Viral Video : सोशल मीडियावर अनेक धक्कादायक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहेत. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये अमेरिकेत एका अपार्टमेंटमध्ये लागलेल्या आगीमुळे मुलाला वाचवण्यासाठी वडील त्याला इमारतीवरून खाली फेकून देत असल्याचे दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकरी चांगलेच चक्रावले आहेत.


सोशल मीडियावर समोर आलेल्या एका व्हिडीओमध्ये एका इमारतीला लागलेल्या आगीमुळे त्यात अडकलेले वडील आणि त्यांचा 3 वर्षांचा मुलगा अतिशय धोकादायक परिस्थितीत पोहोचल्याचे दिसून येते. इमारतीला लागलेली आग एवढी धोकादायक होती की, त्यांना इमारतीतून बाहेर पडता येत नव्हते. अशा स्थितीत आपल्या मुलाला आगीपासून वाचवण्यासाठी वडील त्याला इमारतीवरून खाली फेकत असल्याचे या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये दिसत आहे.






फॉक्स न्यूजच्या रिपोर्टनुसार, हा व्हिडीओ अमेरिकेतील न्यू जर्सी येथील साउथ रिज वुड अपार्टमेंट येथील असल्याचे सांगण्यात येत आहे. जिथे नुकतीच आग लागल्याने एका वडिलांनी आपल्या तीन वर्षांच्या मुलाला आगीतून वाचवण्यासाठी आलेल्या पोलीस आणि बचाव पथकाच्या लोकांच्या सांगण्यावरून दुसऱ्या मजल्यावरून खाली फेकले. मात्र, यावेळी पोलीस आणि बचाव पथकाने मुलाला जमिनीवर पडण्यापूर्वीच झेलले.


पोलिसांच्या सांगण्यावरून त्या व्यक्तीनेही नंतर इमारतीतून खाली उडी मारून आपला जीव वाचवल्याचे व्हिडीओत पुढे दिसत आहे. यादरम्यान कोणालाही मोठी दुखापत झाली नसल्याचे सांगण्यात येत आहे. ही संपूर्ण घटना पोलिसांच्या बॉडी कॅमेऱ्यात कैद झाली आहे. त्यानंतर हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha