Maharashtra Breaking News LIVE Updates : मुंबईच्या कांजूरमार्ग परिसरातील हेवी इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये भीषण आग

Maharashtra Breaking News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये.

abp majha web team Last Updated: 15 Nov 2021 10:18 PM
मुंबईच्या कांजूरमार्ग परिसरातील हेवी इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये भीषण आग

मुंबईच्या कांजूरमार्ग परिसरातील हेवी इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये भीषण आग लागली आहे. अग्निशमन दलाच्या 12 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. कांजूरमार्गमधील डब्बावाला कंपाऊंडजवळ ही भीषण आग लागली आहे.

अमरावती शहरात बंद केलेली इंटरनेट सेवा 24 तासांनी वाढविली

अमरावती शहरात बंद केलेली इंटरनेट सेवा 24 तासांनी वाढविली. अमरावती शहरात 13,14 आणि 15 असं दिवस इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती. आता हा आदेश 24 तासांनी वाढवण्यात आला आहे. अमरावती शहरात उद्या दुपारनंतर इंटरनेट सेवा पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे

मुख्यमंत्री कार्यालय आणि वर्षा निवास्थानात पुन्हा एकदा कोरोनाचा शिरकाव

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे विशेष कार्यकारी अधिकारी OSD सुधिर नाईक यांची केविड 19 संसर्ग चाचणी पॉझिटीव्ह आली आहे. त्यांना पुढील उपचारांसाठी मुंबई सेंट्रल येथील वाँक्हार्ट हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय. त्यामुळे खबरदारीची उपाययोजना म्हणुन मुख्यमंत्री कार्यालय आणि वर्षा निवास्थानातील सर्व कर्मचारी आणि अधिकारी यांची तात्काळ कोविड 19 संसर्ग तपासणी करण्यात येत आहे. ठाकरे कुटुंबातील सर्व सदस्यांचीही अधिक काळजी घेण्यात येत आहे. मुख्यमंत्री कार्यालय आणि वर्षा निवास्थानाचे सॅनिटायझेशन करण्यात आलंय. 

पुण्यात गेल्या 24 तासात 48 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद तर 54 रुग्णांनी केली कोरोनावर मात

पुण्यात गेल्या 24 तासात 48 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 54 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. पुण्यात आतापर्यंत 495567 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात तीन कोरनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या पुण्यात 759 सक्रिय रुग्ण आहेत. आज पुण्यात 4081 नागरिकांची स्वॅब तपासणी झाली आहे.

गडचिरोलीत 26 नक्षल्यांचा खात्मा करणाऱ्या पोलिसांचं अभिनंदन : दिलीप वळसे पाटील

गडचिरोलीत 26 नक्षलवादी मारले गेले हे पोलिसांचे मोठं यश आहे, त्यामुळे नक्षलवादी चळवळीला मोठा फटका बसला आहे. या नक्षलवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सर्व पोलिसांचे राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी अभिनंदन केलं आहे. 

राज्यातील दंगलीमागे रझा अकादमीचा हात, नितेश राणेंचा आरोप

भडकाऊ भाषण करणाऱ्या अर्जुन खोतकरांना अटक करा, यूपी आणि इतर ठिकाणी रझा अकादमीने दंगली घडवल्या असा आरोप भाजपचे आमदार नितेश राणे यांनी केला आहे.  

हिवाळी अधिवेशन एक आठवडा पुढे ढकललं जाण्याची चिन्हं

हिवाळी अधिवेशन एक आठवडा पुढे ढकललं जाण्याची चिन्हं. 

 सूत्रांच्या माहिती नुसार हिवाळी अधिवेशन एक आठवडा पुढे ढकलण्यात येणार असल्याची माहिती मिळतेय

विधान परीषदेच्या निवडणुका येत्या १० डिसेंबरला होत आहेत. त्यामुळे सर्व पक्षांची मागणी आहे की हिवाळी अधिवेशन एक आठवडा पुढे ढकलावं.  

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत विधिमंडळ सल्लागार समितीची बैठक झाल्यावर हिवाळी अधिवेशन मुंबई किंवा नागपूर कुठे आणि कधी घेणार हे अधिकृत जाहीर केलं जाईल .

अनिल देशमुखांची रवानगी पुन्हा न्यायालयीन कोठडीत, देशमुखांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी 

अनिल देशमुखांची रवानगी पुन्हा न्यायालयीन कोठडीत, देशमुखांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, 29 नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे सत्र न्यायालयाकडून निर्देश

बाळासाहेब आणि बाबासाहेब याचं नातं वेगळं-संजय राऊत

बाळासाहेब आणि बाबासाहेब याचं नातं वेगळं होतं. बाळासाहेब ज्या लोकांचे पायाला स्पर्श करत होते त्या पैकी एक बाबासाहेब होते.. दोघांमधील नात अतूट असं होतं.. हा योगा योग आहे की बाळासाहेबांचा जाण्याचा दिवस 2 दिवसांवर आहे आणि आज बाबासाहेब निघून गेले- संजय राऊत

दिवंगत काँग्रेस नेते राजीव सातव यांच्या पत्नी डॉक्टर प्रज्ञा सातव यांना काँग्रेस विधानपरिषदेवर पाठवणार: सूत्र

दिवंगत काँग्रेस नेते राजीव सातव यांच्या पत्नी डॉक्टर प्रज्ञा सातव यांना काँग्रेस विधानपरिषदेवर पाठवणार: सूत्र

शरद रणपिसे यांच्या निधनाने रिक्त जागेवर प्रज्ञा सातव यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता

लवकरच याबाबत अधिकृत घोषणा होणार

जुलै २०२४ पर्यंत या विधानपरिषदेची मुदत आहे

राजीव सातव यांच्या निधनानंतर त्यांचा राजकीय वारसा त्यांच्या पत्नीकडे

चंद्रकांत हंडोरे, नसीम खान, जितेंद्र देहाडे यांच्याही नावाची सुरु होती चर्चा

एकाच जागेसाठी निवडणूक असल्याने महाविकासआघाडीसाठी ही निवडणूक फारशी अवघड नाही

Babasaheb Purandare : शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे निधन

Shivshahir Babasaheb Purandare passed away : शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे पुण्यात आज निधन झाले. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात बाबासाहेब पुरंदरेंवर उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यानच त्यांची प्राणज्योत मालवली. काही दिवसांपुर्वी बाबासाहेब पुरंदरेंना घरात पाय घसरून पडल्याने इजा झाली होती. त्यानंतर त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. रुग्णालयात त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु होते.  बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनामुळे एक पर्व हरपल्याची भावना व्यक्त केली जात आहे.  ते 100 वर्षांचे होते. साडे आठ वाजता पार्थिव पर्वती इथल्या निवासस्थानी ठेवण्यात येईल आणि सकाळी साडे दहा वाजता वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

रविवारी, रात्री आठ वाजण्याच्या सुमारास त्यांना न्यूमोनिया झाला असून प्रकृती खालावली असल्याची माहिती अधिकृतपणे रुग्णालयाच्यावतीने देण्यात आली होती. मात्र, रुग्णालयात मृत्यूशी सुरू असलेली त्यांची झुंज अपयशी ठरली. बाबासाहेब पुरंदरे यांचे मूळ नाव बळवंत मोरोपंत पुरंदरे होते. त्यांचा जन्म 29 जुलै 1922 रोजी झाला. त्यांच्यावर असलेल्या प्रेमापोटी, आदराने त्यांना बाबासाहेब पुरंदरे असे म्हटले जाऊ लागले. जवळपास सात दशके त्यांनी इतिहास संशोधनाचे कार्य केले. पहिल्यांदा ते 1941 मध्ये भारत इतिहास संशोधक मंडळात सहभागी झाले होते. इतिहाससंशोधक ग. ह. खरे यांचे मार्गदर्शन त्यांना लाभले होते. पुणे विद्यापीठाच्या ’मराठा इतिहासाची शकावली- सन 1740 ते 1764 ’ या भारत इतिहास संशोधन मंडळात झालेल्या संशोधन प्रकल्पात बाबासाहेब पुरंदरे संशोधक म्हणून सहभागी झाले होते.

Kartiki Ekadashi 2021 : नांदेडमधील निळा गावचं दाम्पत्य मानाचे वारकरी

Kartiki Ekadashi 2021 : Pandharpur : कोरोनाच्या प्रादुर्भावानंतर पहिल्यांदाच आज कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपुरात वैष्णवांचा मेळा भरला आहे. विठुरायाच्या पंढरपुरात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या हस्ते आज पहाटे विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा करण्यात आली. नांदेड जिल्ह्यातले वारकरी कोंडीबा देवराम टोणगे आणि त्यांच्या पत्नी प्रयागबाई हे दाम्पत्य यावेळी मानाचे वारकरी ठरले. यावेळी कार्तिकी एकादशीला उपमुख्यमंत्र्यांसोबत पूजा करण्याचा मान मिळालेले कोंडीबा टोणगे आणि त्यांच्या पत्नी प्रयागबाई हे दाम्पत्य गेली 30 वर्षे पंढरपूरची वारी करत आहेत. टोणगे दाम्पत्य नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील निळा गावचे ते रहिवासी आहेत. 

एबीपी माझाशी बोलताना टोणगे दाम्पत्य म्हणाले की, "गेली 30 वर्ष पंढरपूरची वारी करत आहोत. संध्याकाळी साडेसात वाजल्यापासून दर्शन रांगेत उभे होतो. कोरोना प्रादुर्भावामुळे विठुरायाचं दर्शन घेता आलं नाही. त्यामुळे दर्शनाची आस होती. आषाढीलाही वारीला आलो होतो. पण दर्शन झालं नाही. त्यामुळे नामदेव पायरीचं दर्शन घेऊन गेलो होतो. कार्तिकी निमित्त देवाला एकच साकडं की, सुख-शांती नांदू देत आणि कोरोना निघून जाऊ देत." प्रयागबाई टोणगे म्हणाल्या की, "दर्शनासाठी ज्यावेळी रांगेत उभे राहिलो तेव्हा अजिबात अपेक्षा नव्हती की, उपमुख्यमंत्र्यांसोबत देवाची पूजा करण्याचा मान मिळेल. देवाकडे कोरोना जाऊ देत आणि सर्वांना सुख मिळू देत, एवढंच मागणं आहे."

Kartiki Ekadashi 2021 : उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते सपत्नीक शासकीय पूजा

Kartiki Ekadashi 2021 : आज कार्तिकी एकादशी... कोरोनाच्या प्रादुर्भावानंतर पहिल्यांदाच पंढरपूर (Pandharpur) विठुरायाच्या नामघोषानं दुमदुमून निघालं आहे. विठुरायाच्या पंढरपुरात उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांच्या हस्ते आज पहाटे विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा करण्यात आली. नांदेड जिल्ह्यातले वारकरी कोंडीबा देवराम टोणगे आणि त्यांच्या पत्नी प्रयागबाई हे दाम्पत्य यावेळी मानाचे वारकरी ठरले. कोरोनामुळे गेल्या वर्षी कार्तिकी वारी होऊ शकली नव्हती. तब्बल दोन वर्षांनी कार्तिकी वारीचा सोहळा आज पंढरपुरात पार पडतोय. त्यामुळे वारकऱ्यांचे पाय पंढरपूरकडे वळलेत, असं असलं तरी एसटीच्या संपाचं सावट या यात्रेवर आहे आणि नेहमी एसटीनं पंढरपुरात दाखल होणाऱ्या वारकऱ्यांची संपामुळे गैरसोय झाली आहे. तरीही मिळेल त्या वाहनानं वारकरी पंढरपुरात दाखल झालेत. आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर पुन्हा एकदा गजबजलं आहे. 

आज कार्तिकी एकादशी निमित्त राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणीची पूजा करण्यात आली. तसेच कोंडीबा देवराम टोणगे (वय 58) आणि त्यांच्या पत्नी प्रयाग बाई कोंडीबा टोणगे (वय 55) या नांदेड जिल्ह्यातील लोह तालुकामधील निळा या गावाच्या दाम्पत्याला मिळाला. मानाचे वारकरी कोंडीबा टोणगे आणि त्यांच्या पत्नी प्रयागबाई टोणगे यांच्या हस्ते ही पूजा करण्यात आली. कार्तिकी एकादशीनिमित्त विठुरायाच्या गाभाऱ्याला आकर्षक सजावट करण्यात आली. 

Kartiki Ekadashi 2021 : कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरी दुमदुमली

कोरोनाचं सावट आल्यानंतर पंढरीचे वारकारी काही वाऱ्यांपासून वंचित राहिले. मात्र आता कोरोनाचा प्रादुर्भाव काहीसा कमी झाल्यानं यंदा कार्तिकीचा सोहळा पार पडतोय. लॉकडाऊननंतर पंढरपूरची आषाढी वारी आणि कार्तिकी वारी (Kartiki Ekadashi 2021) यांवरही निर्बंध लादण्यात आले होते. पंढरपूर यात्रेची आस लागलेल्या वारकऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे. यावर्षी कार्तिकी यात्रेला जिल्हाधिकाऱ्यांनी सशर्त परवानगी दिली आहे. नियम आणि अटींचं पालन करून आज 15 नोव्हेंबरला कार्तिकी एकादशी यात्रेचा मुख्य सोहळा साजरा करण्यात येणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते श्री विठ्ठलाची शासकीय महापूजा पार पडली. त्यामुळे गेली दोन वर्षे यात्रेची प्रतीक्षा करणाऱ्या वारकऱ्यांना यावेळी पंढरपूरच्या यात्रेला जाता येणार आहे. या यात्रेला किमान 5 ते 6 लाख भाविक येतील अशी अपेक्षा असून त्या दृष्टीनं दर्शन व्यवस्था करण्यात आलीय. कार्तिकी वारीच्या निमित्तानं पंढरपुरातील विठ्ठल-रुक्मिणी मंदिर दर्शनासाठी 24 तास खुलं राहणार आहे.

पार्श्वभूमी

Babasaheb Purandare : एका पर्वाचा अस्त! शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे निधन

Shivshahir Babasaheb Purandare passed away : शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे पुण्यात आज निधन झाले. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात बाबासाहेब पुरंदरेंवर उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यानच त्यांची प्राणज्योत मालवली. काही दिवसांपुर्वी बाबासाहेब पुरंदरेंना घरात पाय घसरून पडल्याने इजा झाली होती. त्यानंतर त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. रुग्णालयात त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु होते.  बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनामुळे एक पर्व हरपल्याची भावना व्यक्त केली जात आहे.  ते 100 वर्षांचे होते. साडे आठ वाजता पार्थिव पर्वती इथल्या निवासस्थानी ठेवण्यात येईल आणि सकाळी साडे दहा वाजता वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

रविवारी, रात्री आठ वाजण्याच्या सुमारास त्यांना न्यूमोनिया झाला असून प्रकृती खालावली असल्याची माहिती अधिकृतपणे रुग्णालयाच्यावतीने देण्यात आली होती. मात्र, रुग्णालयात मृत्यूशी सुरू असलेली त्यांची झुंज अपयशी ठरली. बाबासाहेब पुरंदरे यांचे मूळ नाव बळवंत मोरोपंत पुरंदरे होते. त्यांचा जन्म 29 जुलै 1922 रोजी झाला. त्यांच्यावर असलेल्या प्रेमापोटी, आदराने त्यांना बाबासाहेब पुरंदरे असे म्हटले जाऊ लागले. जवळपास सात दशके त्यांनी इतिहास संशोधनाचे कार्य केले. पहिल्यांदा ते 1941 मध्ये भारत इतिहास संशोधक मंडळात सहभागी झाले होते. इतिहाससंशोधक ग. ह. खरे यांचे मार्गदर्शन त्यांना लाभले होते. पुणे विद्यापीठाच्या ’मराठा इतिहासाची शकावली- सन 1740 ते 1764 ’ या भारत इतिहास संशोधन मंडळात झालेल्या संशोधन प्रकल्पात बाबासाहेब पुरंदरे संशोधक म्हणून सहभागी झाले होते.

कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरी दुमदुमली; उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते शासकीय पूजा

Kartiki Ekadashi 2021 : आज कार्तिकी एकादशी... कोरोनाच्या प्रादुर्भावानंतर पहिल्यांदाच पंढरपूर (Pandharpur) विठुरायाच्या नामघोषानं दुमदुमून निघालं आहे. विठुरायाच्या पंढरपुरात उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांच्या हस्ते आज पहाटे विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा करण्यात आली. नांदेड जिल्ह्यातले वारकरी कोंडीबा देवराम टोणगे आणि त्यांच्या पत्नी प्रयागबाई हे दाम्पत्य यावेळी मानाचे वारकरी ठरले. कोरोनामुळे गेल्या वर्षी कार्तिकी वारी होऊ शकली नव्हती. तब्बल दोन वर्षांनी कार्तिकी वारीचा सोहळा आज पंढरपुरात पार पडतोय. त्यामुळे वारकऱ्यांचे पाय पंढरपूरकडे वळलेत, असं असलं तरी एसटीच्या संपाचं सावट या यात्रेवर आहे आणि नेहमी एसटीनं पंढरपुरात दाखल होणाऱ्या वारकऱ्यांची संपामुळे गैरसोय झाली आहे. तरीही मिळेल त्या वाहनानं वारकरी पंढरपुरात दाखल झालेत. आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर पुन्हा एकदा गजबजलं आहे. 

आज कार्तिकी एकादशी निमित्त राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणीची पूजा करण्यात आली. तसेच कोंडीबा देवराम टोणगे (वय 58) आणि त्यांच्या पत्नी प्रयाग बाई कोंडीबा टोणगे (वय 55) या नांदेड जिल्ह्यातील लोह तालुकामधील निळा या गावाच्या दाम्पत्याला मिळाला. मानाचे वारकरी कोंडीबा टोणगे आणि त्यांच्या पत्नी प्रयागबाई टोणगे यांच्या हस्ते ही पूजा करण्यात आली. कार्तिकी एकादशीनिमित्त विठुरायाच्या गाभाऱ्याला आकर्षक सजावट करण्यात आली. 

पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराला आकर्षक सजावट करण्यात आली आहे. विठ्ठल मंदिराला कार्तिकी एकादशी निमित्त 14 प्रकारच्या देशी विदेशी फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. पुणे येथील विठ्ठल भक्त राम जांभुलकर यांनी ही फुल सजावटीची सेवा दिली आहे. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.