Maharashtra Breaking News LIVE Updates : तीन वाहनांच्या विचित्र अपघातात चार जण जागीच ठार

Maharashtra Breaking News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

abp majha web team Last Updated: 24 Jan 2022 12:25 AM
तीन वाहनांच्या विचित्र अपघातात चार जण जागीच ठार

शिक्रापूर :पुणे नगर महामार्गावर शिक्रापूर इथे एका भीषण अपघातात चार जण जागीच ठार झाले असे असून, दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. तीन वाहनांचा हा विचित्र अपघात झाला. अपघातातील जखमींना तातडीनं जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. 


पुणे-नगर महामार्गावरील शिक्रापूर येथील 24 वा मैल इथे भीषण अपघात झाला. भरधाव वेगाने नगरच्या दिशेने जाणारा ट्रक दुभाजकला धडकून विरुद्ध बाजूला पलटी झाला त्यावेळी पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या कार आणि दोन टू व्हीलर गाड्यांना ट्रकने जोरदार धडक दिली अशी प्राथमिक माहिती आहे . 
 या भीषण अपघाताची माहिती तातडीने शिक्रापूर  पोलिसांना देण्यात आली आहे. या अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला असून 2 जण गंभीर जखमी झाले आहेत. 


अपघातात  विठ्ठल हिंगाडे आणि रेश्मा हिंगाडे या पती पत्नी दाम्पत्याचा जागीच मृत्यू झाला. तर कार मधील लिना निकसे यांचा ही जागीच मृत्यू झाला आहे. मृता मधील एकाचे नाव अद्याप समजू शकलेले नसून जखमींची ही ओळख पटवण्याचे काम पोलीस करत आहेत. अपघातामुळे  महामार्गावर मोठ्या प्रमाणात झालेली वाहतूक कोंडी पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने सुरळीत केली.

उत्तर कोकणात काही ठिकाणी धुळीचे वारे येण्याची शक्यता

पुढील 12 तासांत उत्तर कोकणात काही ठिकाणी धुळीचे वारे येण्याची शक्यता.. सुमारे तास 20-30 किमी वेगाने धुळीचे वारे येण्याची शक्यता, भारतीय हवामान विभागाचा अंदाज..


 


 

ऐतिहासिक दिवस, कळवा-मुंब्रा मार्गाने धावली फास्ट लोकल...

आज इतिहासात पहिल्यांदाच ठाणे ते दिवा या स्थानकांच्या दरम्यान फास्ट लोकल आणि मेल एक्सप्रेस गाड्या कळवा आणि मुंब्रा स्थानकांच्या मार्गे धावत आहेत. आज पर्यंत सर्व फास्ट लोकल या ठाणे स्थानका नंतर पारसिक बोगद्यातून पुढे दिवा स्थानकाच्या दिशेने जायच्या. त्यामुळे कळवा आणि मुंब्रा स्थानकांच्या मार्गाने कधीच फास्ट लोकल धावली नाहीत. मात्र मध्य रेल्वेवर आज जो मेगाब्लॉक घेण्यात आला त्यानंतर सीएसएमटी वरून येणाऱ्या फास्ट लोकल आणि एक्सप्रेस गाड्यांच्या मार्गात बदल करण्यात आला आहे. या फास्ट लोकल आणि एक्सप्रेस गाड्या आता नवीन मार्गीकेवरुन धावत आहेत. त्यामुळे हा एक ऐतिहासिक क्षण मानला जातोय. या फास्ट लोकल चालण्यासाठी आधीच कळवा आणि मुंब्रा स्थानकांमध्ये प्लॅटफॉर्म नंबर तीन आणि चार बनवण्यात आलेले आहेत. मात्र असे असले तरी सध्या या स्थानकात कोणतेही फास्ट लोकल थांबणार नाही. त्यासाठी बहात्तर तसांच्या जम्बो मेगाब्लॉक पूर्ण होण्याची वाट बघावी लागेल. या ऐतिहासिक क्षणाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अक्षय भाटकर यांनी ... 

केज पोलिसांनी तंबाखूयुक्त पदार्थांची वाहतूक करणारा ट्रक पकडला.. बावीस लाखांचा मुद्देमाल जप्त
केज पोलीसांनी महाराष्ट्रात बंदी असलेले तंबाखूयुक्त पदार्थांची वाहतूक करणारा ट्रक केज पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. या कार्यवाहीत पोलीसांनी ट्रकसह एकूण २२ लाख साठ हजार रु चा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे.महाराष्ट्रात बंदी असलेल्या तंबाखू भरलेला ट्रक पुणे येथुन केज मार्गे पुढे जातअसल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यानंतर केज-बीड रोडवर शासकीय विश्रामगृहा समोर सापळा लावून भरधाव वेगात जाणारा ट्रक 28  किलो ग्रॅम वजनाचे १५० पोते भरलेला सुगंधी तंबाखूचा माल आहे त्याची किंमत १२ लाख ६० हजार रु असून ट्रकसह एकूण २२ लाख ६० हजार रु. चा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.

 
दफनभूमीसाठी जागा झाली उपलब्ध, मुस्लिम आणि ख्रिश्चन बांधव खुश

ठाण्यातील कळवा परिसरात मुस्लीम आणि ख्रिश्चन समाज झपाट्याने वाढत आहे. परंतु त्यांच्यासाठी दफनभूमी उपलब्ध नव्हती. या ठिकाणच्या ख्रिश्चन बांधवांना दफन करण्यासाठी ठाणे, मुलुंड, सायन या ठिकाणी जावे लागत होते त्यामुळे या परिसरात दफनभूमी उपलब्ध व्हावी यासाठी ख्रिश्चन समाजाकडून गेल्या १२ वर्षांपासून पाठपुरावा सुरु होता. तसेच मुस्लीम समाजातील बांधवांसाठी सुध्दा ठाण्यात एकच दफनभूमी उपलब्ध आहे. त्यामुळे कळवा येथे दफनभूमीसाठी जागा उपलब्ध व्हावी अशी मागणी गेल्या अनेक महिन्यांपासून या परिसरातील ख्रिश्चन आणि मुस्लीम समाजाकडून होत होती. या मागणीनंतर राष्ट्रवादीचे नगरसेवक मिलिंद पाटील यांनी या दफनभूमीसाठी जागा शोधून त्याचा पाठपुरावा केला होता. त्यानंतर नगरसेवक मिलिंद पाटील यांनी गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली कळवा येथील मनीषा नगर परिसरात दफनभूमीसाठी जागा उपलब्ध करून दिली आहे. ही जागा आज राज्याचे गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत स्वाधीन करण्यात आली आहे. याठिकाणी दफनभूमीसाठी उपलब्ध झालेल्या जागेपैकी ५० टक्के जागा ही मुस्लीम बांधवांच्या दफनभूमीसाठी आणि उर्वरित ५० टक्के जागा हि ख्रिश्चन बांधवांच्या दफनभूमीसाठी विभागून देण्यात आली आहे. हा सामाजिक समतेचा भाग असून समाजाची प्रमुख गरज आहे. हि गोष्ट आमच्याकडून पूर्ण करण्यात आली. हे पुण्याईच काम असून ती जागा मिळवून देण्यात आमचा खारीचा वाटा आहे याचा आनंद वाटत असल्याचे आव्हाड यांनी सांगितले.

नवजात बालकाला विकणाऱ्या टोळीला चंद्रपूर पोलिसांनी घेतलं ताब्यात

चंद्रपूर : नवजात बालकाला विकणाऱ्या टोळीला चंद्रपूर पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. चंद्रपूर व नागपूर येथून 5 महिलांसह एकूण सहा आरोपींना अटक, यातील दोन आरोपी महिला नागपुरात खाजगी रुग्णालयात परिचारिका रुपात आहेत कार्यरत, चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात जन्म झालेल्या एका बालकाच्या आईला एचआयव्ही असल्याचे खोटे सांगून बाळाला केले गेले दूर, नागपुरातील एक स्वयंसेवी संस्था अशा HIV ग्रस्त मातांच्या बाळाला सांभाळते असा करण्यात आला दावा, दहा दिवसाचे बालक स्वतःपासून दूर गेल्याने संशयग्रस्त झालेल्या महिलेने पोलिसांना केली तक्रार, पोलिसांनी दोन लाख 75 हजार रुपयात बाळ विकल्याचे धक्कादायक प्रकरण आणले पुढे

कराड पोलिस ठाण्यात कोरोनाचा शिरकाव

कराड पोलिस ठाण्यात कोरोनाचा शिरकाव झाला आहे. तब्बल 30 पोलिस कर्मचारी कोरोना बाधित झाले आहेत. बाधितांमध्ये दोन पोलिस अधिकाऱ्यांसह गरोदर महिला पोलिस कर्माचाऱ्यांचाही समावेश आहे. 

सोलापूर शहरातील शाळा 31 जानेवारी नंतर सुरू होणार

सोलापूर शहरातील शाळा 31 जानेवारी नंतर सुरू करण्याचा निर्णय पालिकेच्या शिक्षण विभागाने घेतला आहे. 31 जानेवारीला कोव्हिड परिस्थितीचे अवलोकन करून निर्णय कळविला जाईल, अशा सूचना सोलापूरच्या शिक्षण विभागाने दिल्या आहेत.

अकोल्यात आज 352 नव्या कोरोना रुग्णांची नोंद

अकोल्यात आज दिवसभरात 352 नवे कोरोना रूग्ण आढळलेत. सध्या जिल्ह्यात 2504 कोरोना रूग्णांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 1148 रूग्णांचा कोरोनाने मृत्यू झाले आहेत. आज होम आयसोलेशनमधील 320 जण कोरोनामुक्त झालेत.


अकोल्यातील गेल्या पाच दिवसांतील आढळलेले कोरोना रूग्ण :


19 जानेवारी : 398
20 जानेवारी : 469
21 जानेवारी : 397
22 जानेवारी : 429
23 जानेवारी : 352


पाच दिवसांत एकूण रूग्ण : 2045

मी राजकारणातील कुंभार! मडकं फुटलं की नवं तयार करतो, मी अनेक नेते तयार केले : रावसाहेब दानवे

Raosaheb Danve : मी राजकारणातील कुंभार आहे. हातातलं मडकं फुटलं की कुंभार  रडत नाही. फेकून देतो आणि पुन्हा नवं तयार करतो. मी अनेक नेते तयार केले आहेत, असे वक्तव्य भाजप नेते आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केलं आहे. युवा मोर्चा भाकरी घरच्या डब्बा पार्टी कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी दानवे यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केलं. तुम्हला निवडणूकीसाठी तयार करायला आलोय, असेही दानवे म्हणाले. 

मुंबई काँग्रेसच्या तीन दिवसीय प्रशिक्षण शिबिराचा आजचा शेवटचा दिवस

मुंबई काँग्रेसच्या तीन दिवसीय प्रशिक्षण शिबीराचा आजचा शेवटचा दिवस, नाना पटोले, भाई जगताप, चरणसिंग सप्रा आणि मुंबईतील नगरसेवक, युवा काँग्रेस, महिला काँग्रेसच्या पदाधिकारी उपस्थित 


- मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आज काय घोषणा करणार ? याकडे सगळ्यांच्या नजरा

इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी गावातून महामार्ग जाऊ नये यासाठी सर्व व्यापारी व दुकानदार यांनी बेमुदत धरणे
 जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी महामार्गात  पुणे जिल्ह्यातील  इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी गावातून महामार्ग जाऊ नये यासाठी सर्व व्यापारी व दुकानदार यांनी बेमुदत धरणे आंदोलनाला सुरुवात केलीये. यावेळी गावातून रस्त्याच्या दुतर्फा बाधीत होणाऱ्या  दुकानदारांनी आपली दुकाने बंद ठेवत या आंदोलनात सहभाग नोंदवलाय .. हा पालखी  महामार्ग गावातुन गेल्यास तालुक्यातील सर्वात मोठी असणारी बाजारपेठ उद् ध्वस्त होईल.. म्हणुन सुरुवाती पासुन गावातील दोनशे पेक्षा जास्त व्यापारी व दुकानदारांचा गावातुन महामार्ग जाण्यास तीव्र  विरोध केलेला आहे. निमगाव केतकीतील सुवर्णयुग गणेश मंदिरात व्यापारी व दुकानदारांनी या  बेमुदत धरणे आंदोलनास सुरुवात केलीय..

 
स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्तानं आदित्य ठाकरे यांचा उद्धाटनांचा धडाका 

स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्तानं आदित्य ठाकरे यांचा उद्धाटनांचा धडाका 


आगामी महानगरपालिका निवडणूका डोळ्यांसमोर ठेवत विकासकामांचा उद्धाटन सोहळा 

कुर्ला येथे असलेल्या आंबेडकर नगर, गरीब मोहल्ला येथे दरड आणि घर कोसळून एक महिलेचा मृत्यू

कुर्ला येथे असलेल्या आंबेडकर नगर, गरीब मोहल्ला येथे दरड आणि घर घरावर कोसळून एक महिलेचा मृत्यू झाला आहे. लता साळुंखे असे मयत महिलेचे नाव आहे.आज सकाळी अचानक ही दरड खाली असलेल्या साळुंखे कुटुंबाचा घरावर कोसळली.जिथे दरड कोसळली तिथे साळुंखे कुटुंबाचे किचन होते.ज्यात लता साळुंखे हे स्वयंपाक करीत होत्या.त्यांच्या अंगावर ही दरड कोसळली.गंभीर जखमी अवस्थेत त्यांना कुर्ला नर्सिंग होम मध्ये उपचारास दाखल केले.मात्र त्यांचा मृत्यू झाला.या ठिकाणी हा विभाग विकासकाने विकासासाठी घेतला आहे.मात्र अजून ही इथला विकास झाला नसल्याने अशा घटना वारंवार होत असल्याचे स्थानिक सांगत आहे. 

मुंबईतील कुर्ल्यात उतारावरच्या झोपडीचा भाग एका दुसऱ्या घरावर पडला, एसजी बर्वे मार्गावरील घटना, एका महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती

#BREAKING : मुंबईतील कुर्ल्यात उतारावरच्या झोपडीचा भाग एका दुसऱ्या घरावर पडला, एसजी बर्वे मार्गावरील घटना, एका महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती



 



https://marathi.abplive.com/news/maharashtra/maharashtra-marathi-news-breaking-news-live-updates-january-23-2022-today-marathi-headlines-maharashtra-political-news-mumbai-news-national-politics-news-1027625

बोरिवलीत दै. सामनाच्या अंकाचे पूजन

शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी स्थाापन केलेल्या दैनिक सामनाचा पहिला अंक 23 जानेवारी 1989 रोजी संपादित झाला. बोरिवली पश्चिम येथील शिवसेना शाखा क्रमांक दहा येथे दर वर्षी या प्रथम अंकाचे पूजन होते. यंदा शिवसेना विभागप्रमुख, आमदार विलास पोतनीस यांनी या अंकाचे पूजन केले. हा अंक अत्यंत जिव्हाळ्याने सांभाळून ठेवणारे ज्येष्ठ शिवसैनिकसूर्यकांत निर्मळ यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

मुंबईतील हवा गुणवत्ता पातळी खालवली, मुंबईतील एकूण हवा गुणवत्ता निर्देशांक 180 वर, पीएम 2.5

मुंबईतील हवा गुणवत्ता पातळी खालवली, मुंबईतील एकूण हवा गुणवत्ता निर्देशांक १८० वर, पीएम २.५ 


मालाड आणि माझगावमध्ये हवा गुणवत्ता निर्देशांक ३०० पार, दोन्ही ठिकाणी हवेची गुणवत्ता अति खराब श्रेणीत, मालाडमध्ये एक्यूआय ३१६ तर माझगावमध्ये ३१५ एक्यूआय


मुंबईत सकाळपासूनच ढगाळ वातावरण, अनेक ठिकाणी धुक्यांचं चित्र

सिंधुदुर्ग जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी

सिंधुदुर्ग जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी


जिल्ह्यातील कुडाळ, सावंतवाडी, दोडामार्ग, वेंगुर्ले तालुक्यातील अनेक ठिकाणी पावसाच्या सरी


अवकाळी पावसामुळे आंबा, काजू उत्पादक शेतकरी चिंतेत


आंबा मोहोर काळवडुन खराब होण्याची दाट शक्यता

पार्श्वभूमी

Maharashtra Breaking News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...


Subhash Chandra Bose : सुभाष चंद्र बोस यांची 125 वी जयंती, देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात 'नेताजीं'चा मोलाचा वाटा


Subhash Chandra Bose : स्वातंत्र्यसेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची आज 23 जानेवारी रोजी त्यांची जयंती आहे. नेताजींनी स्वातंत्र्य चळवळीत मोलाचा वाटा निभावला. त्याच्या स्मरणार्थ कृतज्ञता म्हणून हा दिवस दरवर्षी 'पराक्रम दिवस' म्हणून साजरा केला जातो. या वर्षी 2022 मध्ये सुभाषचंद्र बोस यांची 125 वी जयंती साजरी केली जात आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जन्म 23 जानेवारी 1897 रोजी कटक, ओडिशा, बंगाल विभागात झाला. बोस यांच्या वडिलांचे नाव जानकीनाथ बोस आणि आईचे नाव प्रभावती होते. सुभाषचंद्र बोस यांचे वडील जानकीनाथ बोस हे व्यवसायाने वकील होते आणि त्यांची आई गृहिणी होत्या. 


नेताजी यांचे प्राथमिक शिक्षण कटक येथील रेवेनशॉ कॉलेजिएट स्कूलमध्ये झाले. यानंतर त्यांचे पुढील शिक्षण कोलकाता येथील प्रेसिडेन्सी कॉलेज आणि स्कॉटिश चर्च कॉलेजमध्ये झाले. यानंतर त्यांच्या पालकांनी बोस यांना भारतीय नागरी सेवेची तयारी करण्यासाठी इंग्लंडमधील केंब्रिज विद्यापीठात पाठवले. नेताजींनी 1920 मध्ये इंग्लंडमध्ये नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण केली परंतु भारतीय स्वातंत्र्य लढ्यात भाग घेण्यासाठी त्यांनी नोकरी सोडली. नेताजी सुभाषचंद्र बोस लहानपणापासूनच भारतीय स्वातंत्र्यलढ्याशी संबंधित चळवळींमध्ये सहभागी होते. 


Rohit Patil : रोहित पाटील यांना राष्ट्रवादी पक्षात लवकरच मोठी जबाबदारी मिळणार



Rohit Patil : कवठेमहांकाळ नगरपंचायत निवडणुकीत करिष्मा घडवून आणलेल्या  रोहित पाटील यांच्याकडे राष्ट्रवादी पक्ष मोठी जबाबदारी देणार असल्याचे संकेत मिळत आहेत. यामध्ये रोहित यांची राष्ट्रवादी युवक प्रदेशाध्यक्षपदी वर्णी लागणार असल्याची चर्चा सुरू झालीय. कर्जत -जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी देखील नगरपंचायत निकालानंतर रोहित पाटील यांचे अभिनंदन करत त्यांना पक्षातील मोठी जबाबदारी मिळणार असल्याचे सुतोवाच केले होते.


 नुकत्याच झालेल्या आणि संपूर्ण राज्याचे लक्ष वेधून घेतलेल्या  कवठेमहांकाळ नगरपंचायत निवडणुकीत रोहित पाटील यांची नगरपंचायतवर एकहाती सत्ता आली. 23 वर्षीय रोहितने राष्ट्रवादीच्या चिन्हावर ही निवडणूक लढवत या नगरपंचायत निवडणूकीत एकत्र आलेल्या विरोधकांचा पराभव करत सर्वांना धक्का दिला. या विजयाने रोहित पाटील यांच्या राजकीय कारकीर्दीची विजयी सुरुवात झालीच शिवाय राष्ट्रवादी पक्षातील रोहित पाटील यांचे वजन देखील वाढलंय.  


अवघ्या तेवीस वर्षाच्या रोहित पाटील यांनी कवठेमंकाळ नगर पंचायत निवडणुकीत विरोधकांना धोबीपछाड देत कवठेमंकाळ नगरपंचायत ची सत्ता एकहाती ताब्यात मिळवली. त्यामुळे राजकीय वर्तुळात रोहित पाटील यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. दुसरीकडे रोहितवर  राष्ट्रवादीची ताकद उभी करण्यासाठीच  युवक अध्यक्षपदाची जबाबदार लवकरच सुपूर्द करण्यात येणार असल्याची चर्चा आहे.


आर. आर.पाटील यांनीही राष्ट्रवादी काँग्रेसची अध्यक्षपदाची धुरा पाच ते सहा वर्षे सांभाळलेली होती. तसेच राज्यात राष्ट्रवादीला सक्रिय करण्यात त्यांचे मोठे योगदान होते.  तासगाव, कवठेमहांकाळ या विधानसभा मतदारसंघात आता रोहित पाटील यांच्याकडे  उदयोन्मुख नेतृत्व म्हणून आता पाहिले जात आहे. आगामी विधानसभेत रोहित यांना विधानसभेचे तिकीट देऊन सांगली जिल्ह्याच्या राजकारणात भाजपला रोखण्याची जबाबदारी दिली जाईल. रोहित पाटील यांना राजकीय बळ मिळावे, यासाठीच त्यांच्या नावाची शिफारस युवकांच्या प्रदेशाध्यक्ष पदासाठी करण्यात आली आहे.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.