Maharashtra Breaking News LIVE Updates : पुणे शहरात आज 8301कोरोना रुग्णांची नोंद

Maharashtra Breaking News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

abp majha web team Last Updated: 21 Jan 2022 07:14 PM
पुणे शहरात आज 8301कोरोना रुग्णांची नोंद

पुणे शहरात आज 8301कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. ही आतापर्यंतची एका दिवसात आढळलेली सर्वाधिक वाढ आहे. चार रुग्णांचा आज मृत्यू झालाय. पुण्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची एकूण संख्या 45081 झालीय.  आज 5480 व्यक्ती कोरोनातून बरे झाले आहेत. 

बीड जिल्ह्यात केवळ अकरावी आणि बारावीचे वर्ग सुरू, इतर वर्गांचे निर्णय पुढच्या आठवड्यात

बीड जिल्ह्यात कोरोनाबाधीतांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने बीड जिल्ह्यातील केवळ अकरावी आणि बारावी या दोन वर्गाची शाळा सुरू होणार आहे उर्वरित शाळा सुरू करण्यासंदर्भात निर्णय हा पुढच्या आठवड्यामध्ये घेतला जाईल असा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे 


बीड चे जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी शिक्षण विभागाला तश्या सूचना दिल्या असून सोमवार ऐवजी शुक्रवार पर्यंत जिल्ह्यातील कोरोनाबाधीतांच्या संख्येवर लक्ष ठेवून शुक्रवारनंतर शाळा उघडण्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. मात्र सोमवारपासून दहावी आणि बारावीच्या वर्गाला मात्र परवानगी देण्यात येणार आहे.


शिक्षण विभागाने शाळा सुरू करण्याबाबत जिल्हाधिकार्‍यांकडे प्रस्ताव पाठवल्यानंतर जिल्हाधिकार्‍यांनी आरोग्य विभागाशी याबाबत चर्चा केली. केवळ अकरावी आणि बारावीचे वर्ग उघडणे संदर्भातला निर्णय झाला आहे बाकी इतर वर्ग संदर्भात पुढच्या आठवड्यामध्ये निर्णय घेतला जाणार आहे

वरिष्ठ आयपीएस ए. ए. खान यांचे निधन

वरिष्ठ आयपीएस  ए. ए. खान (वय 81 वर्षे) Spl IGP सेवानिवृत्त,  पोलीस अधिकारी   यांचे आज दुपारी 3 च्या सुमारास कोकिलाबेन रुग्णालयात   निधन झाले आहे.  ए ए खान हे कुख्यात गुंड माया डोळस याचा एनकाउंटर केल्याप्रकरणी प्रकाश झोतात आले होते

गेल्या 24 तासात मुंबईतील 18 पोलिस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण

गेल्या 24 तासात मुंबईतील 18 पोलिस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आह. आतापर्यंत मुंबईतील
10,696 पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनामुळे आतापर्यंत 127 पोलिसांचा मृत्यू झाला आहे. 

महाराष्ट्र जीवन प्राधिकरण ग्राहकांसाठी अभय योजना जाहीर, मंत्री गुलाबराव पाटील यांची माहिती

महाराष्ट्र जीवन प्राधिकरण ग्राहकांसाठी अभय योजना जाहीर करण्यात आली आहे. पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी ही  माहिती दिली आहे. पाणीपट्टीच्या मूळ मुद्दलावरील विलंब शुल्क माफ होणार आहे.  ग्राहकांना प्रोत्साहन मिळण्यासाठी अभय योजना जाहीर करण्यात आली आह्

कोल्हापूर पोलीस दलातील दोन कॉन्स्टेबलना 10 लाखाची लाच घेताना रंगेहाथ अटक

कोल्हापूर पोलीस दलातील एलसीबीच्या दोन कॉन्स्टेबलना 10 लाखाची लाच घेताना रंगेहाथ अटक करण्यात आली आहे. हेड कॉन्स्टेबल विजय कारंडे आणि किरण गावडे हे एलसीबीच्या जाळ्यात सापडले आहेत. स्पोर्ट्स बाईक चोरीची असल्याने कारवाई टाळण्यासाठी विजय कारंडे आणि किरण गावडे यांनी तक्रारदार यांच्याकडे 25 लाखाची मागणी केली होती. तडजोडीत  10 लाख रुपये  स्वीकारताना आज एलसीबीने रंगेहाथ पकडल


 

डॉ. अमोल कोल्हेंच्या चित्रपटाला काँग्रेस विरोध करणार: नाना पटोले

राष्ट्रवादीचे खासदार यांनी 'व्हाय आय किल्ड गांधी; या चित्रपटात नथुराम गोडसेची भूमिका केली आहे. त्यामुळे या चित्रपटाला काँग्रेस विरोध करणार असल्याचं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितलं आहे. 

गोडसेंच्या चित्रपटाला आम्ही विरोध करणार - नाना पटोले

गोडसेंच्या चित्रपटाला आम्ही विरोध करणार आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेते नाना पटोले यांनी दिली आहे. लोकशाही मार्गाने आम्ही आमचा विरोध प्रकट करणार आहे. शरद पवार काय म्हटले याच्यामुळे आम्हाला फरक पडत नाही. किंवा ती भूमिका कोण करतंय याच्यावरून ही आम्हाला फरक नाही. या विचारांचा आम्ही विरोध करतो आणि त्यामुळे ही भूमिका मांडत राहणार, असे पटोले म्हणाले. 

मुंबई उच्च न्यायालय परिसरात साप आढळला, सकाळच्या वेळी फारशी वर्दळ नसल्यानं गोंधळ उडाला नाही

मुंबई उच्च न्यायालय परिसरात शुक्रवारी सकाळी एक साप आढळून आला. मुख्य इमारतीच्या जवळच असलेल्या पंपहाऊसच्या शेजारीच एका दालनात हा साप आढळून आला. सकाळी 9:30 वाजताची वेळ असल्यानं त्यावेळी तिथं फारशी वर्दळ नव्हती. उपस्थित कर्मचा-यांनी तात्काळ या घटनेची बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी तातडीनं हा साप पकडण्यासाठी सर्पमित्राला पाचारण केलं.


सर्पमित्र वाल्मिकी यांनी तात्काळ हायकोर्ट गाठत या सापाला मोठ्या शिताफिनं ताब्यात घेतलं. धामण जातीचा साधारण 4.5 ते 5 फुटांचा हा बिनविषारी साप होता. त्यानंतर या सापाला संरक्षित अधिवासात सोडण्यात येईल. सकाळची वेळ असल्यानं त्यावेळी तिथं फारशी वर्दळ नव्हती. तसंही सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाचं कामकाज हे दुपारी 12 ते 3 यावेळेत ऑनलाईन पद्धतीनं सुरू असल्यानं कोर्टात फारच कमी प्रमाणात लोकांची वर्दळ असते. याशिवाय मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य इमारतीत डागडुजी आणि रंगकाम सुरू असल्यानं त्याकामामुळे हा साप बाहेर पडला असावा असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. 

 
पालघर जिल्हा प्रशासनाकडून इयत्ता आठवी ते बारावीपर्यंतचे वर्ग 27 जानेवारीपासून सुरू करण्याचा निर्णय

सरकारचा राज्यातील शाळा सुरू करण्याच्या निर्णयानंतर पालघर जिल्हा आपत्ती व्यवस्थापनकडून जिल्ह्यातील कोरोना संक्रमणाची स्थिती पाहता जिल्हा प्रशासनाकडून इयत्ता आठवी ते बारावी पर्यंतचे वर्ग 27 जानेवारीपासून सुरू करण्याचा निर्णय घेतला असून पुढील परिस्थिती पाहता पहिली ते सातवी पर्यंत चे वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेण्यात येईल अशी माहिती पालघरचे जिल्हाधिकारी डॉक्टर माणिक गुरसळ यांनी दिली आहे

मुंबई काँग्रेसच्या तीन दिवसीय प्रशिक्षण शिबिराला सुरुवात, प्रमुख नेत्यांची उपस्थिती

मुंबई काँग्रेसच्या तीन दिवसीय प्रशिक्षण शिबिराला सुरवात


सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण,भाई जगताप, बाबा सिद्धिकी यांच्यांसह प्रमुख पदाधिकारी उपस्थिती


आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रणनीती ठरविली जाणार


शिबिराच्या आयोजना वरून वाद निर्माण होण्याची शक्यता


कोरोना पार्श्वभूमीवर पोलिसांची नोटीस


*50 पेक्षा जास्त प्रतिनिधीच्या उपस्थितीला पोलिसांचा विरोध
कोरोना नियमांचे पालन करण्याच्या सूचना*


रोज 100 ते125 प्रशिक्षणार्थीच्या उपस्थितिला मागितली होती परवानगी
केवळ 50 जणांना उपस्थित राहण्याची परवानगी


स्थानिक प्रशासनाच्या भूमिकेकडे लक्ष

आम्ही सामान्य चेहरे उमेदवार देणार, आज 9 उमेदवार यांची घोषणा - खासदार संजय राऊत

आम्ही सामान्य चेहरे उमेदवार देणार  , आज 9 उमेदवार यांची घोषणा - खासदार संजय राऊत

पुणे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर इंदापूर नजीक लोंढेवस्ती नजीक बस पलटली, चालक ठार तर दहा जण गंभीर जखमी 



पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर इंदापूर तालुक्यातील वरकुटे पाटी परिसरात खाजगी कंपनीची बस पलटी झाली.. या अपघातात बस चालक जागीच ठार झालाय.. आज पहाटे ही घटना घडलीय.. एम.एच.०३-सी.पी.-३७१५ ही ट्रॅव्हल्स मुंबईवरुन अक्कलकोटकडे  निघाली होती.. इंदापूर तालुक्यातील वरकुटे पाटी परिसरात लोंढेवस्ती नजीक आली असता बस चालकाला डोळा लागला लागल्याने बस पहिल्या लेन वरुन दुसऱ्या लेन वर जावून रस्ता दुभाजकाला जावून धडकली.. त्यानंतर पहिल्या लेन वर बस पलटी झाली.. यात चालक जागीच ठार झालाय.. या प्रवासी बस मध्ये 20पेक्षा अधिक प्रवासी होते.. त्यापैकी दहा प्रवासी गंभीर जखमी झाले असून त्यांना इंदापूर उपजिल्हा रुग्णालय इंदापूर,सोलापूर शासकीय रुग्णालय व पुणे ससून तर इंदापूर मधील काही खाजगी रूग्णालयात उपचारासीठी दाखल केलंय..


















 














पुणे स्थानकात मेमू ट्रेन रुळावरून घसरली, यार्डमधून बाहेर येत असताना मेमू ट्रेनचे 1 ते 2 डबे घसरले, यामुळे सोलापूरहुन मुंबईला येणारी मार्गिका झाली बंद

पुणे स्थानकात मेमू ट्रेन रुळावरून घसरली, यार्डमधून बाहेर येत असताना मेमू ट्रेनचे 1 ते 2 डबे घसरले, यामुळे सोलापूरहुन मुंबईला येणारी मार्गिका झाली बंद, 
इतर गाड्यांना डायव्हर्ट करून चालवण्यात येणार, 
तसेच काही गाड्या डिटेन होण्याची शक्यता,
ही मेमु पुणे - दौंड मार्गावर धावते, 
सकाळी 9.45 च्या सुमारास प्लॅटफॉर्म 3 वर जाताना घडली दुर्घटना 
सुदैवाने गाडीत कोणीही नव्हते,

आज अहमदनगर शहराचा आणि उपनगरांचा पाणीपुरवठा बंद राहणार

वीज वितरण कंपनीकडून अहमदनगर शहर पाणीपुरवठा योजनेचा वीजपुरवठा काल खंडित झाला होता. वीजपुरवठा सुरू झाल्यानंतर पुन्हा विळद पंपिंग स्टेशनमध्ये तांत्रिक बिघाड झाला आणि पंपिंग स्टेशन येथील ट्रान्सफॉर्मर नादुरुस्त झाला...परिणामी आज नगर शहराचा आणि उपनगरांमधील पाणीपुरवठा बंद राहणार आहे... ट्रान्सफॉर्मर दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आलंय...आज सायंकाळपर्यंत दुरुस्तीचे काम पूर्ण होईल... दरम्यान, शहरातील नागरिकांनी पाणी जपून वापरावे असं आवाहन महापालिका आयुक्त शंकर गोरे यांनी केलंय...

मुंबई महापालिका निवडणूक प्रक्रियेचे बिगुल वाजले, मुंबई महापालिकेच्या वॉर्ड पुर्नरचनेचा आराखडा निवडणूक आयोगाकडे  सादर

मुंबई महापालिका निवडणूक प्रक्रियेचे बिगुल वाजले, मुंबई महापालिकेच्या वॉर्ड पुर्नरचनेचा आराखडा निवडणूक आयोगाकडे  सादर


मुंबईतील वाढीव ९ वॉर्डकडे लक्ष, वॉर्डची संख्या २२७ वरुन २३६ वर


या निवडणूकीत मुंबईतील वॉर्ड पुर्नरचनेवर राजकिय ठसा


२०११ च्या लोकसंख्येच्या आधारापेक्षा गेल्या ११ वर्षांच्या काळात वाढलेल्या  नव्या इमारती, वस्त्या, आणि वाढीव नवी बांधकामे झालेल्या ठिकाणच्या लोकसंख्येच्या घनतेचा आधार घेऊन वॉर्ड पुर्नरचना


मुंबई शहर, पश्चिम उपनगरे आणि पूर्व उपनगर याठिकाणी समसमान ३ वॉर्ड वाढवल्याची सूत्रांची माहिती


शहरभागात लोअर परळ, वरळी सारख्या नवी बांधकामे आणि इमारती उभ्या राहिलेल्या परिसरात नवे वॉर्ड येण्याची शक्यता असल्याची सूत्रांची माहिती


पूर्व उपनगरांत मानखुर्द, संघर्षनगर, माहूल याठिकाणी नवे वॉर्ड येण्याची शक्यता


पश्चिम उपनगरात बोरिवली, मालाड, वांद्रे भागात वॉर्ड वाढवले जाण्याची शक्यता

उस्मानाबाद जिल्ह्यातील सोमवारी शाळा सुरू करण्याचा निर्णय पुढे ढकलला, कोरोनाचा पॉझिटीव्ह रेट जास्त असल्याने निर्णय पुढे, 26 जानेवारीला होणार निर्णय.

उस्मानाबाद जिल्ह्यातील सोमवारी शाळा सुरू करण्याचा निर्णय पुढे ढकलला, कोरोनाचा पॉझिटीव्ह रेट जास्त असल्याने निर्णय पुढे, 26 जानेवारीला होणार निर्णय.

इगतपुरीत आजपासून तीन दिवस काँग्रेसचं शिबीर, निवडणुकीची रणनीती ठरणार

इगतपुरीतल्या थंड वातावरणात राज्यातले काँग्रेस नेते आजपासून तीन दिवस निवडणूक रणनीतीवर चर्चा करणार आहेत. सकाळी 11 वाजता काँग्रेसच्या या शिबिराला सुरुवात होणार आहे. स्वबळाचा नारा देणाऱ्या काँग्रेसची आगामी निवडणुकीत काय रणनीती असेल याचा निर्णय या बैठकीत होण्याची शक्यता आहे. 106 नगरपंचायतींच्या निकालांचं विश्लेषणही यावेळी घेतलं जाईल. आगामी निवडणुकीत काँग्रेस स्वबळाचा हट्ट कायम ठेवणार की राष्ट्रवादी, शिवसेनेशी आघाडी करण्याचा निर्णय घेणार याकडे कार्यकर्त्यांचं लक्ष असेल. 

मार्च मध्ये जिल्हा परिषदांची रणधुमाळी, राज्य निवडणूक आयोगाचे संकेत

मार्च मध्ये जिल्हा परिषदांची रणधुमाळी. राज्य निवडणूक आयोगाचे संकेत. कोरोनाची बंधन पाळून या निवडणुका होणार आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका त्यांची मुदत संपण्यापूर्वी घेण्याचे आयोगावर संविधानिक बंधन आहे. असं स्पष्ट करत राज्य निवडणूक आयोगाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यामुळे मार्चमध्येच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याचे संकेत आयोगानं 17 जानेवारीला काढलेल्या पत्रातून दिसत आहे

मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचे माजी अध्यक्ष,ज्येष्ठ पत्रकार आणि संपादक दिनकर रायकर यांचे निधन

मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचे माजी अध्यक्ष,ज्येष्ठ पत्रकार आणि संपादक दिनकर रायकर यांचे आज निधन झाले

पार्श्वभूमी

Maharashtra Breaking News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...


Maharashtra Unseasonal Rains : राज्यावर पुन्हा अवकाळीचं संकट; 23 आणि 24 जानेवारीला कोकणासह मध्य महाराष्ट्रात पावसाचा इशारा
 
Maharashtra Unseasonal Rains : राज्यावर पुन्हा एकदा अवकाळीचे ढग घोंगावत आहेत. कोकणासह मध्य महाराष्ट्रात पावसाचा इशारा देण्यात आला आहे. 23 आणि 24 जानेवारीला पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. पहिल्याच आठवड्यात अवकाळी पावसाची नोंद झाली आहे. हा जोर पुढे कायम राहील, असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तवलेला आहे. ला निनो परिस्थिती निर्माण झाल्यानेच हवामान बदललं आहे. कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढत असून हा ग्लोबल वॉर्मिंगचा परिणाम असल्याचं तज्ज्ञांनी म्हटलं आहे.  बदलत्या हवामानामुळे अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.


जागतिक स्तरावर ला निनो ही परिस्थिती निर्माण झाली आहे. प्रशांत महासागराचं तापमान वाढल्याचा हा परिणाम असल्याचं हवामान तज्ज्ञांनी सांगितलं आहे. गतवर्षी 15 मे रोजी तोक्ते चक्रीवादळाचा तडाखा बसला होता. त्यानंतर मोसमी हंगामातही अतिमुसळधार पाऊस झाला होता. परतीचा पाऊसही ऑक्टोबरपर्यंत होता. पुढे नोव्हेंबर, डिसेंबर आणि नववर्षाच्या सुरुवातीला जानेवारीच्या पहिल्याच आठवड्यातही राज्यात अवकाळीची नोंद झाली होती. हा जोर पुढे कायम राहील, असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तवला होता. याच बदलत्या हवामानामुळं कोकण आणि मध्य महाराष्ट्रात 23 आणि 24 जानेवारीला पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 


ICC T20 World Cup 2022 : आयसीसीकडून टी20 विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर; टीम इंडियाचं शेड्यूल पाहा  
 
Ind vs Pak T20 World Cup:  आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC)नं टी 20 विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर केले आहे. यंदा ही स्पर्था ऑस्ट्रेलियात ऑक्टोबर- नोव्हेंबर महिन्यात पार पडणार आहे.  यात भारत, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, बांगलादेश, इंग्लंड, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, अफगानिस्तान हे संघ आधीच पात्र ठरले आहेत तर श्रीलंका, नामिबिया, वेस्ट इंडिज आणि स्कॉटलंड हे चार संघ 16 ऑक्टोबरपासून पात्र ठरण्यासाठी खेळतील. यामधून निवडलेल्या दोन संघांना सुपर 12 मध्ये खेळण्याची संधी मिळेल.


टीम इंडिया विश्वचषकातील आपल्या अभियानाला 23 ऑक्टोबरपासून सुरुवात करेल. पहिला सामना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान विरुद्ध असणार आहे. मेलबर्नच्या मैदानावर भारत आणि पाकिस्तान 23 ऑक्टोबरला एकमेकांसमोर असतील. याआधी टी 20 विश्वचषकात भारत पाकिस्तान  2021मध्ये भिडले होते. त्या सामन्यात पाकिस्ताननं भारताला पराभूत केलं होतं. 


 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.