Maharashtra Breaking News LIVE Updates : सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण कोरोनाबाधित

Maharashtra Breaking News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

abp majha web team Last Updated: 27 Jan 2022 11:34 AM
परभणीत मागील 24 तासांत 624 नवे कोरोनाबाधित

परभणी जिल्ह्यात मागील 24 तासांत 624 कोरोनाबाधितांची नोंद झाली असून एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर 235 जणांना घरी सोडण्यात आलं आहे. 

चंद्रपूरात 438 नवे कोरोनाबाधित

चंद्रपूर जिल्ह्यात 438 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली असून एका रुग्णाचा मृत्यूही झाला आहे. तर 563 जण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या जिल्ह्यात 3 हजार 876 सक्रिय कोरोनारुग्ण आहेत. 


 

सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण कोरोना पाॅझिटीव्ह

सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांना कोरोनाची लागण झाली आहे. मंत्रीमंडळ बैठक सुरू असताना त्यांचा रिपोर्ट आल्यानंतर, रिपोर्ट येताच मंत्रीमंडळ बैठकीतून ते तात्काळ बाहेर पडल्याचं समोर आलं असून चव्हाण आज सकाळीच काँग्रेस बैठकीला उपस्थित होते.

राज्यात सुपर मार्केटमध्ये वाईन विकण्यास परवानगी; राज्य सरकारचा निर्णय

राज्यातील सुपर मार्केटमध्ये वाईन विकण्यास परवानगी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. 1000 हजार स्केअर फुटाच्या सुपरमार्केटमध्ये वाईन विकता येणार आहे. 

बाळासाहेब ठाकरे यांचा पुतळा दिल्लीच्या महाराष्ट्र सदनात उभारावा, खा. राहुल शेवाळे यांची मुख्यमंत्र्यांकडे विनंती

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा पूर्णाकृती पुतळा दिल्लीच्या महाराष्ट्र सदन येथील प्रांगणात उभारला जावा, अशी विनंती खासदार राहुल शेवाळे यांनी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्याकडे केली आहे. महाराष्ट्र राज्यासाठी बाळासाहेब ठाकरे यांचं मोठं योगदान असून त्यांचा यथोचित गौरव करण्यासाठी राज्य सरकारने निर्णय घ्यावा अशी मागणी त्यांनी केली आहे.

भाजपकडून मुंबईतील कायदा-सुव्यवस्था बिघडवण्याचे प्रयत्न; महापौर किशोरी पेडणेकर यांचा आरोप
टिपू सुलतान उद्यान नामकरणाच्या मुद्यावरून मुंबईतील कायदा-सुव्यवस्था बिघडवण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याचा आरोप महापौर किशोरी पेडणेकर यांनी केला आहे. 

राहुल गांधींचा पंजाब दौरा

आगामी पंजाब विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी काँग्रेस नेते राहुल गांधी आज पंजाबच्या एकदिवसीय दौऱ्यावर आहेत. राहुल गांधी सकाळी 9 वाजता अमृतसरमध्ये 117 उमेदवारांसह हरमंदिर साहिब इथं दर्शन घेतील. पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांनी ट्वीट करून ही माहिती दिली आहे. 

पाच राज्यांच्या निवडणुकीनंतर राष्ट्रपती निवडणुकीच्या घडामोडींना वेग

पाच राज्यांच्या निवडणुकीनंतर राष्ट्रपती निवडणुकीच्या घडामोडींना वेग येईल. यावर्षी जुलैमध्ये होणाऱ्या राष्ट्रपतीपदाच्या शर्यतीत भाजपमधील चार नावं सर्वात पुढे आहेत. भाजप आणि आरएसएसमध्ये या नावांवर चर्चा सुरु झालीय. उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गहलोत, उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल आणि केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांची नावं सध्या चर्चेत आहेत. यावेळी पुन्हा एकदा महिला राष्ट्रपती होणार का याची चर्चाही राजकीय वर्तुळात सुरु झालीय. उत्तर प्रदेशचे निकाल या निवडणुकीसाठी महत्त्वाचे ठरणार आहेत. 25 जुलैला विद्यमान राष्ट्रपतींची मुदत संपणार आहे. दुसरीकडे या निवडणुकीसाठी विरोधक एकवटणार का याकडेही राजकीय विश्लेषकांचं लक्ष आहे. 

Railway Station Accident आरपीएफ अधिकार्‍यांनी वाचवले महिलेचे प्राण, संपूर्ण घटना CCTV कॅमेऱ्यात कैद

Adani :अदानी विल्मरचा IPO आजपासून खुला होणार,31जानेवारीपर्यंत आयपीओसाठी ड्रॉ सुरू राहणार :ABP Majha

Vidarbha Bandhara Amravati : राज्यातील पहिला विदर्भ बंधारा नेमका कसा आहे? ABP Majha

कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन लस लवकरच मेडिकलमध्ये उपलब्ध होण्याची शक्यता

कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन लस लवकरच मेडिकलमध्ये उपलब्ध होण्याची शक्यता आहे. त्यासाठी दरही निश्चित केले जाणार आहेत. मेडिकलमध्ये खुल्या बाजारात लस उपलब्ध झाल्यानंतर ही लस 425 ते 450 रुपयांना उपलब्ध होऊ शकेल.  राष्ट्रीय औषध मूल्य निश्चिती प्राधिकरणाला लशी किफायती दरात उपलब्ध करण्याच्या दृष्टीनं काम करण्याचे निर्देश देण्यात आलेत. 

शेअर बाजारात पडझड, सेन्सेक्समध्ये 1 हजार अंकाची तर निफ्टीत 300 अंकांची घसरण

शेअर बाजारातील पडझड काही थांबण्याचं नाव घेत नाहीय. आज देखील बाजार सुरु होताच सेन्सेक्समध्ये 1 हजार अंकाची तर निफ्टीत 300 अंकांची घसरण पाहायला मिळाली. आशियाई आणि अमेरिकेतल्या बाजारात देखील नैराश्याचं वातावरण दिसतंय. 

ज्येष्ठ साहित्यिक आणि सामाजिक कार्यकर्ते अनिल अवचट यांचं निधन

ज्येष्ठ साहित्यिक आणि सामाजिक कार्यकर्ते अनिल अवचट यांचं निधन झालंय. दीर्घ आजारामुळे वयाच्या 78व्या वर्षी त्यांनी पुण्यातल्या राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. अनिल अवचट हे पेशानं पत्रकार आणि लेखक, आपली लेखणी त्यांनी कायमच सामान्य जनतेच्या हितासाठी वापरली. 1969 साली त्यांचं पहिलं पुस्तक प्रकाशित झालं त्यानंतर विविध विषयांवरची त्यांची 22 पुस्तकं प्रकाशित झाली आहेत. दलित भटक्या जमाती, वेश्या यांच्याबद्दल त्यांनी विपुल लिखाण केलेलं आहे. पुण्यातल्या मुक्तांगण व्यवसनमुक्ती केंद्राचे ते संचालक होते. त्यांनी शोधून काढलेली व्यसनमुक्तीची अनोखी पद्धत जगभरातल्या अनेक केंद्रांमध्ये वापरली जाते. अनिल अवचट यांचं पार्थिव दुपारी दोन वाजल्यापर्यंत पत्रकार नगर इथे अंतदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.  त्यांच्या जाण्यानं एक संवेदनशील आणि बहुआयामी व्यक्तीमत्व हरपल्याची हळहळ व्यक्त होतेय.

लवासा प्रकल्पाविरोधातील याचिकेवर उच्च न्यायालय अंतिम निकाल सुनावणार

पुणे जिल्ह्यात उभारलेल्या लवासा हिल स्टेशनविरोधात दाखल केलेल्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालय आज निर्णय देणार आहे. पर्यावरण संवर्धनाच्या नियमांचं उल्लंघन करून आणि विविध विभागांकडून बेकायदा परवानग्या घेऊन हा प्रकल्प उभारण्यात आल्याचा आरोप याचिकाकर्त्यांनी केला होता. त्यामुळे तो रद्द करून लिलावाच्या प्रक्रियेला स्थगिती देण्याची मागणी याचिकाकर्त्यांनी न्यायालयात केली आहे. शरद पवार यांच्या निकटवर्तीयांचा हा प्रकल्प असल्यानं त्यांच्यावर मेहेरनजर करण्यात आल्याचा आरोप याचिकाकर्त्यांनी केला होता. त्यामुळे या प्रकरणात न्यायालय काय निर्णय देणार याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.

नितेश राणेंचं काय होणार? संतोष परब हल्ल्याप्रकरणी जामीन मिळवण्यासाठी नितेश राणेंची सर्वोच्च न्यायालयात धाव

केंद्रीय मंत्री नारायण राणेंचे पुत्र, आमदार नितेश राणेंना जामीन मिळणार की तुरुंगाचा रस्ता धरावा लागणारा यासंदर्भात आज महत्त्वाची सुनावणी आहे. संतोष परब हल्लाप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयानं जामीन नाकारल्यानंतर नितेश राणेंनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी सर्वोच्च न्यायालयात नितेश राणेंची बाजू माडंणार आहे. सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला नाही तर त्यांची अटक अटळ मानली जातेय.. इकडे सिंधुदुर्गच्या कणकवलीत कडक पोलीस बंदोबस्त ठेण्यात आला आहे. तर आज सलग चौथ्या दिवशीही नितेश राणए कणकवली पोलीस स्थानकात चौकशीसाठी हजर राहणार असल्याचं कळतयं

पार्श्वभूमी

Maharashtra Breaking News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...


Dr. Anil Awachat Passed Away : ज्येष्ठ साहित्यिक आणि सामाजिक कार्यकर्ते डॉ. अनिल अवचट यांचं निधन


Dr. Anil Awachat Passed Away : ज्येष्ठ साहित्यिक आणि सामाजिक कार्यकर्ते अनिल अवचट यांचं निधन झालं असून वयाच्या 78व्या वर्षी त्यांनी पुण्यातल्या राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. केवळ साहित्य विश्वताच नाही तर समाजातही त्यांनी आपली एक वेगळी ओळख निर्माण केली. पत्रकार म्हणून त्यांनी अनेक विषयांवर आपली मतं मांडली, त्यांच्या लेखणीतून, पुस्तकाद्वारे त्यांचे विचार आपल्यापर्यंत पोहोचलं. 


अनिल अवचट यांचा जन्म पुण्यातील ओतूरमध्ये झाला. त्यांनी एम.बी.बी.एस ची पदवीही पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमधून घेतली. आपल्या महाविद्यालयीन जीवनातही त्यांनी अनेक चळवळींमध्ये भाग घेतला. अनिल अवचट हे केवळ एक साहित्यिक नसून त्यांच्या अनेक ओळखी आहेत, त्यांचं बहुआयामी व्यक्तिमत्त्व त्यांनी केलेल्या विविध प्रकारच्या कामांमधून दिसून येतं.


1969 साली त्यांचं पहिलं-वहिलं पुस्तक पूर्णिया हे प्रसिद्ध झालं. तेव्हापासून त्यांनी अनेक सामाजिक प्रश्नांवर लिखाण केलं. आतापर्यंत त्यांची बावीसहून अधिक पुस्तकं प्रकाशित झाली आहेत.


केवळ साहित्य विश्वताच नाही तर समाजातही त्यांनी आपली एक वेगळी ओळख निर्माण केली. मुक्तांगण या व्यसनमुक्ती केंद्राची सुरुवात त्यांनी केली. व्यसनींना भरकटलेल्या मार्गावरून व्यसनमुक्त करत पूर्वायुष्यात आणण्याचं काम त्यांनी केलं. मुक्तांगण या संस्थेनं अनेक आयुष्य उध्वस्त होण्यापासून रोखली. अनिल अवचट हे एक डॉक्टर होतेच मात्र त्यांनी समाज परिवर्तनाचाही विडा उचलला होता. समाजासाठी आपलं आयुष्य अर्पण करत त्यांनी अनेक कार्य केली.


Lavasa Verdict : 'लवासा'चं काय होणार? आज उच्च न्यायालय निकाल देण्याची शक्यता


Lavasa Verdict : पुणे जिल्ह्यात उभारलेल्या लवासा (Lavasa Project) हिल स्टेशनविरोधात दाखल केलेल्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालय आज निर्णय देणार आहे. पर्यावरण संवर्धनाच्या नियमांचं उल्लंघन करून आणि विविध विभागांकडून बेकायदा परवानग्या घेऊन हा प्रकल्प उभारण्यात आल्याचा आरोप याचिकाकर्त्यांनी केला होता. त्यामुळे तो रद्द करून लिलावाच्या प्रक्रियेला स्थगिती देण्याची मागणी याचिकाकर्त्यांनी न्यायालयात केली आहे. शरद पवार यांच्या निकटवर्तीयांचा हा प्रकल्प असल्यानं त्यांच्यावर मेहेरनजर करण्यात आल्याचा आरोप याचिकाकर्त्यांनी केला होता. त्यामुळे या प्रकरणात न्यायालय काय निर्णय देणार याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.


पर्यावरण संवर्धनाच्या नियमांचे उल्लंघन करून तसेच राज्य सरकारच्या विविध विभागांकडून बेकायदेशीर परवानग्या घेऊन उभारण्यात आलेला लवासा प्रकल्प बेकायदा ठरवत, तो रद्द करावा. तसेच त्याच्या लिलावाच्या प्रक्रियेला स्थगिती द्या, अशी विनंती करणारी जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर आज मुंबई उच्च न्यायालय आपला निर्णय देणार आहे. 


दरम्यान, लवासा कॉर्पोरेशन लिमिटेड या कंपनीकडून 2000 साली पुणे जिल्ह्यातील वरसगाव धरणाच्या परिसरात तब्बल 25 हजार हेक्टर परिसरात लवासा प्रकल्प उभारण्यास सुरुवात करण्यात आली. लवासा प्रकल्प हा स्वातंत्र्यानंतरचं पहिलं हील स्टेशन असेल असा दावा त्यावेळी हा प्रकल्प उभारणाऱ्या हिंदुस्थान कन्स्ट्रक्शन कंपनीकडून करण्यात आला होता. मात्र सुरुवातीपासूनच हा प्रकल्प जमीन खरेदी असेल किंवा पर्यावरणाच्या नियमांचे उल्लंघन असेल यामुळे वादामध्ये राहिला. 2010 साली तत्कालीन केंद्रीय पर्यावरण मंत्री जयराम रमेश यांनी लवासा प्रकल्पामध्ये पर्यावरण नियमांचे उल्लंघन करण्यात आल्याचा ठपका ठेवत प्रकल्पाचं काम थांबवण्याचे आदेश दिले होते. तेव्हापासूनच लवासा प्रकल्पाच्या आर्थिक अडचणींना सुरुवात झाली. काम बंद करण्याचे आदेश दिल्याने कंपनीचे शेअर्स शेअर मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात कोसळले होते. त्यातूनच पुढे लवासाने आर्थिक दिवाळखोरीही जाहीर केली होती. त्यामुळे आता वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या आणि आर्थिक डबघाईला आलेला लवासा प्रकल्पाबाबत आज उच्च न्यायालय काय निर्णय देणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.