CM Uddhav Thackeray : अद्याप कोरोनाचा धोका गेलेला नाही, त्यामुळे काळजी घेणे आवश्यकच आहे, बंधनमुक्त आयुष्य आपण पुन्हा सुरू करतोय, कोरोना प्रमाणेच प्रदूषण पण एक प्रकारचा विषाणू आहे, पर्यावरणाची हानी होऊ न देता विकास व्हायला हवा असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. असे वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पर्यायी इंधन परिषदेत केले. यावेळी मुख्यमंत्री व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी झाले होते. नागरिकांशी त्यांनी ऑनलाईन संवाद साधला


 मार्गदर्शन करणं हा राजकारण्यांचा छंद
आम्ही केवळ महाराष्ट्राचा नाही, तर देशाचा विचार करतो, दरम्यान पर्यावरणाची हानी होऊ न देता विकास व्हायला हवा असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. महाराष्ट्राच्या जनतेच्या दृष्टीनं चांगली कामं गेल्या दोन दिवसात सुरु झाली आहेत, दरम्यान मार्गदर्शन करणं हा राजकारण्यांचा छंद आहे. आगगाड्या आल्या, कामगार कोळसा टाकत राहायचे, लहाणपणी गाणं होतं, धुरांच्या रेषा लांबून पाहताना बरं वाटायचं, आज आपलं लक्ष गेल्यानं धूर टाकण्याऱ्या गाड्या बंद झाल्या असे सांगत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना टोला लगावला आहे.


महाराष्ट्रातील जनतेला आरोग्यदायी जीवन करण्यावर विचार


महाराष्ट्राच्या जनतेच्या दृष्टीनं चांगली कामं गेल्या दोन दिवसात सुरु झाली होती, महाराष्ट्रातील जनतेला आरोग्यदायी जीवन कसं प्राप्त करु शकतो याबाबत विचार करतोय, पुण्यानं नेतृत्त्वं स्वीकारलंय, नागपूर , मुंबई आणि मराठवाड्यात परिषदेचे आयोजन करु, आपण जे काम करतोय त्याबद्दल जनजागृती करु, आजच्या चर्चासत्रात पर्यायी इंधनासंबंधात काम करत आहोत असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.


संबंधित बातम्या


युतीचं सरकार आल्यानंतर शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार : उद्धव ठाकरे


"मी निवडणूक लढवावी की नाही याचा निर्णय उद्धव साहेब घेतील," : आदित्य ठाकरे


विधानसभेसाठी युती राहणार, पण मुख्यमंत्री भाजपचाच, अमित शाहांच्या भूमिकेवरुन शिवसेनेत अस्वस्थता