Maharashtra Breaking News LIVE Updates : अभिनेता धनुष आणि ऐश्वर्या रजनीकांत 18 वर्षांच्या सुखी संसारानंतर विभक्त

Maharashtra Breaking News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

abp majha web team Last Updated: 17 Jan 2022 11:16 PM
अभिनेता धनुष आणि ऐश्वर्या रजनीकांत 18 वर्षांच्या सुखी संसारानंतर विभक्त

अभिनेता धनुष आणि ऐश्वर्या  रजनीकांत 18 वर्षांच्या सुखी संसारानंतर विभक्त झाले आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांनी हा निर्णय जाहीर केला आहे. 

आरोपी विशाल फटे शासकीय रुग्णालयात

बार्शीतील फटे स्कॅम प्रकरणाती मुख्य आरोपी विशाल फटेला अटक झाली असून आता त्याला वैद्यकीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात आणण्यात आलं आहे.

चंद्रकांत बावनकुळे यांनी नाना पटोले यांच्याविरोधात पोलिसांत दाखल केली तक्रार

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मारण्याची आणि शिव्या देण्याची धमकी देणारे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष श्री. नाना पटोले यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी तक्रार भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी रात्री कूही पोलीस ठाण्यात दाखल केली. 

बार्शीतील फटे प्रकरणातील मुख्य आरोपी विशाल फटे पोलिसांत हजर

बार्शीतील फटे प्रकरणातील मुख्य आरोपी विशाल फटे पोलिसा स्थानकात हजर झाला आहे. सोलापूर ग्रामीण पोलीस मुख्यालयात विशाल फटे स्वतःहून हजर झाला आहे. कोट्यवधींच्या घोटाळ्याप्रकरणी विशाल फटे हा मुख्य आरोपी आहे.

उत्तरप्रदेशातील ओबीसी नेते बाबूसिंह कुशवाह यांनी मंत्री छगन भुजबळ यांची भेट घेतली

उत्तरप्रदेशातील ओबीसी नेते आणि जन अधिकार पार्टीचे अध्यक्ष बाबूसिंह कुशवाह यांनी आज अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष व राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांची मुंबई येथे भेट घेतली. उत्तरप्रदेश येथे होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीसंदर्भात उभयतांमध्ये चर्चा झाली. उत्तरप्रदेशच्या निवडणुकीमध्ये ओबीसी मते ही निर्णायक ठरणार असल्याचे मत यावेळी त्यांनी व्यक्त केले.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडी, कुडाळ, कणकवली भागात पावसाच्या जोरदार सरी बरसल्या

सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडी, कुडाळ, कणकवली भागात पावसाच्या जोरदार सरी बरसल्या आहेत. अचानक आलेल्या पावसामुळे आंबा, काजूच्या पिकावर परिणाम होण्याची शक्यता आहे. 

रात्रशाळांच्या संदर्भात धोरण निश्चित करण्यासाठी उच्च स्तरीय समिती गठीत

रात्रशाळांच्या संदर्भात धोरण निश्चित करण्यासाठी उच्च स्तरीय समिती गठीत  करण्यात आली आहे.  शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली दहा सदस्यांची समिती गठीत करण्यात आली आहे.  रात्र शाळांच्या संदर्भात धोरण ठरविण्यासाठी समिती काम करणार आहे.  समिती अभ्यास करून आठ आठवड्यांत अहवाल सादर करणार आहे.

आघाडी करण्यासाठी गोव्यात राष्ट्रवादी आणि शिवसेनेची बैठक - नवाब मलिक 

शिवसेनेसोबत आघाडी करण्यासाठी उद्या अर्थात मंगळवारी गोव्यात राष्ट्रवादीचे नेते प्रफुल पटेल आणि मंत्री जितेंद्र आव्हाड जाणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली. 

छाबय्या विहंग गार्डन प्रकरणी भाजप लोकायुक्तांकडे दाद मागणार

प्रताप सरनाईक यांच्या छाबय्या विहंग गार्डन या इमारतीचा दंड आणि व्याज माफ करण्याच्या कॅबिनेटच्या निर्णयाविरोधात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील एक जनहित याचिका दाखल करणार आहेत. या प्रकरणी आता भाजपने लोकायुक्तांकडे दाद मागण्याचा निर्णय घेतला आहे. 


 

एसटी महामंडळाचा संप अखेर बेकायदेशीर असल्याचा कोर्टाचा निर्वाळा

 


एसटी महामंडळाचा संप अखेर बेकायदेशीर असल्याचा कोर्टाने निर्वाळा दिला आहे. कामगार न्यायालयाने  काही वेळापूर्वी निर्णय जाहीर केला आहे. एसटी महामंडळाकडून दाखल तक्रार अर्जावर कामगार वांद्रे येथील कामगार  न्यायालयाचा निकाल.  लोकोपयोगी सेवा असताना देखील  सहा आठवडे आधी संपाची नोटीस न दिल्याने कोर्टाचा निर्वाळा

शरद पवारांना मेट्रो सफर केल्याप्रकरणी पिंपरीच्या महापौर संतापल्या, केंद्राकडे करणार तक्रार

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांना मेट्रोची सफर घडवली. पिंपरी चिंचवडमध्ये हा पाहणी दौरा असताना याची पुसटशी कल्पना ही न दिल्याने महापौर माई उर्फ उषा ढोरे संतापलेल्या आहेत. म्हणूनच त्या हे कृत्य करणाऱ्या पुणे मेट्रो प्रशासनाची तक्रार थेट केंद्र सरकारकडे करणार आहेत. मेट्रोची ही वागणूक निषेधार्ह असल्याने केंद्र सरकार माझ्या तक्रारीवरून योग्य कारवाई करतील अशी त्यांना अपेक्षा आहे. 


 

अंबरनाथहून डोंबिवलीच्या दिशेनं जाणाऱ्या पाईपलाईन रोडवर विचित्र अपघात

अंबरनाथहून डोंबिवलीच्या दिशेनं जाणाऱ्या पाईपलाईन रोडवर विचित्र अपघात


कार, कंटेनरची लॉरी आणि बाईक यांचा झाला अपघात


मिरची व्हिलेज ढाब्यासमोरच झाला विचित्र अपघात


अपघातात कारच्या मागील भागाचा चक्काचूर, तर बाईकचंही मोठं नुकसान


दोन वाहनांना धडक देत कंटेनर लॉरी डिव्हायडर वर चढली


सुदैवानं या अपघातात कुणालाही इजा नाही


पोलिसांनी लॉरी चालकाला ताब्यात घेतल्याची प्राथमिक माहिती

91 वर्षीय आजीच उपोषण अखेर मागे..

91 वर्षीय आजीच उपोषण अखेर मागे..
हौसाबाई नाईकवाडी यांच उपोषन स्थगित..
अकोले तहसील कार्यालया समोर सुरू होत उपोषण...
तिसऱ्या दिवशी आश्वासनानंतर उपोषण मागे..
स्थानिक आमदार, तहसीलदार व वनविभागान दिले आश्वासन..
लवकरच शासन दरबारी प्रस्ताव सादर करण्याच दिलं आश्वासन..

पत्नीच्या आपमानाला कंटाळून पतीची आत्महत्या
पत्नी आणि तिच्या माहेरच्या लोकांनी अपमान केल्याने आणि दाखल केलेली केस मागे न घेतल्याने व्यथित झालेल्या पतीने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना माजलगाव तालुक्यातील किट्टी आडगावातील मध्ये घडली आहे.. अनिल उत्तम थोरात हा ऊसतोडीचे काम करुन आपल्या कुटुम्बाचा उदरनिर्वाह करत असत.त्याचे व पत्नीचे शुल्लक कारणावरुन मतभेद होत असत.पत्नी आणि तिच्या माहेरच्या लोकांनी अपमान केल्याने आणि दाखल केलेली केस मागे न घेतल्याने व्यथित झाल्यामुळे शनिवारी दुपारी 12 वाजता आनिल याने घरात टोकाचे पाऊल उचलत.साडीने आडुला गळफास घेत आत्महत्या केली. याप्रकरणी अनिलची आई महानंदा उत्तम थोरात यांच्या फिर्यादीवरून माजलगाव ग्रामिण पोलीस स्टेशन येथे पत्नी छाया , तिचा मामा विजू आत्माराम क्षीरसागर , चुलता भाऊ राहुल क्षीरसागर आणि सासू संगीता अंकुश भिसे या चौघांवर माजलगाव ग्रामीण ठाण्यात आत्यहत्यास प्रर्वत केल्याचा  गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
रिक्षाचालकाकडून पैसे घेणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आलं 

बीडच्या माजलगाव शहरांमध्ये रिक्षाचालकाकडून पैसे घेणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आलं आहे..दोन दिवसापूरवी माजलगाव शहरात अवैध प्रवासी वाहतूक करण्याच्या बदल्यात वाहतूक पोलीस पैसे घेत असल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता..व्हिडिओमध्ये एक रिक्षा चालक बाबू पवार नावाच्या एका कर्मचाऱ्याला पैसे देत असल्याच दिसून आलं होतं..या व्हायरल व्हिडिओची बीडचे पोलीस अधीक्षक आर राजा यांनी दखल घेतली असून बाबू पवार या पोलीस कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे..

राजेंद्र कदम यांच्याविरूध्द अॅट्रॉसिटी कलमान्वये गुन्हा दाखल
पुणे जिल्हा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र कदम यांच्याविरूध्द अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यातील (अॅट्रॉसिटी) कलमान्वये दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजेंद्र कदम यांच्या गोठ्यात काम करणाऱ्या महिलेने त्यांच्या विरोधात पोलिसांत तक्रार दिली आहे.  दौंड येथे  जाण्यास कदम यांनी महिलेला विरोध केला.  परंतु महिलेने आग्रह केल्याने राजेंद्र कदम यांनी दोन चापटी मारून रबरी पाईपने पाठ आणि पोटरीवर मारले. त्याचबरोबर जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप महिलेने केला आहे.. 

      15 जानेवारी रोजी सदर महिला आलेगाव येथील कदम वस्ती येथे राजेंद्र शिवाजी कदम यांच्या घराशेजारील गोठ्यात साफसफाईचे काम करून दौंड शहराकडे जाण्यासाठी निघाली होती. त्यावेळी राजेंद्र कदम यांनी सदर महिलेस दौंड येथे न जाण्यास सांगितले परंतु महिलेने आग्रह केल्याने राजेंद्र कदम यांनी दोन चापटी मारून रबरी पाईपने पाठ आणि पोटरीवर मारले. त्याचबरोबर जातीवाचक शिवीगाळ केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
बीडच्या परळीमध्ये कारचा अपघात, दोन जण ठार
परळीकडून भरधाव वेगाने येणाऱ्या गाडीची एका बाभळीच्या झाडाला जोरदार धडक बसून झालेल्या अपघातात दोन जण जागीच ठार झाले आहे. तर एक जण गंभीर जखमी झाल्याची झाला आहे. सायंकाळच्या सुमारास तेलगाव येथे ही घटना घडली. नांदेड जिल्ह्यातील भोकर येथील तीन तरूण बीडला जात असताना ही अपघात झाला.
अकोल्यात 24 तासांत आढळले 291 नवे कोरोना रूग्ण

आज दिवसभरात अकोल्यात आढळलेत 291 नवे कोरोना रूग्ण. सध्या जिल्ह्यात 1532 कोरोना रूग्णांवर उपचार सुरू. आज दोन पुरूष रूग्णांचा उचारादरम्यान मृत्यू. यातील एकाचं वय 84 वर्ष तर दुसर्याचं 55 वर्ष. आतापर्यंत 1145 रूग्णांचा कोरोनाने मृत्यू. आज होम आयसोलेशनमधील 90 जण झालेत कोरोनामुक्त. 


अकोला : गेल्या पाच दिवसांतील आढळलेले कोरोना रूग्ण :


12 जानेवारी : 196
13 जानेवारी : 284
14 जानेवारी : 260
15 जानेवारी : 236
16 जानेवारी : 199


पाच दिवसांत एकूण रूग्ण : 1175

मुंडे बहिण भावाच्या या वादात वैद्यनाथ महाविद्यालयावर प्रशासक येण्याची शक्यता
परळीच्या राजकारणातील मुंडे बहीण-भावाच्या वादात परळीमधील नामांकित जवाहर एज्युकेशन सोसायटीच्या वैद्यनाथ महाविद्यालयावर प्रशासक नेमण्यात येणार आहे. दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या ताब्यातील ही शिक्षण संस्था आता नेमकी कोणाच्या ताब्यात जाईल? याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. परळी शहरातील सर्वात जुनी व नामांकित शिक्षण संस्था असलेल्या जवाहर एज्युकेशन सोसायटीत संचालक मंडळावरुन पालकमंत्री धनंजय मुंडे व भाजपा राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांच्यामध्ये संघर्ष सुरु झाला असून संस्थेत सुरु असलेल्या वादामुळे डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या उपकुसचिवांनी चौकशीसाठी ४ जानेवारीला त्रिसदस्यीय चौकशी समिती गठीत केली असुन ही समिती आपला अहवाल पंधरा दिवसात विद्यापीठाकडे सादर करणार आहे. मुंडे बहिण भावाच्या या वादात वैद्यनाथ महाविद्यालयावर प्रशासक येण्याची शक्यता निर्माण झलीय
बार्शी फटे स्कॅम प्रकरणातील तक्रारदारांचा आकडा वाढला

बार्शी येथील फटे स्कॅम प्रकरणातील तक्रारदारांचा आकडा वाढला आहे. आतापर्यंत 76 जणांनी बार्शी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून या 76 जणांना 18 कोटी 53 लाख 17 हजार रुपयांना फसवल्याचं समोर येत आहे.

बार्शी 'फटे स्कॅम' प्रकरणी विशेष तपास पथक स्थापन, आर्थिक गुन्हे शाखा, सोलापूर ग्रामीणचे उपअधीक्षक तपास अधिकारी

बार्शी 'फटे स्कॅम' प्रकरणी विशेष तपास पथक स्थापन, आर्थिक गुन्हे शाखा, सोलापूर ग्रामीणचे उपअधीक्षक तपास अधिकारी तर अन्य 4 सदस्यांचा पथकात समावेश


संजय बोठे, पोलीस उपअधीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा, तपास अधिकारी असतील तर विशाल हिरे, DYSP, रामदास शेळके, पोलीस निरीक्षक, नारायण मिसाळ, सहा पो निरीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा
ज्ञानेश्वर उदार, सहायक पोलिस निरीक्षक, बार्शी


हे चार सदस्य असतील


प्रभारी पोलीस अधीक्षक हिंमत जाधव यांचे आदेश

सिंदखेडराजा येथील राजे लखोजी जाधव यांच्या राजवाड्यासमोर अज्ञाताने शिवरायांचा पुतळा बसविल्याचं प्रकरण

बुलढाणा -सिंदखेडराजा येथील राजे लखोजी जाधव यांच्या राजवाड्यासमोर अज्ञाताने शिवरायांचा पुतळा बसविल्याचं प्रकरण.


प्रशासनाने शिवभक्तांना पुतळा काढून घेण्यासंबंधी दिला होता दोन दिवसांची अवधी आज संपला.


यासंबंधी प्रशासन आणि शिवभक्तांमध्ये उद्या होणार बैठक , बैठकीत पुतळ्यासंबंधी होणार आहे चर्चा.


उपविभागीय अधिकारी,नगर परिषदेचे मुख्याधिकारी व पोलीस अधिकारी प्रशासना तर्फे तर शिवसेनेचे माजी आमदार शशिकांत खेडेकर हे शिवभक्तांकडून बैठकीत चर्चा करणार आहेत.

पुण्यातील सय्यदवाडी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने रेल रोको आंदोलन

पुण्यातील सय्यदवाडी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने रेल्वे प्रशासनाविरुद्ध रेल रोको आंदोलन. दुरुस्तीचे खोटे कारण सांगत सय्यद नगर रेल्वे गेट नंबर सात हे कायमचे बंद करण्याचा रेल्वे प्रशासनाचा डाव आहे. हा डाव हाणून पाडण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने रेल रोको आंदोलन करण्यात आले.दरम्यान पोलिसांनी यावेळी मोठा बंदोबस्त ठेवला होता, यावेळी पोलिस आणि आंदोलकांमध्ये वादावादी झाली आणि पोलिसांनी आंदोलकांना रेल रोको करण्यास रोखून धरले.राष्ट्रवादीचे काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले  हजारो कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते. भाजपची सत्ता पालिकेत आल्यानंतर तत्कालीन भाजपच्या आमदाराने  हे गेट बंद केले आहे. गेल्या दोनशे वर्षांपासून हे गेट आहे, हे गेट बंद केल्यामुळे दोन लाख नागरिकांची गैरसोय होत आहे .आसपासच्या बारा वाड्यामधील  नागरिक या गेटने ये-जा करतात येथील व्यावसायिक रिक्षा चालक यांच्या व्यवसायावर याचा परिणाम होत आहे. हे गेट खुले न केल्यास यापेक्षा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी दिला आहे.

आमदार रवी राणा यांच्या घरी युवा स्वाभिमान कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी सुरु, पोलिसांकडून युवा स्वाभिमान कार्यकर्त्यांना ताब्यात घेणं सुरू..


आमदार रवी राणा यांच्या घरी युवा स्वाभिमान कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी सुरू..


पोलिसांकडून युवा स्वाभिमान कार्यकर्त्यांना ताब्यात घेणं सुरू..


सकाळ पासून राणा दाम्पत्याला घरातच नजर कैदेत ठेवलेलं आहे..


सरकार विरोधात कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणात घोषणा देणं सुरूच.

बोगस लसीकरण प्रकरणी चौघांना सोमवारपर्यंत पोलीस कोठडी

बोगस लसीकरण प्रकरणी चौघांना सोमवार पर्यंत पोलीस कोठडी,


धुळे जिल्हा न्यायालयाने सुनावली पोलीस कोठडी... 


बोगस लसीकरण प्रकरणी धुळे महापालिकेच्या आरोग्य विभागातील अजून काही मासे गाळाला लागण्याची शक्यता...

शाळा बाबत पुनर्विचार होईल.... आरोग्यमंत्री टोपे

शाळा सुरू करण्याबाबत वेगवेगळे मतप्रवाह असून या बाबत 15 दिवसांनी परिस्थिती पाहून पुनर्विचार केला जाईल अशी मागणी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलीय, लहान मुलांचे बाधित होण्याचे प्रमाण कमी असल्याने अनेकांनी शाळा सुरू करण्याची मागणी आहे या बाबत 15 दिवसाचा अंदाज घेऊन मुख्यमंत्र्यांच्या विचाराने या बाबत निर्णय घेतला जाईल असेही टोपे म्हणाले.

सांगलीतील साखर व्यापाऱ्यावर आयकर विभागाची धाड, पुणे,कोल्हापूर आणि कर्नाटकातील आयकर पथकांची कारवाई, कोट्यवधींची रक्कम मिळाल्याची आयकर विभागातील सूत्रांची माहिती
पुणे, कोल्हापूर, आणि कर्नाटक मधील आयकर विभागाने संयुक्तपणे सांगलीतील साखर व्यापाऱ्यावर धाड टाकलीय. या व्यापाऱ्याच्या निवासस्थानासह मार्केट यार्ड परिसरातील दुकानांवरही आयकर विभागाने काल छापे टाकले. रात्री उशीरापर्यंत ही कारवाई सुरू होती. छाप्याबाबत आयकर विभागाकडून गुप्तता पाळण्यात आली होती. छापा टाकण्यात आलेला व्यापारी सह्याद्रीनगर परिसरात राहत असून, मार्केट यार्ड परिसरात त्यांचा साखरेचे गोडाऊन असल्याची माहिती आहे. दरम्यान या व्यापऱ्यावरील धाडीबाबत आयकर विभागाकडून अजून तरी अधिकृत काही माहिती मिळाली नसली तरी आयकर विभागातील काही  सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या साखर व्यापाऱ्याकडील   महत्वाच्या कागदपत्रांसह कोट्यवधीच्या घरातील रक्कम आयकर पथकाला मिळाल्याची माहिती आहे.पुणे, कोल्हापूर, आणि कर्नाटक मधीलआयकर विभागाच्या या छाप्यामुळे सांगलीत मात्र मोठी खळबळ उडाली आहे.  
मुंबईच्या कांजुरमार्ग जंक्शनजवळ मेट्रोच्या कामाच्या ठिकाणी दुर्घटना, क्रेन कोसळून क्रेनचालकाचा मृत्यू

मुंबईच्या कांजुरमार्ग जंक्शनजवळ मेट्रोच्या कामाच्या ठिकाणी दुर्घटना, क्रेन कोसळून क्रेनचालकाचा मृत्यू,  मेट्रो गर्डर लावण्याचं काम सुरु असताना दुर्घटना  

आर्वी येथील कदम हॉस्पिटलमधील गर्भपात प्रकरण, डॉ. नीरज कदमला अटक

वर्धा - आर्वी येथील कदम हॉस्पिटलमधील गर्भपात प्रकरण, डॉ. नीरज कदमला अटक, शनिवारी रात्री पोलिसांनी ताब्यात घेत केली अटक,  या प्रकरणात अटक झालेल्याची संख्या झाली सहा,  प्रकरणात आणखी खुलासे होण्याची शक्यता ,  सोनोग्राफी सेंटर हे डॉ. रेखा कदम आणि डॉ.नीरज कदम या दोघांच्या नावाने असल्याची माहिती आहे. पोलिसांनी तपासादरम्यान डॉ. रेखा कदम हिला सुरुवातीलाच अटक केली होती.  पोलिसांनी गोबरगॅसच्या खड्ड्यातून १२ कवट्या अन् ५४ हाडं जप्त केली होती

सोलापूर-विजयपूर रोडवरील तेरामैलजवळ चारचाकी गाडीचा भीषण अपघात; तीन जणांचा जागीच मृत्यू

सोलापूर - विजयपूर रोडवरील तेरामैलजवळ चारचाकी गाडीचा भीषण अपघात, झाडाला स्कॉर्पिओ गाडी आदळून तीन जणांचा जागीच मृत्यू, किशोर भोसले, नितीन भांगे, व्यंकटेश म्हेत्रे अशी मृतांची नावे, तर राकेश हच्चे हा इसम या अपघातामध्ये गंभीर जखमी , सर्व जण सोलापूरचे रहिवासी, पहाटे चारच्या सुमारास अपघात झाल्याची माहिती, जखमीवर शासकीय रुग्णालयामध्ये उपचार सुरू

मुंबईकरांनो, तिन्ही मार्गावर आज मेगाब्लॉक

Mumbai Local Mega Block News : रविवारच्या सुट्टीनिमित्त तुम्ही काही प्लॅन आखले असतील तर तुमचा खोळंबा होण्याची शक्यता आहे. कारण मुंबईतील तिन्ही रेल्वे मार्गावर आज मेगाब्लॉक असणार आहे. मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड दरम्यान मेगाब्लॉक असेल. तर पश्चिम रेल्वेवर सांताक्रूझ ते गोरेगाव दरम्यान ब्लॉक असेल. तिकडे ट्रान्स हार्बर मार्गावर चुनाभट्टी ते वांद्रे आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते चुनाभट्टी दरम्यान देखील मेगाब्लॉक असणार आहे. ब्लॉक कालावधीत पर्यायी मार्गाने लोकल फेऱ्या सुरु राहतील अशी माहिती रेल्वेने दिली आहे. 


माटुंगा ते मुलुंड आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते चुनाभट्टटी, वांद्रेदरम्यान मध्य रेल्वेनं आज (रविवारी) मेगाब्लॉक घोषित केला आहे. पश्चिम रेल्वेवर सांताक्रूझ ते गोरेगावदरम्यान ब्लॉक असणार आहे. ब्लॉक कालावधीत प्रवाशांच्या सोयीसाठी पर्यायी मार्गानं लोकल फेऱ्या सुरू राहणार आहेत. 


सविस्तर वृत्त वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

देशात लसीकरणाची वर्षपूर्ती!

Corona Vaccination Drive 1 Year Completed : देशासाठी आजचा दिवस महत्त्वाचा आहे. कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेला आज एक वर्ष पूर्ण झालं आहे. 16 जानेवारी 2021 पासून देशात लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली. 138 कोटी लोकसंख्या असलेल्या देशात वर्षभरात 157 कोटी डोस देण्यात आलेत. आता कोरोनाची तिसरी लाट आलेली असताना लसीकरण महत्त्वाची भूमिका पार पडत असल्याचं पाहायला मिळतं आहे. येत्या काळात बूस्टर डोसचं आव्हान प्रशासनापुढे आहे. लसीकरणाच्या वर्षपूर्तीनिमित्त आज विशेष टपाल तिकीट जारी करण्यात येणार आहे. 


देशात कोविड लसीकरण मोहिमेला आज एक वर्ष पूर्ण होत आहे. गेल्या वर्षी 16 जानेवारी रोजी देशव्यापी मोहीम सुरू करण्यात आली होती. आतापर्यंत देशात एकूण 156 कोटी 68 लाख 14 हजार 804 जणांना पहिला आणि दुसरा डोस देण्यात आला आहे.

देशातील महानगरांतील आजचे दर

देशातील महानगरांतील आजचे दर :




































देशातील प्रमुख शहरं पेट्रोलची किंमत प्रति लिटरडिझेलची किंमत प्रति लिटर 
मुंबई109.98 94.14
दिल्ली95.41 86.67
चेन्नई101.4091.43
कोलकाता104.6789.79
पाटणा105.9291.09

पेट्रोल-डिझेलचे नवे दर जारी; जाणून घ्या

Petrol-Diesel Price Today 16 Januvary 2022 : भारतीय तेल कंपन्यांनी पेट्रोल (Petrol) आणि डिझेल (Diesel) चे लेटेस्ट दर जारी केले आहेत. देशभरात आज म्हणजेच, 16 जानेवारी 2022 रोजीही पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत. देशांतर्गत पातळीवर नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीपासूनच पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर आहेत. त्यानंतरही महाराष्ट्र, राजस्थान, मध्यप्रदेश यांच्यासह अनेक राज्यांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर 100 रुपये प्रति लिटर पार आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून देशाची राजधानी दिल्ली आणि देशाच्या आर्थिक राजधानीचं शहर असणाऱ्या मुंबईत पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर आहेत. याशिवाय अन्य महानगरांतही किमतींमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.


IOCL च्या अधिकृत वेबसाईटवरुन देण्यात आलेल्या माहितीनुसार, आजही देशातील सर्वात मोठ्या महानगरांतील पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत. आज देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरांत (Petrol-Diesel Price In Mumbai) पेट्रोलची किंमत 109.98 रुपये प्रति लिटर आहे. तर डिझेलची किंमत 94.14 रुपये प्रति लिटर इतकी आहे. महाराष्ट्रतही पेट्रोल-डिझेलच्या किमतींनी सर्वोच्च पातळी गाठली आहे. राज्याची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात (Petrol-Diesel Price In Pune) पेट्रोलची किंमत 109.45 रुपये प्रति लिटर आहे. तर डिझेलची किंमत 92.25 रुपये प्रति लिटर इतकी आहे.

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेण्यासाठी एबीपी माझा लाईव्ह पाहा

पार्श्वभूमी

Maharashtra Breaking News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...


Corona Vaccination in India : देशात लसीकरणाची वर्षपूर्ती! वर्षभरात 157 कोटी डोस, आता बुस्टर डोसचं आव्हान


Corona Vaccination Drive 1 Year Completed : देशासाठी आजचा दिवस महत्त्वाचा आहे. कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेला आज एक वर्ष पूर्ण झालं आहे. 16 जानेवारी 2021 पासून देशात लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली. 138 कोटी लोकसंख्या असलेल्या देशात वर्षभरात 157 कोटी डोस देण्यात आलेत. आता कोरोनाची तिसरी लाट आलेली असताना लसीकरण महत्त्वाची भूमिका पार पडत असल्याचं पाहायला मिळतं आहे. येत्या काळात बूस्टर डोसचं आव्हान प्रशासनापुढे आहे. लसीकरणाच्या वर्षपूर्तीनिमित्त आज विशेष टपाल तिकीट जारी करण्यात येणार आहे. 


देशात कोविड लसीकरण मोहिमेला आज एक वर्ष पूर्ण होत आहे. गेल्या वर्षी 16 जानेवारी रोजी देशव्यापी मोहीम सुरू करण्यात आली होती. आतापर्यंत देशात एकूण 156 कोटी 68 लाख 14 हजार 804 जणांना पहिला आणि दुसरा डोस देण्यात आला आहे.


देशातील आतापर्यंतच्या लसीकरणाची आकडेवारी




  • आतापर्यंत झालेलं एकूण लसीकरण : 1,56,68,14,804 

  • आतापर्यंत देण्यात आलेले एकूण बूस्टर डोस : 41,83,391

  • 15 ते 18 या वयोगटाचं आतापर्यंत झालेलं लसीकरण : 33609191


Petrol-Diesel Price Today : पेट्रोल-डिझेलचे नवे दर जारी; 'या' राज्यात 26 जानेवारीपासून पेट्रोलवर सबसिडी


Petrol-Diesel Price Today 16 Januvary 2022 : भारतीय तेल कंपन्यांनी पेट्रोल (Petrol) आणि डिझेल (Diesel) चे लेटेस्ट दर जारी केले आहेत. देशभरात आज म्हणजेच, 16 जानेवारी 2022 रोजीही पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत. देशांतर्गत पातळीवर नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीपासूनच पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर आहेत. त्यानंतरही महाराष्ट्र, राजस्थान, मध्यप्रदेश यांच्यासह अनेक राज्यांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर 100 रुपये प्रति लिटर पार आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून देशाची राजधानी दिल्ली आणि देशाच्या आर्थिक राजधानीचं शहर असणाऱ्या मुंबईत पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर आहेत. याशिवाय अन्य महानगरांतही किमतींमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.


IOCL च्या अधिकृत वेबसाईटवरुन देण्यात आलेल्या माहितीनुसार, आजही देशातील सर्वात मोठ्या महानगरांतील पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत. आज देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरांत (Petrol-Diesel Price In Mumbai) पेट्रोलची किंमत 109.98 रुपये प्रति लिटर आहे. तर डिझेलची किंमत 94.14 रुपये प्रति लिटर इतकी आहे. महाराष्ट्रतही पेट्रोल-डिझेलच्या किमतींनी सर्वोच्च पातळी गाठली आहे. राज्याची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात (Petrol-Diesel Price In Pune) पेट्रोलची किंमत 109.45 रुपये प्रति लिटर आहे. तर डिझेलची किंमत 92.25 रुपये प्रति लिटर इतकी आहे.


देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत (Petrol-Diesel Price In Delhi) पेट्रोलची किंमत (Petrol Price) 95.41 रुपये प्रति लिटर, तर डिझेलची किंमत 86.67 रुपये प्रति लिटर इतकी आहे. याशिवाय देशातील इतर महानगरांपैकी महत्त्वाचं शहर असणाऱ्या चेन्नईत पेट्रोल 101.40 रुपये प्रति लिटरनं आणि डिझेल 91.43 रुपये प्रति लिटरनं विकलं जात आहे. तर कोलकातामध्ये डिझेलची किंमत 89.79 रुपये आणि पेट्रोल 104.67 रुपयांनी विकलं जात आहे. 


- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.