Maharashtra Breaking News LIVE Updates: तोडगा न निघाल्यास एसटीचे खाजगीकरण करण्याचा निर्णय, सूत्रांची माहिती

Maharashtra Breaking News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये.

abp majha web team Last Updated: 18 Nov 2021 09:04 PM
तोडगा न निघाल्यास एसटीचे खाजगीकरण करण्याचा निर्णय, सूत्रांची माहिती

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा न निघाल्यास एसटीचे खाजगीकरण करण्यावर शिक्कामोर्तब करण्याचा निर्णय घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 


 

अमरावती शहरात उद्या संचारबंदी शिथिलतेत बदल

उद्या अमरावती शहरातील जीवनावश्यक वस्तूची दुकानं आणि कृषी दुकान उघडण्याची वेळ सकाळी 9 ते 12 आणि दुपारी 3 ते 6 राहणार आहे. आधी सकाळी 11 ते सायंकाळी 5  वेळ होती
परीक्षार्थींना परीक्षेसाठी संचारबंदीत सवलत कायम आहे.  पोलीस आयुक्त डॉ.आरती सिंह यांनी हा आदेश दिला आहे. हा बदल एका दिवसासाठी आहे.

आटपाडी राडा प्रकरण: गोपीचंद पडळकरांचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयानं फेटाळला

भाजप आमदार गोपीचंद पडळकरांचा अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायालयानं  फेटाळलाय. पडळकर यांच्यासह माजी जिल्हा परिषद सदस्य तानाजी पाटील यांचाही अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयानं फेटाळलाय.

अकोला शहरातील जमावबंदी आणि संचारबंदीचे आदेश दोन दिवसांसाठी वाढविले

अकोला शहरातील जमावबंदी आणि संचारबंदीचे आदेश दोन दिवसांसाठी वाढविले. हे आदेश 21 नोव्हेंबर सकाळी 6 वाजेपर्यंत वाढवण्यात आले. त्यानुसार, संध्याकाळी 7 वाजल्यापासून सकाळी 6 वाजेपर्यंत संचारबंदी असणार. तर, सकाळी 6 ते रात्री 7 दिवसा जमावबंदी असणार आहे. 

ठाण्यात 500 स्केअर फुटापर्यंतच्या घरांना मिळणार कर माफी

ठाण्यात 500 स्के फुटापर्यंतच्या घरांना मिळणार कर माफी,ठाणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये सर्व पक्षीयांच्या संमतीने निर्णय घेण्यात आला. 2017 साली महापालिका निवडणुकीत शिवसेनेने दिलेले करमाफीचे आश्वासन दिले होते.  गेल्या विधानसभेच्या शिवसेनेच्या वचनाम्यामध्ये हा मुख्य मुद्दा होता 

अकोला जिल्ह्यातील उपसभापती पदांवर वंबआचे चार उमेदवार

अकोला: जिल्ह्यात आज झालेल्या पाचपैकी चार उपसभापती पदांवर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार विजयी झाले. अकोला, अकोट, तेल्हारा आणि पातूर पंचायत समिती उपसभापती पदी वंचितचे उमेदवार विजयी झालेत. बार्शीटाकळी पंचायत समिती उपसभापती पदावर भाजपचा कब्जा आहे. 

शरद पवारांचे संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना संप मागे घेण्याचे आवाहन

गडचिरोलीत शरद पवारांनी संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना संप मागे घेण्याचे आवाहन केले आहे. सरकारने संवादातून मार्ग काढावा अशीही सूचना त्यांनी केली. प्रसंगी आम्ही मध्यस्थी करण्यास तयार असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. विलिनीकरण अशक्य असल्याचे अप्रत्यक्ष संकेत त्यांनी दिले. एसटी कर्मचारी संघटनांनी आडमुठेपणाचा मार्ग सोडावा असे आवाहन करत सरकारशी चर्चा करताना मान्यताप्राप्त संघटनांशी चर्चा करता येते मात्र जमावाशी नाही हे त्यांनी लक्षात आणून दिले.

सातारा: पावसाच्या तुरळक सरी

साताऱ्यामध्ये पावसाच्या तुरळक सरी कोसळल्या आहेत. मागील काही दिवसात राज्यातील काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. 

कोरोनामुळे नियुक्त्या रखडलेल्या एसटी महामंडळातील 3 हजार 500 कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा

कोरोनामुळे नियुक्त्या रखडलेल्या एसटी महामंडळातील 3 हजार 500 कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा झाला आहे.  2019 साली सरळसेवा भरती प्रक्रियेतून निवड झालेल्या चालक तथा वाहक आणि सहाय्यक यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. राज्यातील एसटी संपाच्या पार्श्वभूमीवर आता राज्य सरकारची नियुक्त्या रखडलेल्या कर्मचाऱ्यांना संधी देण्याची तजवीज सुरू 'एबीपी माझा'ला एसटी महामंडळातील वरिष्ठ सूत्रांची माहिती

देवेंद्र फडणवीसांच्या घरी एसटी संपाबाबत बैठक, अनिल परब, बाळासाहेब थोरात उपस्थित

राज्यात सुरु असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या  संपाबाबत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या घरी एक महत्वाची बैठक सुरु आहे. या बैठकीला अनिल परब, बाळासाहेब थौरात, गोपीचंद पडळकर यांच्यासह अनेक महत्त्वाचे नेते उपस्थित आहेत

वानखेडे विरूद्ध नवाब मलिक खटल्याचा निकाल सोमवारी

एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्या वडिलांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्याविरोधात दाखल केलेल्या खटल्याचा निकाल सोमवारी जाहीर होणार आहे.  संध्याकाळी साडे पाच वाजता न्या. माधव जामदार निकाल जाहीर करणार आहेत.

विधान परिषद पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी काँग्रेसच्या हालचाली

विधान परिषद पोट निवडणूक बिनविरोध करण्यासाठी काँग्रेसच्या हालचाली, नाना पटोलेंपाठोपाठ बाळासाहेब थोरातही विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार, दुपारी तीन वाजता बाळासाहेब थोरात देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याची माहिती, देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या सरकारी निवासस्थानी बाळासाहेब थोरात देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत

पहिली ते सातवी शाळा पुढील 15 दिवसात सुरू करण्याचा शिक्षण विभागाचा विचार

पहिली ते सातवी शाळा पुढील 15 दिवसात सुरू करण्याचा शिक्षण विभागाचा विचार


राज्यातील पहिली ते सातवी शाळा सुरू करताना राज्यभरात सरसकट सुरू करण्यात याव्यात, अशा प्रकारे शिक्षण विभाग टास्क फोर्स, कॅबिनेट समोर प्रस्ताव ठेवणार आहे


मात्र, टास्क फोर्स सोबत येणाऱ्या मंगळवारी जेव्हा बैठक होईल तेव्हा टास्क फोर्स कडून टप्प्याटप्प्याने शाळा सुरू करण्याबाबत विचार करावा असे मत मांडले जाणार आहे


टास्क फोर्सच्या म्हणण्यानुसार शहरी भागात सुरुवातीला पाचवी ते सातवीच्या वर्ग सुरू कराव्यात तर ग्रामीण भागांमध्ये पहिली ते चौथी चे वर्ग सुरू करावे


त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये शहरी भागामध्ये पहिली ते चौथीचे वर्ग सुरू करावेत


आता टास्क फोर्स या सूचना येणाऱ्या बैठकीत देणार असल्याची माहिती आहे, त्यानंतर शाळा सुरू करण्याबाबत शिक्षण विभाग पुढील कॅबिनेटमध्ये चर्चा करेन शिवाय मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केल्यानंतर शाळा कधी सुरू कराव्यात याबाबत निर्णय घेईल

मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन आणि विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांना मोठा दिलासा 

मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन आणि विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांना मोठा दिलासा ..मुंबई बँक घोटाळा प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेला  तूर्तास कोणतीही कठोर कार्रवाई न करण्याचे आदेश. ह्या पूर्वी सदर  प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखे तर्फे दाखल सी..समरी रिपोर्ट दंडाधिकारी कोर्टानं फेटाळत तपास करण्याचे निर्देश. 123  कोटी रूपयांच्या अनियमितता प्रकरणाचा तपास करत आहे ईओडब्ल्यू .  पुढील सुनावणी 2 डिसेंबरला ठेवण्यात आली आहे

महाविकास आघाडीच्या मेळाव्यात राजू शेट्टी यांनी व्यक्त केली नाराजी

महाविकास आघाडीच्या मेळाव्यात राजू शेट्टी यांनी व्यक्त केली नाराजी


पूरग्रस्त निधीवरून नागरिक नाराज आहेत याची दखल घ्या


राजू शेट्टी यांचा भर सभेत उपस्थित मंत्र्यांना टोला


हीच वेळ आहे तुम्हाला सांगण्याची आणि तुम्ही ऐकून घेण्याची- शेट्टी

हिवाळी अधिवेशन नागपूरला होणार, 20 डिसेंबरपासून नागपूरला हिवाळी अधिवेशन घेण्याच्या हालचालींना सुरुवात, सूत्रांची माहिती 

हिवाळी अधिवेशन नागपूरला होणार, 20 डिसेंबर पासून नागपूरला हिवाळी अधिवेशन घेण्याच्या हालचालींना सुरुवात, आठ दिवसांचं अधिवेशन होण्याची शक्यता, मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करुन होणार अंतिम निर्णय,सूत्रांची माहिती 

पहिली ते सातवी शाळा पुढील 15 दिवसात सुरू करण्याचा शिक्षण विभागाचा विचार 

पहिली ते सातवी शाळा पुढील 15 दिवसात सुरू करण्याचा शिक्षण विभागाचा विचार 


राज्यतील पहिली ते सातवी शाळा सुरू करताना राज्यभरात सरसकट सुरू करण्यात याव्यात, अशा प्रकारे शिक्षण विभाग टास्क फोर्स, कॅबिनेट समोर प्रस्ताव ठेवणार आहे


मात्र, टास्क फोर्स सोबत येणाऱ्या मंगळवारी जेव्हा बैठक होईल तेव्हा टास्क फोर्स कडून टप्प्याटप्प्याने शाळा सुरू करण्याबाबत विचार करावा असे मत मांडले जाणार आहे


टास्क फोर्सच्या म्हणण्यानुसार शहरी भागात सुरुवातीला पाचवी ते सातवीच्या वर्ग सुरू कराव्यात तर ग्रामीण भागांमध्ये पहिली ते चौथी चे वर्ग सुरू करावे


त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये शहरी भागामध्ये पहिली ते चौथीचे वर्ग सुरू करावेत


आता टास्क फोर्स या सूचना येणाऱ्या बैठकीत देणार असल्याची माहिती आहे, त्यानंतर शाळा सुरू करण्याबाबत शिक्षण विभाग पुढील कॅबिनेटमध्ये चर्चा करेन शिवाय मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केल्यानंतर शाळा कधी सुरू कराव्यात याबाबत निर्णय घेईल

लस घेणं टाळणं अत्यंत धोकादायक... : अदर पुनावाला

Corona Vaccine : देशाला कोरोनाच्या प्रादुर्भावात कोरोना प्रतिबंधक लस देऊन नवसंजवनी देणाऱ्या सीरम इंस्टीट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ (CEO) अदर पुनावाला (Adar Poonawalla) यांनी बुधवारी देशवासियांना लस घेण्याचं आवाहन केलं. कोरोनावर मात करण्यासाठी लसीचा डोस घेणं अत्यंत आवश्यक आहे. जर कोणी लस घेण्याचं टाळत असेल, तर सध्या हा सर्वात मोठा धोका आहे. पुनावाला म्हणाले की, देशातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये 20 कोटी लसीचे डोस अद्यापही उपलब्ध आहेत. त्यामुळे ज्यांनी अजूनही लस घेतली नाही, त्यांनी लवकरात लवकर लस घेतली पाहिजे.


 



तुमच्या शहरांतील पेट्रोल-डिझेलचे दर काय?

Petrol and Diesel Price in India : भारतीय तेल कंपन्यांनी (IOCL) आजचे पेट्रोल-डिझेलचे नवे दर (Petrol Diesel Rate) जारी केले आहेत. आजही पेट्रोल-डिझेलच्या वाढणाऱ्या किमतींमध्ये सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. भारतीय तेल कंपन्यांनी आज पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये कोणताही बदल केलेला नाही. गेल्या महिन्यांत पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये सातत्यानं वाढ होत असल्याचं पाहायला मिळालं होतं. परंतु, गेल्या काही महिन्यांपासून पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर असल्याचं पाहायला मिळत आहे. आज देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईत पेट्रोलची किंमत 109.98 रुपये प्रति लिटर आहे. तर डिझेलची किंमत  94.14 रुपये प्रति लिटर इतकी आहे. तर देशाच्या राजधानीचं शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दिल्लीत पेट्रोलची किंमत (Petrol Price)103.97 रुपये प्रति लिटर, तर डिझेलची किंमत  86.67 रुपये प्रति लिटर इतकी आहे.


भारतीय तेल कंपनी इंडियन ऑयल कॉर्पोरेशन (IOCL) नं दिलेल्या माहितीनुसार, चेन्नईमध्ये पेट्रोल 101.40 रुपये प्रति लिटरनं आणि डिझेल 91.43 रुपये प्रति लिटरनं विकलं जात आहे. तर कोलकातामध्ये डिझेलची किंमत 89.79 रुपये आणि पेट्रोल 104.67 रुपयांनी विकलं जात आहे. 


सविस्तर वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अनिल देशमुखांना पुन्हा त्यांच्या जागेवर बसवायचंय : प्रफुल पटेल

Praful Patel oN Anil Deshmukh : महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना पुन्हा त्यांच्या जागेवर बसवायचं आहे, असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल पटेल यांनी केलं आहे. नागपुरातल्या लकडगंज परिसरात झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ता मेळाव्यात त्यांनी हे वक्तव्य केलं. शरद पवारांच्या आशिर्वादानं अनिल देशमुख लवकरच जेलमधून बाहेर येतील, असा विश्वासही यावेळी प्रफुल पटेल (Praful Patel) यांनी व्यक्त केला. हे आपलं मत नसून शरद पवार (Sharad Pawar) यांचं मत असल्याचं स्पष्टीकरणही प्रफुल पटेलांनी दिलं आहे. 


प्रफुल पटेल यावेळी बोलताना म्हणाले की, "हे अनिल भाऊ लवकरच आपल्या सोबत येतील. पवार साहेबांच्या आशीर्वादामुळे. पवार साहेबांचा पूर्ण आशीर्वाद त्यांच्या पाठीशी आहे. आणि आपल्याला लवकरात लवकर अनिल बापूला परत या त्यांच्या जागेवर बसवायचं आहे. हे पवार साहेबांचे विचार आहेत. माझ्या एकट्याचे नाहीत. म्हणून मी तुम्हाला सांगू इच्छितो की, आपण त्यांच्या अनुपस्थितीमध्ये कोणतीही पोकळी निर्माण झालीये, असं कोणाला वाटू नये. 


सविस्तर वाचण्यासाठी येथे क्लिक करा

Maharashtra Board SSC Exam 2022 Online Registration  : आजपासून दहावीच्या परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज नोंदणी करता येणार

Maharashtra Board SSC Exam 2022 Online Registration  : आजपासून दहावीच्या परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरता येणार आहे. वर्ष 2022मध्ये घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षेसाठी आजपासून ऑनलाईन अर्ज नोंदणी सुरु होणार आहे. नियमित शुल्कासह पहिल्यांदात परीक्षेला बसणारे विद्यार्थी 9 डिसेंबरपर्यंत परीक्षा अर्ज सादर करू शकतात. या मुदतीनंतर अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांकडून विलंब शुल्क आकारण्यात येणार आहे. विलंब शुल्कासह अर्ज करण्याची मुदत 20 ते 28 डिसेंबरपर्यंत आहे. विद्यार्थ्यांनी शाळांमार्फत मंडळाच्या www.mahahsscboard.in या वेबसाईटवर परीक्षा अर्ज पाठवायचे आहेत. 

बुलडाणा - खामगाव आगारातील एसटी कर्मचारी विशाल अंबलकर यांचा मृत्यू

बुलडाणा - खामगाव आगारातील एसटी कर्मचारी विशाल अंबलकर यांचा मृत्यू


काल रात्री आपल्या राहत्या घरी विष घेऊन केला होता आत्महत्येचा प्रयत्न.


रात्री अकोला येथील शासकीय रुग्णालयात झाला उपचारादरम्यान मृत्यू.


एसटी संपामुळे व्यथित होऊन व आपल्यावर कारवाई होईल या भीतीपोटी घेतलं होतं विष.


विशाल अंबलकर अविवाहित होते.

पार्श्वभूमी

रविकांत तुपकरांचं अन्नत्याग आंदोलन, पोलिसांनी नागपुरातून बुलडाण्यात सोडलं, आंदोलनावर ठाम, प्रकृती बिघडली
 
नागपूर : काल नागपुरात रात्री स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांना अटक करण्यात आली आहे. नागपूर पोलिसांनी रात्री 10 वाजून 20 मिनिटांनी ही अटक केली. कापूस आणि सोयाबीनच्या प्रश्नावर त्यांनी नागपुरात बेमुदत अन्नत्याग सत्याग्रह आंदोलनाला सुरू केलंय. मात्र, नागपुरातील तुपकरांच्या आंदोलनात 'हाय होल्टेज' नाट्य रंगल्याचं पाहायला मिळालं. अटक केलेल्या तुपकरांना रातोरात पोलीस बंदोबस्तात बुलडाण्याकडे रवाना करण्यात आलं आहे.  कापूस-सोयाबीन प्रश्नावर काल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकरांनी बेमुदत अन्नत्याग सत्याग्रह आंदोलन सुरू केलं होतय. सरकारने कोरोना आणि जमावबंदीचं कारण देत तुपकरांच्या आंदोलनाला परवानगी नाकारलीय. आंदोलनादरम्यान काल रात्री 10 वाजून 20 मिनिटांनी तुपकरांना अटक करण्यात आली. प्रकृती खालावलेल्या तुपकरांना जबरदस्तीने उपचारांसाठी नागपुरात दवाखान्यात नेण्यात आलं. मात्र, त्यांनी उपचारास स्पष्ट नकार देत आपलं अन्नत्याग आंदोलन सुरूच ठेवलंय. अखेर सरकारने तुपकरांना रातोरात जबरदस्तीने पोलीस बंदोबस्तात बुलडाण्याकडे रवाना केलं. 
 


T20I Rankings: टी 20 क्रमवारीत केएल राहुलची घसरण, कोण आहे नंबर वन...


ICC T20I Rankings: टी20 वर्ल्डकपनंतर (T20 WorldCup) पहिल्यांदाच आयसीसीने (ICC T20 Ranking) ने टी20 रॅकिंग जाहीर केली आहे. टी-20 वर्ल्डकपमध्ये धावा करणाऱ्या फलंदाजांना फायदा झाला आहे.  मात्र, पहिल्या पाच खेळाडूंमध्ये एकाही भारतीयाचा समावेश नाही.भारताचा स्टार फलंदाज केएल राहुल (KL Rahul) ची आयसीसी क्रमवारीत घसरण झाली आहे. तो सहाव्य़ा स्थानावर गेला आहे तर विराट कोहली  (Virat Kohli) आठव्या स्थानावर कायम आहे. तर भारतीय टी 20 संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) 15 व्या स्थानावरून 16 व्या स्थानावर घसरला आहे. फलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल तीन फलंदाजांमध्ये कोणताही बदल झालेला नाही. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम 839 रेटिंग गुणांसह पहिल्या स्थानावर आहे. इंग्लंडचा डेव्हिड मलान दुसऱ्या तर एडन मार्करम तिसऱ्या स्थानावर आहे.


बळीराजा दुहेरी पेचात! इकडे आड, तिकडे विहिर; अवकाळी पाऊस त्यात महावितरणाची नोटीस


मुंबई : एकीकडे शेतमालाला हमी भाव मिळत नाही, तर दुसरीकडे अतिवृष्टीने हाता तोंडाशी आलेला घास हिरावून घेतला जात आहे. अशात आता सरकार पण शेतकऱ्यांची परीक्षा घेतंय का?, असा सवाल विचारला जातोय. कारण एकीकडे राज्य शासनानं अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसान भरपाई म्हणून काही रक्कम देऊ केली. आणि आता महावितरणकडून शेतकऱ्यांनी वीज बिल भरले नाही म्हणून सरसकट डीपी डिस्कनेक्ट केले जातायत. त्यामुळे पिकांना पाणी कसं द्यायचं, असा प्रश्न शेतकर्‍यांसमोर उभा राहीलाय. त्यातच 3 एचपी मोटरसाठी 10 हजार तर 5 एचपी मोटरसाठी 15 हजार भरण्याचीही महावितरणकडून सक्ती केली जात असल्याचं बळीराजा सांगतोय.दरम्यान वीजबिलांच्या प्रचंड थकबाकीमुळे महावितरण कंपनी सध्या आर्थिक संकटात आहे. राज्यात सर्वाधिक थकबाकी कृषिपंपधारक शेतकऱ्यांकडे आहे. हे ग्राहक वीजबिल भरतच नसल्याची ओरड सातत्याने केली जाते. राज्यात महावितरणच्या थकबाकीचा डोंगर सध्या खूप मोठा झाला आहे. ही अभूतपूर्व थकबाकी वसूल करण्याचे मोठे आवाहन महावितरणपुढे आहे. असे असले तरी लॉकडाऊनकाळात वीज ग्राहकांना वाढीव बिलांचा शॉक बसला. आधीच अनेकांचे रोजगार गेले, त्यात वाढीव वीजबिले आल्याने सर्वसामांन्यांचे कंबरडे मोडले. त्यात आता पिकांना पाणी देण्याच्या एचपी मोटरसाठी  10 ते 15 हजार भरण्याची सक्ती वीजबिल भरण्यासाठी महावितरणने केली आहे. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.