Maharashtra Breaking News LIVE Updates : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एका क्लिकवर...

Maharashtra Breaking News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

abp majha web team Last Updated: 06 Feb 2022 10:09 AM
उद्या डब्बेवाल्याची सेवा बंद

राज्य सरकारने भारताच्या गानकोकिळा, भारतरत्न स्व. लता मंगेशकर (दीदी )यांच्या निधनानिमित्त 3 दिवसीय राज्य दुखवटा जाहीर केला आहे, त्यामध्ये मुंबई डब्बावाला संघटना सहभागी आहे. त्यामुळे उद्या सोमवार, दिनांक 7 फेब्रुवारी 2022 रोजी डब्बे व्यवसाय बंद ठेवण्यात येणार आहे. व त्यामार्फत ताईंना श्रद्धांजली अर्पण करण्यात येणार आहे. याची सर्व डब्बेवाला कामगारांनी नोंद घ्यावी. 

परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसारच होणार 

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणातर्फे (म्हाडा) सरळसेवा भरतीअंतर्गत  अतांत्रिक पदासाठी सोमवार, दि. ०७ फेब्रुवारी, २०२२ रोजी आयोजित परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसारच होईल, अशी माहिती 'म्हाडा'चे सचिव श्री राजकुमार सागर यांनी दिली. 


म्हाडा सरळसेवा भरती प्रक्रियेअंतर्गत अतांत्रिक संवर्गातील सहायक, वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक-टंकलेखक या पदांसाठी नियोजित केलेल्या वेळापत्रकानुसार सोमवार दि. ७ फेब्रुवारी, २०२२ रोजी सकाळी ०९.०० वाजेपासून ते ११.०० वाजेपर्यंत, दुपारी १२.३० वाजेपासून ते २.३० वाजेपर्यंत तर दुपारी ४ वाजेपासून ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत अशा तीन सत्रांत परीक्षा होणार आहे, याची सर्व अर्जदारांनी नोंद घ्यावी असे आवाहन मंडळाचे सचिव श्री. राजकुमार सागर यांनी केले आहे.

गेवराई : पाण्यात बुडून चार मुलांचा मृत्यू..

गेवराई तालुक्यातील शहाजनपुर चकला या ठिकाणी सिंदफणा नदीत बुडून चार मुलांचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे शहाजनपुर चकला येथील संजय कोळेकर बबलू वकटे. आकाश सोनवणे आणि गणेश इनकर अशी या मुलांची नाव असून हे सर्वजण 12 ते 15 वर्ष वयाचे आहेत.


हे चोघे ही सिंदफणा नदी पार करत असताना पाण्याच्या डोहात बुडून त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे गेल्या अनेक दिवसापासून सिंधफणा नदी मधून या अवेद्यपद्धतीने वाळूचा उपसा केला जात आहे त्यामुळे नदीमध्ये मोठमोठे डोह निर्माण झाले आहेत आणि याच डोहातील पाण्याचा अंदाज या मुलांना आला नाही आणि त्यामुळे या चौघाजणांचा दुर्दैवी मृत्यू पाण्यात बुडून झाला आहे या सर्व प्रकरणानंतर आता गावकऱ्यांनी वाळू उपसा करणार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

महापौर किशोरी पेडणेकर यांना दिली फडवणीस यांनी लिफ्ट 

गोवा येथे प्रचारासाठी मुंबई महापौर किशोरी पेडणेकर होत्या अचनाक लता मंगेशकर यांच्या निधन बातमी आली मुंबईच्सा पहिल्या नागरिक असणार्या महापौर पेडणेकर यांना पणजी येथून मुंबईकडे सकाळी फ्लाईट मिळत नव्हते त्यानंतर फडवणीस यांच्याशी महापौर पेडणेकर यांनी संपर्क करत गोवातून येणार्या चार्टर मध्ये लिफ्ट फडवणीस यांनी दिली. फडवणीस, गोवा सीएम प्रमोद सावंत अणि गिरीश महाजन हे चार्टर यांनी गोवातून मुंबईला आले त्यात महापौर पेडणेकर यांना विमानातून आले.  फडणवीस आणि महापौर यांच्यातील वाद तसच महापौर यांनी मिसेस फडणवीस यांच्यावर केलेली टीका.  शिवेसना आणि भाजपा उडत असलेले दररोज खटके अशातच नाजूक प्रसंगात महापौर आणि फडवणीस यांचा राजकीय प्रवास चर्चेचा विषय झाला

उद्या बीएससी म्हणजेच बॉम्बे स्टॉक एक्सचेंज सुरु राहणार, बीएससीने दिली माहिती

उद्या बीएससी म्हणजेच बॉम्बे स्टॉक एक्सचेंज सुरु राहणार आहे. बीएससीने यासंदर्भात माहिती दिली आहे. उद्या लता दीदींच्या निधनामुळे राज्य सरकारकडून सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे.

यवतमाळ : स्मशानभूमीसाठी एक तासापासून गावकऱ्यांचा रास्ता रोको आंदोलन

यवतमाळ : चंद्रपूर राज्यामहामार्गवर गावकऱ्यांनी सुमारे एक तासापासून रास्ता रोको आंदोलन केले आहे. सुनंदा राठोड या महिलेचा आज वृद्धापकाळाने मृत्यू झाला. त्यानंतर अंत्यसंस्कार करायचे कुठं असा प्रश्न नातलगांना आणि गावकऱ्यांना निर्माण झाल्याने आंदोलन करण्यात आलं. पूर्वी ज्या ठिकाणी अंत्यसंस्कार व्हायचे ती जागा आता उपलब्ध नाही त्यामुळे स्मशानभूमी साठी जागा मिळावी यासाठी रस्त्यावर लाकडं ओंडके टाकून आंदोलन करण्यात आलं. यामुळे रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.

बुलढाणा जिल्ह्यात सातही आगारातून बससेवा सुरु, 50 बसेस रस्त्यावर, प्रवाशांना दिलासा

बुलढाणा जिल्ह्यात सात आगारातून काही प्रमाणात बस सेवा सुरू झाल्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. एसटीच्या उत्पन्नातही वाढ झाली आहे. जिल्ह्यातील सात आगारातून 50 बसेस रोज धावत असून बुलढाणा आगाराला आता दिवसाला चार लाखापेक्षा जास्त उत्पन्न मिळू लागलं आहे. एकीकडे एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरूच असून काही कर्मचारी मात्र कामावर परतले असून यामुळे बस फेऱ्या सुरू झाल्याने प्रवाशांना मात्र दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यातून लांब पल्ल्याच्या बसेसही सुरू करण्यात आल्या आहेत.

गोंदिया जिल्ह्यात थंडीचा जोर वाढला... 10 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद

गोंदिया जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून थंडीचा जोर ओसरत असताना पुन्हा वातावरणातील बदलामुळे थंडी वाढत असतानाचे चित्र दिसत आहे. गेल्या दोन दिवसांपासून थंडीत वाढ झाल्याचे दिसून आले. आज जिल्ह्यात कमाल तापमान 28 अंश तर किमान तापमान 10 अंश सेल्सिअसची नोंद करण्यात झाली आहे. 

सोमय्या यांच्यावर हल्ल्याचा कट पूर्वनियोजित - प्रविण दरेकर

भाजप नेते प्रविण दरेकर यांनी सरकारवर निशाणा साधत म्हटलं आहे की, सोमय्या यांच्यावर हल्ल्याचा कट पूर्वनियोजित होता. 100 ते 150 शिवसैनिकांनी हा कट पार पाडला. राज्यात कायदा  आणि सुव्यवस्था नाही. झेड सिक्युरिटीच्या कवचात असलेल्या नेत्यावर जीवघेणा हल्ला लज्जास्पद आहे. 

किरीट सोमय्या यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी आठ शिवसैनिकांविरोधात गुन्हा दाखल

भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर शनिवारी पुणे महानगरपालिकेत हल्ला करण्यात आला होता. शिवसेनेचे पुणे शहराध्यक्ष संजय मोरे आणि त्याची काही साथीदार सोमय्या यांना निवेदन देण्यासाठी गेले होते. परंतु त्या ठिकाणी झटपट झाल्यानंतर शिवसैनिकांनी सोमय्या यांच्यावर हल्ला केला होता. पुण्याच्या शिवाजीनगर पोलिस ठाण्यात या प्रकरणी सात ते आठ शिवसैनिकांनी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

उदयनराजेंनी रूग्णालयात घेतली सोमय्यांची भेट

खासदार उदयनराजे यांनी किरीट सोमय्या यांची रूग्णालयात जाऊन भेट घेतली.



मराठीचे आणि महाराष्ट्राचे शत्रू केंद्र सरकार पोसतंय - संजय राऊत

मराठीचे आणि महाराष्ट्राचे शत्रू भाजपचे केंद्र सरकार पोसत असल्याचा आरोप शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केला आहे. मराठीचे आणि महाराष्ट्राचे शत्रू आपणच कसे पोसतोय हे आता रोज दिसत असल्याचे त्यांनी म्हटले. केंद्रीय तपास यंत्रणांच्या विरोधात महाराष्ट्रातही स्फोट झाल्यास तेव्हा भाजप काय करेल, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. शिवसेनेचे मुखपत्र सामनामधील 'रोखठोक' या स्तंभात संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

पार्श्वभूमी

Maharashtra Breaking News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...


OBC Political Reservation : ओबीसी राजकीय आरक्षणाबाबत मोठी बातमी समोर आली आहे. राज्य मागासवर्ग आयोगाचा अंतरिम अहवाल पूर्ण झाला असल्याची माहिती आहे.  आज सकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना अहवालाचा मसुदा सोपवला जाणार आहे.  8 फेब्रुवारीला ओबीसी राजकीय आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी होणार आहे.  महाराष्ट्र शासनाच्या वेगवेगळ्या आठ विभागांकडून देण्यात आलेली ही माहिती आहे. आता हा अहवाल मुख्यमंत्र्याना सादर करण्यात येईल.  त्यानंतर तो आठ तारखेला सर्वोच्च न्यायालयात सादर करण्यात येईल.



राज्य सरकारने वेगवेगळ्या विभागांच्या योजनांसाठी वापरली जाणारी आकडेवारी राज्य मागासवर्गीय आयोगाला उपलब्ध करून दिल्यानंतर मागील बैठकीत राज्य मागासवर्गीय आयोगाने ओबीसी आरक्षणासाठी अहवाल तयार करण्याचे काम सुरु केले होते.  ओबीसी आरक्षण दीर्घकालीन मिळावे यासाठी आवश्यक असलेला इंपिरिकल डेटा गोळा करण्यासाठी राज्य सरकारने चारशे कोटींहून अधिक रकमेची तरतूद केलीय. या निधीपैकी पहिल्या टप्प्यातील 80 कोटीहून अधिकचा निधी राज्य मागासवर्गीय आयोगाला प्राप्त झाला असून यामुळे इंपिरिकल डेटा गोळा करण्याच्या कामाला सुरुवात होणार आहे.


ओबीसी राजकीय आरक्षणासाठी सहा विभागाचा मिळून एकत्रित डेटा जमा 


राज्य सरकारनं सहा विभागाचा मिळून एकत्रित डेटा जमा केला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत इतर मागासवर्गीयांचे म्हणजे ओबीसीचे आरक्षण पूर्ववत करण्यासाठी आवश्यक सांख्यिकी राज्य सरकारने तयार ठेवली आहे. राज्य सरकारच्या विविध संस्था आणि शासकीय प्रणालीद्वारे काढलेल्या माहितीनुसार राज्यात ओबीसी समाज 40 टक्के ओबीसी विद्यार्थ्यांचे प्रमाण 30 टक्के तर ओबीसी शेतकऱ्यांचे प्रमाण 39 टक्के असल्याचे सुचवण्यात आले आहे. 


गोखले इन्स्टिट्यूट, सामाजिक न्याय विभाग, सरल संख्यांकी, बार्टी पुणे , ग्रामीण भारत डेटा आणि एकत्रित जिल्हा माहिती प्रणाली या सगळ्यांचा वापर करून ही माहिती राज्य सरकारने जमा केली आहे. महाराष्ट्रात पहिल्यांदाच ओबीसी समाजाचा प्रमाण किती हे स्पष्ट झालं आहे.


 


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha


- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.