दररोज सकाळी हे बुलेटिन प्रसारित केलं जातं. एबीपी माझाच्या या बुलेटीनमध्ये दररोज सकाळी राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, मनोरंजन, क्रिडा विश्वातील महत्त्वाच्या दहा बातम्यांचा आढावा घेतला जातो.


1. आंदोलनस्थळी शौचालय, पाण्याची सुविधा नाही, मुंबई पालिकेसमोर एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन


ST Workers : गेल्या ऑक्टोबर महिन्यापासूनपासून आझाद मैदानात एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. आझाद मैदानामध्ये सुरु असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामध्ये मुंबई महानगर पालिकेकडून मूलभूत सुविधा मिळत नाहीत. त्यामुळे एसटी कर्मचारी आक्रमक झाले आहेत. आज एसटी कर्मचाऱ्यांनी मुंबई महानगरपालिका मुख्यालयाबाहेर चक्काजाम आंदोलन सुरु केलं आहे. पिण्याचे पाणी आणि शौचालय नसल्यामुळं हे आंदोलन केलं जात आहे. मुंबई महानगरपालिकेसमोर असलेला रस्ता पूर्णपणे एसटी कर्मचाऱ्यांनी जाम करुन टाकला आहे.


2. मुंबै बँक बोगस मजूर प्रकरणी प्रवीण दरेकरांना नोटीस, आज चौकशीला हजर राहण्याच्या सूचना, पोलिसांना सर्व सहकार्य करणार, दरेकरांची माहिती


3. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राज ठाकरेंची भेट, दोघांमध्ये सुमारे 2 तास चर्चा, व्यक्तिगत आणि कौटुंबिक भेट असल्याची गडकरींची माहिती 


4. रिफायनरी प्रकल्प विदर्भात उभारा, प्रकल्प उभारल्यास वेगळा विदर्भ मागणार नाही, काँग्रेस नेते आशिष देशमुख यांची मागणी


5. महसूल अधिकाऱ्यांचे अधिकार आरडीएक्स सारखे, नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडेंचं पोलीस  महासंचालकांना पत्र, महसूल यंत्रणेकडून कार्यकारी दंडाधिकारी पदाचे अधिकार काढून घेण्याची मागणी


पाहा व्हिडीओ : स्मार्ट बुलेटिन : 04 एप्रिल 2022 : सोमवार



6. चांदिवली, कल्याणमध्ये मनसेकडून लाऊडस्पीकरवर हनुमान चालिसा पठण, संजय राऊतांचं टीकास्त्र, तर अमित ठाकरेंना हनुमान चालिसा म्हणायला लावा, सुजात आंबेडकरांची टीका


7. श्रीलंकेच्या संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा, सामुहिक राजीनाम्याचं कारण अस्पष्ट, सरकारविरोधात नागरिकांची जोरदार निदर्शनं, श्रीलंकेत आणीबाणी लागू


8. अविश्वास प्रस्ताव रद्द झाल्यानंतर सर्वोच्च न्यायायल बनलं पाकिस्तानच्या राजकारणाचं केंद्र, संसद भंग करण्याच्या याचिकेवर आज सुनावणी, इम्रान खान राहणार 15 दिवसांचे काळजीवाहू पंतप्रधान


9. अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये गोळीबारात सहा जणांचा मृत्यू, 12 जण जखमी, गोळीबाराचं कारण अस्पष्ट, गोळीबारानंतर नागरिक सैरावैरा पळत असल्याचा व्हिडीओ


10. रणबीर कपूर आणि आलिया भट याच महिन्यात रेशीमगाठीत अडकणार, डेस्टिनेशन वेडिंगऐवजी मुंबईतील आर.के. हाऊसमध्ये सोहळा पार पडणार असल्याची चर्चा