Maharashtra Breaking News LIVE Updates : धारावीत आज 60 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद

Maharashtra Breaking News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

abp majha web team Last Updated: 02 Jan 2022 06:47 PM
आर. एन. सिंग यांचे निधन

उत्तर भारतीय संघाचे (मुंबई) अध्यक्ष, भारतीय जनता पार्टीचे विधानपरिषद सदस्य आर. एन. सिंग (BJP MLC R N Singh) यांचे शनिवारी गोरखपूर (उत्तरप्रदेश) येथे हृदयविकाराने निधन झाले. ते ७४ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात दोन मुली आणि एक मुलगा असा परिवार आहे.मुंबईतील सर्वात जुन्या समजल्या जाणाऱ्या उत्तर भारतीय संघाचे (Uttar Bharatiya Sangh) ते सातव्यांदा अध्यक्ष झाले होते. ८ जुलै २०१६ मध्ये ते भाजपच्या (BJP) तिकिटावर विधानपरिषदेवर निवडून गेले होते. ७ जुलै २०२२ रोजी त्यांच्या सदस्यत्वाचा कार्यकाळ रोजी संपणार होता.

कर्नाटकात प्रवेश करण्यासाठी दोन डोस आणि आर टी पी सी आर आवश्यक,मुख्यमंत्री बोम्माई
दोन डोस घेतलेल्या आणि आर टी पी सी आर निगेटिव्ह रिपोर्ट असलेल्या व्यक्तींना कर्नाटकात प्रवेश दिला जाईल अशी माहिती  कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी बेळगाव विमानतळावर पत्रकारांशी बोलताना दिली.   महाराष्ट्रात विशेषतः मुंबईत ओमायक्राँन रुग्णांची संख्या वाढत आहे.   कर्नाटकातील जनतेचे महाराष्ट्राशी  अनेकांचे व्यावसायिक संबंध आहेत.त्यामुळे अनेक जण व्यवसायाच्या निमित्ताने कर्नाटकात येत असतात.राज्यातील सीमेवरील सगळ्या चेक पोस्टवर खबरदारी घेण्याचे आदेश दिले आहेत.केवळ बेळगाव जिल्ह्यातच नव्हे तर सीमेवरील सगळ्या जिल्ह्यात खबरदारी घेण्याचे आदेश दिले आहेत.विजापूर जिल्ह्यात देखील नवे अकरा तपासणी नाके उभारण्यात आले आहेत. कडक नियमामुळे जनतेची थोडी गैरसोय होणार आहे पण जनतेच्या आरोग्याच्या दृष्टीने नियमांची अमलबजावणी करणे आवश्यक आहे.
सांगलीत ओमायक्रोनचे 2 रुग्ण

सांगलीतील 100 फुटी रोडवर गुलाब कॉलनीत वास्तव्यास असलेले दोनजण ओमायक्रोनबाधित असल्याचा रिपोर्ट प्रशासनाला मिळाला आहे. दोघेही पती-पत्नी असून त्यांनी परदेशी प्रवासही न करता त्यांना ओमायक्रॉनची लागण झाली आहे, सध्या कोणताही जास्त त्रास नसल्याचे महापालिका आरोग्य अधिकाऱ्यांनी सागितले आहे.

मुंबईतून गोव्याला जाणाऱ्या कॉर्डिलिया क्रूजला प्रवेश नाकारला

मुंबईतून 30 डिसेंबर रोजी गोव्याला जाणाऱ्या कॉर्डिलिया क्रूजला प्रवेश नाकारला होता. या क्रूजवरील काहींना कोरोनाची लागण झाल्याचंही समोर आलं आहे. या क्रूजवर जवळपास 2 हजार प्रवासी होते.

धारावीत आज 60 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद

धारावीत आज 60 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झालीय. धारावीत सध्या 179 रुग्ण सक्रीय असल्याची माहिती एएनआय वृत्त संस्थेनं दिलीय. 


 


 

लातुरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या डान्स स्पर्धेत कोरोना नियमाचा फज्जा

अजित पवार यांचे कोविड नियम पालन करण्यासाठी सतत आव्हान करतानाचे अनेक व्हिडीओ आहेत मात्र त्याच्याच पक्षातील तरुण कार्यकर्ते यांनी सर्व नियम पायदळी तुडवले आहेत . जगात कोरोनाच्या ओमीक्रॉन विषाणूचा धोका वाढत असताना केंद्र आणि राज्य सरकारच्या वतीने कडक नियम घालून दिले आहेत पण राज्यात सत्तेत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्यार्थी आघाडीने येथील दयानंद सभागृहात डान्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते यात कोरोना बाबतच्या नियमांना हरताळ फासल्याचे दिसून येत आहे दयानंद सभागृहात खचाखच भरलं असून या कार्यक्रमा दरम्यान स्पर्धक युवक युवतीसह अनेक राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्ते डान्स करत जल्लोष साजरा केला आहे आता जिल्हा प्रशासन यावर काय कारवाई करणार याकडे लक्ष लागून आहे सर्वसामान्य नागरिकांना एक नियम आणि राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांना दुसरा नियम पालन चुकीचे असल्याचे दिसून येत आहे

ईडब्ल्यूएस आरक्षणासाठी आर्थिक उत्पन्नाची मर्यादा आठ लाख रुपयेच राहणार

ईडब्ल्यूएस आरक्षणासाठी आर्थिक उत्पन्नाची मर्यादा आठ लाख रुपयेच राहणार, केंद्र सरकारचं सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र


या उत्पन्न मर्यादेवर फेर विचार करण्यासंदर्भात सुप्रीम कोर्टाने सुचवलं, त्यानंतर सरकारकडून समिती नेमण्यात आली होती


ओबीसी आणि ईडब्ल्यूएस या दोन्ही गटांसाठी सामाजिक पार्श्वभूमी वेगळी असताना उत्पन्न मर्यादा मात्र एकच का हा प्रश्न कोर्टाने विचारला होता


मात्र ईडब्ल्यूएस साठी वरकरणी आठ लाख रुपये सेम वाटत असले तरी त्यांच्यासाठीच्या अटी ओबीसी पेक्षा वेगळ्या आहेत समितीचा दावा


यात कुटुंबाची व्याख्या ओबीसी पेक्षा वेगळी धरलेली आहे उत्पन्नासाठी..


ई डब्ल्यू एस नॉन क्रिमीलेअर ठरविण्यासाठी काही बदलही समितीने सुचवले आहेत.. पण हे बदल पुढच्या शैक्षणिक वर्षापासून लागू करण्याचे निर्देश..


या वर्षीचे प्रवेश सध्याच्या निकषानुसार करण्याचेही निर्देश..


मेडिकल पीजी नीट कौन्सिलिंगचा सगळा घोळ, डॉक्टरांचे आंदोलन चालू आहे ते याच केसमुळे


त्यामुळे आता केंद्राच्या प्रतिज्ञापत्रानंतर हा सगळा मुद्दा सुरळीत होऊन प्रवेश प्रक्रिया मार्गी लागते का पहावे लागेल


यासंदर्भात पुढची सुनावणी 6 जानेवारी रोजी आहे सुप्रीम कोर्टात

नागपूरात 9 लसीकरण केंद्रावर मुलांसाठी लसीकरण

नागपूरात सोमवार पासून शहरातील 9 लसीकरण केंद्रावर 15 ते 18 या वयोगटातील मुलांसाठी लसीकरण मोहिमेला सुरवात होणार आहे. नागपूर शहरात 15 ते 18 वयोगटातील 1 लाख 40 हजार मुलांना लसीकरण केले जाणार आहे. प्रत्येक सेंटर 200 जणांचे लसीकरणाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. लसीकरणासाठी आलेल्या मुलांना बसण्यासाठी तसेच नांव नोंदीची सोय केंद्रावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. यासोबत पालकांना ऑनलाइन स्लॉट उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. यासोबत नागपूर मनपाच्या हद्दीतील 10 झोन असून प्रत्येक झोनला 2 शाळांमध्ये सुद्धा मागणीनुसार लसीकरण केंद्राची सोय उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

Vishnu Ganesh Pingle : विष्णू गणेश पिंगळेंचा जीवनपट

‘यज्ञी ज्यांनी देऊन निजशीर, घडिले मानवतेचे मंदिर! परि जयांच्या दहनभूमीवर, नाही चिरा नाही पणती। तिथे कर माझे जुळती ’ या पंक्तीला पात्र ठरलेले असंख्य वीर या देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या देहाच्या समिधा अर्पण करून गेले. अशा अनाम स्वातंत्र्यवीरांपैकी एक विष्णू गणेश पिंगळे. आज त्यांचा स्मृतिदिन. पुणे जिल्ह्यातील शिरूर गावी जन्मलेला हा युवक यंत्रविशारद पदाचा अभ्यासक्रम पूर्ण करून अमेरिकेत गेला आणि लाल हरदयाळांच्या गदर पार्टीत सहभागी झाला. बॉम्ब तयार करून एकाच वेळी अनेक ब्रिटिश लष्करी छावण्या उद्ध्वस्त करण्याची योजना लाल हरदयाळांनी आखली, ती अशाच तळहातावर शिर घेऊन झुंजणा-या सहका-यांच्या बळावर! गदर पार्टीने ही योजना आखली. मनसुबे रचले गेले. पण फितुरीने घात केला. ही योजना लाला हरदयाळ आणि विष्णू गणेशसारखे त्यांचे सहकारी राबवू शकले नाहीत. पिंगळेंना अटक झाली. त्यांच्यासह सात क्रांतिकारकांना दि. 16 नोव्हेंबर 1915 रोजी फाशी देण्यात आले. 


मध्य रेल्वेचा 24 तासांचा मेगाब्लॉक; त्यामुळे काय बदल होणार?

मध्य रेल्वेवर आज ठाणे ते दिवा या स्थानकांच्या दरम्यान 24 तासांचा जम्बो मेगाब्लॉक घेण्यात येत आहे. या मेगाब्लॉक दरम्यान दोन मोठी कामं हाती घेण्यात आली आहेत. सगळ्यात मोठं काम कळवा स्थानकाच्या पुढे सुरु आहे. गेल्या ब्लॉकच्या वेळी जुन्या मार्गिका तोडून नवीन मार्गिकांना जोडण्यात आल्या होत्या. त्याच जुन्या मार्गिका पुन्हा तोडून पूर्वीच्या मार्गिकांना जोडण्यात येणार आहेत. 


दुसरं काम कळवा खाडीजवळ निर्माण करण्यात आलेल्या खाडी पुलावर सुरु आहे. मुंब्रा स्थानकाच्या आधी हे खाडीपूल आहेत. जुन्या बोगद्यातून येणाऱ्या जुन्या मार्गिका या खाडी पुलावरून जाणाऱ्या मार्गिकांना जोडण्यात आल्या आहेत. त्याच नवीन मार्गिकांचे लोड टेस्टिंग आज केले जाणार आहे. या दोन्ही नवीन मार्गावरून आज काही गाड्या चालवल्या जातील आणि त्याचे परीक्षण करून त्या मार्गिका सुरक्षित आहेत की, नाही ते तपासले जाईल. त्यासाठी कमिशनर ऑफ रेलवे सेफ्टी या साईटवर आले आहेत. 


सविस्तर वाचण्यासाठी येथे क्लिक करा...

भाजपच्या बडा नेत्याकडून वानखेडेंना त्याच पदावर ठेवण्यासाठी लॉबिंग : नवाब मलिक

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबीवर पुन्हा एकदा आरोपांच्या फैरी झाडल्या आहेत. नव्याने फर्जीवाडा समोर आणणार असं म्हणत मलिकांनी समीर वानखेडेंवर निशाणा साधला आहे. समीर वानखेडेंना त्याच पदावर कायम ठेवण्यासाठी दिल्लीतून एका बड्या भाजप नेत्याचं लॉबिंग सुरु असल्याचा गंभीर आरोप नवाब मलिक यांनी केला आहे.


मलिक म्हणाले, ''मागील काही दिवसांपासून समीर वानखेडे मी कार्यकाळ वाढवून मागत नाही. दोन महिन्यांच्या सुट्टीवर जाणार आहे. अशा बातम्या पेरल्या जात आहेत.'' कार्यकाळ संपल्यानंतरही अजूनही त्यांची बदली का करण्यात आली नाही? असा सवाल मंत्री नवाब मलिक यांनी उपस्थित केला आहे. 


आपल्याला घाबरवण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा आरोप मलिक यांनी केला आहे. मलिकांनी म्हटलं की, ''मला आणि माझ्या कुटुंबाला घाबरवण्याचा प्रयत्न सुरु आहे. मात्र, आम्ही घाबरणाऱ्यांपैकी नाही. मागील वर्षी फर्जीवाडा समोर आणला तसा या वर्षीही समोर आणणार आहे.''


सविस्तर वाचण्यासाठी येथे क्लिक करा...

सरकार खबरदारी घेतेय; ऑक्सिजन, व्हेंटिलेटरची तयारी करण्याचं काम सुरु : अजित पवार

महाराष्ट्रात वाढत चाललेल्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर (Corona in Maharashtra) काही निर्बंध घालण्यात आले आहेत. सोबतच काही महत्वाच्या नेत्यांकडून राज्यात पुन्हा लॉकडाऊन (Maharashtra Lockdown) होण्याबाबतचे संकेत देखील मिळाले आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी देखील काल राज्यात लॉकडाऊन लागण्यासंदर्भात संकेत दिले होते. 


आज त्यांनी पुन्हा तसे संकेत दिले असून राज्यात ऑक्सिजन, व्हेंटिलेटरची तयारी करण्याचं काम सुरु असल्याचं सांगितलं आहे. राज्य सरकार मुख्यमंत्री ठाकरेंच्या नेतृत्वात काम करत आहे. राज्यात दुसरी लाट असताना आम्ही तयारीचे आदेश दिले होते. ऑक्सिजन , व्हेंटिलेटरची तयारी करण्याचं काम सुरू केलंय. दुसऱ्या लाटेत उद्योगाचा ऑक्सिजन इकडे वळवावा लागला. ज्याची ऑक्सिजन वाढवण्याची क्षमता आहेत त्यांनी ती वाढवावी, असंही पवारांनी सांगितलं. अजित पवार पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणूक मतदान करण्यासाठी सपत्नीक आले होते तेव्हा अजित पवारांनी माध्यमांशी संवाद साधला. 


सविस्तर वृत्त थोड्याच वेळात...

रुग्णाच्या श्वासातूनही पसरु शकतो ओमायक्रॉन, तज्ज्ञांचा इशारा

कोरोना व्हायरसच्या इतर व्हेरियंट्सच्या तुलनेत नवा व्हेरियंट ओमायक्रॉनचा संसर्ग अधिक वेगानं होतो. यापूर्वी खोकताना किंवा शिंकताना नाका-तोंडातून बाहेर येणाऱ्या ड्रॉपलेट्समुळे संसर्ग पसरत होता. परंतु, आता श्वासातूनही संसर्ग पसरत असल्याचं दिसून येत आहे. तज्ज्ञांनी ओमायक्रॉनपासून सावध राहण्याचा इशारा दिला आहे. 


न्यू अँड इमर्जिंग रेस्पिरेटरी व्हायरस थ्रेट्स अॅडव्हायझरी ग्रुपचे (Nervtag) प्रोफेसर पीटर ओपेनशॉ यांनी दिलेल्या माहितीनुसार, "ब्रिटनमध्ये जवळपास 90 टक्के रुग्णांसाठी ओमायक्रॉन व्हेरियंट जबाबदार आहे. लवकरच हे प्रमाण डेल्टा व्हेरियंटपेक्षा जास्त होणार आहे. अनेक संशोधनांमध्ये ओमायक्रॉनची लक्षणं सौम्य असल्याचा दावा करण्यात आला आहे. यूकेमधील एका अहवालानुसार, ओमायक्रॉनची बाधा झाल्यानंतर रुग्णालयात दाखल होण्याचा धोका इतर व्हेरियंट्सच्या तुलनेत 50 ते 70 टक्क्यांपर्यंत कमी आहे."


सविस्तर वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यात भीषण अपघातात चार महिला मजुरांचा मृत्यू

नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यात बोलेरो पिकअप व्हॅनच्या भीषण अपघातात चार महिला मजुरांचा मृत्यू झाला असून इतर पाच महिला मजूर गंभीर जखमी आहे....


आज पहाटे काटोल तालुक्यातील ईसापुर - घुबडमेट रस्त्यावर हे अपघात झाले... 



परिसरातील संत्राच्या बगीच्यात संत्रा तोडण्यासाठी ह्या महिला मजूर एका बोलेरो पिकअप व्हॅन ने जात होत्या... 


पहाटे चारच्या सुमारास बोलेरो वाहनचालकाचा नियंत्रण सुटला आणि बोलेरो रस्त्याच्या कडेला असलेल्या एका झाडावर जाऊन आदळली...


त्याच्यामध्ये तीन मजुरांचा जागीच मृत्यू झाला... तर एक महिला मजुरीचा रुग्णालयात नेताना मृत्यू झाला आहे... इतर पाच जणींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे...


मनीषा सलाम, मंजुळा उईके, कलाताई परतेती व मंजुला धुर्वे असे मृत महिला मजुरांचे नाव आहे...

95व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी भारत सासणे

#BREAKING : 95व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी भारत सासणे, उदगीरमध्ये होणार आहे साहित्य संमेलन

Petrol-Diesel Price 02 January 2022 : देशात नववर्षाच्या दुसऱ्या दिवशीही पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर

Petrol-Diesel Price 02 January 2022 : भारतीय तेल कंपन्यांनी पेट्रोल (Petrol) आणि डिझेल (Diesel) चे ताजे दर जारी केले आहेत. राष्ट्रीय बाजारात नव्या वर्षाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच, आज 2 जानेवारी 2022 रोजीही पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. देशपातळीवर पेट्रोल-डिझेलच्या किमती (Fuel Price) स्थिर आहेत. 

तूर्तास लॉकडाऊनचा विचार नसला तरी, कोरोनाबाधितांची वाढती आकडेवारी पाहता निर्बंध वाढवणार : राजेश टोपे

दिवसेंदिवस ओमायक्रॉन व्हेरियंटचा प्रादुर्भाव वाढत चाललाय..))दररोज येणारी आकडेवारी पाहता कोरोनाचा गुणाकार सुरु झालाय असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही. त्यामुळं राज्य सरकार पुन्हा लॉकडाऊन लावणार का असा प्रश्न संपूर्ण महाराष्ट्राला पडलाय. आणि या प्रश्नाचं उत्तर स्वतः आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिलंय. तूर्तास लॉकडाऊनचा विचार नसला तरी, कोरोनाबाधितांची वाढती आकडेवारी पाहता निर्बंध वाढवणार असल्याचं राजेश टोपेंनी स्पष्ट केलंय. तर लॉकडाऊनचा निर्णय हा ऑक्सिजनची गरज आणि बेडच्या उपलब्धतेनुसार घेतला जाईल असं राजेश टोपे म्हणाले. 

केंद्र सरकारचं राज्यांना पत्र; गृह विलगीकरणातील रुग्णांवर लक्ष ठेवण्यासाठी विशेष पथक नेमण्याची सूचना

देशभरात  कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्यानं केंद्र सरकारनं सर्व राज्यांना तातडीनं पत्र पाठवलंय. या पत्रात राज्य सरकारला महत्त्वाच्या सूचना करण्यात आल्या आहेत. फिल्ड हॉस्पिटलची उभारणी करण्यात यावी, गृह विलगीकरणात असलेल्या रुग्णांवर देखरेख ठेवण्यासाठी विशेष पथक नेमण्यात याव यासारख्या अनेक सूचना केंद्र सरकारकडून करण्यात आल्यात.

मध्य रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी

मध्य रेल्वेवर लोकलनं प्रवास करण्याचे तुमचे काही प्लॅन असतील तर पुन्हा एकदा विचार करा. कारण मध्य रेल्वेवर प्रवास करताना तुमचे हाल होण्याची शक्यता आहे. मध्य रेल्वेच्या ठाणे ते दिवा मार्गावर 24 तासांचा जम्बो ब्लॉक घेण्यात येतोय.  पाचव्या सहाव्या मार्गिकेसाठी 24 तासांचा ब्लॉक घेण्यात येतोय. या दरम्यान ठाणे ते कल्याण मार्गावर अप आणि डाऊन धीम्या लोकल गाड्या पूर्णपणे बंद असणारेय. तर 200 लोकलच्या फेऱ्या देखील रद्द करण्यात आल्यात.

पार्श्वभूमी

Maharashtra Breaking News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...


पंतप्रधानांनी 12 कोटींची मर्सिडीज बेन्झ घेतली, आतातरी फकीर म्हणून घेऊ नये : संजय राऊत 


शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सामना (Saamana)च्या रोखठोक (Rokhthok) कॉलममधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे.  2021 साल सरले, पण 2022 या वर्षात आशेची किरणे दिसतील काय? असा सवाल करत राऊत यांनी पंतप्रधानांनी खरेदी केलेल्या गाडीवरुन देखील टीका केली आहे. राऊत म्हणाले की,  महागाई, बेरोजगारीवर उपाय नाही. पंतप्रधान मोदींसाठी 12 कोटींची नवी मर्सिडीज बेन्झ गाडी आता खरेदी केली. त्यातून सरकारची भ्रमंती चालली आहे, असं राऊत यांनी म्हटलं आहे. 


खासदार राऊत यांनी लिहिलं आहे की, 2021 अनेक जळमटे तशीच ठेवून सरले आहे. तेच निर्बंध, तेच सर्व प्रश्न 2022 च्या झोळीत टाकून 2021 सरले तेव्हा लोकांनी फार मोठा जल्लोष केला असे चित्र दिसले नाही. 2020 मावळताना 2021 वर्षाला गोंधळ व अराजकाची भेट दिली. 2021 ने 2022 ला तोच नजराणा पुढे दिला. मावळते प्रत्येक वर्ष देशाला निराशा आणि अराजक देत आहे. आपले पंतप्रधान मोदी हे जगासमोर गंगास्नान करतात. म्हणून देशातल्या लोकांचे नैराश्य दूर झाले नाही किंवा कोरोना वाहून गेला नाही. तो कायम आहे. 28 डिसेंबर रोजी देशभरातील सर्व माध्यमांनी पंतप्रधान मोदी यांच्यासाठी विकत घेतलेल्या 12 कोटी रुपयांच्या नव्या मर्सिडीज गाडीचे छायाचित्र छापले. स्वतःस फकीर म्हणवून घेणाऱ्या, प्रधान सेवक म्हणून वावरणाऱ्या पंतप्रधान मोदी यांनी परदेशी बनावटीची गाडी घेतली. पंतप्रधानांची सुरक्षा, आराम वगैरे गोष्टी महत्त्वाच्या, पण त्यापुढे आपण फकीर असल्याचा पुनरुच्चार प्रधान सेवकांनी करू नये, असं राऊतांनी म्हटलं आहे. 


गांधी घराण्याच्या साहसाचं केलं कौतुक
राऊत पुढं लिहितात, मेक इन इंडिया, स्टार्ट अप इंडिया, स्वदेशीचा उपक्रम ज्या पंतप्रधानांनी सुरू केले, तेच परदेशी बनवटीच्या गाड्या वापरतात. पंडित नेहरू यांनी सदैव हिंदुस्थानी बनावटीची अॅम्बेसेडर गाडी वापरली. फाळणीनंतर त्यांच्या जीवितास सर्वांत जास्त धोका होता. महात्मा गांधी तर बेडरपणे भ्याड खुनी हल्ल्यास सामोरे गेले. जिवास प्रचंड धोका असतानाही इंदिरा गांधींनी त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेतील शीख रक्षक बदलले नाहीत. तामीळनाडूच्या गर्दीत राजीव गांधी गेले व लिट्टेकडून मारले गेले. हे त्यांचे साहस होय. त्यांनी असे साहस करायला नकोच होते, पण केले. पंतप्रधान मोदींची 12 कोटींची बुलेटप्रूफ, बॉम्बप्रूफ कार म्हणून महत्त्वाची आहे, असं राऊत यांनी म्हटलं आहे. 



नवे वर्ष कोणत्या आशांची किरणे दाखवणार?



राऊत यांनी म्हटलं आहे की, राजकारण्यांची विश्वासार्हता रसातळाला नेणारे वर्ष मावळले म्हणत नवे वर्ष कोणत्या आशांची किरणे दाखवणार? देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नापेक्षा कर्ज अधिक या स्थितीत आपण चाललो आहोत. पेट्रोल, डिझेलचे भाव कमी करणे आता अशक्यप्राय बनले आहे. पेट्रोल-डिझेलचे भाव वाढले ते नेहरूंच्या धोरणांमुळेच असे खापर फोडून मोदी व सरकार 12 कोटींच्या नव्या मर्सिडीज बेन्झ गाडीत विराजमान झाले आहेत. मोदी यांचे वृत्तवाहिन्यांवरील रोजचे 'दर्शन' पाहिले तर तेच स्वतः भ्रमंतीसाठी वेळ आणि पेट्रोल किती खर्च करीत आहेत ते लक्षात येते. मंत्र्यांच्या मोटारी, उद्योगपती, बड्या नेत्यांची चार्टर विमाने उडतच आहेत आणि लोकांना मात्र उपदेशाचे डोस पाजले जात आहेत. नव्या वर्षाच्या शुभेच्छा देताना सामान्य लोकांना एकच विनंती करायची आहे, झाले ते पुरे झाले. 2022 सालात तरी शहाणे व्हा! नेते व मंत्री रोज खोटे बोलतात. त्यांचे इतके मनावर घेऊ नका. कारण शेवटी चुकीच्या माणसांना अंबारीत बसविण्याचे कार्य तुमच्याच हातून घडत असावे, असं राऊत यांनी म्हटलं आहे. 

 


 

रविवारी दोन जानेवारी 2022 रोजी मध्य रेल्वे आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. मध्य रल्वेचा मेगा ब्लॉक हा 24 तासांचा असणार आहे. ठाणे-दिवा मार्गावरील पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेचे काम त्वरित पूर्ण करण्यासाठी 24 तासांचा जम्बो ब्लॉक घेण्यात आला आहे. तर, हार्बर मार्गावरही दुरुस्तीच्या कामासाठी रविवारी मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. 


2 जानेवारी पासून रेल्वे ठाणे-दिवा मार्गावर 24 तासांचा मेगाब्लॉक घेणार आहे.  रविवारी मध्यरात्री 2 वाजल्यापासून ते सोमवारी मध्यरात्री दोन वाजेपर्यंत हा ब्लॉक असणार आहे, अशी माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली आहे. एक जानेवारीला रात्री 11.43 पासून ते दोन जानेवारीला रात्री 11.43 पर्यंत सीएसएमटीकडे जाणाऱ्या कल्याणहून सुटणाऱ्या अप आणि जलद गाड्या कल्याण आणि मुलुंड दरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येणार आहेत. या गाड्या ठाकुर्ली, कोपर, मुंब्रा आणि कळवा स्थानकावर थाबंणार नाहीत. पुढे मुलंड स्थानकावर अप धीम्याा मार्गावर पुन्हा वळवल्या जातील. त्यामुळे या सर्व लोकल नियोजित वेळेपेक्षा दहा मिनिटे उशीराने पोहोचतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून निघणाऱ्या डाऊन धीम्या, अर्ध जलद सेवा मुलुंडहून दोन जानेवारी रोजी 5.05 पासून ते 3 जानेवारी मध्यरात्री 1.15 पर्यंत मुलुंड व कल्याण स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर धावतील. या लोकल कळवा, मुंब्रा, कोपर व ठाकुर्ली स्थानकावर थांबणार नाहीत, अशी माहिती मध्य रेल्वेने दिली. 



- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.