Maharashtra Breaking News LIVE Updates : एमपीएससीची तयारी करणाऱ्या पुण्यातील तरुणाची आत्महत्या

Maharashtra Breaking News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

abp majha web team Last Updated: 15 Jan 2022 05:28 PM
आसाममध्ये सैन्य भरतीसाठी गेले आणि तिथे अडकलेले उमेदवार महाराष्ट्राच्या दिशेने निघाले
आसाम मध्ये सैन्य भरतीसाठी गेले आणि तिथे अडकलेले उमेदवार महाराष्ट्राच्या दिशेने निघाले आहेत.  महाराष्ट्रातील तरुण उमेदवार सैन्य भरतीसाठी आसाम मध्ये गेले होते. मात्र त्यातील साठ ते सत्तर उमेदवार हे रॅपिड अँटीजन टेस्ट मध्ये कोरोना पॉझिटिव आल्याने ते आसाम राज्य सरकारच्या नियमानुसार रुग्णालयात भरती झाले. महाराष्ट्रातील या अडकलेल्या मुलांना त्यांचा विलीगीकरणाचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर रुग्णालयातून सोडण्यात आले आहे... आणि त्यातील अनेक तरुणांनी आता महाराष्ट्रात यायला सुरुवात केली आहे....
लसीचे दोन डोस घेतले असतील तरच लोणावळ्यासह मावळ तालुक्यात मिळणार प्रवेश, अन्यथा....!

पुण्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळी म्हणजे लोणावळ्यात लसीचे दोन डोस घेतले असतील तरच प्रवेश मिळणार आहे. यासाठी प्रशासनाकडून मुंबई आणि पुण्याच्या एन्ट्री पॉइंटवर चेक पोस्ट लावण्यात येणार आहेत. सोमवारी 17 जानेवारीपासून याची अंमलबजावणी सुरू होईल. शिवाय ज्यांनी दुसरा डोस घेतला नसेल आणि त्यांची मुदत ओलांडली असेल तर नाक्यावरच त्या व्यक्तीस लस टोचली जाणार आहे. वडगाव मावळ तालुक्यातील लोणावळ्यासह कामशेत, कान्हे रेल्वे गेट, वडगाव आणि तळेगावच्या एन्ट्री पॉइंटवर ही अशीच नाकाबंदी करण्यात येणार आहे. दिवसेंदिवस तालुक्यात कोरोनाचे रुग्ण वाढू लागलेत, त्यामुळेच ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या आठशे पार गेलीये. कोरोनाचा विळखा वाढू लागल्याने तालुका प्रांताधिकाऱ्यांनी अशी खबरदारीची पावलं उचलली आहेत. एन्ट्री पॉइंटच्या प्रत्येक चेकपोस्टवर नगरपंचायत आणि नगरपरिषद प्रशासनाच्या मदतीला पोलीस ही तैनात असतील. ते प्रत्येक व्यक्तीला चेक पोस्टवर रोखणार आहेत. त्यांनी कोरोना लसीचे दोन डोस घेतलेत का? एकच डोस घेतलाय आणि त्यांची दुसऱ्या डोसची मुदत संपलीये का? किंवा आत्तापर्यंत लसच घेतली नाही याची पडताळणी केली जाईल. शिवाय लस न घेतलेल्यांना चेक पोस्टवरच लस टोचण्यात येणार आहे.

अंबरनाथमध्ये रस्त्यावर उभ्या असलेल्या कारला अचानक लागली आग

अंबरनाथमध्ये रस्त्यावर उभ्या असलेल्या कारला अचानक लागली आग


अंबरनाथ पूर्वेच्या मोतीराम पार्क परिसरात लागली आग


अग्निशमन दलानं घटनास्थळी धाव घेत आग विझवली


सुदैवानं आगीत कुणालाही इजा नाही

पदयात्रा काढण्यास निवडणूक आयोगाकडून 22 तारखेपर्यंत बंदी

पाच राज्यातील निवडणुकीचा प्रचार सुरु असताना निवडणूक आयोगाने एक महत्त्वाची घोषणा केलीय. या पाचही राज्यात पदयात्रा किंवा सायकर रॅली काढण्यास 22 तारखेपर्यंत बंदी घालण्यात आली आहे.


पाच राज्यांतील निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला असताना केंद्रीय निवडणूक आयोगाने एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या पाच राज्यांमध्ये 22 जानेवारी पर्यंत निवडणूक प्रचारसभा, मेळावे आणि रोडशो घेण्यास बंदी कायम ठेवण्यात आली आहे. देशातील कोरोना संसर्गाचे आकडे वाढत असल्याने केंद्रीय निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला आहे. तर बंद हॉलमध्ये 300 जणांचा मेळावा घेण्यास राजकीय पक्षांना अनुमती देण्यात आली आहे. 


या आधी केंद्रीय निवडणूक आयोगाने कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता निवडणुकीतील  रॅली, रोड शोवर बंदी घातली होती. आता त्यासंबंधी नवे आदेश काढून ही बंदी 22 जानेवारीपर्यंत कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 


 

निवडणूक आयोगाकडून २२ जानेवारी पर्यंत निवडणूक प्रचारसभा, मेळावे आणि रोडशो वरील मनाई कायम

निवडणूक आयोगाकडून २२ जानेवारी पर्यंत निवडणूक प्रचारसभा, मेळावे आणि रोडशो वरील मनाई कायम.. कोरोना संसर्गाचे आकडे वाढत असल्याने निवडणूक आयोगाचा निर्णय.. बंद हॉलमध्ये 300 जणांचा मेळावा घेण्यास अनुमती 

एमपीएससीची तयारी करणाऱ्या पुण्यातील तरुणाची आत्महत्या

एमपीएससीची तयारी करणाऱ्या पुण्यातील तरुणाची आत्महत्या, PSI च्या शारीरिक चाचणीत केवळ एका गुणामुळे गेली होती संधी

माजी आमदार कन्हैयालाल गिडवाणीच्या पुत्राच्या घरी आयकरची छापेमारी

माजी आमदार कन्हैयालाल गिडवाणीच्या पुत्राच्या सांगलीतील घरावर आयकर विभागाचा छापा पडला आहे. गुरुमुख गिडवाणी आणि निकेश गिडवाणी या साखर व्यापाऱ्यांच्या  घरावर आणि दुकानावर हा छापा टाकण्यात आला आहे. पुणे, कोल्हापूर, आणि कर्नाटकमधील आयकर विभागाचा हा संयुक्तपणे छापा असल्याची माहिती आहे. 

यवतमाळ उमरखेड येथील डॉ. हनुमंत धर्मकारे खून प्रकरणाचा अखेर उलगडा

यवतमाळ उमरखेड येथील डॉ. हनुमंत धर्मकारे खून प्रकरणाचा अखेर उलगडा झाला आहे. यवतमाळ येथील 3 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 

आमची युती फक्त महाराष्ट्रात, इतर राज्यात युतीबाबत हायकमांड निर्णय घेईल : काँग्रेस नेते विजय वड्डेट्टीवार

आमची युती फक्त महाराष्ट्रात, इतर राज्यात युतीबाबत हायकमांड निर्णय घेईल. येणारी निवडणूक ठरवेल कोणाला किती जागा; काँग्रेस नेते विजय वड्डेट्टीवार यांचा संजय राऊत यांना खोचक टोला

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी प्राचार्य दिगंबर दुगार्डे तर उपाध्यक्षपदी सुनील चांदेरे यांची निवड 

#BREAKING : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी प्राचार्य दिगंबर दुगार्डे तर उपाध्यक्षपदी सुनील चांदेरे यांची निवड  

बार्शीतील फटे स्कॅम प्रकरणातील आरोपी अंबादास फटे, वैभव फटे यांना 5 दिवसांची पोलीस कोठडी

बार्शीतील फटे स्कॅम प्रकरणातील आरोपी अंबादास फटे, वैभव फटे यांना 5 दिवसांची पोलीस कोठडी


20 जानेवारी पर्यंत बार्शी न्यायालयाने दिली पोलीस कोठडी


बार्शीत शेअर गुंतवणुकीच्या नावाखाली केली आहे फसवणूक


मुख्य आरोपी विशाल फटे अद्याप फरार


मात्र त्याचे वडील आणि भाऊना पोलिसांनी केली आहे अटक

दापोली तीन वृद्ध महिलांचा मृत्यू प्रकरण,दागिन्यासाठी वणोशी येथील तीन वृद्ध महिलांची हत्या झाल्याचे स्पष्ट

दापोली तीन वृद्ध महिलांचा मृत्यू प्रकरण,दागिन्यासाठी वणोशी येथील तीन वृद्ध महिलांची हत्या झाल्याचे स्पष्ट, चोरीच्या उद्देशाने हत्या झाल्याचे पोलिसांनी केले स्पष्ट, 1 लाख 62 हजार 150 ₹ च्या दागिन्यासाठी झाली हत्या.

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून प्राचार्य दिगंबर दुगार्डे तर उपाध्यक्ष पदासाठी सुनील चांदेरे यांना संधी

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्ष पदाच्या उमेदवार म्हणून प्राचार्य दिगंबर दुगार्डे तर उपाध्यक्ष पदासाठी सुनील चांदेरे यांना संधी. दोघेही राष्ट्रवादीचे.  पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेतील 21 पैकी 19 संचालक राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे निवडून आलेत.  त्यामधून अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार,  दिलीप वळसे पाटील आणि दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत बैठक होतेय.  या बैठकीत अध्यक्ष म्हणून दुर्गाडे तर उपाध्यक्ष म्हणून चांदेरेच्या निवडीची औपचारिकता पूर्ण करण्यात येतेय.

अभिनेते किरण माने यांनी घेतली राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट

अभिनेते किरण माने यांनी घेतली राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट, भेटीमध्ये अचानक मालिकेतून काढून टाकल्याबाबत झाली चर्चा, विशिष्ट पक्षाविरोधात लिहिल्यामुळे काढून टाकल्याचा किरण माने यांचा आरोप,  मुंबईतील वाय बी चव्हाण सेंटर येथे किरण माने यांनी शरद पवार यांच्या सोबत भेटून चर्चा केली

चंद्रपूर जिल्ह्यात सोसाट्याच्या वाऱ्यासह झालेल्या गारपिटीने शेतकऱ्यांचे नुकसान

चंद्रपूर जिल्ह्यात काल संध्याकाळी सोसाट्याच्या वाऱ्यासह झालेल्या गारपिटीने शेतकऱ्यांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. या मुसळधार पावसाचा आणि गारपिटीचा सावली, राजुरा आणि ब्रम्हपुरी या तालुक्यांना सर्वाधिक नुकसान झाले आहे. काल संध्याकाळी सावली तालुक्यातील पालेबारसा, मंगरमेंढा, उसरपार चक, उसरपार तुकुम, सायखेडा, मेहा-खुर्द आणि जनकापूर या गावांना गारपिटीने अक्षरशः झोडपून काढले. या गारपिटीने रब्बी च्या चना, मिर्ची, लाखोळी, उडीद-मुंग-वाटाणा, पोपट या सारखी कडधान्य आणि भाजीपाला पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने शेतात पाणी साचले आहे आणि यामुळे ही पिकं आता सडून खराब होणार आहे. या नुकसानीने शेतकरी पार खचून गेला असून त्यांनी सरकारकडे नुकसानीचे पंचनामे करण्याची आणि नुकसानभरपाई देण्याची मागणी केली आहे.




भाजपकडून उत्तरप्रदेश निवडणुकीसाठी पहिली यादी घोषित, योगी आदित्यनाथ गोरखपूरमधून लढणार

भाजपकडून उत्तरप्रदेश निवडणुकीसाठी पहिली यादी घोषित, योगी आदित्यनाथ गोरखपूरमधून लढणार

 आर्वीच्या कदम रुग्णालयात पुन्हा एक कवटी सापडली; एकूण 12 कवट्या आणि 54 हाडे मिळाली
वर्धेच्या कदम रुग्णालयातील गर्भपात प्रकरणाने संपूर्ण राज्यात खळबळ माजली आहे. या रुग्णालय परिसरात शुक्रवारी पोलिसांनी फॉरेन्सिक टीमच्या सहाय्याने शोधकार्य केले. त्यामध्ये शोधकार्यात पुन्हा एक कवटी सारखा अवयव आढळले असल्याची माहिती आहे. आतापर्यंत या परिसरातून 12 कवट्या आणि 54 हाडे आढळली आहे. बुधवारी पोलिसांनी रुग्णालयाच्या मागील बाजूस असलेल्या गोबरगॅसच्या खड्ड्याची तपासणी केळी होती. त्यात पोलिसांना 11 कवट्या 54 हाडे बायोमेडिकल वेस्ट मटेरियल आदी मिळालं होतं. यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षक यांनी घटनास्थळी भेट देत प्रकरणाचा सखोल अभ्यास करत तपासासाठी वेगळे पथक स्थापन केले. पोलिसांच्या चमुने वर्धा आणि नागपूरच्या फॉरेन्सिक चामुंच्या मदतीने पुन्हा रुग्णालय परिसरातील तपासणी केली. दरम्यान रुग्णालयाच्या मागील परिसरातून परत एक कवटी आढळल्याचं पोलीसांनी सांगितलं.तपासात आणखी काय पुढे येते हे पाहणे महत्वाचे आहे.

 
बार्शीतल्या 'फटे scam' प्रकरणात पहिली अटक, मुख्य आरोपी विशाल फटे याचे वडील अंबादास फटे, भाऊ वैभव फटे पोलिसांच्या ताब्यात

बार्शीतल्या 'फटे scam' प्रकरणात पहिली अटक, मुख्य आरोपी विशाल फटे याचे वडील अंबादास फटे, भाऊ वैभव फटे पोलिसांच्या ताब्यात


मध्यरात्री सांगोला येथून स्थानिक गुन्हे शाखेने घेतलं ताब्यात


कोट्यावधीच्या फसवणूक प्रकरणी विशाल सोबत परिवारातील 4 सदस्य देखील होते आरोपी


त्यापैकी दोघे आता ताब्यात, मुख्य आरोपी विशाल फटे अद्याप ही फरार

ज्येष्ठ तमाशा कलावंत शाहीर राजा पाटील काळाच्या पडद्याआड
क्षेत्रातून करमणुकीच्या  माध्यमातून लोकप्रबोधन करणारे  कवठेमहांकाळ येथील शाहीर राजाराम यशवंत पाटील उर्फ राजा पाटील यांचे वयाच्या 70 व्या वर्षात निधन झाले. त्यांच्या निधनाने तमाशा क्षेत्रावर दु:खाचे सावट पसरले आहे. शाहीर राजा पाटील यांनी १९९०च्या दशकात तमाशा आणि शाहीरी लोककला महाराष्ट्रभर सादर करुन लोककलेचा जागर केला होता.

शाहीर राजा पाटील यांनी काळू बाळू तमाशा मंडळ, गणपत व्ही.माने चिंचणीकर, दत्त महाडीक पुणेकर, रघुवीर खेडकर, काताबाई सातारकर, या.तमाशांना वगनाट्य दिली व ती महाराष्ट्रभर गाजली. या टोपी खाली।दडलय काय, बारा हजाराची कमळी,.खेकडा चालला दिल्लीला, रक्तात नाहाली आब्रु, कायदा गाढव हाय, तुकोबा निघाले वैकुंठाला, इंदिरा काय भानगड, राजा हारीचंद्र, डॉ.शर्मा, संत एकनाथ, संत दामाजी, भक्त पुंडलिक,ही वगनाट्य महाराष्ट्रभर गाजली. माणूस माणसाचा वैरी, बापू बिरु वाटेगावकर, कृष्णा मिळाली कोयनेला अशी नाटकेही शाहीर राजा पाटील यांनी लिहून.अजरामर केली.


सलमान खानकडून पनवेलमधील शेजारी केतन कक्कडविरुध्द सिटी सिव्हील कोर्टात खटला दाखल

सलमान खानने त्याच्या पनवेलमधील शेजारी केतन कक्कड विरुध्द सिटी सिव्हील कोर्टात खटला दाखल केला आहे.. सोशल मीडियावर सलमान खानचे फोटो पोस्ट केल्यामुळे त्याला आणि त्याच्या कुटुंबियांना त्रास होत असल्याचे खटल्यात म्हणत यावर बंदी घालण्यासंदर्भात सलमान कोर्टात गेला आहे.. केतन कक्कड यांच्या वतीने त्यांच्या वकिलांनी कोर्टाला रिप्लाय फाईल करण्यासाठी वेळ मागितला आहे..

खंडेरायाच्या पौष पौर्णिमा यात्रेवर कोरोनाचे सावट; जेजुरीत कलम 144 लागू करणार असल्याची प्रशासनाची माहिती

सोमवारी जेजुरीच्या खंडेरायाची पौष पौर्णिमा यात्रा होणार आहे. यात्रेवर कोरोनाचे सावट असल्याने जेजुरीत कलम 144 लागू करणार असल्याची प्रशासनाने माहिती दिली आहे. दर वर्षी या यात्रेसाठी 1 लाख भाविक जेजुरी गडावर येतात.परंतु मंदिर प्रशासनाने लसीचे दोन डोस घेतलेल्या लोकांनाच मंदिरात येता येईल असा निर्णय घेतला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासन जेजुरीत कमल 144 लागू करणार आहे. पौष पौर्णिमेच्या यात्रेत गाढवांचा बाजार मोठ्या प्रमाणावर भरतो परंतु याला बाजारावर देखील कोरोनाच सावट आहे. कोरोनाचे सर्व नियम पाळून यात्रा करणार असल्याचे मंदिर विश्वस्तांची माहिती दिली आहे. 

पार्श्वभूमी

महाराष्ट्राकडे लसीचा पुरेसा साठा, लसीअभावी लसीकरणात अडचण नाही; केंद्र सरकारकडून स्पष्टीकरण


एकीकडे देशात कोरोना (Corona) चा वाढता संसर्ग कायम असताना देशात लसीकरणावर (Covid19 Vaccine) भर दिला जात आहे. अशात मीडिया रिपोर्ट्सनुसार, लस उपलब्धतेत कमतरता असल्यामुळे राज्य सरकार लसीकरणाची गती वाढवू शकत नाही असे बोलले जात होते. मात्र केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने (Central Health Ministry) या वृत्ताचे खंडन केले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितले की राज्याकडे कोवॅक्सिन लसीचा 24 लाखांहून अधिक डोसचा साठा आहे त्याशिवाय राज्याला शुक्रवारी अतिरिक्त 6.35 लाख डोस मिळाले असल्याचे केंद्राने म्हटलंय. मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, ''कोविन अ‍ॅपवर (Co-WIN App) उपलब्ध साप्ताहिक लसीकरणाच्या आकडेवारीनुसार, 18 वर्षांखाली अल्पवयीन मुलामुलींच्या लसीकरणासाठी राज्याला कव्हर करण्यासाठी आणि बूस्टर डोस (Booster Dose) साठी महाराष्ट्राचा कोवॅक्सिन लसीचा सरासरी वापर दररोज सुमारे 2.94 लाख डोस इतका आहे. राज्याकडे कोवॅक्सिन लसीचा आतापर्यंत न वापरलेल्या  24 लाखांहून अधिक डोसचा साठा आहे. त्यामुळे, राज्याकडे 10 दिवसांच्या लसीकरणासाठीचा लसीचे मुबलक डोस आहेत. 


शेतकऱ्याच्या मुलीची गगनभरारी! घरीच अभ्यास करत पहिल्याच प्रयत्नात UPSC च्या परिक्षेत यश


एका शेतकऱ्याच्या मुलीने जिद्दीच्या बळावर पहिल्याच प्रयत्नात केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजेच यूपीएससी (UPSC) च्या परिक्षेत मोठे यश संपादन केले आहे. घरीच अभ्यास करत तिने हे यश मिळवले आहे. श्रद्धा नवनाथ शिंदे असे त्या मुलीचे नाव आहे. यूपीएससीच्या भारतीय अभियांत्रिकी सेवा परीक्षेत ती राज्यात पहिली तर देशात 36 व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे. श्रद्धाचे वडील हे बीड तालुक्यातील लोणी शहाजानपूर येथील असून ते अल्पभूधारक शेतकरी आहेत. तर आई गृहिणी असून त्या अशिक्षित आहेत. श्रद्धाचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण बीडलाच झाले.श्रद्धा यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण बीडला झाल्यानंतर तिने औरंगाबाद (Aurangabad) येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून इलेक्ट्रीकल इंजिनीअरींगचे शिक्षण पूर्ण केले. 2018 ला श्रद्धाने अभियांत्रिकीची पदवी हाती घेतली. त्यानंतर तिने थेट दिल्ली गाठली व सहा महिने शिकवणी केली.


 


 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.