Maharashtra Breaking News LIVE Updates : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात दोन्ही सभागृहांचं कामकाज वेगवेगळ्या वेळी चालण्याची शक्यता

Maharashtra Breaking News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

abp majha web team Last Updated: 24 Jan 2022 08:31 PM
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात दोन्ही सभागृहांचं कामकाज वेगवेगळ्या वेळी चालण्याची शक्यता

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात दोन्ही सभागृहांचं कामकाज वेगवेगळ्या वेळी चालण्याची शक्यता आहे. संसदेतल्या जवळपास सातशे ते आठशे कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याने त्या पार्श्वभूमीवर खबरदारी घेतली जाण्याची शक्यता आहे.

औरंगाबाद खंडपीठाचे कामकाज ऑनलाईन

उद्यापासून (मंगळवार) औरंगाबाद खंडपीठाचे कामकाज ऑनलाईन सुरु करण्यात येत आहे. कोरोनाच्या ओमायक्रॉन विषाणूचा संसर्ग वाढत असल्याने हा निर्णय़ घेण्यात आला आहे.

मुंबई भाजप कार्यकारिणीची उद्या महत्वपूर्ण बैठक

मुंबई भाजप कार्यकारिणीची उद्या महत्वपूर्ण बैठक होणार आहे. महापालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर भाजपची आक्रमक रणनितीवर उद्या महत्वपूर्ण बैठक उदया पार पडणार आहे.  विरोधी पक्षनेते घेणार मुंबई भाजप कार्यकारिणीचा  आढावा घेणार आहे. भाजप अध्यक्ष मंगलप्रभात लोढा, आशिष शेलार, विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर, अतुल भातखळकर उपस्थित राहणार आहे

चंद्रशेखर बावनकुळे यांना कोरोनाची लागण

चंद्रशेखर बावनकुळे यांना कोरोनाची लागण झाली आहे.  त्यांनी ट्वीट करत याबाबतची माहिती दिली. ते आपल्या ट्वीटमध्ये म्हणतात की,  माझी कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली असून मी स्वतःला घरीच आयसोलेट केले आहे . डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आवश्यक औषधोपचार व काळजी घेत आहे. अलीकडे माझ्या संपर्कात आलेल्या सर्व कार्यकर्ते व नागरिकांनी आपली चाचणी करून घ्यावी ही विनंती .

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून प्रधानमंत्री राष्ट्रीय बालपुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन

प्रधानमंत्री राष्ट्रीय बालपुरस्कार पुरस्कार विजेत्यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अभिनंदन केले आहे. भारतीय प्रजासत्ताकाच्या ७२ व्या वर्धापनदिन सोहळ्याच्या पार्श्वभुमीवर आज हे पुरस्कार जाहीर झाले. जळगाव येथील शिवांगी काळे हिने 'वीरता’ या श्रेणीमध्ये, पुण्याच्या जुई केसकर हिने 'नव संशोधन' मध्ये आणि मुंबईतील जिया राय, तसेच नाशिकच्या स्वयंम पाटील याने 'क्रीडा' श्रेणीमध्ये प्रधानमंत्री राष्ट्रीय बालपुरस्कार पटकावला आहे. या सर्वांचे मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी हार्दिक अभिनंदन केले आहे. 

नाना पाटोले यांच्या वक्तव्याविरोधात अकोल्यात आंदोलन

अकोला : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासंदर्भात एकामागे एक आक्षेपार्ह्य विधान करणारे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याविरोधात  भाजप महिला आघाडीचं जोडो मारो आंदोलन. नाना पटोले यांच्या प्रतिमेला  जोडे मारत केला निषेध. नाना पटोले यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी. भाजप कार्यालय असलेल्या गांधी चौकात केलं आंदोलन.

नाना पाटोले यांच्या वक्तव्याविरोधात भाजपचे औरंगाबादमध्ये जोडे मारो आंदोलन; पोलिसांनी आंदोलकांना घेतलं ताब्यात

काँग्रेस अध्यक्ष नाना पाटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याविरोधात आज भाजपच्या वतीने शहरातील सिडको बसस्थानक चौकात जोडे मारो आंदोलन करण्यात आले. या वेळी आक्रमक झालेल्या आंदोलकांनी रस्ता रोको करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान आंदोलक आणि पोलिसांत झटापट झाली. यावेळी भाजप पदाधिकाऱ्यांनी नाना पाटोले यांचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी भाजप पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतले. 

आमदार नितेश राणे कणकवली पोलीस स्टेशनला दीड तास चौकशीसाठी हजर

आमदार नितेश राणे कणकवली पोलीस स्टेशनला दीड तास चौकशीसाठी हजर

चौकशी संदर्भात कोणतीही माहिती समोर आली नाही

 २७ जानेवारीपर्यंत नितेश राणेंना दिलासा मिळाल्या नंतर कणकवली पोलीस स्टेशनला चौकशीसाठी हजर

कोळसा तुटवड्यामुळे राज्यावर पुन्हा एकदा विजेचे संकट 

कोळसा तुटवड्यामुळे राज्यावर पुन्हा एकदा विजेचे संकट 

कोळसा कंपन्यांकडे स्फोटकांचा तुटवडा असल्याने कोळशाचे उत्पादन कमी

तर अनेक ठिकाणी कामगार कमी असल्याने कोळसा उत्पादनात घट

कोळशाचा पुरेसा साठा उपलब्ध नसल्याने चंद्रपूर मधील दोन युनिट बंद तर अमरावती मधील एक खाजगी युनिट बंद करण्यात  आल आहे

चंद्रपूरमध्ये ही  इतर युनिटमध्ये फक्त दोन ते तीन दिवसांचा साठा उपलब्ध आहे

सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक

सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक

एकाच महिन्यात दुसऱ्यांदा कांद्याची बंपर आवक

आज जवळपास 800 ट्रक कांदा बाजारात दाखल

साधारण दीड हजार ते अडीच हजर रुपये कांद्याला दर

आवक जास्त असल्याने उद्या कांदा लिलाव राहणार बंद तर 26 जानेवारी मुळे बुधवारी देखील बाजार समितीला सुट्टी

महिला आणि बालविकास विभागातील गट अ, ब च्या भरती प्रक्रियेवरून स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी आक्रमक 

महिला आणि बालविकास विभागातील गट अ ब च्या भरती प्रक्रियेवरून स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी आक्रमक 

Mpsc मार्फत सरळ सेवा भरती करण्याची विद्यार्थ्यांची मागणी 

नव्या शासन निर्णयानुसार राज्य सेवेतून भरती प्रक्रिया राबवणार असल्याचं करण्यात आलय जाहीर

पूर्वसूचना न देता शासन निर्णय काढल्याचा आंदोलकांचा आरोप

राज्यभरातील जवळपास दीड लाख विद्यार्थ्यांचं नुकसान होणार असल्याचा दावा

मागणीसाठी कोल्हापुरातील स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी एकवटले

नंदुरबार जिल्ह्यात पुन्हा तापमानाचा पारा घसरला, तोरणमाळ येथे तापमान 4 अंश सेल्सिअस वर

नंदुरबार जिल्ह्यात पुन्हा तापमानाचा पारा घसरला...

सातपुड्याच्या डोंगराळ भागात तापमान घसरण ..

तोरणमाळ येथे तापमान 4 अंश सेल्सिअस वर...

सपाटी भागात तापमान 7 अंश सेल्सिअस वर स्थिर...

कडाक्याचा थंडीचा जनजीवन परिणाम.....

धुळे जिल्ह्यात आज पुन्हा तापमानात घसरण...

धुळे जिल्ह्यात आज पुन्हा तापमानात घसरण...

जिल्ह्याचे तापमान 6.8 अंशावर... 

जिल्ह्यात ढगाळ वातावरण कायम...
गारठा देखील वाढला

पाकिस्तानमधील मुंबईत धडकलेलं धुळीचं वादळ कोकणात धडकणार, ताशी 20 ते 30 किमी वेगानं वारे वाहण्याचा अंदाज

Dust storm north Konkan area include Mumbai : पाकिस्तानमधील धुळीच्या वादळाचा महाराष्ट्रातील  वातावरणावर परिणाम दिसून येत आहे. काल सकाळपासून मुंबईतील आणि आसपासच्या शहरांमधील दृश्यमानता अतिशय कमी झाली आहे. तर हवेमध्ये धुळीचे कण मिसळल्याने त्यात काल आणि आज पाऊस पडल्याने अनेक गाड्यांवर आणि वस्तूंवर पांढरे डाग दिसून येत आहेत. अचानक वातावरणात झालेल्या बदलामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

दरम्यान उत्तर कोकणात काही ठिकाणी धुळीचे वारे येण्याची शक्यता आहे.  सुमारे तास 20-30 किमी वेगाने धुळीचे वारे येण्याची शक्यता आहे.  मुंबई, ठाणे, पालघर आणि आसपासच्या भागांत धुळीचे वारे येण्याची शक्यता आहे, असा भारतीय हवामान विभागाचा अंदाज आहे.

ओमायक्रॉनमुळं बंद झालेल्या शाळा आजपासून सुरु होणार, पालकांच्या भूमिकेकडे लक्ष, तर १४ जिल्ह्यांमध्ये शाळा सुरू न करण्याचा स्थानिक प्रशासनाचा निर्णय,

 राज्यातील शाळा सोमवारपासून सुरू होणार आहेत. कोरोना महामारीच्या काळात तब्बल सातशे दिवस शाळा बंद होत्या. त्यामुळे ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा धोका कमी झाला आहे अशा जिल्ह्यांमध्ये शाळा सुरू करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. परंतु, शाळा सुरू होत असल्या तरी पालकांनी विद्यार्थ्यांना शाळेत पाठवणं बंधनकारक नाही. सध्याच्या परिस्थितीनुसार ज्यांना योग्य वाटतं त्या पालकांनी विद्यार्थ्यांना शाळेत पाठवावे. ज्यांना वाटते रिस्क घेऊ नये त्यांनी घेऊ नये. उद्यापासून शाळा सुरू होत असल्या तरी पुढची पावलं कशी टाकयची हे शाळा आणि पालकांनी ठरवायचे आहे, असे मत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केले आहे. पालकांनी विद्यार्थ्यांना शाळेत पाठवणं बंधनकारक नाही. सध्याच्या परिस्थितीनुसार ज्यांना योग्य वाटतं त्या पालकांनी विद्यार्थ्यांना शाळेत पाठवावे, असे मत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केले आहे. 

शिवप्रेमींच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर अखेर रविवारी मध्यरात्री छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा शहरात दाखल

औरंगाबाद : शिवप्रेमींच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर अखेर रविवारी मध्यरात्री छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा शहरात दाखल झाला आहे. महापालिका आणि पोलीस प्रशासनाने तयारी पूर्ण केली.मागील दोन वर्षांपासून क्रांती चौकात शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या चौथऱ्याची उंची वाढविण्याचे काम सुरू होते. त्याच सोबत पुणे येथे पुतळा तयार करण्याचे कामही सुरू होते. तयार करण्यात आलेला पुतळा एका मोठ्या ट्रेलरमध्ये ठेवून औरंगाबादेत पोचला .

औरंगाबाद शहराचा कोरोना पॉझिटिव्हिटी रेट 49 टक्क्यांवर

औरंगाबाद शहराचा कोरोना पॉझिटिव्हिटी रेट 49 टक्क्यांवर जाऊन पोहोचला आहे. शंभर रुग्ण तपासले तर त्यातील 49 रुग्ण हे पॉझिटिव्ह येत असल्याने शहराची चिंता वाढली आहे. 15 जानेवारीला औरंगाबाद शहराचा पॉझिटिव्हिटी रेट केवळ 18.46 टक्के होता. 20 तारखेला 31.61 टक्क्यावर पोहोचला. तेवीस तारखेला 1618 नमुने तपासले असता ,शहराचा पॉझिटिव्हिटी रेट हा 48 . 27 टक्के झाला आहे. असं असलं तरी 95 टक्के रुग्णांना घरी आयसोलेटेड राहण्याची परवानगी देण्यात आली आहे..

पार्श्वभूमी

Maharashtra Breaking News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

1. ओमायक्रॉनमुळं बंद झालेल्या शाळा आजपासून सुरु होणार, पालकांच्या भूमिकेकडे लक्ष, तर १४ जिल्ह्यांमध्ये शाळा सुरू न करण्याचा स्थानिक प्रशासनाचा निर्णय,
 राज्यातील शाळा सोमवारपासून सुरू होणार आहेत. कोरोना महामारीच्या काळात तब्बल सातशे दिवस शाळा बंद होत्या. त्यामुळे ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा धोका कमी झाला आहे अशा जिल्ह्यांमध्ये शाळा सुरू करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. परंतु, शाळा सुरू होत असल्या तरी पालकांनी विद्यार्थ्यांना शाळेत पाठवणं बंधनकारक नाही. सध्याच्या परिस्थितीनुसार ज्यांना योग्य वाटतं त्या पालकांनी विद्यार्थ्यांना शाळेत पाठवावे. ज्यांना वाटते रिस्क घेऊ नये त्यांनी घेऊ नये. उद्यापासून शाळा सुरू होत असल्या तरी पुढची पावलं कशी टाकयची हे शाळा आणि पालकांनी ठरवायचे आहे, असे मत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केले आहे. पालकांनी विद्यार्थ्यांना शाळेत पाठवणं बंधनकारक नाही. सध्याच्या परिस्थितीनुसार ज्यांना योग्य वाटतं त्या पालकांनी विद्यार्थ्यांना शाळेत पाठवावे, असे मत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केले आहे. 

2. मी देखील गुन्हेगार...निवडणुकीत कमी पडल्याची कबुली देताना मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य; भाजप, राष्ट्रवादी आणि काँग्रेसप्रमाणे रिंगणात उतरण्याचा शिवसेना नेत्यांना सल्ला
 
3. होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ओबीसी आरक्षण लागू करण्याचं आव्हान, दुपारी साडे तीन वाजता मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत महत्त्वाची बैठक
 
4. नाना पटोलेंकडून मोदींबद्दलच्या वादग्रस्त वक्तव्याची मालिका सुरुच, भाजप आक्रमक, नागपुरात काँग्रेस प्रदेशाध्यक्षांच्या पुतळ्याचं दहन
 
5. पाकिस्तानातून मुंबईत धडकलेलं धुळीचं वादळ कोकणात धडकणार, ताशी 20 ते 30 किमी वेगानं वारे वाहण्याचा अंदाज

Dust storm north Konkan area include Mumbai : पाकिस्तानमधील धुळीच्या वादळाचा महाराष्ट्रातील  वातावरणावर परिणाम दिसून येत आहे. काल सकाळपासून मुंबईतील आणि आसपासच्या शहरांमधील दृश्यमानता अतिशय कमी झाली आहे. तर हवेमध्ये धुळीचे कण मिसळल्याने त्यात काल आणि आज पाऊस पडल्याने अनेक गाड्यांवर आणि वस्तूंवर पांढरे डाग दिसून येत आहेत. अचानक वातावरणात झालेल्या बदलामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

दरम्यान उत्तर कोकणात काही ठिकाणी धुळीचे वारे येण्याची शक्यता आहे.  सुमारे तास 20-30 किमी वेगाने धुळीचे वारे येण्याची शक्यता आहे.  मुंबई, ठाणे, पालघर आणि आसपासच्या भागांत धुळीचे वारे येण्याची शक्यता आहे, असा भारतीय हवामान विभागाचा अंदाज आहे.  

6. राज्यातील कमाल तापमानात मोठी घट, मुंबईसह राज्यभरात गारवा वाढला, पुढील 2-3 दिवस चित्र कायम राहणार
 
7. मोठ्या शहरांत झपाट्यानं पसरणारा ओमायक्रॉन समूह संसर्गाच्या टप्प्यावर, ‘इन्साकॉग’चा इशारा, बीए.टू व्हेरियन्टचाही भारतात शिरकाव
 
8.  एबीपी माझाचा सर्वात मोठा इम्पॅक्ट, रणजीतसिंह डिसले गुरुजींना अखेर रजा मंजूर, अमेरिकेत जाण्याचा मार्ग मोकळा
 
9. वीज कापण्याशिवाय आता पर्याय नाही, ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र, पाणीपुरवठा विभागासह विविध विभागांकडे 8 हजार 924 कोटींची थकबाकी.

10. चित्तथरारक सामन्यात भारत चार धावांनी पराभूत, एकदिवसीय मालिका 3-0 ने गमावली, आफ्रिकेकडून क्लिनस्वीप

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.