोग्य सेवेवर मोठा परिणाम झाला आहे. राज्यातील 19 महाविद्यालयतील 2700 डॉक्टर शिक्षक संपावर गेले आहे.


मागील 50 दिवसांपासून हे आंदोलन सुरु आहे. राज्यातील प्रत्येक महाविद्यालयतील शिक्षक हे रोज ठिय्या आंदोलन करतात आणि कामावर जात होते. वेळोवेळी निवेदन देखील दिली आहेत. त्यानंतर घंटानाद आंदोलन कँडल मार्च देखील काढण्यात आला. मात्र सरकार मागण्यांबाबत गंभीर दिसत नाही.  हे लक्षात आल्यावर कालपासून बाह्यरुग्न सेवा बंद करण्यात आली आहे.


काही दिवसांपूर्वी कँडल मार्च ,घंटानाद आंदोलन करण्यात आले होते. रोज धरणे आंदोलन सुरु आहेत. आता बाह्यरुग्न सेवा बंद आहे. मागण्यांबाबत गंभीरपणे विचार नाही झाला तर दवाखान्यात दाखल रुग्ण सेवेवर ही परिणाम होईल असा इशारा यावेळी देण्यात आला आहे


लातूर येथील रुग्णसेवेवर परिणाम


लातूर येथील वैद्यकीय महाविद्यालयत जिल्ह्यातून नव्हे तर आजुबाजुच्या शहरातील रुग्णाचा राबता आहे येथे 100 डॉक्टर काम करतात. लातूर येथील वैद्यकीय महाविद्यालयत रोज जवळपास 1500 बाह्यरुग्ण तपासणीसाठी येत असतात. यापैकी 100 च्या आसपास रुग्णास पुढील उपचारसाठी  दवाखनयात भरती केले जाते. विविध आजरावरील 50 ते 70 शस्त्रक्रिया रोज केल्या जातात. ज्याची प्लानिंग असते. अचानकपणे होणार शस्त्रक्रिया या 25 च्या आसपास आहेत. यापैकी आता एमर्जन्सी असलेले शस्त्रक्रिया केल्या जात आहेत