Breaking News LIVE Updates : बाबासाहेब पुरंदरेंची प्रकृती गंभीर, पुण्यात उपचार सुरु

Maharashtra Breaking News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये.

abp majha web team Last Updated: 14 Nov 2021 07:59 PM
 बाबासाहेब पुरंदरेंची प्रकृती गंभीर, पुण्यात उपचार सुरु

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरु आहे. 

ऑस्ट्रेलियानं नाणेफेक जिंकली, प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय

टी-20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियानं प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. 

अमरावतीच्या ग्रामीण भागातही संचारबंदी
अमरावती शहरात दोन दिवस हिंसाचार झाला. काल भाजपने अमरावती शहर बंदच आवाहन केलं होतं तर आज भाजपा महिला जिल्ह्याध्यक्ष निवेदिता चौधरी यांनी ग्रामीण परिसर बंदचं आवाहन केलं. ग्रामीण भागातील परिस्थिती नियंत्रणात राहावी याकरिता ग्रामीण पोलीस अधीक्षक यांनी परतवाडा अचलपूर, वरुड, अंजनगाव सुर्जी, मोर्शी याठिकाणी मध्यरात्रीपासून संचारबंदी लागू करण्यात आली आहे. सोबतच ग्रामीणही इंटरसेवा बंद करण्याचा विचार पोलिसांचा असल्याची माहिती पोलीस अधीक्षकांनी एबीपी माझाला दिली तसेच ज्या लोकांमुळे परिस्थिती बिघडू शकते अशा लोकांचा शोध घेऊन त्यांना स्थानबद्ध केले आहे.. सद्या अमरावती जिल्ह्यातील परिस्थिती असून पोलिसांचे पथक मुख्य ठिकाणी तैनात असल्याची माहिती अमरावतीचे पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी दिली..
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट ला सहकार मंत्री अमित शहा भेट देणार

वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटला सहकार मंत्री अमित शहा भेट देणार असल्याची माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. आम्ही खूप व्यापक मनाचे आहोत, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट ही साखर उद्योगात बेसिक संशोधन करणारी इन्स्टिट्यूट आहे. सत्तेत असताना मी ही बराच वेळा भेट दिलीय. अमित शहा हे सहकार मंत्री आहे त्यामुळे ते व्ही एस आय ला भेट देऊ शकतात त्यात काहीही चुकीचे नाही. 'व्ही एस आय' ही काय पवार साहेबांची प्रॉपर्टी नाही, पवारांनी पुढाकार घेऊन ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी सुरु केलेली चांगली संस्था आहे.

तर मुंबईत हिंदू जिवंत राहिला नसता - चंद्रकांत पाटील

भाजप हे सॉफ्ट टार्गेट होतेय, राज्यात काही झालं की भाजपचा हात आहे बोललं जातं आहे. परवाच्या तोडफोडीत कोणाचा हात होता? हे ही संजय राऊत यांनी सांगून टाकावं. कालची प्रतिक्रिया हिंदू मार नही खायेगा अशीच होती, उत्स्फूर्त प्रतिक्रिया होती. 1993 च्या दंगलीत बाळासाहेबांनी हिंदूंसाठी पुढाकार  घेतला नसता तर मुंबईत हिंदू जिवंत राहिला नसता. पण आता हिंदुहृदयसम्राट यांचे वारसदार काही बोलणार नाही का?, असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केलाय. ते पुण्यात बोलत होते. 

सावंतवाडीतील दुहेरी हत्याकांडाचे अखेर गुढ उकलले, आरोपी जेरबंद



सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी उभाबाजार परिसरात आठवड्याभरापूर्वी घडलेल्या दुहेरी हत्याकांडाचे गुढ उकलण्यास सावंतवाडी पोलिसांना यश आले आहे. वयोवृद्ध असलेल्या निलिमा खानविलकर आणि शालिनी सावंत यांचा गळा चिरून निर्घृण खून करण्यात आला होता. या प्रकरणात संशयित असलेला आणि आत्महत्येचा प्रयत्न करून गेले काही दिवस बेपत्ता असलेला कुशल टंगसाळे यानेच हा खून केल्याचे आता तपासात निष्पन्न झाले आहे. कर्जबाजारी झाल्यामुळे तसेच पाच लाख रुपये देणे असल्यामुळे सोन्याच्या दागिन्यांसाठी आपण हा प्रकार केला अशी कबुली त्याने पोलिसांना दिली. आरोपी कुशला सावंतवाडी पोलिसांनी ठाणे येथून ताब्यात घेतले तो नाशिकला रेल्वेने पाळण्याच्या मार्गावर असताना पोलिसांनी ताब्यात घेतले.

















 

 



 










 महाराष्ट्र पोलिस अकादमीत कोरोनाचा शिरकाव , गेल्या तीन दिवसात 22 प्रशिक्षणार्थी पाेलिस उपनिरीक्षकांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर

 महाराष्ट्र पोलिस अकादमीत कोरोनाचा शिरकाव , गेल्या तीन दिवसात 22 प्रशिक्षणार्थी पाेलिस उपनिरीक्षकांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर


- दिवाळीच्या सुट्टीत गावी गेलेले प्रशिक्षणार्थी अकादमीमध्ये दाखल होताच करण्यात आली चाचणी 


- बाधितांवर महापालिकेच्या बिटको रुग्णालयात उपचार सुरु


- पोलिस अकादमीत गेल्या वर्षी देखिल शंभरहून अधिक जणांना झाली होती कोरोनाची लागण

महापालिकेच्या सिटीलिंक बसमध्ये घुसून महिलेसह टोळक्याची कंडक्टर आणि ड्रायव्हरला मारहाण

महापालिकेच्या सिटीलिंक बसमध्ये घुसून महिलेसह टोळक्याची कंडक्टर आणि ड्रायव्हरला मारहाण


- म्हसरूळ परिसरातील काल संध्याकाळची घटना 


- सर्व प्रकार बसमधील सिसीटिव्ही कॅमेरात कैद  
 
- कारला कट मारल्याच्या रागातून महिला आणि तिचे साथीदार बस मध्ये घुसल्याची प्राथमिक माहिती


- म्हसरूळ पोलीस ठाण्यात अज्ञात महिला आणि साथीदारांविरोधात तक्रार दाखल


- आरोपी पोलिसांच्या ताब्यात, पुढील तपास सुरू

शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्या अडचणीत वाढ, फसवणूक आणि धमकावण्याबद्दल गुन्हा दाखल..

शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्या अडचणीत वाढ, वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये फसवणूक आणि धमकावण्याचा गुन्हा दाखल..


वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये नितीन बरई नावाच्या व्यक्तीने शिल्पा शेट्टी, राज कुंद्रा आणि काशीफ खान सोबत इतर काही लोकांवर गुन्हा दाखल केला आहे..


2014 मध्ये SFL FITNESS PVT LTD चा डायरेकटर काशीफ खानने शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रासोबत मिळून नितीन बरईला 1 कोटी रु गुंतवणूक करण्यास सांगितले होते..


पण नंतर जेव्हा काही सुरळीत चालत नव्हतं तेव्हा नितीनने त्याचे पैसे परत मागितल्यावर त्याला धमकी देण्यात आली. पोलीसांनी कलम 406,409,420,506,34,120 (B) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे..

पुण्यात हडपसरमध्ये डेकोरेशन साहित्यच्या गोडाऊनमधे आगीची घटना

पुण्यातील हडपसर, साडेसतरा नळी येथे एका डेकोरेशन साहित्यच्या गोडाऊनमधे आगीची घटना, पहाटे तीनच्या सुमारास आग लागली होती. आग विझवण्यासाठी घटनास्थळी अग्निशमन दलाच्या चार गाड्या पोहोचल्या.. अग्निशमन दलाकडून आग आटोक्यात. कुणीही जखमी नाही 

पार्श्वभूमी

Maharashtra Breaking News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये.



Gadchiroli Naxal: गडचिरोलीत पोलीस चकमकीत कमांडर मिलिंद तेलतुंबडेसह 26 नक्षल्यांचा खात्मा, शोधमोहिम सुरु, गृहमंत्र्यांकडून कौतुक









मिलिंद तेलतुंबडेचा खात्मा


दरम्यान या चकमकीत मिलिंद तेलतुंबडेचा खात्मा करण्यात आला आहे. यवतमाळ जिल्ह्यातील राजूर गावाचा रहिवासी असलेला मिलिंद तेलतुंबडे भीमा कोरेगाव प्रकरणात अटक करण्यात आलेले  प्रा. आनंद तेलतुंबडे यांचा भाऊ आहे. त्याच्यावर देखील या प्रकरणात गुन्हा दाखल आहे. याशिवाय जांभुळखेडा स्फोटात देखील त्याच्यावर गुन्हा दाखल आहे. मिलिंद हा दीपक आणि सह्याद्री अशा विविध नावानी चळवळीत वावरतो. सोबतच दंडकारण्य केंद्रीय समितीचा तो सदस्य असून त्याच्यावर एक कोटीच्यावर बक्षीस आहे.


Amravati Violence : अमरावतीत हिंसाचारानंतर संचारबंदी, इंटरनेट सेवा तीन दिवस बंद राहणार
 
अमरावती: महाराष्ट्रातील अमरावतीमध्ये 'बंद' दरम्यान हिंसाचाराच्या ताज्या घटनांनंतर शनिवारपासून संचारबंदी लागू करण्यात आला असून पुढचे तीन दिवस इंटरनेट सेवा निलंबित करण्यात आली. शहर पोलीस आयुक्त आरती सिंह यांनी याबाबत माहिती दिली. तसेच वैद्यकीय कारणाशिवाय कोणालाही घराबाहेर न पडण्याचे आदेश पोलिसांकडून देण्यात आले आहेत. अमरावतीमधील परिस्थिती सध्या नियंत्रणात आहे.त्रिपुरामधील घटनेच्या निषेधार्थ काल झालेल्या हिंसाचारानंतर अमरावतीमध्ये बंदचं आवाहन करण्यात आलं होतं. मात्र या बंदलाही हिंसक वळण लागलंय. सकाळी दहाच्या सुमारास जमाव मोठ्या संख्येनं रस्त्यावर उतरला. या जमावाने काही वेळातच दगडफेक आणि घोषणाबाजी सुरु केली. जमावाने यावेळी दुकानांना लक्ष्य केलं. दुकानांवर दगडफेक करत तोडफोड करण्याचा प्रयत्न करण्यात आला. जमावाला नियंत्रित करण्यासाठी काही ठिकाणी पोलिसांना लाठीमार करावा लागला.


- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.