Maharashtra Breaking News LIVE Updates : गोव्यातही काँग्रेस आणि शिवसेनेची युती होणार? गोव्याचे काँग्रेस नेते दिगंबर कामत आणि संजय राऊत यांच्यात बैठक

Maharashtra Breaking News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

abp majha web team Last Updated: 03 Jan 2022 09:29 PM
गोव्यातही काँग्रेस आणि शिवसेनेची युती होणार?

गोव्यातही काँग्रेस आणि शिवसेनेची युती होणार असल्याची शक्यता आहे.  गोव्याचे काँग्रेस नेते दिगंबर कामत आणि संजय राऊत यांच्यात बैठक सुरू आहे.  गोव्यात सात जागेंची शिवसेनेची काँग्रेसकडे मागणी आहे.

पुण्यात गेल्या 24 तासात 444 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद तर 120 रुग्णांनी केली कोरोनावर मात

पुण्यात गेल्या 24 तासात 444 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 120 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. पुण्यात आतापर्यंत 511585 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात एकाही कोरनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला नाही. सध्या पुण्यात 2838 सक्रिय रुग्ण आहेत. आज पुण्यात 6573 नागरिकांची स्वॅब तपासणी झाली आहे.

29 आणि 30 जानेवारी रोजी होणारी म्हाडाची परीक्षा पुढे ढकलली

29 आणि 30 जानेवारी रोजी नियोजित म्हाडा सरळ सेवा भरती परीक्षा 2021-22 पुढे ढकलण्यात आली आहे.  आज एमपीएससीमार्फत घेण्यात येणाऱ्या जानेवारी महिन्यातील तीन परीक्षेचे सुधारित वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले. त्यात अनेक उमेदवारांना एमपीएससी व म्हाडा प्राधिकरणाच्या दोन्ही परीक्षा एकाच दिवशी येत असल्याने अडथळा निर्माण झाला होता. त्यामुळे म्हाडा प्राधिकरणाची क्लस्टर 6 मधील सहाय्यक, वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक, टंकलेखक या संवर्गकरिता 29 आणि 30 जानेवारी या दिवशी सहा सत्रांमध्ये होणारी म्हाडा ऑनलाईन परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. परीक्षेचे सुधारित वेळापत्रक लवकरच म्हाडा संकेतस्थळावर जाहीर करण्यात येईल. 

Maharashtra Breaking News LIVE Updates : भंडारा जिल्ह्यातील तुमसरचे आमदार राजू कारेमोरे यांचा जामीन अर्ज नामंजूर

भंडारा जिल्ह्यातील तुमसरचे आमदार राजू कारेमोरे यांचा जामीन अर्ज नामंजूर, व्यापारी मित्रांना मारहाण झाल्यानंतर पोलीस ठाण्यात घातला होता गोंधळ. या प्रकरणी आज दुपारी झाली होती अटक 

नाशिक जिल्ह्यात दिवसभरात 216 कोरोना पॉझिटिव्ह 

नाशिक जिल्ह्यात दिवसभरात 216 कोरोना पॉझिटिव्ह 


नाशिक शहरातील 151 जणांना लागण, दोघांचा मृत्यू


गेल्या दोन चार  दिवसात सातत्याने वाढ
मागील 3 महिन्यातील सर्वाधिक वाढ

नवी मुंबईत पहिली ते नववी आणि अकरावीच्या शाळा बंद

नवी मुंबईतील शाळा बंद करण्याचा निर्णय  घेतला आहे. पहिले ते नववी आणि अकरावीचे वर्ग बंद राहणार आहेत. 
मात्र शाळा ॲानलाईन सुरू राहणार आहे. फक्त दहावी आणि बारावी चे वर्ग ॲाफलाईन सुरू राहणार आहे. 

औरंगाबादमध्ये क्रांती चौकातील पुलावर भलामोठा गॅप, अपघाताची शक्यता

औरंगाबाद शहरातील मुख्य चौकात असलेल्या क्रांती चौक उड्डाण पुलावर भलामोठा गॅप पडला आहे . यावरूनच वाहनं ये-जा करताना पाहायला मिळत आहेत. हा गॅप  एवढा मोठा आहे की थेट खालचा रस्ता स्पष्टपणे दिसतो. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास मंडळाने बांधलेला क्रांती चौकातील उड्डाणपूल निर्मितीपासूनच वादग्रस्त राहिलेला आहे. पुलाचे बेअरिंग अलायमेंट सरकले की काय अशी भीती तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. पुलावर रोज 12 ते 14  हजारांहून अधिक वाहनांचा राबता असतो.

समीर वानखेडेंची बदली करण्याचा केंद्र सकरकारचा निर्णय योग्यच ; नवाब मलिक

समीर वानखेडेंची बदली करण्याच केंद्र सकरकारचा निर्णय योग्य असल्याचे राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी म्हटले आहे. कार्यकाळ संपल्याने समीर वानखेडे यांची बदली करण्यात आली आहे. 

बीड जिल्ह्यातील आज कोरोना शुन्यावर

बीड जिल्ह्यात आज एकही कोरोनाचा रुग्ण सापडला नाही. ऑक्सिजन, बेड, डॉक्टरांची जमजमवी वेगात सुरू असताना बीडची कोरोना रुग्णसंख्या मात्र शुन्यावर आली आहे ही सकारात्मक बाब आहे. 

पहिली ते आठवीच्या शाळा मुंबईत 31 जानेवारीपर्यंत बंद, ऑनलाईन शिक्षण सुरू राहणार

पहिली ते आठवीच्या शाळा मुंबईत 31 जानेवारीपर्यंत ऑफलाईन  बंद राहणार आहे.  ऑनलाईन शिक्षण मात्र  सुरू राहणार आहे. 

राज्यातील कोरोना आणि ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर युवासेनेचे राज्यव्यापी पदाधिकारी अधिवेशन स्थगित

सध्याची राज्यातील कोरोना आणि ओमायक्रॉनचा प्रादुर्भाव पाहता युवासेनेचे राज्यव्यापी पदाधिकारी अधिवेशन  स्थगित करण्यात आले आहे. हे अधिवेशन नाशिक  8 आणि 9 जानेवारीला नाशिक येथे होणार होते. कोरोनाची संख्या पाहता युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी हा निर्णय घेतला आहे. 

तुमसरचे आमदार राजू कारेमोरे यांना अटक, 31 डिसेंबरच्या रात्री मोहाडी पोलिस स्टेशन मध्ये घातला होता राडा

तुमसरचे आमदार राजू कारेमोरे यांना अटक, 31 डिसेंबरच्या रात्री मोहाडी पोलिस स्टेशन मध्ये घातला होता राडा, पोलिसांना केली होती अश्लील शिवीगाळ, व्यापारी मित्रांना पोलिसांनी मारहाण करण्याचा अणि 50 लाख चोरी करण्याचा लावला आरोप, भंडारा पोलिसांनी घरून केले अटक, विविध कलमान्वये आज अटक करून कोर्टात केले हजर....

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे जाण्याची शक्यता, निवडणूक आयोगाची मात्र तयारी पूर्ण

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या (Local Body Election) निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने तयारी पूर्ण केली आहे. परंतु, कोरोनाच्या (Corona) तिसऱ्या लाटेमुळे या निवडणुका पुढे जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यातच ओबीसी आरक्षणाशिवाय (Obc Reservation) निवडणुका नको अशी राज्य सरकारने भूमिका घेतली आहे. राज्य सरकारने तसा ठरावही विधिमंडळात पास केला आहे. महापालिका आणि जिल्हा परिषदांमधील जागांच्या संख्येत वाढ झाल्याने वॉर्ड रचनेचे काम निवडणूक आयोगाने सुरू केले असून ते अंतिम टप्प्यात आले आहे. त्याचबरोबर सुधारित आराखड्यानुसार आरक्षण निश्चितीसाठी प्रक्रियाही सुरू केली आहे. एकीकडे निवडणुका पुढे ढकलण्यावरून राज्य निवडणूक आयोग आणि राज्य सरकारमध्ये संघर्ष सुरू असताना निवडणूक आयोगाने ओबीसी आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याची तयारी सुरू केलेली आहे. त्यामुळे या निवडणुकांचे नक्की काय होणार हे येत्या काही दिवसांत पाहायला मिळणार आहे. 

सप्तश्रृंगी देवस्थान ट्रस्टचा महत्वपूर्ण निर्णय, देवीच्या दर्शनासाठी 10 वर्षाखालील मुले आणि 65 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना प्रवेश बंदी

सप्तश्रृंगी देवस्थान ट्रस्टचा महत्वपूर्ण निर्णय,  देवीच्या दर्शनासाठी 10 वर्षाखालील मुले आणि 65 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना प्रवेश बंदी


 लहान मुले आणि ज्येष्ठांना खबरदारी म्हणून प्रवेश बंदी करणारे पहिलेच देवस्थान


- कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत असल्याने ट्रस्टने घेतला निर्णय


अचानक लहान लहान मुलांना प्रवेश नाकरल्यानं पालकांचे हाल, दर्शन होई पर्यंत मुलांना ठेवायचे कुठे हा प्रश्न 


- मास्क , सोशल डिस्टन्सिंग सॅनिटायझर या नियमांचे पालन बंधनकारक

भाजप आमदार नितेश राणेंची अटकपूर्व जामीनासाठी हायकोर्टात याचिका दाखल

#BREAKING : भाजप आमदार नितेश राणेंची अटकपूर्व जामीनासाठी हायकोर्टात याचिका दाखल, मंगळवारी होणार तातडीची सुनावणी, सिंधुदूर्ग सत्र न्यायालयानं अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्याच्या निर्णयाला दिलं आव्हान

मुंबईत कोविडचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शाळांबाबत आज निर्णय होणार

#BREAKING : मुंबईत कोविडचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शाळांबाबत आज निर्णय होणार, शाळा प्रत्यक्ष सुरू ठेवायच्या की नाही? यावर आज पालिका अधिकारी निर्णय घेणार, आज संध्याकाळी पालिका अधिकाऱ्यांची बैठक

घाटकोपरच्या असल्फामध्ये आगीची घटना, जीवितहानी नाही, फायर ब्रिगेडकडून कुलिंग ऑपरेशन सुरू

पाऊण तासापूर्वी घाटकोपरच्या असल्फा सुंदर बाग  येथील डिसिल्व्हा कंपाऊड येथे साधारणपणे पाऊण तासापूर्वी एका काचेच्या आणि सोफा बनवण्याच्या कंपनीला आग लागली होती. यामध्ये मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली आहे मात्र जीवितहानी झालेली नाही. सध्या आग आटोक्यात आली आहे. फायर ब्रिगेडकडून कुलिंग ऑपरेशन सुरू आहे. घटनास्थळी 4 गाड्या असून जवळपास 40 ते 50 अग्निशमन दलाचे कर्मचारी कुलिंग करत आहेत

मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक निवडणूक मतमोजणी सुरू; पहिला निकाल सहकार पॅनेलच्या बाजूने

मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक निवडणुकीतील पहिला निकाल हाती. मध्यवर्ती ग्राहक संस्था मतदार संघातून सहकार पॅनलचे विठ्ठलराव भोसले विजयी. 

कागल-निढोरी राज्यमार्गावर तिहेरी अपघात, अपघातात दोघांचा जागीच मृत्यू

कागल-निढोरी राज्यमार्गावर तिहेरी अपघात, अपघातात दोघांचा जागीच मृत्यू तर सहा जण जखमी, वाघजाई घाटात वळणावर उसाने भरलेला ट्रॅक्टर टेम्पो आणि दुचाकीवर उलटल्यानं अपघात, जखमींवर सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू





देशातील प्रमुख महानगरांतील पेट्रोल-डिझेलच्या किमती

देशात ऑईल मार्केटिंग कंपन्यांनी इंधानाच्या किमतींमध्ये कोणताही बदल केलेला नाही. जाणून घेऊया वेगवेगळ्या शहरांतील पेट्रोल-डिझेलच्या किमती 




































देशातील प्रमुख शहरं पेट्रोलची किंमत प्रति लिटरडिझेलची किंमत प्रति लिटर 
मुंबई109.98 94.14
दिल्ली95.41 86.67
चेन्नई101.4091.43
कोलकाता104.6789.79
पाटणा105.9291.09

Petrol Diesel Price Today : देशात पेट्रोल-डिझेलचे आजचे दर काय?

Petrol-Diesel Price 03 January 2022 : नववर्षांची सुरुवात झाली आहे. परंतु, देशांतर्गत इंधन बाजारात पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये कोणताही बदल झालेला नाही. देशात पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत. नववर्षाच्या सुरुवातीला कच्च्या तेलाच्या बाजारात मोठी पडझड पाहायला मिळाली होती. गेल्या ट्रेडिंग सत्रात, जागतिक मानक मानल्या जाणार्‍या ब्रेंट क्रूडची किंमत प्रति बॅरल 0.16 टक्क्यांनी घसरून $79.40 वर आली होती. त्याच वेळी, ब्रेंट क्रूड फ्युचर्सची किंमत 0.74 टक्क्यांनी घसरून प्रति बॅरल $ 78.94 वर आली. वेस्ट टेक्सास इंटरमीडिएट कच्च्या तेलाच्या किमती न्यूयॉर्कमध्ये 0.23 टक्क्यांनी घसरून 76.81 डॉलर प्रति बॅरलवर आल्या होत्या. 


देशात गेल्या दोन महिन्यांपासून तेल वितरण कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये कोणतीही वाढ केलेली नाही. राजधानी दिल्लीसह देशभरात पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये गेल्या दोन महिन्यांपासून बदल करण्यात आलेला नाही. भारतीय तेल कंपन्यांनी 04 डिसेंबरपासून पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये कोणताही बदल केलेला नाही. इंधन दरवाढ कायम असल्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला काहीसा दिलासा मिळणार आहे. गेल्या दोन महिन्यांत तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलच्या (Petrol-Diesel Price) किमतींमध्ये कोणताही बदल केलेला नाही. केंद्र सरकारनं दिवाळीपूर्वी पेट्रोल-डिझेलच्या उत्पादन शुल्कात कपात केली होती. त्यामुळे देशभरातील पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये घट झाल्याचं पाहायला मिळालं होतं. नंतर अनेक राज्यांनी पेट्रोल-डिझेलवरील व्हॅट कमी करत सर्वसामान्यांना दिलासा दिला होता. 


सविस्तर वाचण्यासाठी येथे क्लिक करा

देशात आजपासून 15 वर्षांवरील मुलांच्या लसीकरणाला सुरुवात

देशात आजपासून 15 वर्षांवरील मुलांच्या लसीकरणाला सुरुवात होतेय. त्यासाठी आठ लाखांवर मुलांनी आतापर्यंत कोविन अॅपवर नोंदणी केलीय. प्रशासनानं त्याची तयारी केलीय. मुलांनी न घाबरता लस घ्यावी असं आवाहन डॉक्टरांनी केलं आहे. 


दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेण्यासाठी एबीपी माझा लाईव्ह पाहा

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेण्यासाठी एबीपी माझा लाईव्ह पाहा


पार्श्वभूमी

Maharashtra Breaking News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...


Pegasus Spyware Case: सुप्रीम कोर्टाचे आवाहन, पेगासस हेरगिरी प्रकरणात हॅकिंग झाल्याचा संशय असल्यास...


Pegasus Spyware Case: पेगासस हेरगिरी प्रकरणी सुप्रीम कोर्टाने महत्त्वाचे आवाहन केले आहे. पेगासस स्पायवेअरद्वारे फोन हॅकिंग झाल्याचा संशय असल्यास सुप्रीम कोर्टाने नियुक्त केलेल्या समितीशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. देशातील प्रमुख वृत्तपत्रांमध्ये याबाबतचे आवाहन करणारी नोटीस प्रसिद्ध करण्यात आली आहे. पेगासस स्पायवेअर प्रकरणामुळे भारतासह जगभरात खळबळ उडाली होती. 


सुप्रीम कोर्टाने नियुक्त केलेल्या तांत्रिक समितीने ही नोटीस प्रसिद्ध केली आहे. ज्या नागरिकांना आपल्या मोबाइलमध्ये पेगासस स्पायवेअरद्वारे हल्ला करण्यात आला असल्याचे संशय आहे, त्यांनी 7 जानेवारी 2022 च्या आधी एक ई-मेल पाठवणे गरजेचे असल्याचे प्रसिद्ध केलेल्या नोटिसमध्ये म्हटले आहे. 


समितीने म्हटले की, जर, तुम्ही दिलेल्या कारण योग्य वाटल्यास समिती तुमचा मोबाइल तपासणीसाठी मागण्याची विनंती करणार. सुप्रीम कोर्टाने नियुक्त केलेल्या समितीने म्हटले की, भारताच्या कोणत्याही नागरिकाला इस्रायलच्या एनएसओ ग्रुपच्या पेगासस स्पायवेअरचा वापर करून मोबाइल हॅक केला असल्याचा संशय असल्यास त्यांनी सुप्रीम कोर्टाने नियुक्त केलेल्या समितीसोबत संपर्क करावा. 







Corona Vaccination For Children : 15 ते 18 वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला आजपासून सुरुवात, आतापर्यंत 8 लाखांहून अधिक नोंदणी


Corona Vaccination For Children : देशातील 15 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांना 3 जानेवारीपासून कोरोनाची लस दिली जाणार आहे, यासंदर्भातील घोषणा काही दिवसांनी पंतप्रधानांनी केली होती. यासाठी आधीपासून कोविन अ‍ॅपवर नोंदणी सुरु झाली आहे. आतापर्यंत 8 लाखांहून अधिक लोकांनी कोविन अॅपवर नोंदणी केली आहे. नोंदणीसाठी इयत्ता दहावीचं ओळखपत्र देखील ओळखीचा पुरावा म्हणून ग्राह्य धरला जाणार आहे. आजपासून म्हणजेच, 3 जानेवारीपासून लहान मुलांच्या लसीकरणाला सुरुवात करण्यात येणार आहे. यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं गाईडलाईन्स जारी केली आहे. लहान मुलांना लस देण्यासाठीची सीरींज, नीडल कदाचित वेगळी असणार आहे. 1 जानेवारीपासून रजिस्ट्रेशन प्रक्रिया सुरु होणार आहे. CoWIN पोर्टलवर आणखी एक स्लॉट जोडण्यात आला असून तिथून मुलांना लसीकरणासाठी स्लॉट बुक करता येणार आहे. 


CoWIN पोर्टलवर आपला COVID-19 वॅक्सिन स्लॉट बुक करण्यासाठी विद्यार्थ्यांना आपल्या आयकार्डचा वापर करावा लागणार आहे. ज्या मुलांकडे आधार कार्ड नसेल त्यांच्या लसीकरणात अडथळा येऊ नये म्हणून आयकार्डचा वापर करण्याचा पर्याय केंद्राकडून अंमलात आणण्यात आला आहे. भारत सरकारनं 15 ते 18 वर्ष वयोगटातील मुलांसाठी दोन लसींना मंजुरी दिली आहे. भारत बायोटेकची कोवॅक्सिन लसीचे दोन डोस आणि Zydus Cadila's ZyCoV-D चे तीन डोस या लसींमधून पर्याय निवडावा लागणार आहे. 






- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.