Maharashtra Breaking News LIVE Updates : खासदार अमोल कोल्हे 'नथुराम गोडसे'च्या भूमिकेत, वादाची शक्यता

Maharashtra Breaking News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

abp majha web team Last Updated: 20 Jan 2022 05:50 PM
बी. के. उपाध्याय होमगार्डचे महासंचालक

वरिष्ठ आयपीएस अधिकारी बी. के. उपाध्याय म्हणजेच डॉ. भूषण कुमार उपाध्याय यांना बढती देण्यात आली आहे.  बी. के. उपाध्याय यांची परमबीर सिंहांच्या जागी नियुक्ती करीत त्यांना पोलीस महासंचालकपदी बढती देण्यात आलीय.

सातारचे खासदार श्रीनिवास पाटील यांना कोरोनाची लागण.

सातारचे खासदार श्रीनिवास पाटील यांना कोरोनाची लागण...  उपचारासाठी साता-यातील खासगी रुग्णालयात दाखल

मुंबईतले निर्बंध हळूहळू उठतील - अस्लम शेख, पालकमंत्री, मुंबई 

मुंबईतले निर्बंध हळूहळू उठतील, लगेच काही सर्व होणार नाही सगळ्याशी चर्चा करून निर्णय घेणार टास्क फोर्स डॅाक्टरांच्या सल्ल्यानंतर सर्व निर्णय घेतले जातील, अशी माहिती मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी दिली आहे. शाळांसंदर्भात आज चर्चा झाली, शाळांसाठी लागणारे निर्बंध जाहिर केले जातील आपल्याला हळूहळू सर्व सुरु करावं लागेल. शाळा सुरु करण्यासाठी सर्व नियम पाळले जातील सर्वांना लस आणि बूस्टर डोस दिला पुर्ण असेल सर्व खबरदारी घेऊनच निर्णय घ्यावा लागेल, असेही अस्लम शेख म्हणाले.

चंद्रशेखर बावनकुळे आणि त्यांच्यासोबत ठिय्या आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

चंद्रशेखर बावनकुळे आणि त्यांच्या सोबत ठिय्या आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्याच आलाय. कोरोना मार्गदर्शन सुचनांचं उल्लंघन केलं म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  कलम १८८ अन्वये कोराडी पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल झाला. नाना पटोले यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी 18 जानेवारी रोजी केलं होतं आंदोलन. आंदोलनात मोठ्या संख्येनं कार्यकर्ते झाले होते सहभागी झाले होते. आंदोलन करताना कोविड नियमांचं उल्लंघन केल्यामुळं पोलिसांनी केला गुन्हा दाखल केला. 

खासदार अमोल कोल्हे 'नथुराम गोडसे'च्या भूमिकेत, वादाची शक्यता

राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी व्हाय आय किल्ड गांधी या चित्रपटात नथुराम गोडसेची भूमिका साकारली असून त्यावरुन आता वाद होण्याची शक्यता आहे. हा चित्रपट लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. 

घरकुलाच्या मागणीसाठीपरभणीच्या मैराळ सावंगी येथील गावकऱ्यांचे जलसमाधी आंदोलन 

गावातील अनेक गावकरी मातीच्या घरात राहत असताना गावकऱ्यांना घरकुलाचा लाभ दिला जात नसल्याने संतापलेल्या काही गावकऱ्यांनी जलसमाधी आंदोलन केले. परभणीच्या गंगाखेड तालुक्यातील मैराळ सावंगी येथील गावकऱ्यांनी  गोदावरी नदी पात्रात उतरून जलसमाधी आंदोलन केले. आंदोलन केल्यानंतर ग्रामसेवक तसेच सरपंचांनी तात्काळ आंदोलनस्थळी भेट देऊन घरकूल देण्याचे आश्वासन दिले तेव्हा आंदोलकांनी हे आंदोलन मागे घेतले.

मानेंच्या बाजूनं महिला कलाकारांची संख्या जास्त, सत्याची बाजू घेणा-या या ख-या जिजाऊच्या लेकी आहेत - जितेंद्र आव्हाड

कलाकार, प्रॅाडक्शन हाऊस आणि स्टार प्रवाहमधला वाद मिटवण्यासाठी जितेंद्र आव्हाडांची मध्यस्ती, चांगली मालिका बंद होऊ नये यासाठी आव्हाडांचे प्रयत्न. 

किरण माने प्रकरणात सतीश राजवाडे यांच्याशी चर्चा केल्याची माहिती जितेंद्र आव्हाड यांनी दिली. आपण मानेंना नोटीस दिली होती का? मेल पाठवला होता का? असे प्रश्न विचारण्यात आले. एका कलाकाराला बाहेर काढणं हे योग्य नाही.  मानेंच्या बाजूनं महिला कलाकारांची संख्या जास्त, सत्याची बाजु घेणा-या या ख-या जिजाऊच्या लेकी आहेत.  किरण मानेंवर अन्याय झाल्याचं स्पष्ट होतंय, असे आव्हाड म्हणाले. 

राजवाडे यांनी प्रॅाडक्शन हाऊस यांना घेऊन येतो,  असं सांगितलं आहे. या प्रकरणाला कुठेही रंग न लावता अन् कोणावरही अन्याय न होऊ देता काम केलं पाहिजे. राजवाडेंना या प्रकरणात काहीच माहित नव्हतं असं सांगितलं, अशी माहिती जितेंद्र आव्हाड यांनी दिली. 

मध्यप्रदेशमधील दरोडेखोरांसोबत पिंपरी- चिंचवड पोलिसांची झटापट

मध्यप्रदेशमधील दरोडेखोरांसोबत पिंपरी- चिंचवड पोलिसांची झटापट झालीये. आठ आरोपींना पोलिसांनी बेड्या ही ठोकल्यात पण आणखी तीन आरोपींचा शोध सुरुये. यात एक पोलीस गंभीर जखमी झालेत. पुणे-मुंबई एक्सप्रेसवे वर हा थरार सकाळी साडे अकराच्या सुमारास घडला. मध्यप्रदेशची ही टोळी पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावरून जाणार असल्याची खात्रीलायक माहिती पिंपरी- चिंचवड पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी उर्से टोल नाक्यावर सापळा रचला होता. मुंबई वरून पुण्याला सकाळी साडेअकराच्या सुमारास दोन संशयित वाहन टोलनाक्यावर आली. त्यावेळी पोलिसांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला असता, दरोडेखोरांनी थेट पोलिसांच्या अंगावर गाड्या घालण्यास सुरुवात केली. मात्र, तरी देखील पोलिसांनी मार्गावरून हटले नाहीत. शेवटी पोलिसांच्या अंगावर त्यांनी वाहन घातली आणि गाडीतून उतरत ते डोंगरात पसार झाले. तत्पूर्वी आठ आरोपींना पोलिसांनी जागेवर अटक केली तर चौघे डोंगराळ परिसरात लपून बसलेत. यात एक पोलीस जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच गुन्हे शाखेतील सर्व पथके घटनास्थळी दाखल झाले असून अन्य आरोपींचा शोध घेण्याचे काम सुरू आहे

मुंबईत शाळा सुरू करण्यास महापालिका सकारात्मक, शाळा 27 जानेवारीपासून सुरू होण्याची शक्यता

मुंबईतही शाळा सुरू करण्यासाठी मुंबई महापालिका सकारात्मक असून मुंबईतल्या शाळा 27 जानेवारीपासून सुरू होण्याची शक्यता आहे.  मुंबईत ऑफलाईन बरोबरच ऑनलाईन शाळाही सुरू राहणार आहे. राज्यातील शाळा सोमवारवारपासून सुरू होणार असल्या तरी पालिकेला मात्र शाळा सुरू करण्यासाठी तीन चार दिवसांचा कालावधी लागणार असल्याची माहिती अतिरिक्त महापालिका आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.

परमबीर सिंह यांच्याशी संबंधित भ्रष्टाचाराच्या प्रकरणातील आरोपी विवय सिंह याला जामीन मंजूर

परमबीर सिंह यांच्याशी संबंधित भ्रष्टाचाराच्या प्रकरणातील आरोपी विवय सिंह याला जामीन मंजूर झाला आहे.  मुंबई मुख्य महानगर दिंधिकारी न्यायालयानं  30 हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला. 

बुली बाई अ‍ॅप प्रकरणातील तिन्ही आरोपींचा जामीन अर्ज फेटाळला 

बुली बाई अ‍ॅप प्रकरणातील तिन्ही आरोपींचा जामीन अर्ज फेटाळला  आहे. विशाल कुमार झा, श्वेता सिंह आणि मयंक रावत या आरोपींच्या जामीनास कोर्टाने नकार दिला आहे.  मुंबई पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेकडून जामिनाला विरोध 

वैद्यनाथ काॅलेजवर प्रशासक  नेमण्यास औरंगाबाद खंडपीठाची मनाई

परळी वैजनाथ येथील जवाहर शिक्षण संस्थेच्या वैद्यनाथ महाविद्यालयावर  प्रशासक आणण्याच्या हालचाली सुरू होत्या..मात्र मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने सदर महाविद्यालयावर प्रशासक नेमण्यास मनाई केली असून तसा आदेश पारित केला. जवाहर एज्युकेशन सोसायटी संचलित वैद्यनाथ महाविद्यालय परळी वैजनाथ या संस्थेत  डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा  विद्यापीठाला त्रिसदस्यीय चौकशी समिती देखील नियुक्त करण्यास सांगितले होते. या चौकशी समिती विरुध्द संस्थेने औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली होती, त्याची सुनावणी झाली, त्यावेळी न्यायालयाने हा मनाई आदेश पारित केला

मुंबईच्या आर्थर रोड जेलमध्ये कैद्याची आत्महत्या,  हामिद इक्बाल शेख असं कैद्याचं नाव,शेखला दीड महिन्यापूर्वी JJ मार्ग पोलिसांनी मोबाईल चोरीच्या गुन्ह्यात अटक

मुंबईच्या आर्थर रोड जेलमध्ये कैद्याची आत्महत्या,  हामिद इक्बाल शेख असं कैद्याचं नाव,शेखला दीड महिन्यापूर्वी JJ मार्ग पोलिसांनी मोबाईल चोरीच्या गुन्ह्यात अटक केली होती. गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती, आज सकाळची घटना 

शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांच्यावर गुन्हा दाखल, रॅलीत झालेल्या राड्यामुळे नाईक यांच्यासह कार्यकर्त्यांवर कुडाळ पोलीस स्थानकात गुन्हा

शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांच्यावर गुन्हा दाखल

कुडाळ नगरपंचायत निवडणुकीच्या निकालानंतर आमदार वैभव नाईक यांनी काढलेल्या रॅलीत झालेल्या राड्यामुळे वैभव नाईक यांच्यासह कार्यकर्त्यांवर कुडाळ पोलीस स्थानकात गुन्हा दाखल

काल निवडणूक मिरवणूकीच्या दरम्यान झालेल्या राड्या प्रकरणी शिवसेना आणि भाजपच्या प्रत्येकी २५ ते ३० कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल

जिल्हाधिकाऱ्याचे आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हे दाखल

जिल्ह्यात जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार लागू असलेल्या जमावबंदीचा आदेशाचे उल्लंघन केल्यामुळे कलम १८८, २६९, २७० तसेच आप्पती व्यवस्थापण अन्वये कुडाळ पोलिस स्थानकात गुन्हा दाखल

पार्सलमध्ये लपवून आणलेल्या हेरोइन ड्रग्जचा साठा जप्त , कस्टम विभागाच्या मुंबई युनिटची मोठी कारवाई

कस्टम विभागाच्या मुंबई युनिटची मोठी कारवाई

पार्सलमध्ये लपवून आणलेल्या हेरोइन ड्रग्जचा साठा जप्त 

जप्त हेरोइनच्या बाजारपेठेतील किंमत 2 कोटी 7 लाख 

ह्या प्रकरणी  दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे

मोठी बातमी, सोमवारपासून शाळा सुरु करण्याची मुख्यमंत्र्यांची परवानगी

#BREAKING : मोठी बातमी, सोमवारपासून शाळा सुरु करण्याची मुख्यमंत्र्यांची परवानगी, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती, सर्व नियम पाळून शाळा सुरु करणार https://marathi.abplive.com/news/maharashtra/maharashtra-marathi-news-breaking-news-live-updates-january-20-2022-today-marathi-headlines-maharashtra-political-news-mumbai-news-national-politics-news-1026916

@VarshaEGaikwad

उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसची दुसरी यादी जाहीर, 41 पैकी 16 महिला उमेदवार

उत्तर प्रदेश साठी काँग्रेसची दुसरी यादी जाहीर...

41 पैकी 16 महिला उमेदवार

पहिल्या यादीत 125 उमेदवार जाहीर करण्यात आले होते

आत्तापर्यंत 166 उमेदवार जाहीर, त्यापैकी 66 महिला

भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात 4 वर्षीय चिमुकलीचा मृत्यू

भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात 4 वर्षीय चिमुकलीचा मृत्यू, अंजली रावत असे मयत झालेल्या चिमुकलीचे नाव, नागपूर जिल्ह्यातील बुटीबोरी जवळच्या भारकस येथील घटना 

5 दिवसाआधी अंजली दुपारच्या वेळेस घराजवळ खेळत असताना तिच्यावर पहिले एका कुत्र्याने आणि नंतर इतर दोन कुत्र्यांनी हल्ला केला... कुत्र्यांच्या हल्ल्यातून घाबरलेली अंजली खाली पडली आणि त्यानंतर तीन कुत्र्यांनी तिच्या कमरेला पाठीला आणि पायाला अनेक चावे घेतले.. यात गंभीर जखमी झालेल्या अंजलीला सुरुवातीला जवळच्या टाकळघाट प्राथमिक आरोग्य केंद्रात आणि त्यानंतर नागपूरच्या शासकीय वैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.. मात्र उपचारादरम्यान अंजलीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे...

भारकस गावात तसेच आजूबाजूच्या परिसरात भटके कुत्रे आणि डुकरांचा हैदोस असून नागरिकांवर कुत्रे सातत्याने हल्ले करत असताना स्थानिक ग्रामपंचायत प्रशासन जिल्हा परिषद तसेच पोलिस प्रशासन ऐकत नसल्याची नागरिकांची तक्रार आहे...

ठाणे नौपाडा पोलिसांनी कालीचरण महाराजाची वर्ध्यामधून घेतली कस्टडी

ठाणे नौपाडा पोलिसांनी कालीचरण महाराजची वर्ध्यामधून  घेतली कस्टडी, 

कालीचरणला घेऊन ठाण्याच्या दिशेने टीम निघाली,

संध्याकाळी 7 पर्यंत ठाण्यात पोहोचण्याची शक्यता, 

पुणे पोलिसांकडून रायपूर पोलिसांनी आणि मग वर्धा पोलिसांनी कस्टडी घेतली होती, 

त्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी दाखल केलेल्या गुन्ह्यात नौपाडा पोलिसांनी घेतली कस्टडी

समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांच्याकडून मंत्री नवाब मलिक यांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात नव्यानं अवमान याचिका दाखल

समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांच्याकडून मंत्री नवाब मलिक यांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात नव्यानं अवमान याचिका दाखल

नवाब मलिक यांनी हायकोर्टात सांगितलं होतं की ते वानखेडे यांच्याविरोधात कुठलही आक्षेपार्ह वक्तव्य करणार नाही

हायकोर्टाची मलिक यांनी बिनशर्त माफीही मागितली होती

मात्र 31 डिसेंबर आणि 1 जानेवारी रोजी मलिक यांनी पुन्हा वानखेडे कुटुंबियांविरोधात आक्षेपाहार्य वक्तव्य दिल्याचा वानखेडेंचा आरोप

नागपूर जिल्ह्यात गोसेखुर्द धरणाच्या बॅक वॉटरमध्ये बोट उलटली, बोटीत 5 महिला आणि 1 पुरुष,  एका महिलेचा बुडून मृत्यू

नागपूर जिल्ह्यातील कुही तालुक्यात कुजबा जवळ गोसेखुर्द धरणाच्या बॅक वॉटरमध्ये बोट उलटली, बोटीत 5 महिला आणि 1 पुरुष,  यात एका महिलेचा बुडून मृत्यू, 5 लोकं पोहून बाहेर आले, 5 जणांना सरकारी रुग्णालयात दाखल केले आहे...

Mumbai Local Mega Block : ठाणे-दिवा दरम्यान शेवटचे 2 मेगाब्लॉक, नंतरच पाचवी सहावी मार्गिका सुरू, मध्य रेल्वेची माहिती

https://marathi.abplive.com/news/mumbai/mumbai-local-mega-block-last-2-megablock-between-thane-diva-after-then-5th-and-6th-line-started-information-of-central-railway-1026955

सोलापुरात एसटी कर्मचाऱ्याच्या मुलाची आत्महत्या

सोलापुरात एसटी कर्मचाऱ्याच्या मुलाने केली आत्महत्या केलीय. अमर तुकाराम माळी असे मृत मुलाचे नाव आहे. अमर याचे वडील सोलापुरात एसटी कर्मचारी आहेत. सोलापूरतल्या कोंडी गावात माळी कुटुंबीय राहायला आहेत. काल दुपारी राहत्या घरीच आईच्या साडीला अमर याने गळफास घेतला. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट नाहीये. मात्र आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे. दरम्यान शवविच्छेदन केल्यानंतर रात्री  त्याच्यावर अंत्यसंस्कार पार पडले.

Covid19 Third Wave : दिलासादायक! भारतात दैनंदिन कोरोनारुग्ण संख्या 4 लाखांच्या पार जाणार नाही : शास्त्रज्ञांचा अंदाज

Covid19 Third Wave : अलिकडे वाढता कोरोनाचा धोका पाहता भारतातील दैनंदिन रुग्णसंख्याही दिवसागणिक वाढेल, असा अंदाज वर्तवण्यात आला होता. मात्र, आता एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. भारतात दैनंदिन कोरोनारुग्णांची संख्या 4 लाखांच्या पार जाण्याची शक्यता नाही, असा अंदाज शास्त्रज्ञांनी व्यक्त केला आहे. या विश्लेषणानुसार, मुंबई आणि दिल्लीमध्ये जानेवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यातच कोरोनारुग्णांचा उच्चांक गाठला आहे, तर बेंगळुरू 22 जानेवारी रोजी कोरोनारुग्णांचा उच्चांक गाठेल.

शास्त्रज्ञांना कोरोनाच्या परिस्थितीच्या ताज्या विश्लेषणातून असे दिसून आले आहे की, भारतातील तिसऱ्या लाटेचा उच्चांक 23 जानेवारी रोजी दिसून येईल मात्र, दैनंदिन कोरोनारुग्णांची संख्या चार लाखांच्या पुढे जाण्याची शक्यता नाही. कोविड ट्रॅकरच्या सूत्र मॉडेलने सांगितले की,  मुंबई आणि दिल्लीने जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यातच रुग्णवाढीचा उच्चांक गाठला आहे.

Dhule : नगरपंचायत  निवडणुकीच्या निकालानंतर साक्रीत गालबोट; वादात महिलेचा मृत्यू

Dhule Sakri Latest Update : साक्री नगरपंचायत निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर गालबोट लागल्याचं पाहायला मिळालं. निकालानंतर भाजप कार्यालयात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू होता. यावेळी शिवसेनेचे गोटू जगताप हे आपल्या मोटरसायकलने जात असताना त्यांच्यात आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला या वादाचे पर्यावसन काही वेळात हाणामारीत झाले.

दरम्यान हा वाद सुरू असताना गोटू जगताप यांच्या बहीण मोहिनी नितीन जाधव या वाद सोडविण्यासाठी आल्या होत्या. यावेळी मोहिनी जाधव त्या खाली पडल्या आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला. गोटू जगताप यांच्या मातोश्री ताराबाई जगताप या निवडणुकीत पराभूत झाल्याने  त्यातून ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. 

भावाला मारहाण होत असताना मोहिनी जाधव मध्यस्थी करण्यासाठी पुढे आल्या असताना त्यांचा मारहाणीत मृत्यू झाल्याचा आरोप त्यांच्या नातेवाईकांकडून करण्यात आला आहे. दरम्यान दोषींवर कारवाई होत नाही तोवर मृतदेह ताब्यात न घेण्याचा पवित्रा त्यांच्या नातेवाईकांनी घेतला आहे. मात्र मोहिनी जाधव यांच्या मृत्यू मागील कारण अद्याप समजू शकले नाही. 

Maharashtra School : सोमवारपासून शाळा सुरु? आज मंत्रिमंडळ बैठकीत शिक्कामोर्तब होण्याची शक्यता

Maharashtra School Reopen : राज्यातील शाळा सुरू करण्याबाबत सर्व स्तरातून मागणी होत असताना आता आज याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. आज होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत चर्चा होणार आहे.  शाळा सुरु करण्याबाबत शालेय शिक्षण विभागानं मुख्यमंत्री ठाकरेंना काल प्रस्ताव पाठवलाय. येत्या सोमवारपासून शाळा सुरु करण्यात याव्यात तसंच शाळा सुरु करण्याबाबत स्थानिक प्रशासनाला अधिकार देण्यात यावे असं या अहवालात नमूद करण्यात आलंय. मंत्री आदित्य ठाकरेंनी कोविड टास्क फोर्सशी चर्चा करुन शाळा सुरू करण्याबाबत अनुकुलता दर्शवली आहे. त्यामुळं सोमवारपासून शाळा सुरू होणार का?याकडे आता लक्ष लागून आहे. 

शाळा सुरू करण्याचा प्रस्ताव शिक्षण विभागाने मुख्यमंत्र्यांकडे दिला असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. येत्या सोमवारपासून राज्यातील शाळा सुरु करण्यात याव्यात असं या प्रस्तावात म्हटलं आहे. 

मागील 24 तासात मुंबईत 12 पोलिसांना कोरोनाची लागण, आतापर्यंत मुंबईत 10,678 पोलिस कर्मचारी कोरोनाबाधित तर 127 पोलिसांचा कोरोनामुळं मृत्यू

मागील 24 तासात मुंबईत 12 पोलिसांना कोरोनाची लागण, आतापर्यंत मुंबईत 10,678 पोलिस कर्मचारी कोरोनाबाधित तर 127 पोलिसांचा कोरोनामुळं मृत्यू

पार्श्वभूमी

Maharashtra Breaking News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

Maharashtra School : सोमवारपासून शाळा सुरु? आज मंत्रिमंडळ बैठकीत शिक्कामोर्तब होण्याची शक्यता
 
Maharashtra School Reopen : राज्यातील शाळा सुरू करण्याबाबत सर्व स्तरातून मागणी होत असताना आता आज याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. आज होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत चर्चा होणार आहे.  शाळा सुरु करण्याबाबत शालेय शिक्षण विभागानं मुख्यमंत्री ठाकरेंना काल प्रस्ताव पाठवलाय. येत्या सोमवारपासून शाळा सुरु करण्यात याव्यात तसंच शाळा सुरु करण्याबाबत स्थानिक प्रशासनाला अधिकार देण्यात यावे असं या अहवालात नमूद करण्यात आलंय. मंत्री आदित्य ठाकरेंनी कोविड टास्क फोर्सशी चर्चा करुन शाळा सुरू करण्याबाबत अनुकुलता दर्शवली आहे. त्यामुळं सोमवारपासून शाळा सुरू होणार का?याकडे आता लक्ष लागून आहे. 

शाळा सुरू करण्याचा प्रस्ताव शिक्षण विभागाने मुख्यमंत्र्यांकडे दिला असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. येत्या सोमवारपासून राज्यातील शाळा सुरु करण्यात याव्यात असं या प्रस्तावात म्हटलं आहे. 

Dhule : नगरपंचायत  निवडणुकीच्या निकालानंतर साक्रीत गालबोट; वादात महिलेचा मृत्यू
 
Dhule Sakri Latest Update : साक्री नगरपंचायत निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर गालबोट लागल्याचं पाहायला मिळालं. निकालानंतर भाजप कार्यालयात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू होता. यावेळी शिवसेनेचे गोटू जगताप हे आपल्या मोटरसायकलने जात असताना त्यांच्यात आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला या वादाचे पर्यावसन काही वेळात हाणामारीत झाले.

दरम्यान हा वाद सुरू असताना गोटू जगताप यांच्या बहीण मोहिनी नितीन जाधव या वाद सोडविण्यासाठी आल्या होत्या. यावेळी मोहिनी जाधव त्या खाली पडल्या आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला. गोटू जगताप यांच्या मातोश्री ताराबाई जगताप या निवडणुकीत पराभूत झाल्याने  त्यातून ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. 

भावाला मारहाण होत असताना मोहिनी जाधव मध्यस्थी करण्यासाठी पुढे आल्या असताना त्यांचा मारहाणीत मृत्यू झाल्याचा आरोप त्यांच्या नातेवाईकांकडून करण्यात आला आहे. दरम्यान दोषींवर कारवाई होत नाही तोवर मृतदेह ताब्यात न घेण्याचा पवित्रा त्यांच्या नातेवाईकांनी घेतला आहे. मात्र मोहिनी जाधव यांच्या मृत्यू मागील कारण अद्याप समजू शकले नाही. 

Covid19 Third Wave : दिलासादायक! भारतात दैनंदिन कोरोनारुग्ण संख्या 4 लाखांच्या पार जाणार नाही : शास्त्रज्ञांचा अंदाज

Covid19 Third Wave :
 अलिकडे वाढता कोरोनाचा धोका पाहता भारतातील दैनंदिन रुग्णसंख्याही दिवसागणिक वाढेल, असा अंदाज वर्तवण्यात आला होता. मात्र, आता एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. भारतात दैनंदिन कोरोनारुग्णांची संख्या 4 लाखांच्या पार जाण्याची शक्यता नाही, असा अंदाज शास्त्रज्ञांनी व्यक्त केला आहे. या विश्लेषणानुसार, मुंबई आणि दिल्लीमध्ये जानेवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यातच कोरोनारुग्णांचा उच्चांक गाठला आहे, तर बेंगळुरू 22 जानेवारी रोजी कोरोनारुग्णांचा उच्चांक गाठेल.

शास्त्रज्ञांना कोरोनाच्या परिस्थितीच्या ताज्या विश्लेषणातून असे दिसून आले आहे की, भारतातील तिसऱ्या लाटेचा उच्चांक 23 जानेवारी रोजी दिसून येईल मात्र, दैनंदिन कोरोनारुग्णांची संख्या चार लाखांच्या पुढे जाण्याची शक्यता नाही. कोविड ट्रॅकरच्या सूत्र मॉडेलने सांगितले की,  मुंबई आणि दिल्लीने जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यातच रुग्णवाढीचा उच्चांक गाठला आहे.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.