Trendingसोशल मीडियावर (Social Media) अनेक व्हिडीओ आणि फोटो व्हायरल होत असतात. काही अपघाताचे तर काही दुर्घटनेचे  व्हिडीओ  पाहिल्यानंतर नेटकरी आश्चर्यचकित होतात.  एक असाच  अंगावर काटे आणणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 


सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये असे दिसत आहे की, एका इमारतीला आग लागली आहे. त्या इमारतीमध्ये एक मुलगा आणि त्याचे वडील अडकले आहेत. फॉक्स न्यूजच्या रिपोर्टनुसार, हा व्हिडीओ अमेरिकेतील न्यू जर्सीच्या साऊथ रिज वुड अपार्टमेंटचा आहे. या इमारतीला आग लागल्यानंतर तीन वर्षाच्या मुलाला आणि त्याच्या वडिलांना वाचवण्यासाठी पोलीस आणि बचाव दलाची टीम घटनास्थळी दाखल झाले. त्या पोलिसांच्या सांगण्यावरून त्या मुलाच्या वडिलांनी त्या मुलाला इमारती खाली फेकलं. मग बचाव दलातील कर्मचाऱ्यांनी त्या मुलाला पकडलं.  
 





व्हिडीओमध्ये पुढे दिसते की, त्या मुलाच्या वडिलांनी मुलाला फेकल्यानंर स्वत: देखील इमारतीवरून उडी मारली. रिपोर्टनुसार, त्या मुलाला आणि त्याच्या वडिलांना कोणतीही दुखापत झाली नाही. हा व्हिडीओ सध्या व्हायरल झाला. अनेक नेटकऱ्यांनी या व्हिडीओला लाइक्स आणि कमेंट्स केल्या आहेत. 


महत्वाच्या बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha