ST : एसटी महामंडळाच्या उत्पन्नात 12 कोटी रुपयांची वाढ, आर्थिक घडी रुळावर येण्यास होणार मदत
ST : उत्पन्न वाढत असल्याने एसटी महामंडळाची आर्थिक घडी रुळावर येण्यास होणार मदत होणार आहे.
ST : एसटी संप (ST Strike) आणि कोरोना काळानंतर (Corona) पहिल्यांदाच मंगळवारी महामंडळाचे उत्पन्न दिवसाला 25 कोटी 47 लाखांवर पोहोचले आहे. तर एसटी महामंडळाच्या दिवसाच्या सरासरीच्या उत्पन्नात 12 कोटी रुपयांची वाढ झाली आहे. एसटी महामंडळाचा 10 वर्षांतला आर्थिक उच्चांकी आकडा वाढत असून, एसटीची आर्थिक घडी रुळावर येण्यास होणार मदत होणार आहे.
संपानंतर पुन्हा एकदा प्रवासी एसटीकडे परतले
एसटीच्या ताफ्यात असलेल्या 13 हजार गाड्यांमधून येणारे सर्वाधिक उत्पन्न पाहायला मिळत आहे. तर एसटी संपानंतर पुन्हा एकदा प्रवासी एसटीकडे परतत असल्याचे आकडेवारीवरुन स्पष्ट झाले आहे. संप काळात एसटीपासून प्रवासी वर्ग दुरावला होता. तर 30 ऑक्टोबर रोजी दिवसाला 23 कोटींपर्यंतचे उत्पन्न जमा झाले होते.
'एसटी' ची दिवाळी जोरात! उत्पन्न 20 कोटी पर्यंत वाढले
दिवाळीमध्ये तिकीटात केलेल्या 10 टक्के भाडेवाढीमुळे एसटी महामंडळाचे उत्पन्न 8 कोटींनी वाढले असल्याची माहिती मिळत होती. एसटी महामंडळाचे सरासरी दर दिवसाला उत्पन्न 15 कोटींच्या जवळपास आहे. 1 नोव्हेंबरपासून पुन्हा तिकीट दर जैसे थे होते, मात्र प्रवासी वर्ग पुन्हा एसटीकडे परतत असल्यानं उत्पन्न 20 कोटींपर्यंत राहण्याचा अंदाज वर्तविण्यात आला होता. या काळात एसटी महामंडळाने प्रति किलोमीटर जास्तीत जास्त उत्पन्न आणण्यासाठी प्रत्येक विभागाला दैनंदिन उद्दीष्ट दिले होते. त्यामध्ये धुळे विभाग प्रथम, जळगाव विभाग द्वितीय तर कोल्हापूर विभागाने तृतीय क्रमांक पटकावला आहे. दिवाळी मध्ये सर्वाधिक उत्पन्न 31 आक्टोबर रोजी 25 कोटी 48 लाख इतके आले आहे. तर दिवाळीपूर्वी एसटीचे दैनंदिन उत्पन्न सरासरी 13 कोटीच्या आसपास होते. ते दिवाळीमध्ये तब्बल 20 कोटी पर्यंत गेले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
Mumbai News : चेंबूर कॅम्प परिसरात ठाकरे गटाच्या आजी-माजी महिला शाखा प्रमुखांमध्ये तुफान राडा, शाखेच्या जागेवरुन वाद